Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 90
________________ जैन इतिहास जैन इतिहासात महान वीर, युगपुरुष, ऋषभनाथांपासून महावीरांपर्यंत २४ तीर्थंकर होऊन गेले. त्यांनी जगाला अहिंसा, सत्य, समता, अपरिग्रह, मानवतेची शिकवण दिली. जर विश्वातील प्रत्येकाने जैन तत्त्वांचा अंगीकार केला तर अशांतता दूर होईल. जैन इतिहास हा खरोखरच प्रबळ, प्रभावी आहे. जैन इतिहासाने अनेक महान युगपुरुषांची महती वर्णिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भरत, बाहुबली, श्रेणिक राजा, अजातशत्रू, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, राजा खारवेल, समुद्रगुप्त, हर्ष, सम्राट अशोक, जितशत्रू यांची नावे प्रमुख आहेत. राजा श्रवणबेळगोळची जगप्रसिद्ध गोमटेश्वराची दिव्य आणि विशाल मूर्ती जैनांच्या उज्ज्वल इतिहासाचे ज्वलंत प्रतीक गेली हजार वर्षे उभे आहे. चांमुडराय, जैनांचे आचार्य हेही वादविवादात तथा जैन धर्माच्या प्रचारात अग्र ठरलेत. आचार्य परंपराही महान व प्राचीन आहे. त्यांनी सर्व भाषांत ग्रंथ लिहिण्याचे कार्य केले. ते अति विद्वान, प्रभावशाली, वीतरागी, निर्लोभी, सत्यवादी तथा अहिंसेचे पुजारी होते. ते शांतिदूत होते. जैन साहित्य : जैन साहित्य हे अतिप्राचीन, मौलिक व विज्ञानाला धरून आहे. जैन साहित्य हे समुद्राएवढे विशाल आहे. जैन साहित्य सर्व भाषांत आहे. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामीळ, गुजराती, संस्कृत, प्राकृत, शौरसेनी, अर्धमागधी, इंग्रजी इत्यादी अनेक भाषांत ते लिहिले गेले. जगाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करायला सर्वश्रेष्ठ आहे. जैनकथा, पुराण हे मधुर, सुरस, उपदेशात्मक असतात. अनेक शिलालेखांद्वारे जैन साहित्याची प्राचीनता सिद्ध होते. जैन साहित्य नाटक, काव्य, कथा इत्यादींमध्ये अग्रेसर जैन धर्माची ओळख / ७९ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98