Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 93
________________ कर्मबंधाची सुरुवात होते. जगाचा आकार हा कमरेवर दोन्ही हात ठेवून उभा असलेला पुरुष असा आहे. मंत्रशास्त्र , शरीरशास्त्र यांचे पण वर्णन जैनदर्शनात आहे. ११व्या व १२व्या शतकात मंत्रशास्त्राचा जैनागमात उल्लेख सापडतो. मंत्रसाधनेचा हेतू आत्मकल्याणच आहे . पंचणमोकार हा एक महामंत्रच आहे. स्वप्ने का पडतात , त्यांचे फळ काय असते , हे पण खुलासेवार नमूद आहे . जैनागमानुसार स्वप्नांचे अंतरंग , कारण ज्ञानावरण, दर्शनावरण व अतंराय कर्माचा क्षयोपशम तसेच मोहनीयकर्माचा उदय असतो. अनादिकाळापासून आत्म्याचा कर्माशी संबंध आला आहे. तेव्हापासून त्याने शरीर धारण केले आहे. जीवांच्या विग्रहगतीपासून मृत्यूपर्यंतचे वर्णन केलेले आहे . शरीराची रचना ही नामकर्मामुळे होते. गर्भात आल्यापासून त्याचा अंत होईपर्यंतच्या सर्व अवस्थांचे वर्णन जैनाचार्यांनी केले आहे. ईश्वर आपणास काहीच देत नाही तर आपल्या कर्माप्रमाणे ते मिळत असते . शरीररचनेचे वर्णन हे शरीरशास्त्राप्रमाणेच योग्य वाटते . वनस्पतीस जीव असतो, हे जैन धर्माचे अती प्राचीन कथन आहे . विज्ञानाने ते फक्त आता जाणले आहे. वनस्पती एकेंद्रियच जीव आहे. त्याचप्रमाणे जल , अग्नी , वायू, पृथ्वी हे पण एकेंद्रियच जीव आहेत . तेव्हा त्यांचा वापर योग्य करावा . वनस्पतीकायचे दोन प्रकार आहेत - सूक्ष्म व बादर. ___जैन ज्योतिष हे अनेक ग्रंथांनी भरलेले आहे . त्यापैकी मंडलप्रवेश , लोकविजय मंत्र , ज्योतिषकरंडक, सूर्यप्रज्ञप्ती , चंद्रप्रज्ञप्ती इत्यादी ग्रंथ आहेत . जैन ज्योतिष हे लौकिक कारणासाठी नसून , आध्यात्मिक जगताचे लोक अलोकाशाचे वर्णन आहे . जैन भूगोलात तिन्ही लोकाचे , तेथील वातावरण, पर्वत , नद्या , क्षेत्र , आयू, उंची , आहार या सर्वांचे वर्णन आढळते . त्यांच्या आकृती व नकाशा मिळतो . जैनशास्त्रात आयुर्वेदाचे प्रगाढ ज्ञान भरलेले आहे . जैन आयुर्वेदात मद्य , मांस व मधूचे सेवन कुठेच सांगितले नाही. अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदाकडे आज बघितले जाते. जैन गणितशास्त्रात लौकिक गणितामध्ये संख्या , मापन , अष्टपरिकर्माचा समावेश होतो. धवलादी ग्रंथात अलौकिक व सूक्ष्म गणित आढळते . क्षेत्र , काळ , वस्तू , धान्य , मापनाचे मापन आढळते . सूर्यप्रज्ञप्ती , गोम्मटसार , जंबूद्वीपपण्णत्तीमध्ये गणितपद्धती काटेकोरपणे वापरली जाते. जैन धर्माची ओळख / ८२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 91 92 93 94 95 96 97 98