Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 88
________________ केवलदर्शन असते. १०) लेश्यामार्गणा : ज्या परिणामांनी जीव शुभ-अशुभ भावांनी , अनात्मभावाने लिप्त होतो; त्या भावांना आत्मसात करतो, त्यास लेश्या म्हणतात . कषाययुक्त योग परिणाम म्हणजेच लेश्या होय . लेश्या सहा प्रकारची असते. १) कृष्ण, २) नील, ३) कपोत, ४) पीत, ५) पद्म व ६) शुक्ल. लेश्या : तीन लेश्या कृष्ण , नील , कपोत अशुभ आहेत; तर तीन शुभ लेश्या आहेत - पीत , पद्म व शुक्ल . या प्रत्येक लेश्यांचा विशिष्ट भाव व रंग असतो. लेश्याचे दोन मुख्य भेद - १) द्रव्यलेश्या, २) भावलेश्या. द्रव्यलेश्या - शरीर नामकर्माचा उदय असताना शरीराचा जो कृष्ण-नील आदी वर्ण ती द्रव्यलेश्या होय. भावलेश्येत जीवाचे कषाययुक्त योग परिणाम असतात. नारकी जीवाची द्रव्यलेश्या कृष्णलेश्या असते . भोगभूमीतील जीवाची द्रव्यलेश्या सूर्याप्रमाणे पीतवर्ण असते . जघन्य भोगभूमीत हरित वर्णाची कपोतलेश्या असते. कृष्णलेश्यावाला जीव हा क्रूर व क्रोधी असतो. तो झाडास मुळासकट उपटतो . तो दयाधर्म करीत नाही . नीललेश्यावाला आळशी , प्रमादी असतो. कपोतलेश्यावाला जीव रुष्ट होणे, दुसऱ्याची निंदा करणे, तीव्र शोक भावांनी ग्रासित असतो . पीतलेश्याचा जीव मृदू भाषण करतो, कृत्य-अकृत्य , भक्ष्य-अभक्ष्याचा विचार करतो. पद्मलेश्यावाला त्यागी, भद्रपरिणामी , क्षमाशील , देवगुरूशास्त्र यांची भक्ती करणारा असतो. शुक्ललेश्याचा जीव पक्षपात न करता समभाव ठेवणे, रागद्वेष न करणे हे करतो. ११) भव्यत्वमार्गणा : यात जीवाचे भव्यत्व व अभव्यत्व यांचे वर्णन असते. ज्याप्रमाणे विवाहित स्त्री गर्भवती होण्याची शक्यता असते; त्याप्रमाणे भव्य जीवाला मोक्षमार्ग मिळण्याची शक्यता असते. परंतु , विधवा स्त्रीला अपत्य होण्याच्या अशक्यतेइतकेच अभव्य जीवास मोक्ष मिळणे अशक्य असते . १२) सम्यक्त्वमार्गणा : सहा द्रव्ये , पाच अस्तिकाय द्रव्ये, सात तत्त्वे यांचे जसे स्वरूप शास्त्रात सांगितले; तसे यथार्थ श्रद्धान करणे ते सम्यग्दर्शन होय . सम्यक्त्वमार्गणेचे सहा भेद आहेत . १) क्षायिक सम्यक्त्व : दर्शनमोहाच्या तीन प्रकृती व अनंतानुबंधीच्या चार प्रकृतींचा क्षय झाल्यावर आत्मतत्त्वाचे जे दर्शन ते क्षायिक सम्यग्दर्शन . जैन धर्माची ओळख / ७७ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98