Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 43
________________ गुरू-उपासना : म्हणजे अशा मुनीची सेवा करणे की , जे पंचव्रतधारी आहेत. तसेच जे दिगंबर , वीतरागी , गृहत्यागी , मन आणि विषयांवर नियंत्रण ठेवतात - त्यांची अर्चना , वंदना करणे . जे संसारास ज्ञानमार्ग , मोक्षमार्ग सांगतात , ते नमस्कार करण्यास योग्य असतात . स्वाध्याय : यामध्ये स्वतःचे अध्ययन येते. स्वाध्यायाला परमतप म्हटले आहे संयम : म्हणजे मन , वचन आणि शरीरावर नियंत्रण . हे नियंत्रण फक्त मनुष्यगतीतच होते . देव व इतर गतीत नाही. संयम दोन प्रकारचा आहे. १) इंद्रिय संयम आणि २) प्राणिसंयम. प्राणिसंयमात दुसऱ्या प्राण्यांबद्दल आस्था व करुणा असते. हा संयम करणे म्हणजे दुर्लभ रत्न प्राप्त करणे होय. दानापेक्षा संयम श्रेष्ठ आहे. विषयचोर सगळीकडे नेहमी फिरत असतात. त्यांना घोड्याप्रमाणेच लगाम लावावा लागतो. तप : असे की, जे लोक आणि परलोक दोन्हींना फलदायी होते . तापवले जाते ते तप . तपाचा उद्देश कर्माचा क्षय करणे असावा. शास्त्रात दोन प्रकारचे तप सांगितले आहे . १) बाह्य व २) आंतरिक. श्रावकाने यथाशक्ती तप करावे. दान : सम्यग्ज्ञानादी गुणशुद्धी तसेच स्वयं व इतरांचे कल्याण व्हावे म्हणून प्रासुक द्रव्याचे दान करतात . दान देताना दात्याचे भाव व दानवस्तूत फरक असतो म्हणून दानफळात भिन्नता असते . जैन धर्माची ओळख / ३२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98