Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 13
________________ होतात . अरिहंतामध्ये दोन प्रकारचे जीव असू शकतात. तीर्थंकर अरिहंत व सामान्य अरिहंत . सिद्धांचे वर्णन : णमो सिद्धाणं : सिद्ध परमेष्ठींना नमस्कार असो. ज्यांनी चार घातिया व चार अघातिया कर्मांचा नायनाट केला, अभाव केला तेच सिद्ध होतात . ज्ञानाची परम निर्मळ अवस्था. परम औदारिक शरीरापासून वेगळी फक्त ज्ञान शरीरी अवस्था राहते . ऊर्ध्वगमन करीत लोकांच्या अग्रभागी सिद्धालयामध्ये सिद्धशिलेवर जे जीव स्थिर होतात , त्यांना सिद्ध किंवा मुक्त जीव म्हणतात . हे पूर्ण विकसित रूप आहे . त्याच्या पलीकडे विकास होत नाही . एकदा सिद्धदशा प्राप्त झाल्यावर तो जीव संसारात परत येत नाही. तो परमोच्च सुखाचा आस्वाद घेत राहतो. अरिहंताचे औदारिक शरीर आहे . परंतु , जेव्हा त्यांच्या दिव्य शरीराचा अभाव होतो. अर्थात , शरीराचे सारे परमाणू कापराप्रमाणे उडून जातात. एकमात्र निरामय , निरंजन चैतन्यपुंज राहतो, तोच सिद्धात्मा! अरिहंत भगवान काही काळ विहार करीत लोकांना उपदेश देत असतात म्हणून त्यांना आप्त समजून प्रथम वंदन केले आहे . णमो आयरियाणं : __ आचार्य परमेष्ठींना नमस्कार असो . मुनी , आर्यिका , श्रावक , श्राविका अशा चतुर्विध संघाने 'संघाधिपती' म्हणून ज्यांची निवड केलेली असते, त्यांना आचार्य म्हणतात . निर्दोषरीतीने ३६ मुळ गुणांना धारण करून ते संघाचा सांभाळ वात्सल्य भावनेने करतात. तसेच संघातील प्रत्येकास ते शिक्षा देऊन तसेच प्रायश्चित्त स्वीकारून दोषपरिमार्जन करतात . व्रतादी देऊन त्यांना अनुशासन शिकवितात . आचार्यांच्या बाह्य क्रिया जरी कठोर दिसत असल्या तरी त्या संघासाठी योग्य असतात . ते संघाचे नेतृत्व स्वीकारून संघाची सुरक्षितता वाढवितात . दीक्षा व शिक्षा त्यांचे कर्तव्य असते. णमो उवज्झायाणं : उपाध्याय परमेष्ठींना नमस्कार असो. ते जिनप्रणित ग्रंथाचे पारायण, अध्ययन , लिखाण , मनन, चिंतन करून इतरांना त्याच पद्धतीने करवितात . सदाचाराचे आचरण संघात वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न उपाध्याय करतात . आचार्य आज्ञा व आदेश , दीक्षा देतात तर उपाध्याय मात्र उपदेश करतात . ११ अंग व १४ पूर्वांचे ते ज्ञानी असतात . २५ मूलगुणांचे धारी असतात . जैन धर्माची ओळख / २ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98