Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 86
________________ साधारण वनस्पतिकाय निगोद जीवामध्ये असे अनंत जीव आहेत की, ज्यांनी आतापर्यंत त्रसपर्याय धारण केला नाही . ते नित्य निगोदात राहतात . या निगोद राशीवर सहा महिने आठ समयात ६०८ जीव संसारराशीत येतात व तितकेच संसारस्थ जीव दर सहा महिने आठ समयात मुक्त होतात , असा नियमच आहे. ४) योगमार्गणा : मन-वचन-कायेच्या अवलंबनाने जे आत्मप्रदेशामध्ये स्पंदन-हलन-चलन होते , त्यास योग म्हणतात . योगाचे मुख्य तीन भेद आहेत . १) मनोयोग, २) वचनयोग, ३) काययोग. मनोयोगाचे चार भेद - १) सत्य, २) असत्य, ३) उभय, ४) अनुभव . वचनयोगाचे चार भेद आहेत . पण , काययोगाचे सात भेद आहेत . ५) वेदमार्गणा : वेदनामक नोकषायाचा उदय किंवा उदीरणा असताना जीवाचे स्पर्शनेंद्रियाद्वारे विषयसेवन करण्याचे मोहयुक्त परिणाम होतात, त्यास वेद म्हणतात . पुरुषवेदात स्त्रीसुखाची तर स्त्रीवेदात पुरुषसुखाची कामना असते . पुरुषवेद हा फार प्रभावी असल्याने तो सातव्या नरकात जाण्याचे व मोक्षप्राप्तीचेही प्रयत्न करू शकतो. ६) कषायमार्गणा : हे संसाराला वाढविणारे आहेत . कषायाचे मुख्य चार भेद आहेत- क्रोध , मान , माया आणि लोभ . याचे प्रत्येकी चार भेद आहेत . १) अनंतानुबंधी : जो सम्यग्दर्शनाचा घात करतो. तो हा नरकबंध घडवितो. २) अप्रत्याख्यानावरण : ज्यामुळे श्रावक देशचरित्र धारण करू शकत नाही . हा कषाय पृथ्वीच्या रेषेप्रमाणे लवकर मिटतो. हा तिर्यंचगतिबंधाला कारण होतो. ३) प्रत्याख्यानावरण : ज्यामुळे मुनीचे चरित्र धारण होत नाही तो. हा वाळूच्या रेखासमान लवकर मिटतो. हा मनुष्यगतिबंधाला कारणीभूत होतो. ४) संज्वलन : जो यथाख्यात चारित्र्याचा घात करतो, त्यास संज्वलन कषाय म्हणतात. हा जलरेखासमान तत्काळ मिटतो. देवगतीस कारणीभूत होतो. ७) ज्ञानमार्गणा : जे तिन्ही लोकांतील पदार्थांना त्यांच्या त्रिकालवर्ती द्रव्यगुण-पर्यायसह प्रत्यक्ष अथवा परोक्ष जाणते , त्यास ज्ञान असे म्हणतात ज्ञानाचे पाच भेद आहेत - १) मतिज्ञान , २) श्रुतज्ञान, ३) अवधिज्ञान, ४) मनःपर्ययज्ञान आणि ५) केवलज्ञान. मतिज्ञानाचे एकूण ३३६ भेद आहेत . ४८ व्यंजन अवग्रहाचे, ७२ जैन धर्माची ओळख / ७५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98