________________
ज्ञान जाणले हे तेव्हाच म्हणता येईल की त्यानंतर ठोकर लागत नाही. कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) या सर्व ठोकराच आहेत! आणि तोपर्यंत भटकणेच आहे! कषायांचा पडदा दुसऱ्यांचे दोष दाखवतो! कषाय प्रतिक्रमणाने जातात!
मोक्ष प्राप्तीसाठी कर्मकांड किंवा क्रिया करण्याची गरज नाही, फक्त आत्मा जाणण्याची गरज आहे, जग निर्दोष पाहण्याची गरज आहे!
तरी देखील ज्यांना जसे अनुकूल वाटेल तसे ते करतील, कुणाची टीका करण्याची गरज नाही. नाहीतर त्याच्याबरोबर नव्या कराराने बांधले जाऊ.
स्वकर्माच्या आधारावरच स्वत:ला भोगावे लागते त्यात मग दुसऱ्या कुणाचा काय दोष?
महावीरांचा खरा शिष्य कोण? ज्याला लोकांचे दोष दिसणे कमी झाले आहे ! जरी संपूर्ण दशेत नाही पण सुरुवात तर झाली!
धर्मात एकमेकांचे दोष दिसतात ते तुझे-माझे या भेद बुद्धीने. आणि म्हणूनच श्रीमद् राजचंद्रानी असे म्हटले आहे की,
'गच्छ मतनी जे कल्पना, ते नहीं सद्व्यवहार.' ('गच्छ-मताची जी कल्पना, तो नाही सद्व्यवहार.')
दादाश्री सांगतात की, 'आता आमच्याकडून जे काही बोलले जात आहे ते मागील जन्मात रेकॉर्ड झालेलेच बोलले जात आहे. मागील जन्मात चुकीचे रेकॉर्ड झाले होते त्यामुळे काही धर्मात 'ही चूक आहे' असे बोलले जाते. पण आजचे ज्ञान-दर्शन त्यास संपूर्ण निर्दोष पाहते आणि जे बोलले जाते त्याचे लगेचच प्रतिक्रमण होऊन स्वच्छ होऊन जाते!'
अक्रम मार्गात दादाश्रींचे आश्चर्यजनक ज्ञानीपद प्रकट झाले आहे, या काळात! कुणाच्याही कल्पनेत सुद्धा येऊ शकणार नाही
२२