________________
निजदोष दर्शनना ने... निर्दोष
स्वत:ची संपूर्ण स्वतंत्रता, आझादी हवी असेल तर स्वत:च्या सर्व चुका संपल्यावरच मिळेल. चूक केव्हा सापडते? जेव्हा 'स्वतः कोण आहे?' याचे भान होते, परमात्म्याचा साक्षात्कार होतो, तेव्हा!
जगाचा मालक कोण? या ब्रह्मांडातील प्रत्येक जीव ब्रह्मांडाचा मालक आहे. मात्र स्वत:चे भान नसल्यामुळे जीवदशेत राहतो. ज्याला स्वत:च्या देहावर सुद्धा मालकीपणाचा भाव नाही तो संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक झाला! हे जग आपल्या मालकीचे आहे असे लक्षात आले, हाच मोक्ष! अद्याप हे का समजले नाही? कारण आपल्याच चुकांनी आपण बांधले गेलो आहोत म्हणून. संपूर्ण जग आपल्याच मालकीचे आहे.
__ आमचा वरिष्ठ कोणीच नाही. वरती कोणी बॉस आहे किंवा कोणी बाप बसलेला आहे, असे नाही. जे आहात ते तुम्हीच आहात आणि तुम्हाला शिक्षा देणाराही कोणी नाही तसेच तुम्हाला जन्म देणारा सुद्धा कोणी नाही. तुम्ही स्वत:च जन्म घेता आणि देह धारण करता आणि मग परत जाता आणि परत येता. जाता आणि येता. तुमच्या मर्जीप्रमाणे व्यवहार चालत आहे. हिंदुस्तानात येईपर्यंत तर समजा सर्व नैसर्गिक, साहजिकरित्या होत आहे पण एकदा हिंदुस्तानात आल्यानंतर थोडेफार समजते की आपल्याकडून काहीतरी चूक घडत आहे.
समंजस माणूस इतकेच जरी समजला की, खरोखर माझ्यात इतर कुणीही हस्तक्षेप करु शकेल, दुःख देऊ शकेल असे नाही? तर आम्ही सांगू की, 'नाही, नाही, नाहीच!!!' आणि जर विचारेल की मग 'माझा वरिष्ठ सुद्धा कुणी नाही?' तेव्हा सांगू 'नाही, नाही, नाही!!!' तुझा वरिष्ठ तुझ्या ब्लंडर्स आणि मिस्टेक्स आहेत. ब्लंडर्स कसे तोडावे? तर आम्ही त्याला सांगू की 'भाऊ, त्यासाठी तर तू इथे ये.' आणि मिस्टेक्स कशा संपवाव्यात? तर ते आम्हाला तुला समाजावून सांगावे लागेल. त्यानंतर तू त्यांना संपव. आम्ही रस्ता दाखवू. म्हणजे मिस्टेक्स तुला संपवायच्या आणि ब्लंडर्स आम्ही तोडून देऊ.