________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
चूक दाखवली तर आम्ही ते लगेचच एक्सेप्ट (स्वीकार) करतो. कोणी म्हटले की ही तुमची चूक आहे, तर आम्ही सांगू की, 'हो भाऊ, तू आम्हाला आमची चूक दाखवलीस म्हणून तुझे उपकार.' आम्ही असेच समजतो की त्याने चूक दाखवली म्हणून त्याचे उपकार, मग दोष आहे की नाही याचा शोध घ्यायचा नाही. त्यांना दिसत आहे म्हणून दोष आहेच. माझ्या कोटामागे लिहिले असेल की, 'दादा चोर आहेत'. मग लोक मागे बोलतील की नाही? 'दादा चोर आहे.' असे का बोलतात? कारण माझ्या कोटाच्या मागे तसे लिहिले आहे, बोर्ड लावला आहे ना, तो त्यांना दिसतो! तो बोर्ड जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजते की हो, मागे बोर्ड लावला आहे. जरी दुसरा कोणी लिहून गेला असेल, पण या सर्वांना वाचता तर येते ना!
प्रश्नकर्ता : दादांनी आप्तवाणीत असे लिहीले आहे की, 'दादा चोर आहेत.' असे जर कोणी लिहीले तर, त्याचा महान उपकार, मानावा असे लिहीले आहे.
दादाश्री : हो लिहीले आहे. प्रश्नकर्ता : म्हणजे ते कसे?
प्रश्नकर्ता : हो, जर उपकार मानले नाही तर त्यात तुमचा संपूर्ण अहंकार वर येऊन द्वेषात परिणमित होईल. त्याचे काय नुकसान होणार आहे? त्याच्या बापाचे काय जाणार आहे? तो तर दिवाळखोर होऊन उभा राहील आणि तुम्ही मात्र स्वतःचे दिवाळे काढले. स्वत:चे दिवाळे निघू नये यासाठी तुम्ही म्हटले पाहिजे, 'भाऊ, तुझा उपकार आहे!' आपले दिवाळे निघू नये म्हणून. तो तर दिवाळा काढूनच बसला आहे. त्याला काय? त्याला जगाची पडलेली नाही. तो तर वाटेल ते बोलेल. बेजबाबदारीचे वाक्य कोण बोलतो? तर ज्याला स्वत:च्या जबाबदारीचे भान नाही तोच. मग आपणही त्यांच्या सोबत भुंकू लागलो तर आपण सुद्धा कुत्राच म्हटले जाऊ. म्हणून आपण म्हणावे, 'तुझे खूप उपकार आहे.'