________________
निजदोष दर्शनना ने...निर्दोष
दोष नसतानाही बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून हा जो बोलत आहे, ती तुमची जी चूक आहे, त्याचाच तो मोबदला देत आहे. हो, ती तुमच्या मागील जन्माची चूक आहे, त्या चुकीचा बदला हा मनुष्य तुम्हाला देत आहे. तो निमित्त आहे आणि चूक तुमची आहे म्हणूनच तो बोलत आहे.
आपली चूक आहे म्हणूनच तो बोलत आहे, म्हणजे तो मनुष्य आपल्याल्या त्या दोषातून मुक्त करत आहे. तेव्हा त्याच्यासाठी भाव बिघडवू नये. उलट आपण असे म्हटले पाहिजे की, 'हे प्रभु! त्याला सद्बुद्धी द्या.' इतकेच म्हटले पाहिजे, कारण तो निमित्त आहे.
चावा घेतात निमित्ताचा आम्हाला तर कोणत्याही मनुष्यासाठी खराब विचार सुद्धा येत नाहीत. बरे-वाईट करुन गेला तरीही खराब विचार नाही! कारण ती त्याची दृष्टी, त्या बिचाऱ्याला जसे दिसते तसे तो करतो. त्यात त्याचा काय दोष? आणि वास्तवात, एक्जेंटली हे जग काय आहे ? तर या जगात कोणी दोषी नाहीच. तुम्हाला दोष दिसतो, ते तुमच्या बघण्याच्या दृष्टीत फेर आहे. मला आत्तापर्यंत कोणी दोषी दिसलेच नाही. अर्थात कोणीही दोषी नाहीच, असे मानूनच तुम्ही चला ना! आपले शेवटचे स्टेशन आहे, ते सेंट्रल आहे असे मानून चालले तर त्यात फायदा होईल की नाही? तुम्हाला काय वाटते?
प्रश्नकर्ता : हो, फायदा होतो.
दादाश्री : कोणी दोषी नाही असे जाणून घ्याल तरच इतर सर्व निर्दोष वाटतील आपल्याला! कारण आपण निमित्त आहोत. आणि ते बिचारेही निमित्त आहेत. आपले लोक निमित्ताचाच चावा घेतात. निमित्ताचा चावा घेणे, असे करतात का कधी? नाही ना? निमित्ताचा चावा घेतात का?
प्रश्नकर्ता : हो, आम्ही निमित्ताचाच चावा घेत असतो, पण असे करायला नको ना?