Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 87
________________ अर्थअवग्रहाचे , ईहाचे ७२, अवायचे ७२ व धारणाचे ७२ मिळून ३३६ भेद होतात . श्रुतज्ञानाचे १) अंगबाह्य व २) अंगप्रविष्ट हे दोन भेद आहेत . अंगप्रविष्टाचे १२ भेद आहेत . वरील पाचही ज्ञानांचे वर्णन पुढे आले आहे. ८) संयममार्गणा : व्रताचे ग्रहण, समितीचे पालन , कषायांचा निग्रह अनर्थदंडाचा त्याग , इंद्रियविषयावर जय या सर्वांना संयम म्हणतात . संयमाचे पाच भेद आहेत. १) सामायिक, २) छेदोपस्थापना, ३) परिहार विशुद्धी, ४) सूक्ष्मसांपराय, ५) यथाख्यात. सामायिकात : सर्व सावध योगाचा त्याग करतात. सामायिकपासून च्युत झाले असताना त्यामध्ये पुनःस्थिर होणे ती , छेदोपस्थापना होय. ही ६ ते नवव्या गुणस्थानी होते. परिहार विशुद्धीत ३० वर्षे सुखी जीवन घालवून नंतर दीक्षा ग्रहण करतात . यथाख्यात संयमात मोहकर्माचा उपशम व क्षय झाल्याने तो आत्म्यात लीन होतो . जीवनसमास १४ आहेत . १) एकेद्रियाचे दोन भेद - बादर, सूक्ष्म २) तीन विकलत्रय - दोन , तीन , चार इंद्रिय ३) पंचेंद्रियाचे दोन भेद - संज्ञी-असंज्ञी यांचे पर्याप्त व अपर्याप्त भेद इंद्रियांचे विषय २८ आहेत . पाच रस , पाच वर्ण , दोन गंध , आठ स्पर्श, सात स्वर , एक मन . ९) दर्शनमार्गणा : छमस्थ जीवाला प्रथम दर्शन होते व नंतर ज्ञान होते. सामान्यविशेषात्मक पदार्थाचे जे सामान्य ग्रहण त्यास दर्शन म्हणतात . हे दर्शन निराकार असते. सामान्य प्रतिभास असतो. दर्शनाचे चार भेद आहेत . १) चक्षुदर्शन - जे प्रकाशते , दिसते ते चक्षुदर्शन होय . २) अचक्षुदर्शन - चक्षुशिवाय बाकीच्या इंद्रियांनी होणारा पदार्थाचा सामान्य प्रतिभास ते अचक्षुदर्शन . ३) अवधिदर्शन - अवधिज्ञानाच्या पूर्वी होणारा जो सामान्य प्रतिभास ते अवधिदर्शन होय. ४) केवलदर्शन - केवलज्ञानाबरोबर होणारा जो सामान्य प्रतिभास ते जैन धर्माची ओळख / ७६ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98