________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
आहे' हीच मूळ चूक आहे, मुख्य चूक हीच आहे. हा आरोपित भाव आहे, हा खरा भाव नाही. जसे इथे कोणी इंदिरा गांधी सारखे कपडे घालून आली आणि सर्वांना म्हणाली की 'मी इंदिरा गांधी आहे.' आणि असे सांगून त्याचा फायदा घेतला तर त्याचा गुन्हा लागू होणार की नाही? त्याचप्रमाणे 'मी चंदुभाऊ आहे,' याचा निरंतर फायदा घेत राहतो. हा आरोपित भाव म्हटला जातो, तोच गुन्हा आहे. ___ म्हणजे तुमच्या चुका आणि तुमचे ब्लंडर्स हे दोनच तुमचे वरिष्ठ आहेत. तुमचे ब्लंडर्स कोणकोणते असतील? 'मी चंदुभाऊ आहे' हे पहिले ब्लंडर.' 'मी यांचा मुलगा आहे' हे दुसरे ब्लंडर. 'मी हिचा नवरा आहे' हे तिसरे ब्लंडर. 'मी ह्या मुलाचा बाप आहे' हे चौथे ब्लंडर. असे किती ब्लंडर्स केले असतील?
प्रश्नकर्ता : अनेक केले असतील.
दादाश्री : हो. ह्या ज्या ब्लंडर्स आहेत त्या तुमच्याकडून तुटणार नाहीत. आम्ही ब्लंडर्स तोडून देतो आणि नंतर ज्या मिस्टेक्स आहेत त्या मग तुम्ही काढायच्या. कुणी वरिष्ठ नाही. मग उगाच कसली भीती! तुम्हाला हे समजले ना की कुणीही वरिष्ठ नाही? पक्की खात्री झाली ना?
चुका केव्हा समजतात? लोक मानतात की देव वरिष्ठ (उपरी) आहेत, म्हणून देवाची भक्ती केली तर आपण सुटून जाऊ. पण नाही, कोणी बापही वरिष्ठ नाही. तूच तुझा मालक, तुझा रक्षकही तूच आणि तुझा भक्षकही तूच. यु आर होल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबल फॉर युवरसेल्फ (तुम्हीच स्वतःसाठी संपूर्ण जबाबदार आहात.) स्वतःच स्वतःचे वरिष्ठ आहात. यात दुसरा कोणी बापही हस्तक्षेप करत नाही. आपला वर कोणी बॉस आहे ते सुद्धा आपल्या चुकांमुळेच आहे आणि अंडरहॅन्ड आहे, तेही आपल्या चुकांमुळेच आहे. म्हणून चुका तर संपवाव्याच लागतील ना?