Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 63
________________ जीवासंबंधी : जीव हा जाणतो, पाहतो , अमूर्तिक असतो , कर्ता असतो, भोक्ता असतो , शरीरप्रमाण , संसारी , सिद्ध , ऊर्ध्वगमन करणारा असा असतो. _ 'जीवो उवओगमओ अमृत्ति कत्ता सदेहपरिमाणो। भोत्ता संसारथो सिद्धो सो विस्ससोड्ढगई।' जीवाचे भेद : संज्ञी पंचेंद्रिय जीवास दहा प्राण असतात . पाच इंद्रिय , तीन बळ , आयु आणि श्वासोच्छ्वास . व्यवहारनयाने आठ प्रकारचे ज्ञान आणि चार प्रकारचे दर्शन सामान्यतः जीवाचे लक्षण आहे; तर शुद्ध निश्चयनयाने शुद्ध दर्शन आणि ज्ञान जीवाचे लक्षण आहे . संसारी जीवाचे दोन भेद आहेत . १) स्थावर व २) त्रस. स्थावर म्हणजे पृथ्वी , जल , अग्नी, वायू आणि वनस्पती कायिक जीव. दोन इंद्रियांपासून ते पाच इंद्रियांपर्यंतचे जीव त्रस आहेत . शंख - दोन इंद्रिय , मुंगी - तीन इंद्रिय , माशी - चार इंद्रिय व मनुष्य , नारकी देव , हत्ती, घोडा वगैरे पंचेंद्रिय जीव आहेत . पंचेंद्रिय जीव मनसहित व मनरहित दोन्ही प्रकारचे असतात. एकेंद्रिय जीवांत काही बादर व काही सूक्ष्म असतात आणि सर्वच जीव पर्याप्त व अपर्याप्त असतात . जे स्वयं रोखले जातात तसेच दुसऱ्यांना पण रोखतात किंवा जे आपसात टक्कर देतात , त्यांना बादर जीव म्हणतात . जे जीव दुसऱ्यांना अडवत नाही व दुसऱ्यांकडून रोखले पण जात नाही किंवा एकमेकांशी टक्कर देत नाहीत , ते सूक्ष्म जीव असतात . ज्या जीवांची आहारादी पर्याप्ती पूर्ण होते , ते पर्याप्तक जीव असतात . ज्यांची आहारादी पर्याप्ती पूर्ण होत नाही , ते अपर्याप्त जीव असतात . पर्याप्तीचे सहा भेद आहेत . आहार, शरीर , इंद्रिय, श्वासोच्छ्वास , भाषा आणि मन . हे सहा जेव्हा परिपूर्ण रूपाने असतात , तेव्हा ते पर्याप्त असतात. शरीर हे पाच प्रकारचे असते. १) औदारिक, २) वैक्रियक, ३) आहारक, ४) तैजस आणि ५) कार्माण शरीर. औदारिक शरीर : मनुष्य व तिर्यंचांच्या शरीरास (स्थूल) औदारिक जैन धर्माची ओळख / ५२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98