Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
जैन धर्माची ओळख
卐
डॉ. सौ. विजया गोसावी
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
जैन धर्माची ओळख
डॉ. सौ. विजया गोसावी
સૂબેઝ सुमेरू प्रकाशन
डोंबिवली.
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
जैन धर्माची ओळख
डॉ. सौ. विजया गोसावी
ऐश्वर्या हाऊसिंग सोसायटी, एफ ६/१-१ सेक्टर ७, सानपाडा, नवी मुंबई - ४०० ७०५. दूरध्वनी : (०२२) २७६८०३९०
पहिली आवृत्ती : एप्रिल, २००८
प्रकाशक सुमेरू प्रकाशन डी-६, राजहंस सोसायटी, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१. दूरध्वनी : (०२५१) २४०४१४९/२४३५९६८
© सर्व हक्क लेखकाधीन
मुखपृष्ठ कोमल असोसिएट्स, डोंबिवली
*
मुद्रक सायली प्रिंटर्स डी-६, राजहंस सोसायटी, टिळकनगर, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१. दूरध्वनी : (०२५१) २४३५९६८, भ्रमणध्वनी : ९३२४६७३४००
समरू
किंमत : रुपये ११/
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
प.पू. आचार्यश्री आर्यनंदी महाराज
यांना विनम्र अभिवादन !
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
तीर्थरूप आई-दादांच्या
चरणी हे अनमोल पुष्प ?
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आशीर्वाद
'जैन धर्माची ओळख' हे पुस्तक जैन धर्माचा सार आहे. लेखिकेने अत्यंत सोप्या सरळ व संक्षिप्त भाषेत तत्वज्ञान सांगितले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व त्यांना आशीर्वाद!
संपूर्ण जैन समाज याचा लाभ घेईल हीच सदिच्छा!
- मुनि किशनलालजी प्रज्ञाशिखर, उदयपूर
दिनांक : ३ नोव्हेंबर, २००७
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
डॉ. सागरमलजैन पारमार्थिक शिक्षणन्यास द्वारा संचालित
प्राच्यविद्यापीठ
विक्रम विश्वविद्यालय द्वारा मान्यता प्राप्त शोधकेन्द्र बुपाडा रोड
शाजापुर (म.प्र.) 465001
डॉ. सागरमल जैन Ref. No.
संस्थापक निवेशक
Dr. Sagarmal Jain Founder Director
P
13.15*2
शाजापुर.
PRACHYA VIDYAPEETH A Research Centre Recognised by Vikram University
DUPADA ROAD
SHAJAPUR (M.P.) 465001
अभिनंदन
जैन धर्माच्या विकास यात्रेत महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे. इ.पू. दुसऱ्या व तिसऱ्या शताब्दीत जैन धर्माचा प्रसार हा महाराष्ट्रात निश्चित होता. आचार्य कालक हे इ. स. पूर्व प्रथम शताब्दीत पैठणला गेले होते. इ.स.च्या दुसऱ्या व तिसऱ्या शताब्दीत महाराष्ट्रात काही अभिलेख पण मिळाले आहेत. यावरून हेच सिद्ध होते की महाराष्ट्र हे जैन धर्माचे एक मुख्य केंद्र होते.
विजयादशमी
विक्रम सं. २०६५
तिथी २१ नोव्हेंबर २००७
Date :
अमरावतीच्या जवळील अचलपूर गावात आचार्य स्कंदिलाचार्य हे दीक्षित झाले होते. वेरूळच्या जैन गुफा पण हेच प्रतिपादित करतात की, जैन धर्माचा प्रभाव महाराष्ट्रात होताच. प्राचीन मराठी साहित्य उपलब्ध जरी असले तरी आज त्याची कमतरता वाटत आहे.
२१/११/०७
डॉ.सौ. विजया गोसावी यांनी 'जैन धर्माची ओळख' हे पुस्तक लिहून मराठी भाषिक जैन समाजावर महत् उपकार केले आहेत. मला हे सांगताना आनंद होतो की, प्रस्तुत पुस्तक जैन धर्माची सम्यक् ओळख करण्यास समर्थ आहे.
या पुस्तकात लेखिकेने सुरुवातीलाच णमोकार मंत्राचे माहात्म्य, जैनध्वज, जैन धर्मचक्र ह्यांचे विवेचन केलेत. पश्चात जैनधर्माचे चार अनुयोगाचे वर्णन, लोक स्वरूपाचे वर्णन करून जैन तत्त्वांची ओळख अत्यंत सोप्या भाषेत केली. अशा प्रकारे लेखिकेने सामान्य जनतेसाठी हे पुस्तक लिहिण्याचे एकमेव कारण हेच होते की, जैन धर्माचे शास्त्र सर्व लोकांना समजावे. ह्या एकमेव उद्देश्यासाठीच हे पुस्तक लिहिले गेले व या पवित्र उद्देश्यामुळे डॉ. विजया गोसावी धन्यतेच्या पात्र आहेत. मराठी भाषिक जैन समाजाने ह्या पुस्तकाचा जरूर लाभ घ्यावा व आपले आध्यात्मिक जीवन सार्थक करावे.
डॉ. सागरमल जैन
प्राच्य विद्यापीठ
शाजापूर (म. प्र. )
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
लेखिकेचे मनोगत
आपला जन्म केवळ जैन कुळात झाला म्हणून आम्ही जैन आहोत , हे म्हणणे सत्य ठरणार नाही. कारण , फक्त जैन कुळात जन्माला आलो परंतु जैन तत्त्वांची, जैन धर्माची ओळख नसेल तर स्वतःस जैन म्हणवून घेणे योग्य ठरेल का? जैन धर्माची तत्त्वे , सखोल , वैज्ञानिक, तंतोतंत , सूक्ष्म व आत्म्याचे कल्याण करणारी आहेत . या जन्म-मरणाच्या शृंखलेतून सुटका करून आंतरिक सुखाचा परमबिंदू गाठणारी आहेत. मग त्यांचा परिचय करून घ्यायलाच हवा. प्रत्येक जीव सुखाच्या शोधात असतो. परंतु , सुख कुठे आहे, हे माहीत नसल्यामुळे तो जगात भटकतो. बाह्य जगातील प्रत्येक गोष्ट, वस्तू , व्यक्ती ही अनित्य , अशाश्वत व परिवर्तनशील आहे. मग जी गोष्ट सारखी बदलते , ती शाश्वत सुख कसे देणार? माझे शरीर , माझे घर, माझे गाव , माझी गाडी , माझी मुले, माझी बुद्धी , माझे सौंदर्य , माझी शक्ती हे सर्वच तर बदलते. मग न बदलणारे , नित्य व शाश्वत काय आहे, असा प्रश्न मनात येतो का? प्रश्न असेल तर उत्तर मिळेल . जर प्रश्रच नाही, जिज्ञासा नाही तर उत्तर पण नाही . फारच थोड्या लोकांच्या मनात हे प्रश्न येतात . ज्याच्या मनात येतात , ते सत्याचा शोध घेण्यास प्रवृत्त होतात .
सत्य फक्त आत्मा आहे. या आत्म्याचे वास्तव्य आमच्याच शरीरात आहे. त्यास इकडे-तिकडे शोधण्याची आवश्यकता नाही. फक्त आत्म्याचे स्वरूप जाणा व भेद करा - स्व व इतरमध्ये . सत्याचा शोधही स्वतःच करायचा असतो. भगवान महावीर पण हेच म्हणतात- 'अप्पणा सच्चमेसेज्जा' म्हणजे 'स्वयं सत्य शोधा'. म्हणून या लेखनाद्वारे जैन धर्माची प्राथमिक
ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. हे पुस्तक त्याच उद्देशाने लिहिले आहे. चला, तर आपण ओळखू हे विश्व , विश्वातले द्रव्य , जैन धर्माची तत्त्वे तसेच स्वतःचे ज्ञान , आत्म्याचे ज्ञान . अगदी थोडक्यात , परंतु सुलभ भाषेतील हे पुस्तक सुरुवातीच्या साधकास मार्गदर्शक ठरेलच ..
- डॉ. सौ. विजया गोसावी
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
लेखानुक्रम
...
...
...
...
....
....
...
..
...
....
...
....
..
...
....
....
महामंत्र णमोकार ..... जैन ध्वज ................ चार अनुयोग ........... लोक ................ सात तत्त्वे जीव व संसार परिभ्रमण ........... श्रावकधर्म कर्मसिद्धान्त ............... कर्मबंधाचे कारण ........... ज्ञान : महिमा ... सम्यग्दर्शन आत्मा तप ............ ध्यान ............. गुणस्थान ......... मार्गणा जैन इतिहास ........ आधुनिक विज्ञान व जैन धर्म .....
.........
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
|जिनधर्म
समयसार
जिनवाणी
आचार्य
अरिहंत
उपाध्याय
--
जिनालय
माया
नवदेवता देवता म्हटले की, अन्य सरागी देव-देवी आपल्या डोळ्यासमोर येतात. परंतु 'दिवि क्रीडायाम्' धातूपासून देव शब्द बनला आहे. जो स्वभावामध्ये क्रीडा करतो तो देव । 'देव' शब्दास 'ता' प्रत्यय लावून भाववाचक देवता शब्द बनला आहे. देवता म्हणजेच 'खरा देवपणा' जिथे आहे तोच देव । नवदेवता - (१) अरिहंत , (२) सिद्ध, (३) आचार्य, (४) उपाध्याय, (५) साधु , (६) जिनधर्म , (७) जिनागम , (८) जिनचैत्य (प्रतिमा), (९) जिनचैत्यालय (जिनमंदिर), यांनाच नवदेवता असे म्हणतात.
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
महामंत्र णमोकार
णमो अरिहंताणं । णमो सिद्धाणं । णमो आयरियाणं । णमो उवज्झायाणं । णमो लोए सव्वसाहूणं ।। एसो पंचणमोक्कारो सव्वपावप्पणासणो । मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवइ मंगलम् ।।
णमोकार मंत्र :
जैन धर्माचे मर्म , अचाट शक्ती, माहात्म्य सर्व काही णमोकार मंत्रात आहे. णमोकार मंत्र सर्वात मुख्य व महान आहे . साऱ्या धर्माचे मूळ उगमस्थान या एका ३५ अक्षरांच्या मंगल मंत्रात आहे. णमोकार मंत्र सर्व मंत्रांचा राजा तसेच तत्त्वज्ञानाचा सार असलेला आहे. तो अति पवित्र आहे. हा मंत्र स्वयंसिद्ध आहे . अनंत जीवांनी या मंत्राचा आधार घेऊनच आपली जीवननौका संसार सागराच्या पलीकडे नेली आहे . मूळ भाषा अर्धमागधी आहे . या मंत्रातील पाच पदे सर्वोत्कृष्ट आदर्शाची प्रतीके आहेत . या मंत्राचा सरळ व साधा अर्थ असा आहे : -
लोकांतील म्हणजे विश्वातील अरिहंतांना नमस्कार ! लोकांतील सर्व सिद्धांना नमस्कार! लोकांतील सर्व आचार्यांना नमस्कार ! लोकांतील सर्व उपाध्यायांना नमस्कार ! लोकांतील सर्व साधूंना नमस्कार ! पंचपरमेष्ठींना हा नमस्कार असला तरी तो निजस्वरूप परमात्म्याचे गुणगान आहे. णमो अरिहंताणं :
चार घातिया कर्मदोष हेच आमचे अरि (शत्रू) आहेत . त्या राग, द्वेष , मोहाचा ज्यांनी नाश केला , तेच 'अरिहंत' होत . देवाधिदेव , इंद्र ज्यांची पूजा करतात , ते अरिहंत आहेत. जे हिताचाच मार्ग दाखवितात , ते अरिहंत होत. अरिहंत परमेष्ठीचे ४६ मूळ गुण आहेत. जन्माच्या , केवलज्ञानाच्या वेळी प्रत्येकी १० अतिशय चिन्ह, देवकृत समवसरणादिक १४ अतिशय पूर्ण रचना , अष्टप्रतिहार्य व अंतिम ज्ञानादी चतुष्ट्य असे ४६ मूळ गुण प्रगट
जैन धर्माची ओळख / १
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
होतात . अरिहंतामध्ये दोन प्रकारचे जीव असू शकतात. तीर्थंकर अरिहंत व सामान्य अरिहंत . सिद्धांचे वर्णन : णमो सिद्धाणं :
सिद्ध परमेष्ठींना नमस्कार असो. ज्यांनी चार घातिया व चार अघातिया कर्मांचा नायनाट केला, अभाव केला तेच सिद्ध होतात . ज्ञानाची परम निर्मळ अवस्था. परम औदारिक शरीरापासून वेगळी फक्त ज्ञान शरीरी अवस्था राहते . ऊर्ध्वगमन करीत लोकांच्या अग्रभागी सिद्धालयामध्ये सिद्धशिलेवर जे जीव स्थिर होतात , त्यांना सिद्ध किंवा मुक्त जीव म्हणतात . हे पूर्ण विकसित रूप आहे . त्याच्या पलीकडे विकास होत नाही . एकदा सिद्धदशा प्राप्त झाल्यावर तो जीव संसारात परत येत नाही. तो परमोच्च सुखाचा आस्वाद घेत राहतो. अरिहंताचे औदारिक शरीर आहे . परंतु , जेव्हा त्यांच्या दिव्य शरीराचा अभाव होतो. अर्थात , शरीराचे सारे परमाणू कापराप्रमाणे उडून जातात. एकमात्र निरामय , निरंजन चैतन्यपुंज राहतो, तोच सिद्धात्मा! अरिहंत भगवान काही काळ विहार करीत लोकांना उपदेश देत असतात म्हणून त्यांना आप्त समजून प्रथम वंदन केले आहे . णमो आयरियाणं :
__ आचार्य परमेष्ठींना नमस्कार असो . मुनी , आर्यिका , श्रावक , श्राविका अशा चतुर्विध संघाने 'संघाधिपती' म्हणून ज्यांची निवड केलेली असते, त्यांना आचार्य म्हणतात . निर्दोषरीतीने ३६ मुळ गुणांना धारण करून ते संघाचा सांभाळ वात्सल्य भावनेने करतात. तसेच संघातील प्रत्येकास ते शिक्षा देऊन तसेच प्रायश्चित्त स्वीकारून दोषपरिमार्जन करतात . व्रतादी देऊन त्यांना अनुशासन शिकवितात . आचार्यांच्या बाह्य क्रिया जरी कठोर दिसत असल्या तरी त्या संघासाठी योग्य असतात . ते संघाचे नेतृत्व स्वीकारून संघाची सुरक्षितता वाढवितात . दीक्षा व शिक्षा त्यांचे कर्तव्य असते. णमो उवज्झायाणं :
उपाध्याय परमेष्ठींना नमस्कार असो. ते जिनप्रणित ग्रंथाचे पारायण, अध्ययन , लिखाण , मनन, चिंतन करून इतरांना त्याच पद्धतीने करवितात . सदाचाराचे आचरण संघात वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न उपाध्याय करतात . आचार्य आज्ञा व आदेश , दीक्षा देतात तर उपाध्याय मात्र उपदेश करतात . ११ अंग व १४ पूर्वांचे ते ज्ञानी असतात . २५ मूलगुणांचे धारी असतात .
जैन धर्माची ओळख / २
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
उपाध्याय ज्ञान , ध्यान , तपातच लीन राहतात. ते बहुतांश वेळ तपश्चर्येत घालवितात . णमो लोए सव्वसाहूणं :
साधू सम्यक् श्रद्धेच्या रूपाने , ज्ञानाने व चारित्र्याने ते जीवन जगतात . निर्दोष व्यवहार हेच त्यांचे तंत्र असते . २८ मूलगुणांचे पालन करून ते धन्य होतात . (पाच महाव्रते , पाच समिती , पाच इंद्रियविजय , सहा आवश्यक क्रिया, सात शेष गुण मिळून २८ मूलगुण होतात .) शीलव्रताच्या बळावर ते मोक्षमार्ग क्रमाने सुरू करतात . काम-विकार-राग-द्वेष यावर विजय मिळवून ते दोषांना दूर करतात . साधूच्या अवस्थेतच आत्मकल्याण शक्य आहे.
___ याप्रमाणे आचार्य, उपाध्याय , साधू हे मुक्तिमार्गाचे तसेच रत्नत्रयाचे साधक आहेत; तर अर्हत-सिद्ध आमचे आदर्श आहेत , साध्य आहेत . या णमोकार मंत्रात एका विशिष्ट व्यक्तीला नमस्कार नसून गुणांना वंदन आहे. हा मंत्र अनादि आहे. हा मंत्र पापांचे क्षालन करणारा आहे. हा मंगलमय आहे. हा णमोकार मंत्र स्वतः सिद्ध, स्वयंप्रकाशी आहे. सर्व पापांना क्षणात भस्म करणारा आहे. हा मंत्र आम्ही कुठल्याही क्षेत्री व समयी म्हणू शकतो. तरीपण द्रव्य-क्षेत्र-काल-भावाची विशुद्धी मंत्राचे फळ-सामर्थ्य वाढविते.
प्रतिदिनी १०८ वेळा बोटांवर , मण्यांच्या माळेच्या साहाय्याने , पुष्पाने , लवंगाने , तांदळाने आम्ही हा मंत्रजप करू शकतो. धवल ग्रंथाच्या प्रारंभी ‘णमो अरिहंताणं' तसेच भगवतीसूत्रात या मंत्राचा उल्लेख आहे. हा महामंत्र आम्हास शक्ती , मती व अध्यात्माची किल्ली जरूर देतो. कुठल्याही बिकट परिस्थितीत हा मंत्र आम्हास मार्ग दाखवितो. णमोकार मंत्राचे व्रत-विधान पण आहे. ३५ दिवस उपोषण करून अभिषेक, पूजा-मंत्रजप करणे. मंत्राच्या उच्चाराने विद्युतशक्ती निर्माण होऊन भूत-पिशाच्च बाधा , जल-अग्नीचे भय, रोगपीडांचे निर्मूलन होऊन मनास शांती प्राप्त होते. या मंत्रामध्ये संपूर्ण शास्त्राचे सार साठलेले आहे .
जैन धर्माची ओळख / ३
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
जैन ध्वज
जैन शासनात जैन ध्वजाचे फार महत्त्व आहे. प्रतिष्ठा पाठमध्ये मंदिराच्या शिखरकळसावर एक हात उंच असलेला ध्वज आरोग्य प्रदान करतो . दोन हात उंच-सुपुत्रादी संपत्ती , तीन हात उंच धान्य संपत्ती , चार हात उंच राजाला वृद्धी , राज्यात यश, कीर्ती व प्रताप आणतो. ध्वजारोहण करणारा विशिष्ट मंत्र म्हणून आपण ध्वजाचे आरोहण करतो. तो मंत्र असा आहे : - श्रीमज्जिनस्य जगदीश्वरता ध्वजस्य । मीनध्वजादिरिपुजालयो ध्वजस्य । तन्यासदर्शन जनागमनं ध्वजस्य । चारोपणं सुविधिवविदघे ध्वजस्य ।।
जो ध्वज वृषभादिक २४ तीर्थंकरांची जगदीश्वरता व कामावर विजय . दर्शवितो , तसेच जिनबिंबाच्या दर्शनार्थांना आवाहन इत्यादींचे प्रतीक आहे , अशा ध्वजाचे मी आरोहण करतो . असा अर्थ वरील मंत्राचा आहे.
जैन शासनात ध्वजाची प्रथा पूर्वीपासूनच आहे. जैन शासनातील सहधर्मी आम्ही बंधूसमान आहोत , अशी भावना ध्वजारोहणामध्ये मुख्य असते . सर्व लोकांचे कल्याण होवो, सर्व दोषांचे, विकारांचे हरण होवो तसेच जैन धर्म हा विश्वात चिरकाल शाश्वत रूपाने राहो , हाच संदेश हा ध्वज देत असतो. स्वस्तिक चिन्ह :
_स्वस्तिक हे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ऋग्वेदात त्याचे वर्णन आहे. स्वस्तिक शब्द ‘सु-अस्' या धातूपासून बनला आहे. 'सु' म्हणजे सुंदर , मंगल . 'अस्' म्हणजे अस्तित्व . तीन लोकांत तीन काळांत व प्रत्येक वस्तूत जे विद्यमान आहे तेच सुंदर , मंगल स्वरूपाचे आहे.
जैन शासन हे अर्थातच सर्वांचे कल्याण करणारे आहे. स्वस्तिकाचा अर्थ असा 'स्वस्ति करोतीति स्वस्तिकः' जे स्वस्ति, कल्याण करते तेच स्वस्तिक. चार गतींचे - मनुष्य , देव, तिर्यंच व नरक तसेच तीन बिंदू सम्यग्दर्शन , सम्यग्ज्ञान व सम्यग्चारित्र यांचे प्रतीक स्वस्तिक आहे . अर्ध चंद्र
जैन धर्माची ओळख / ४
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
हे सिद्धशिलेचे प्रतीक आहे . स्वस्तिक हे सर्वथा मंगलकारी आहे . जैन धर्मात तसेच जैन समाजात नेहमी शुभ कार्यात स्वस्तिकाचा उपयोग करतात . पूजा, विवाह, गृहप्रवेश , मंदिर सर्वच ठिकाणी स्वस्तिकाचे चिन्ह शुभ म्हणून वापरतात. धर्मचक्र :
धर्मचक्राचाही जैन शासनात वापर करतात . धर्मचक्र हे जिनेंद्र वृषभदेव, महावीरांचे , जयवंतांचे प्रतीक आहे. जैन शासनात धर्मचक्राची विविध रूपे आढळतात . शास्त्रामध्ये याचे स्पष्ट वर्णन आहे. शिवकोटी आचार्यांनी भगवती आराधनेत १२ आरे असलेल्या धर्मचक्राचे वर्णन केले आहे. हे १२ आरे जिनवाणीच्या द्वादशांगांचे प्रतीक आहेत . २४ आरेवाले धर्मचक्र २४ तीर्थंकरांचे प्रतीक आहे. १६ आरेवाले धर्मचक्रेही आढळतात. संपूर्ण प्रजेचे कल्याण होवो , यथासमयी वर्षा होवो , समस्त रोगांचा अभाव होवो, चोरी, महामारी व अकाल मृत्यू वा दुष्काळ जगात एक क्षणभरही राहू नये. सर्वदा सुकाळ राहो तसेच दशधर्माचे पालन होवो , हाच संदेश धर्मचक्र देते .
जैन शासनाचा ध्वज पाच रंगांचा आहे. त्यात क्रमशः समान प्रमाणात अरुणाभ , पीताभ, श्वेताभ , हरिताभ आणि गडद नीलाभ रंगांच्या आडव्या पट्ट्या असतात. श्वेत पट्टीवर मधोमध स्वस्तिक चिन्ह अंकित केलेले असते. स्वस्तिकाची उंची श्वेतपट्टीच्या उंचीएवढी असते. हा पाच रंगांचा ध्वज पंच परमेष्ठीचे तसेच पंच महाव्रताचे प्रतीक आहे. श्वेताभ रंग अहिंसेचा, अरुणाभ रंग सत्याचा , पीताभ रंग अचौर्याचा , हीरताभ रंग ब्रह्मचर्याचा , नीलाभ रंग अपरिग्रहाचा द्योतक आहे .
हा पंचरंगी ध्वज तेव्हाचे पूज्य उपाध्याय* मुनिराज १०८ श्री विद्यानंदजी यांनी महावीर भगवंतांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवाच्या वेळी संशोधन करून तयार केला . त्यापूर्वी जैन ध्वज केशरी रंगाचा स्वस्तिक चिन्हांकित असा त्रिकोणी आकाराचा होता . (मुखपृष्ठावर ध्वजाचा रंग दाखविला आहे. तसेच धर्मचक्राचे पण चित्र आहे.)
आता प.पू. विद्यानंद मुनिराज 'आचार्य' आहेत . २५०० व्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाच्या काळात ते उपाध्याय होते.
जैन धर्माची ओळख / ५
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
चार अनुयोग
जैन आगमात चार अनुयोग आहेत : (१) प्रथमानुयोग, (२) चरणानुयोग, (३) करणानुयोग, (४) द्रव्यानुयोग
जैन दर्शनाचा अभ्यास यामध्ये सामावलेला आहे. प्रत्येक अनुयोगाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याविषयी काही माहिती बघू या . १) प्रथमानुयोग :
यात संसाराची विचित्रता, पाप-पुण्याचे फळ , महान पुरुषांची प्रवृत्ती इत्यादींचे विवेचन करून जीवांना धर्मरत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे फक्त लौकिक कथा जाणू शकतात, त्यात रस घेतात त्यांच्यासाठी प्रथमानुयोग आवश्यक आहे. कारण , तत्त्वांचा विषय त्यांनाही कळत नाही. प्रवचन ऐकताना फक्त कथाच तेवढ्या लक्षात राहतात. तसे नातेवाईकांत बरेच लोक असे आहेत. कथांच्या द्वारे मनोरंजन होते व शिकवण पण मिळते. सर्वसाधारण जीव लालसेने अशा कथांचे वाचन करतात व त्या वाचनातून ते पापाला वाईट व पुण्याला चांगले समजतात. ६३ शलाका पुरुष तथा २४ तीर्थंकरांचे जीवन चरित्र हे सामान्य लोकांना बोधकारक ठरते. २) चरणानुयोग :
या अनुयोगात मूलाचाराची माहिती असते . मुनी , साधूंचे व्यवहार व आचरण कसे असावे , हे सांगितलेले असते . भोजनाचे ३२ अंतराय दोष व आहाराचे ४६ दोष यात सांगितले आहेत. तसेच प्रतिक्रमण भेद , मूल बीज, अग्र बीज , (काष्ठ द्विदल - चारोली , बदाम, पिस्ता - वगैरे) व पाणी गाळण्याचा विधी यात आहे. कारण , न गाळलेल्या पाण्यात असंख्य त्रस जीव असतात. एका पांढऱ्या रंगाच्या जाड्या वस्त्राने दुहेरी करून पाणी गाळणे. पाणी जर उकळून घेतले तर २४ तासांच्या आत , गाळून घेतलेले पाणी दोन घडी म्हणजे ४८ मिनिटे तर लवंग , हरडे, चुन्याने प्रासूक करून ६ तासांपर्यंत ते पाणी पिण्यास योग्य असते. रात्री भोजन केल्याने स्थूल व
जैन धर्माची ओळख /६
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
सूक्ष्म जीवांची हिंसा होते. रात्री सूक्ष्म जीव दिसत नाहीत : रात्री जेवण करायचे नसेल तर स्त्रियांना पण स्वाध्याय करण्यास, मंदिरामध्ये जाण्यास वेळ मिळतो. सूर्यास्तानंतर अनेक सूक्ष्म जीवांची उत्पत्ती वाढते व त्यांचे ग्रहण कळत-नकळत जेवणाबरोबर होते.
२२ परिषहांचे वर्णन पण चरणानुयोगात येते . १) क्षुधा परीषह , २) तृष्णा परीषह , ३) शीत , ४) उष्ण , ५) डन्समशक , ६) नग्न , ७) अरति , ८) स्त्री, ९) चर्या , १०) आसन , ११) शयन , १२) आक्रोश , १३) बंधबंधन , १४) याचना , १५) अलाभ , १६) रोग , १७) तृष्णस्पर्श, १८) मल , १९) सत्कार-पुरस्कार , २०) प्रज्ञा , २१) अज्ञान , २२) अदर्शन परीषह. चरणानुयोगात उपदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पापाचरणापासून दूर होऊन व धर्माचरणात मग्न व्हावे म्हणून हिंसादी पापकृत्ये करू नये, हेच सांगण्यात येते. जे धर्माचरण करू इच्छितात ; त्यांच्यासाठी गृहस्थधर्म व मुनिधर्म सांगण्यात आला आहे. संपूर्ण वीतरागी होणे हेच चरणानुयोगाचे प्रयोजन आहे. चरणानुयोगाचे साहित्य : १) नियमसार - आचार्य कुंदकुंदांचा हा ग्रंथ नियमांचे वर्णन करतो. २) अष्टपाहुड - आठ पाहुड आहेत - दसंण पाहुड, चारित्र पाहुड, मोक्ष पाहुड, सुत्त पाहुड, बोध पाहुड, भाव पाहुड, शील पाहुड , लिंग पाहुड. या सर्व स्वतंत्र अशा ग्रंथरचना आहेत . ३) रत्नकरण्ड - श्रावकाचार , ४) मूलाचार, ५) भगवती आराधना, ६) सागरधर्मामृत, ७) श्रावकाचार असे अनेक ग्रंथ श्रावकाचे व मुनीचे आचरण स्पष्ट करतात . ३) करणानुयोग :
करणानुयोगात जीव , कर्माचे तसेच त्रिलोकादी रचनेचे वर्णन करून जीवांना धर्मात मग्न करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जे जीव धर्मात मग्न होऊ पाहतात ; त्यांना जीवांचे गुणस्थान, मार्गणा , कर्माचे कारण अवस्था, त्यांचे फळ तसेच स्वर्ग-नरकाची ठिकाणे जाणून पाप विमुक्त करण्याची इच्छा होते . जीवाला सूक्ष्म गोष्टींचे, गणिताचे ज्ञान करून त्याला जैनागमाकडे आकर्षित केले जाते. जो करणानुयोगाचा अभ्यास करतो त्यास द्रव्य , क्षेत्र ,
जैन धर्माची ओळख / ७
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
काळ , भावाचे स्वरूप लवकर लक्षात येते . तत्त्वज्ञान निर्मळ झाल्याने तो विशेष धर्मात्मा मानला जातो . करणानुयोगात अरिहंताचे ४६ गुण , सिद्धाचे आठ गुण , आचार्याचे ३६ गुण , मुनीचे २८ गुण, उपाध्यायाचे २५ गुण, कर्माच्या १४८ प्रकृती (घातीयाच्या ४७ प्रकृती व अघातीच्या १०१ प्रकृती मिळून १४८ प्रकृती) या सर्वांचे वर्णन आहे. तसेच स्वर्ग-नरकाचे संपूर्ण सूक्ष्म वर्णन आढळते.
करणानुयोगाच्या साहित्यात सूर्यप्रज्ञप्ती , चंद्रप्रज्ञप्ती , जंबूद्वीप प्रज्ञप्ती , त्रिलोयपण्णती, त्रिलोकसार , क्षेत्रमास , ज्योतिषकरण्डक आदी प्रमुख ग्रंथ आहेत . करणानुयोगातील हे विविध जैन साहित्य भारतीय साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून , काही अज्ञात गोष्टींची माहिती घेणेसुद्धा शक्य आहे. ज्योतिषकरण्डकमध्ये २१ अधिकार असून , त्यात चंद्र , सूर्य , नक्षत्रांची माहिती आहे. जंबूद्वीप प्रज्ञप्तीमध्ये जंबूद्वीपाचे वर्णन आहे. तिलोयपण्णतीमध्ये त्रिलोकाचे वर्णन नऊ महाधिकारात आहे. सामान्य लोकाचे स्वरूप, नारकीलोक , भवनवासीलोक, मनुष्यलोक , तिर्यंचलोक , व्यंतरलोक, ज्योतिर्लोक, देवलोक व सिद्धलोकाचे वर्णन आहे. या ग्रंथाचे कर्ते आ. यतिवृषभाचार्य आहेत . त्यांनी अकराव्या शतकात रचना केली आहे. यात सहा अधिकार असून- सामान्यलोक , भवनलोक , व्यंतरलोक , ज्योतिर्लोक, वैमानिकलोक व नर-तिर्यंच लोकांचे वर्णन आहे. ४) द्रव्यानुयोग :
प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग या चार अनुयोगांपैकी धार्मिक साहित्यात द्रव्यानुयोगाचे महत्त्व सर्वात अधिक आहे. तसे तर चारी अनुयोग महत्त्वाचे आहेत. यात प्रामुख्याने जीव , अजीव, कर्मसिद्धान्त , नय-निक्षेप इत्यादींची चर्चा असते . द्रव्यानुयोगाचे प्राकृत व संस्कृत ग्रंथ असे दोन विभाग साहित्याच्या दृष्टीने करता येतील .
आचार्य कुंदकुंदांच्या समयसार, प्रवचनसार , नियमसार , अष्टपाहुड आणि पंचास्तिकाय इत्यादी ग्रंथांचा समावेश प्राकृत भाषेत होतो. आचार्य कुंदकुंद हे इ.स. पहिल्या शतकातले आहेत . द्रव्यसंग्रह , जीवसमास , कसायपाहुड, पंचसंग्रह, सर्वार्थसिद्धी तत्त्वार्थवार्तिक , तत्त्वार्थवृत्ती , तत्त्वार्थश्लोकवार्तिक हे देखील द्रव्यानुयोगाचेच ग्रंथ आहेत .
द्रव्यानुयोगाचे ग्रंथ हे विश्व म्हणजे काय , द्रव्य म्हणजे काय , गुण म्हणजे काय, याचे वर्णन करतात . सम्यग्दर्शन म्हणजे काय? त्याचे उपाय,
जैन धर्माची ओळख / ८
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
स्वरूप काय आहे, ते कसे प्राप्त करावे? उपयोग म्हणजे काय व त्याचे प्रकार किती , याचे सखोल वर्णन आपणास द्रव्यानुयोगात मिळते . पुण्य व पाप कसे मिळते , हे पण कळते.
तत्त्वार्थसूत्रावरील अनेक टीका आपणास तत्त्वार्थसूत्राचे महत्त्व प्रतिपादित करतात . तत्त्वार्थसूत्रावर सोळाव्या शतकात श्रुतसागर यांनी तत्त्वार्थवृत्ती ही टीका लिहिली. तत्त्वार्थश्लोकवार्तिक ही नवव्या शतकातील आचार्य विद्यानंदी यांनी केलेली रचना आहे. त्यांचे आप्तपरीक्षा पत्रपरीक्षा, प्रमाणपरीक्षा , अष्टसहस्री इत्यादी ग्रंथ आहेत . सर्वार्थसिद्धी ही सर्वात प्राचीन टीका मानली जाते. ही पाचव्या शतकातील देवनंदी पूज्यपाद यांची टीका आहे.
तत्त्वार्थसूत्र हा ग्रंथ आचार्य उमास्वामींनी लिहिला. दिगंबर तथा श्वेतांबर दोन्ही संप्रदाय या रचनेस मान्यता देतात. या ग्रंथाला मोक्षशास्त्र या नावानेदेखील ओळखतात . यात १० अध्याय असून , सूत्रसंख्या ३५७ आहे. या ग्रंथातील 'सम्यग्दर्शन ज्ञानचारित्राणि मोक्षमार्गः' हे प्रमुख सूत्र आहे.
जैन धर्माची ओळख / ९
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
लोक
'षड् द्रव्यात्मको लोकः' जैन धर्मात लोकाची , विश्वाची कल्पना वेगळीच आहे . या लोकाचा आकार हा दोन्ही हात कमरेवर ठेवून उभ्या असलेल्या पुरुषासारखा आहे.
सहा द्रव्यांच्या समूहाला 'विश्व' म्हणतात . विश्वाची अन्य नावे आहेत - लोक , ब्रह्मांड, जगत इत्यादी. या विश्वात सहा जातीचे द्रव्य आणि संख्येच्या अपेक्षेने अनंतानंत द्रव्य राहतात . सहा द्रव्यांची नावे अशी आहेत - १) जीव, २) पुदगल, ३) धर्म, ४) अधर्म, ५) आकाश आणि ६) काल. त्यापैकी जीवद्रव्य अनंत आहे. पुद्गलद्रव्य अनंतानंत आहे. धर्म , अधर्म व आकाश एकेक आहे, तर कालद्रव्य असंख्यात आहे.
ही सहाही द्रव्ये या विश्वात मिळून एकाच क्षेत्रात राहतात. त्यांचे राहण्याचे क्षेत्र जरी एक असले तरी ती कधीच भांडत नाहीत. ती प्रत्येकाच्या स्वभावाने म्हणजे गुणधर्मानेच राहतात. म्हणून ती सर्वच स्वाधीन व स्वतंत्र आहेत.
या विश्वाला कुणीच बनविले नाही. ते अनादी-अनंत आहे. या विश्वाबद्दल जाणून घेतल्याने आम्हास भरपूर फायदे होतात . १) हे विश्व नष्ट होणार नाही, हे जाणून भय दूर होते २) या जगाचा कोणी कर्ता आहे, ही कल्पना दूर होते . ३) या विश्वाबद्दल पूर्वी असलेले बरेचसे भ्रम दूर होतात . 'लोक' नावाने प्रसिद्ध असणारा आकाशाचा हा खंड मनुष्याकार आहे.
तो चोहोबाजूंनी तीन प्रकारच्या वायूने वेष्टीला गेला आहे. 'लोका'च्या वरपासून खालपर्यंतच्या भागामध्ये एक राजू-प्रमाण विस्ताराने युक्त त्रसनाली आहे . त्रस जीव याच्याबाहेर राहू
शकत नाहीत. मात्र , स्थावर जीव सर्वत्र असतात . हा लोक परस्परोपग्रहो तीन भागांत विभाजित केला आहे . १) अधोलोक , जीवनाम् २) मध्यलोक , आणि ३) ऊर्ध्वलोक .
जैन धर्माची ओळख / १०
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
सिद्ध लोक
ऊर्ध्व लोक (स्थावर
स्वर्ग लोक
लोक
मध्य लोक
मर्त्य लोक
अधो लोक
नरक लोक
स्थावर
लोक
त्रस नाली
अधोलोकाचे वर्णन असे आहे की , तिथे फक्त नारकी जीव राहतात. भयंकर वेदना व दुःखाने ते व्याप्त आहेत . ऊर्ध्वलोकात १६ स्वर्ग आहेत व तेथे पुण्यात्म-जीव जातात . त्यावर भवावतारी लोकाचे ठिकाण आहे. या लोकाच्या वर सिद्धलोक आहे. तेथे फक्त मुक्त जीव राहतात . मध्यलोकात असंख्यात द्वीप व समुद्र एकानंतर एकाला वेष्टीत झालेले आहेत . जंबूद्वीप, घातकी व पुष्कर यांचा अर्धभाग मिळून अडीच द्वीप आहेत . यात मनुष्याचा निवास आहे. शेष द्वीपात व्यंतर , भूत-पिशाच्च , तिर्यंच राहतात . जंबूद्वीपात सुमेरू पर्वताच्या दक्षिणेला हिमवान , महाहिमवान व निषाद तसेच उत्तरेला नील , रुक्मी व शिखरी हे सहा कुलपर्वत आहेत. ते या जंबूद्वीपाला भरत, हेमवत , हरी , विदेह , रम्यक , हैरण्यवत व ऐरावत इत्यादी सात क्षेत्रांत विभक्त करतात. प्रत्येक पर्वतावर एकेक महासरोवर आहे. एकंदरीत १४ नद्या आहेत . भरत व ऐरावत क्षेत्रातील दोन-दोन नद्यांमुळे व पर्वतामुळे या क्षेत्राचे सहा खंडांत विभाजन होते . यातील मध्यवर्ती खंडात आर्यलोक व शेष खंडात
जैन धर्माची ओळख / ११
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
म्लेंच्छ लोक राहतात. या दोन्ही क्षेत्रांत धर्म , कर्म , सुख , दुःख , आरोग्य , उंची , बुद्धी यांची हानी व वृद्धी होत असते. परंतु , इतर क्षेत्र पूर्ववत राहतात . त्यात बदल होत नाही. विदेह क्षेत्रात ३२ भाग आहेत. या क्षेत्रात कधीच धर्मविच्छेद होत नाही. आज तिथे २० तीर्थंकर आहेत . त्यापैकी सीमंधर स्वामी सर्वांना परिचित आहेत . लवणोदकाच्या तळाशी अनेक पाताळ आहेत . पृथ्वीतलापासून ७९० योजने वर आकाशात क्रमाने तारे , सूर्य , नक्षत्र , बुध, शुक्र, बृहस्पती, मंगळ व शनी इत्यादी ग्रह आहेत.
मध्यलोकाचा आकार उभ्या केलेल्या अर्ध्या मृदंगाप्रमाणे आहे व ऊर्ध्वलोकाचा आकार उभ्या केलेल्या मृदंगाप्रमाणे आहे. अधोलोकाचा आकार वेत्रसनाप्रमाणे आहे . संपूर्ण लोकाची उंची १४ राजू , अधोलोकाची उंची ७ राजू व ऊर्ध्व लोकाची उंची एक लाख योजन इतकी आहे. घनोदधी, घनवात व तनुवात ही तीन वातवलये वृक्षाच्या सालीप्रमाणे 'लोका'भोवती पसरली आहेत. प्रथम घनोदधी , त्यानंतर घनवातवलय असून , शेवटी तनुवातवलय आहे. त्यानंतर निराधार आकाश आहे. ही तिन्ही वलये एकमेकांत आश्रित आहेत . अधोलोक :
तो वेत्रासनाच्या आकाराप्रमाणे आहे . तो ७ राजू उंच आहे . तो खाली ७ राजू व वर १ राजू प्रमाण एवढा रुंद आहे. यात वरपासून खालपर्यंत क्रमाने रत्नप्रभा, शंकराप्रभा, वालुकाप्रभा, पंकप्रभा, धूमप्रभा, तमःप्रभा व महातमप्रभा नावांचे सात नरक आहेत . एकूण ४९ इतकी पटले आहेत . प्रत्येक पटलात विविध बिळे व गुहा आहेत . सात नरकांनंतर शेवटी १ राजू प्रमाण क्षेत्र मोकळे आहे. तेथे निगोद जीव राहतात . पटलाचे रत्नप्रभा नरकात रत्नासारखा प्रकाश , शर्कराप्रभात साखरेसारखा पांढरा प्रकाश आहे. तमःप्रभात अंधकाराने व्याप्त तर महातमप्रभात महान अंधकारयुक्त आहे. मध्यलोक :
तनुवातवलयाच्या अंतर्भागापर्यंत तिर्यकलोक अर्थात मध्यलोकांची मर्यादा निश्चित झाली आहे . अडीच द्वीप व दोन सागर यांनी युक्त ४५००,००० योजन मनुष्यलोक आहे. मनुष्योत्तर पर्वताच्या बाहेर मनुष्याला जाता येत नाही . अडीच द्वीपांत पाच मेरू पर्वत आहेत. प्रत्येक मेरूला संबंधित सहा कुलधर पर्वत आहेत. त्यामुळे ते क्षेत्र सात क्षेत्रात विभाजित होते . विदेह क्षेत्राच्या दोन भागांत प्रत्येकी आठ वक्षार पर्वत , सहा विभंग
जैन धर्माची ओळख / १२
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
नद्या व १६ क्षेत्र आहेत. विजायार्थ पर्वतावर विद्याधरांची वस्ती असते . अंतिम द्वीप, सागरात कर्मभूमी आहे. अन्य द्वीप व सागरात भोगभूमी असते . षट्कर्म व धर्मकर्माचे अनुष्ठान असते . जिथे जीव काही न करता प्राकृतिक पदार्थांच्या साहाय्याने उत्तम भोग भोगतात व सुखाने राहतात , ती भोगभूमी होय . त्रिकालात उत्तम , मध्यम व जघन्य स्वरूपात कर्मभूमी व भोगभूमी असते. ऊर्ध्वलोक :
सुमेरू पर्वताच्या टोकापासूनच्या जवळच्या अंतरावरूनच ऊर्ध्वलोकाला प्रारंभ होऊन लोकशिखरापर्यंत १००४०० योजनयुक्त व सात राजू प्रमाण ऊर्ध्वलोक आहे . लोकशिखरापासून २१ योजन ४२५ धनुष्य खाली स्वर्ग आहे. त्याच्या वर सिद्धलोक आहे. स्वर्गातीत स्वर्गपटल वरवरती स्थिर आहे व त्याचे दोन भाग आहेत - कल्प व कल्पातीत. १० कल्पयुक्त आहेत . कल्परहित अहमिंद्र देव विमानवासी आहेत . आठ युगलरूप स्थित अशी ही १६ कल्प पटले आहेत . १) सौधर्म , २) ईशान , ३) सानत्कुमार , ४) माहेंद्र, ५) ब्रह्म , ६) ब्रह्मोत्तर , ७) लान्तव, ८) कापिष्ठ, ९) शुक्र, १०) महाशुक्र , ११) शतार , १२) सहस्रार , १३) आनत , १४) प्राणत , १५) आरण, १६) अच्युत .
ऊर्ध्वलोकाच्या वर ग्रैवयेक , अनुदिश व अनुत्तर ही तीन कल्पातीत पटले आहेत. प्रत्येक पटलात विमान आहे. सर्व पटलांची संख्या ६३ इतकी आहे . ही विमाने १) इंद्रक , २) श्रेणिबद्ध व ३) प्रकीर्ण अशी तीन प्रकारची आहे. सर्वार्थसिद्धी विमानाच्या ध्वजदंडापासून २९ योजन व ४२५ धनुष्य वर सिद्धलोक आहे. तेथे मुक्त जीव राहतात . त्याच्यापुढे 'लोका'चा अंत होतो.
जैन व वैदिक मत : या दोन्ही मतांत बरीच जवळीक आहे. १) वलयांकित आकाररूपाने अनेक द्वीप व समुद्र एकमेकांना वेष्टीत असे आहेत . २) पर्वतांची नावे जवळजवळ समान आहेत . ३) निर्देश : भूखंडाखालील पाताळांचा निर्देश लवण सागराशी मिळताजुळता आहे. ४) पृथ्वीखालील नरकांची स्थिती दोन्हींत सारखी आहे. ५) आकाशातील सूर्य , चंद्र व देवांत समानता आहे. आधनिक विश्व व जैन मान्यता : स्थूल दृष्टीने पाहता आधुनिक भूगोल व जैन भूगोल यात बराच
जैन धर्माची ओळख / १३
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
फरक आहे. तरीपण काही साम्ये आहेत. जसे -
१) पृथ्वी प्रथम अग्नीच्या गोळ्याच्या स्वरूपात असणे, हळूहळू ती थंड होणे व त्यावर पुढे जीव उत्पत्ती होणे, ही कल्पना जैन धर्ममान्य प्रलय स्वरूपाशी मिळतीजुळती आहे. २) पृथ्वीच्या चारी बाजूंच्या वायुमंडळात ५०० मैलांपर्यंत उत्तरोत्तर तरलता जैनमान्य तीन वातवलयांप्रमाणेच आहे. ३) आशिया हे महाद्वीप जैनमान्य भरतक्षेत्राप्रमाणे आहे. ४) आर्य व म्लेंच्छ जातीचे स्थान. ५) सूर्य-चंद्र यांची स्थिती व जीवांसंबंधी विचार याबाबत दोन्हींमध्ये मतभेद आहेत. सूर्य-चंद्र यावरील जीव विज्ञानाच्या अल्पज्ञतेमुळे दिसत नाहीत. अशाप्रकारे हे विश्वाचे थोडक्यात वर्णन जैन दर्शनात आहे. षट्काल :
काल द्रव्याच्या स्वभावामुळे अवसर्पिणी व उत्सर्पिणी काल निरंतर बदलत राहतात. या दोन्हींचे सहा-सहा भेद होतात. अवसर्पिणीचा पहिला भेद सुखमा सुखमा काल असतो. त्याचा काल चार कोडाकोडी सागर प्रमाण असतो. चौथा भेद दुःखमा - सुखमा आहे. त्याचा काळ ४२ हजार वर्षे कमी एक कोडाकोडी सागर प्रमाण आहे. पाचवा भेद दुखमा व सहावा भेद दुःखमा दुःखमा असून, ते प्रत्येकी २१ हजार वर्षांचे असतात. सुखमासुखमा अत्यंत सुखाचा तर सुखमा हा सुखाचा असतो. सुखमा-दुखमात सुख-दुःख दोन्ही असते. पाचवा काल दुखमात दुःख तर सहावा काळ दुखमा-दुखमात दुःखच दुःख असते. याप्रमाणे कालचक्रामुळे मानवाच्या तसेच सर्वच जीवांच्या सुखदुःखात, आयूमध्ये, शरीररचनेत, खाण्यापिण्यात फेरबदल होत असतो.
प्रथम तीर्थंकरांचा जन्म चौथ्या काळात झाला व सध्या पंचम काल चालू आहे. या सहा कालांपैकी प्रथम तीन काळांत भरत क्षेत्रात भोगभूमी असते. या काळात युगल रूपानेच स्त्री-पुरुषांची उत्पत्ती होते. या वेळेस १० प्रकारचे कल्पवृक्ष असतात. ते सर्व सुख सुविधा प्राप्त करून देतात. पुरुष स्त्रीस 'आर्या' म्हणतो तर स्त्री पुरुषास 'आर्य' म्हणते. त्या वेळेस फक्त एकच उत्तम जात असते. चार वर्ण, असि-मसि या सर्वांचा अभाव असतो. ते सर्व अल्प कषायी असतात. त्यामुळे मृत्यूनंतर देवगती प्राप्त करतात. पुरुषाचा मृत्यू शिंका आल्यानंतर तर स्त्रीचा जांभई दिल्यानंतर लगेच होतो .
तिसऱ्या काळाच्या पल्याचा आठवा भाग शेष राहिला असताना
जैन धर्माची ओळख १४
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
कल्पवृक्षांची क्षमता कमी होते. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी आकाशात सूर्य व चंद्राचे दर्शन एकाच वेळेस झाल्यानंतर लोक घाबरतात . तेव्हा प्रथम कुलकर प्रतिश्रुतीने त्याचा खुलासा करताना सांगितले की, हा काळाचा दोष आहे. आतापर्यंत सूर्य-चंद्राचा प्रकाश ज्योतिरंग वृक्षामुळे दिसत नव्हता. तिसऱ्या कालाच्या अंतिम समयास १४ कुलकर होतात . चतुर्थ काळात तीर्थंकर , नारायण , प्रतिनारायण , चक्रवर्ती असे ६३ शलाका पुरुष होतात .
सहाव्या काळाच्या शेवटी मनुष्य एक हात उंचीचा व आयू २० वर्षांची असेल . त्या वेळेस ते मरून फक्त तिर्यंच व नरक गतीत जाणार . शीत , क्षार , विष , व्रज , अग्नी, धूळ व धूम्र या सात प्रकारे सात दिवस भयंकर वर्षा होईल . सर्व पृथ्वी प्रलयमय होईल . एकेक योजनपर्यंत पृथ्वी जलमय होईल . त्यामुळे जवळजवळ सर्व जीव मरतील. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून उत्सर्पिणीचा काळ सुरू होईल . या वेळेस प्रारंभी सात प्रकारची वर्षा होईल . पाणी , दूध , धृत , अमृत , सुगंधित पवन वगैरे . त्या वेळेस पृथ्वी शांत होईल व जीवांची उत्पत्ती होण्यास सुरुवात होईल. तो दिवस भाद्रपद शुद्ध पंचमीचा असेल . या वेळेस आपण पयूषण पर्व साजरा करतो. पाप व पुण्य :
शुभभाव पुण्य व अशुभभाव पाप . पुण्याचे दोन भेद भावपुण्य आणि द्रव्यपुण्य . तसेच पापाचेही दोन भेद आहेत - भावपाप व द्रव्यपाप. शुभकर्म :
जीवांची रक्षा करणे, त्यांना जीवदान देणे , सत्य बोलणे, चोरी न करणे , ब्रह्मचर्य , अपरिग्रह तसेच पूजा, भक्ती, नमन , दान , दया , मैत्री, प्रमोद हे सर्व शुभभाव आहेत . अशुभभावात हिंसा , असत्य , चोरी , गुरूची निंदा , क्रोध , मान , माया , लोभ करणे यांचा समावेश होतो. पुण्याचे ९ प्रकार :
१) अन्न , २) पान , ३) स्थान , ४) शय्या , ५) वस्त्र , ६) मन , ७) वचन , ८) काया , ९) नमस्कार . पापाचे १८ प्रकार :
१) प्राणतिपाद , २) मृषावाद , ३) अदत्तावान , ४) मैथुन , ५) परिग्रह , ६) क्रोध , ७) मान , ८) माया , ९) लोभ , १०) राग, ११) द्वेष , १२) कलह , १३) अभ्याख्यान , १४) पैशुन्य , १५) परपरिवाद , १६) रतिअरती , १७) माया-मृषा , १८) मिथ्यादर्शन शल्य.
जैन धर्माची ओळख / १५
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
परिसमन्तात् उष्यन्ते दहयन्ते रागद्वेषमोहादि ।
कर्माणि यस्मिन पर्वाणि इति पर्युषण पर्व : । पयूषण पर्वाच्या वेळी आपले राग-द्वेष कमी करून दहा धर्मांचे पालन करावयाचे असते. तसेच कर्मास जाळण्याची व दहन करण्याची ही वेळ असते.
कल्पकाल (२० कोडाकोडी सागर वर्ष) सुखमासुखमा सुखमा सुखमा-दुखमा दुःखमा सुखमा दुखमा दुखमा–दुखमा उंची - ३ कोस २ कोस १ कोस- ५०० धनुष्य ते ७ हाथ ते २ हाथ ते ते २ कोस ते १ कोस पर्यंत ५०० धनुष्य ७ हाथ २ हाथ १ हाथ आय-३ पल्य २ ते १ पल्य १ पल्य ते १ कोटीपर्व ते १२० वर्ष - २० वर्ष ते ते २ पल्य
१ कोटीपूर्व १२० वर्ष २० वर्ष १५ वर्ष काल- ४
३ ३ कोडाकोडी कोडाकोडी
२ कोडीकोडी मोदी मोदी
४२ हजार २१ हजार २१ हजार कोडाकोडी सागर सागर
सागर वर्ष
वर्ष वर्ष आहार-तीन २ दिवसांनतर १ दिवसानंतर प्रत्येक दिवशी पुष्कळ वेळा प्रचुरता दिवसा नंतर
एकवेळा द्रव्य व्यवस्था :
या विश्वात राहणारी सहा द्रव्ये आहेत . परंतु , द्रव्य म्हणजे काय? सत् म्हणजे द्रव्य . तसेच जे उत्पाद , व्यय व ध्रौव्याने युक्त असते , ते द्रव्य होय . ही परिभाषा पण प्रसिद्ध आहे. तसेच गुण पर्यायाने युक्त ते द्रव्य होय. ही पण एक व्याख्या आहे.
द्रव्याला वस्तू , सत् , पदार्थ , सत्ता व तत्त्वही म्हणतात . प्रत्येक द्रव्य हे स्वतंत्र व अनादी आहे. त्यांचा कर्ता कुणीच नाही . द्रव्यात गुण पहिल्यापासूनच असतात. त्यांची निर्मिती कुणीच करीत नाही. एका द्रव्यात अनंत गुण असतात . मी जीव द्रव्य आहे, हीच माझी ओळख आहे. आचार्य पूज्यपाद “सर्वार्थसिद्धी'त म्हणतात :
'धर्माधर्मादीनि द्रव्यानी यत्र लोक्यन्ते स लोकः।" अर्थ - जिथे धर्म , अधर्म वगैरे सहा द्रव्ये राहतात , तोच लोक आहे. द्रव्य म्हणजे 'उत्पादव्ययध्रौव्ययुक्तं सत्'. उत्पाद म्हणजे द्रव्यांत जो नवीन पर्याय किंवा अवस्था निर्माण होते , तो उत्पाद होय. सोन्याची अंगठी मोडून कानातली फुले केलीत. ही कानातली फुलेच उत्पाद होय. व्यय म्हणजे जो जुना पर्याय नष्ट झाला तो. इथे आपल्या उदाहरणात अंगठीचा व्यय झाला . ध्रौव्य द्रव्य म्हणजे काय? जे द्रव्य सोन्याच्या रूपात होते ते कायम राहिले , म्हणजे
जैन धर्माची ओळख / १६
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
ध्रौव्य द्रव्य हे कधीच नष्ट होत नाही. तर बघा द्रव्यात उत्पाद, व्यय व
ध्रौव्य आहे. द्रव्य हे नित्य आहे.
.
१) जीवद्रव्य :
ज्यात चेतना आहे, दर्शनरूप, ज्ञानशक्ती आहे, तो जीव. मी स्वयं जीवद्रव्य आहे. मी वस्तूचे, पदार्थाचे ज्ञान करू शकते. मी 'स्व'चे तसेच पर वस्तूचे ज्ञान करू शकते.
२) पुद्गलद्रव्य :
ज्यात स्पर्श, रस, गंध आणि वर्ण हे विशेष गुण आहेत, त्यांना पुद्गलद्रव्य म्हणतात. हे अजीव आहेत. त्यात ज्ञान-दर्शन शक्ती नसते. जड असतात . उदा . टेबल, शरीर, घर वगैरे.
पुद्गलद्रव्याचे दोन भेद आहेत १) परमाणू, २) स्कन्ध. परमाणू म्हणजे ज्याचे भाग होऊ शकत नाही. परमाणू हा सूक्ष्म असतो. 'स्कन्ध' म्हणजे दोन वा अधिक परमाणूंचा समूह. आपण हे उदाहरणाने समजू. समजा, १६ परमाणूंचा एक पुद्गल पिंड आहे, तो 'स्कन्ध' आहे. त्याचे तुकडे झाल्यानंतर जे आठ परमाणू आहेत, त्यांना 'देश' म्हणतात व चार परमाणूंचा एक चतुर्थांश तुकडा म्हणजे 'प्रदेश' होय. जो अविभागी भाग राहील, तो 'परमाणू' होय.
स्कन्ध सहा प्रकारचे आहेत.
-
१) बादर - बादर : एकदा तोडल्यानंतर ज्यांना जोडता येत नाही ते. जसे दगड, लाकूड वगैरे.
२) बादर : दूध, तूप, तेल, रस, पाणी यांचे छेदन झाल्यानंतरही ते एकत्रित होतात. जसे दूध व पाणी वेगळे केले जाते तसेच यांना पुन्हा एकत्रित करता येते. हे बादर स्कन्ध आहे.
—
३) बादर सूक्ष्म : ज्यांचे ज्ञान तर होते; परंतु त्यांना पकडता येत नाही. जसे सावली, अंधार, चांदणे, ऊन वगैरे.
४) सूक्ष्म बादर : पाच इंद्रियांद्वारे होणारे ज्ञान. जसे- स्पर्श, रस, वर्ण, गंध. जे सूक्ष्म आहे; परंतु तरी त्यांचे ज्ञान होते .
सूक्ष्म : कर्मवर्गणा, जे की अत्यंत सूक्ष्म आहे; त्यांचे ज्ञान इंद्रियांद्वारे होत नाही .
५)
६) सूक्ष्म-सूक्ष्म : अत्यंत सूक्ष्म स्कन्ध.
पुद्गलाचे चार भेद आहेत. १) स्कन्ध, २) स्कन्धदेश, ३) स्कन्धप्रदेश,
जैन धर्माची ओळख / १७
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
४) परमाणू. पंचास्तिकाच्या ७४व्या गाथेत लिहिले आहे.
'खंधा या खंधदेशा खंधपदेसा य होति परमाणू ।
इति ते चदुब्बियप्पा पुग्गलकाया मुणेयव्वा ।' पुद्गलाच्या विभिन्न अवस्था शास्त्रात नमूद आहेत - शब्द , बंध, स्थूलता संस्थान , भेद , अंधकार , छाया , आतप आणि उद्योत . ज्याप्रमाणे प्रकाश डोळ्यांनी दिसतो तसेच अंधकार पण चक्षुद्वारेच ग्रहण केला जातो. तम हा नीलवर्णाचा असतो म्हणून थंडपणा जाणवतो. पुद्गलाचे भेद आणखी सहा प्रकारे करण्यात येतात . १) उत्कर, २) चूर्ण, ३) खंड, ४) चूर्णिका , ५) प्रतर आणि ६) अणुचटन . ३) धर्मद्रव्य :
जैन दर्शनात धर्मद्रव्याची वेगळी , विशिष्ट कल्पना आहे ; जी अन्य धर्म व दर्शनापासून भिन्न आहे. धर्मद्रव्य हे गमन करण्यास कारणीभूत आहे . हे उदासीन कारण आहे. कारण , जीव व पुद्गल यांना गती देण्यास ते कारणीभूत ठरते . पण, फक्त त्यांना गमन करायचे असेल तरच ते मदत करते , अन्यथा नाही. धर्मद्रव्य हे आकाशद्रव्याप्रमाणेच निष्क्रिय आहे. तत्त्वार्थसूत्रात म्हटले आहे - ‘निष्क्रियाणि च' ।। धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशाचे आहे. पाण्यातील माशास पाणी हे गमन करण्यास निमित्त आहे. तसेच धर्मद्रव्य जीवद्रव्य व पुद्गलद्रव्यास गमन करण्यास निमित्तमात्र आहे . अलोकाशात धर्मद्रव्य नसल्याने सिद्ध भगवान स्थिर आहेत . ४) अधर्मद्रव्य :
जीव व पुद्गलास थांबण्यास , स्थिर होण्यास जे निमित्त बनते , ते अधर्मद्रव्य आहे. हे पण उदासीन कारण आहे. जीव व पुदगल द्रव्यांना ते स्थिर ठेवण्यास निमित्तमात्र आहे ; ज्याप्रमाणे वृक्षाची छाया ही प्रवाशासाठी थांबण्यास सहायक आहे . अधर्मद्रव्य पण धर्मद्रव्याप्रमाणेच संख्येने एक व प्रदेशाने असंख्यात आहे. ५) आकाशद्रव्य :
जे जीवादी पाच द्रव्यांना राहण्यास जागा देते , ते आकाशद्रव्य आहे . आकाशद्रव्य सर्वव्यापक व सर्वत्रच आहे . ते सर्वात विशाल द्रव्य आहे. आकाश हे अरूपी आहे. म्हणून जे निळे आकाश दिसते , ते पुद्गलाचा पर्याय आहे. जिथे जीव , पुद्गल , धर्म , अधर्म व काल द्रव्य राहतात ; त्यास लोकाकाश म्हणतात . आकाशद्रव्याचे दोन भेद आहेत - १) लोकाकाश,
जैन धर्माची ओळख / १८
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
२) अलोकाकाश. आकाश हे द्रव्य अनंत प्रदेशाचे आहे. ६) कालद्रव्य :
जे जीवादिक द्रव्यांच्या परिणमनाला निमित्त ठरते , ते कालद्रव्य आहे; ज्याप्रमाणे कुंभाराच्या चाकास फिरण्यास लोखंडाचा खिळा निमित्तमात्र असतो. वास्तविक , हे परिणमन जीवादिक द्रव्य स्वतः करीत असतात . जैन दर्शनात कालद्रव्याचे दोन प्रकार आहेत . १) निश्चय काल व २) व्यवहार काल. निश्चय काल हा पाच वर्ण , पाच रस , दोन गंध आणि आठ स्पर्शानी रहित असतो. परंतु अमूर्त , अगुरुलघु आणि वर्तना लक्षणांनी परिपूर्ण असतो. समय , निमेष , काष्ठा , कला , घडी , अहोरात्र , महिना , ऋतू , अयन आणि वर्षरूप जो काल आहे , तो पराश्रित आहे. समय हा अविभागी आहे म्हणून आचार्यांनी गणनाच्या दृष्टीने काही मापदंड दिलेत . जसे - आवलिया
१ स्तोक ७ स्तोक
१ लव . ३८ लवने अधिक
१ मुहूर्त १ मुहूर्त
२ घडी ३० मुहूर्त
१ दिवस , १ रात्र १५ दिवस व रात्र
१ पक्ष २ पक्ष
१ महिना १ ऋतूत
२ महिने ३ ऋतूत
१ अयन २ अयन
१ वर्ष ५ वर्षे
१ युग १ लाख वर्षे x ८४
१ पूर्वांग १० कोडाकोडी सागरोपम =
१ उत्सर्पिणी काळ २० कोडाकोडी सागरोपम
१ कल्प काळ + १० कोडाकोडी सागरोपम =
याप्रकारे काळाची मोजणी होते. अजीव द्रव्य :
ज्यास ज्ञान नाही , जे जाणत नाही, ते अजीव द्रव्य आहे. जीवास सोडून बाकीचे पाच द्रव्य - पुद्गल , धर्म , अधर्म , काल , आकाश अजीव द्रव्य आहेत.
जैन धर्माची ओळख / १९
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
गुण : ___जो द्रव्याच्या संपूर्ण भागात व सर्व अवस्थांत आढळतो; तो त्या द्रव्याचा गुण असतो; जसे जीवद्रव्याचा मुख्य गुण जाणणे आहे. तर हा गुण जीवद्रव्याची सोबत नेहमी देतो . गुण व द्रव्याचा नित्यतादात्म्य संबंध आहे.
गुणाचे दोन भेद आहेत . १) सामान्य गुण, २) विशेष गुण. विशेष गुण हे प्रत्येक द्रव्याचे विशिष्ट गुण असतात . ते फक्त त्याच द्रव्यात सापडतात . जसे पुद्गलद्रव्यात स्पर्श , रस , वर्ण , गंध आढळतात . पण , हे गुण धर्मद्रव्यात नाहीत. ___सामान्य गुण मात्र सर्व द्रव्यांत असतात . सामान्य गुण अनंत आहेत . परंतु मुख्य सहा आहेत . १) अस्तित्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्य कधीच नष्ट होत नाही , त्या गुणास अस्तित्व गुण म्हणतात . २) वस्तुत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्यात अर्थक्रियाकारित्व होते , त्यास वस्तुत्व गुण म्हणतात. ३) द्रव्यत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्यात नेहमी बदल होतात , त्यांच्या अवस्था बदलतात , त्यास द्रव्यत्व गुण म्हणतात. ४) प्रमेयत्व गुण : जेव्हा द्रव्य ज्ञानाचा विषय बनते , तेव्हा प्रमेयत्व गुण असतो. ५) अगुरूलघुत्व गुण : ज्या शक्तीने द्रव्याचा द्रव्यपणा कायम राहतो. अर्थात ; एक द्रव्य दुसऱ्यात द्रव्यरूप होत नाही. एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, द्रव्यात राहणारे अनंत गुण इकडेतिकडे पसरत नाही , वेगळेवेगळे होत नाही तेव्हा त्यास अगुरूलघुत्व गुण म्हणतात . ६) प्रदेशत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्याचा आकार हा अवश्य असतो, त्यास प्रदेशत्व गुण म्हणतात .
या प्रकारे द्रव्याचे हे सहा सामान्य गुण आहेत . गुण हे भावरूप आहेत . तथा अनादि-अनंत , अकृत्रिम आहेत .
पर्याय : गुणानंतर आता पर्यायाची परिभाषा बघू या गुणांच्या कार्याला पर्याय म्हणतात . यात परिणमन होत असते. पर्यायाचे दोन भेद आहेत . १) व्यंजनपर्याय : द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजनपर्याय म्हणतात.
जैन धर्माची ओळख / २०
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
२) अर्थपर्याय : प्रदेशत्व गुणास सोडून बाकीच्या सर्व गुणांच्या परिणमनास अर्थपर्याय म्हणतात. पर्यायाचे द्रव्यपर्याय व गुणपर्याय हे पण भेद आहेत.
गुण
विशेष
अस्तित्व वस्तुत्व
स्वभाव
अर्थपर्याय
सामान्य
द्रव्यत्व प्रमेयत्व अगुरुलघुत्व प्रदेशत्व
अर्थपर्याय
व्यंजनपर्याय
विभाव अर्थपर्याय
स्वभाव
व्यंजनपर्याय
जैन धर्माची ओळख / २१
पर्याय
विभाव व्यंजनपर्याय
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
सात तत्त्वे
वस्तूच्या स्वरूपास तत्त्व म्हणतात . जैन दर्शनात सात तत्त्वे प्रयोजनभूत मानली आहेत. कारण , त्यांचे ज्ञान प्राप्त केल्याने आत्म्याचे कल्याण व मानव जन्माचा उद्देश सफल होतो. म्हणून प्रत्येकास त्याचे ज्ञान हवेच; अन्यथा स्व व पर असा भेद करता येणार नाही.
प्रयोजनभूत सात तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत.
१) जीव, २) अजीव, ३) आस्त्रव, ४) बंध, ५) संवर, ६) निर्जरा, ७) मोक्ष. जीवतत्त्व म्हणजे काय? १) जीवतत्त्व :
दर्शनज्ञान स्वभावी आत्म्यास जीवतत्त्व म्हणतात . जीवद्रव्य आणि जीवतत्त्व या दोन्हींत अंतर आहे. ज्ञानदर्शनस्वभावी , त्रिकाली ध्रुव आत्माच जीवतत्त्व आहे. मी स्वयं जीवतत्त्व आहे. २) अजीवतत्त्व :
आत्म्याच्या व्यतिरिक्त समस्त पदार्थांना अजीवतत्त्व म्हणतात . पुद्गल , धर्म , अधर्म , आकाश , काल ही अजीवतत्त्वे आहेत . ३) आस्त्रवतत्त्व :
आत्म्यात उत्पन्न होणारे राग-द्वेष मोहरूप शुभ-अशुभ विकारी भावांना भावास्त्रव म्हणतात आणि त्या भावांच्या निमित्ताने द्रव्यकर्माचे येणे यास द्रव्यास्त्रव म्हणतात . असे आस्त्रव तत्त्वाचे भावास्त्रव व द्रव्यास्त्रव हे दोन प्रकार आहेत . आस्त्रवतत्त्व हे पाप-पुण्य येण्याचे द्वार आहे. आपण आस्त्रव कसे येतात , हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जसे - एकदा एका शेठजीस वैद्याने आंबे खाऊ नये म्हणून सक्त बजावले . जर शेठजीने आंबे खाल्ले तर मृत्यू येईल असेही सांगितले . शेठजीने कधीच आंबे न खाण्याचा निर्णय घेतला. एकदा जंगलातून प्रवास करताना ते एका झाडाखाली विसावा घेण्यास थांबले . योगायोग असा की, ते झाड आंब्याचे होते. झाडावरील पिवळ्या
जैन धर्माची ओळख / २२
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
रंगाचे ताजेतवाने सुंदर आंबे बघून शेठजीस आंबे खाण्याचे भाव झाल्याबरोबर भावास्त्रव सुरू झाला व त्याच्या पाठोपाठ द्रव्यास्त्रव पण
झाला. ४) बंधतत्त्व :
मोह-राग-द्वेष, पाप-पुण्याच्या विभावाने आत्म्यात थांबणे म्हणजेच भावबंध व त्याच्या निमित्ताने पुद्गलाचे स्वयं कर्मरूप बांधणे म्हणजे द्रव्यबंध होय. हेच आपण शेठजीच्या उदाहरणाने समजू. शेठजीला आंबे खाण्याचे भाव झालेत व तोंडाला पाणी पण सुटले. अचानक खाली पडलेला आंबा शेठजीने तोंडाला लावला तेव्हाच भावबंध झाला व तो झाल्याबरोबरच कर्म पुद्गल परमाणूने कर्मबंध रूपाने द्रव्यबंध केला. शुभ भावाने पुण्याचा बंध होतो. जसे मंदिरात जाणे, पूजा करणे, तीर्थयात्रा करणे, स्वाध्याय करणे, , पुस्तक लिहिणे हे सर्व शुभभाव आहेत. त्यामुळे पुण्याचा बंध होतो. परंतु, कुणाचे वाईट करणे, मन दुखविणे, मारणे इत्यादीमुळे अशुभभाव बनतात. पाप-पुण्य हे आस्त्रवतत्त्वात समाविष्ट आहेत.
५) संवरतत्त्व :
आत्म्याच्या शुद्धीचे प्रगटीकरण हेच संवरतत्त्व आहे. ज्ञानानंदस्वभावी आत्म्याच्या लक्षामुळे विकारी भावांना अडविणे म्हणजेच भावसंवर आहे व तदनुसार नवीन कर्माचे येणे, स्वयं थांबणे म्हणजे द्रव्यसंवर आहे. वरील उदाहरणाने हेच आपण बघू या. शेठजीला आंबे खाण्याची तीव्र इच्छा झाली व खाली पडलेला आंबा शेठजीने तोंडाला पण लावला. पण, लगेच त्यांना आठवले की, माझा मृत्यू जवळ येईल. तेव्हा तो आंबा न खाताच दूर केला व स्वयं मी कोण, याचा विचार मनात येताच संवरतत्त्वाचा प्रारंभ झाला. जहाजाला पडलेले छिद्र बंद करण्याचे प्रयत्नच संवरतत्त्वात उदाहरण म्हणून योग्य ठरतात.
६) निर्जरातत्त्व :
होते.
अखंड निज शुद्धात्म्याच्या लक्षामुळे आंशिक शुद्धी होते आणि अशुभाची हानी झाल्यामुळे भावनिर्जरा होते. त्याच वेळेस कर्माचे अंश खिरणे चालू होते . त्यास द्रव्यनिर्जरा म्हणतात. जीवाच्या मनात आत्म्याच्या विषयी विचार, मंथन चालू झाले की, , निर्जरातत्त्वाची सुरुवात आपल्या उदाहरणात शेठजीने आता आंबा विसरून स्वयंचा अभ्यास, विचार, मंथन सुरू केले.
जैन धर्माची ओळख / २३
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
७) मोक्षतत्त्व :
ज्ञानानंदस्वभावी आत्म्याच्या लक्षामुळे आत्म्याची पूर्ण शुद्धता, वीतरागता हे भावमोक्ष आहे व त्याच्या निमित्ताने द्रव्यकर्माचा पूर्णतः नाश होणे द्रव्यमोक्ष आहे. आता पुन्हा जन्म-मरणाचे फेरे नाहीत.
सुनो सुनो हे भव्य जीवो, जैन धर्म की वाणी ।
छह द्रव्य और सात तत्त्वकी सुंदर इक कहानी /
अशाप्रकारे ही सात तत्त्वे आहेत. सात तत्त्वांत आस्त्रव व बंधतत्त्व हे दुःखाचे कारण आहे आणि दुःखरूप असल्याने सोडण्यास योग्य आहे. जीवतत्त्व हेच परमश्रेष्ठ तत्त्व आहे. त्याच्याच साहाय्याने मोक्ष प्राप्त होतो. संवर व निर्जरा ही दोन्ही तत्त्वे आम्हास सुखमार्गी घेऊन जातात म्हणून प्रगट करण्यास योग्य आहेत. मोक्षतत्त्व तर परमध्येय आहे. या सात तत्त्वांत जीव व अजीवतत्त्व सामान्य आहेत; तर बाकीची पाच तत्त्वे विशेष आहेत. या सात तत्त्वांचे ज्ञान होणे फार महत्त्वाचे आहे. कारण, त्यांच्याशिवाय स्व व पर मध्ये भेद करण्याचे साधन नाही. तेव्हा फक्त या सात तत्त्वांच्या ज्ञानाने आम्ही आमचा मोक्षमार्ग सोपा व सरळ करू शकतो.
जीव अजीव
आस्त्रव
सात तत्त्वे
बंध
संवर
जैन धर्माची ओळख / २४
निर्जरा
मोक्ष
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
जीव व संसार परिभ्रमण
मानवी जीव अनादिकाळापासून मिथ्यात्वामुळे वस्तूचे स्वरूप न जाणता शरीर , स्त्री-पुरुष , धन-धान्य , मुले या पर पदार्थांमध्येच एकत्व , ममत्व , कर्तृत्व व भोक्तृत्वाची खोटी कल्पना मनी धरून जगात वावरत आहे. त्याचमुळे दुःख , व्याकूळता , चिंता , क्लेश अशा अनेक पीडांनी त्रस्त आहे.
__ हा जीव या संसारामध्ये नाना योनी आणि गतींमध्ये भटकतो. याचे कारण , मी कोण? माझे या विश्वाशी नाते काय? या मूलभूत प्रश्रांचा विचार करून आयुष्याची दिशा ठरविली नाही, हेच होय. त्यालाच मिथ्यात्व म्हटले आहे.
आत्महित साधण्याकरिता प्रथम - १) खऱ्या देवशास्त्रगुरूची यथार्थ प्रतीती २) जीवादी सप्त तत्त्वांची यथार्थ प्रतीती ३) स्व-परतत्त्वांची श्रद्धा आणि ४) आपल्या शुद्ध स्वरूपाची अनुभूती या गोष्टी आवश्यक आहेत .
__ अज्ञानी जीवास आपल्या चैतन्य स्वरूपाची ओळख न झाल्याने तो रागादी विकारामुळे स्व व परचा भेद करू शकत नाही. रागादिक हे आस्त्रवभाव असून , ते आत्म्यापासून भिन्न आहेत . त्यामुळेच ते सोडण्यायोग्य (हेय) आहे. आपल्या ज्ञायकस्वभावाच्या आश्रयाने स्वरूपात रमणे , हाच एकमेव उपाय आहे. परंतु , जीवाच्या हे लक्षातच येत नाही व त्यामुळे तो पूजा-अर्चनेच्या क्रियाकांडानेच कर्मांना रोखून दूर करता येईल, असे मानतो. अशाप्रकारे सर्वच अज्ञानी जीव या अगृहीत मिथ्यात्वाने पछाडलेले आहेत. बाहेरचे संयोग अथवा पर पदार्थ हे दुःखाचे कारण नाही. परंतु , त्यांच्याविषयीचे प्रेम , ममत्व हेच दुःखाचे कारण आहे . मिथ्यात्व म्हणजे काय?
प्रयोजनभूत जीवादी सात तत्त्वांच्या विपरीत (विरुद्ध) श्रद्धा न असणे म्हणजे मिथ्यात्व होय . कुदेवाला देव मानणे तथा अतत्त्वाला तत्त्व समजणे,
जैन धर्माची ओळख / २५
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
अधर्माला धर्म मानणे या सर्व मिथ्यात्वाच्याच कल्पना आहेत .
मिथ्यात्वाचे पाच प्रकार आहेत.
१) एकान्त , २) विपरीत , ३) संशय , ४) अज्ञान आणि ५) विनय . १) एकान्त मिथ्यात्व :
आत्मा , परमाणू अनेक धर्मांनी परिपूर्ण असूनदेखील त्यांना फक्त एकाच गुणाने परिपूर्ण मानणे , हे एकांत मिथ्यात्व होय. जसे आत्मा हा सर्वथा नित्यच मानणे. २) विपरीत मिथ्यात्व :
शरीरास आत्मा मानणे , पुण्याने धर्म होतो हे मानणे विपरीत मिथ्यात्वाचे उदाहरण आहे. थोडक्यात, जे यथार्थ आहे , त्याच्या विरुद्ध मानणे. ३) संशय मिथ्यात्व :
धर्माचे स्वरूप असे आहे की तसे आहे, याविषयी मनात संशय असणे संशय मिथ्यात्व आहे. उदा . आत्मा हा स्व चा कर्ता आहे की परचा कर्ता आहे, हे न समजणे. ४) अज्ञान मिथ्यात्व :
जिथे हित-अहिताचा मुळी विवेकच नसतो , त्यास अज्ञान मिथ्यात्व म्हणतात . अज्ञान म्हणून त्याचा दोष लागणारच , हे नक्की. ५) विनय मिथ्यात्व :
सर्वच धर्म उत्कृष्ट आहेत. सर्वच देव नमस्कार करण्यायोग्य आहेत, यास विनय मिथ्यात्व म्हणतात . कुणी नावे ठेवतील म्हणून सर्वच मंदिरांत विनय दाखविणे, हे पण एक कारण असते .
मिथ्याज्ञानाचेही तीन प्रकार आहेत - १) संशय, २) विपर्यय व ३) अनध्यवसाय.
प्रयोजनभूत सात तत्त्वांना यथार्थ न जाणणे, हे मिथ्याज्ञान आहे. मनात वस्तूच्या स्वरूपाविषयी संशय असतो . विपर्ययमध्ये 'हे असेच आहे' हे विरुद्ध दिशेने मानणे असते ; तर अनध्यवसायात ‘काहीतरी आहे' असे अनिश्चित ज्ञान असते. गृहीत व अगृहीत मिथ्यात्व :
मिथ्यात्वाचे असेही दोन प्रकार आहेत . १) गृहीत आणि २) अगृहीत मिथ्यात्व. देव, शास्त्र, गुरू, धर्म ही वस्तुतः तत्त्वांची ओळख देण्यास व आत्म्याला ओळखण्यास निमित्तभूत उत्कृष्ट साधने आहेत. परंतु , अज्ञानामुळे
जैन धर्माची ओळख / २६
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
खऱ्या देव , गुरू, शास्त्र व धर्माचा परिचय होतच नाही. उलट , आपल्या विपरीत समाजाच्या आहारी जाऊन अतत्त्वश्रद्धान करतो, तेच गृहीत (आधिगमज) मिथ्यादर्शन होय. परंतु, जे मिथ्यात्व मागील संस्कारामुळे निसर्गतःच प्राप्त होते , त्यास अगृहीत मिथ्यात्व म्हणतात .
हे मिथ्यात्त्व परोपदेशाशिवाय इंद्रियासोबत तृष्णा आणि कषायामध्ये जी प्रकृती असते ; त्या प्रकृतीलाच अगृहीत (निसर्गज) मिथ्यात्व म्हणतात . जीवतत्त्वाचे स्वरूप व भेद :
जीवतत्त्वाचे तीन प्रकार आहेत . गती, इंद्रिय इत्यादिकांच्या अपेक्षेने भेद न करता अंतरंग श्रद्धा व तत्स्वरूप साक्षात परिणाम या अपेक्षेने हे तीन भेद केले आहेत . १) बहिरात्मा , २) अंतरात्मा, ३) परमात्मा . १) बहिरात्मा : जो शरीरादी बाह्य पदार्थांमध्ये आत्मबुद्धी करतो , तो बहिरात्मा होय. त्याला जीव-अजीवाचे , स्व-पराचे भेदज्ञान नसते . तो अविवेकी असतो. तो फक्त बाह्य जग जे दिसते , त्यास खरे मानतो. २) अंतरात्मा : जो आपल्या भेदविज्ञानाद्वारे आत्मस्वरूपाला शरीरादी सर्व परद्रव्यांपासून व विकारांपासून भिन्न मानतो, तो अंतरात्मा होय. अंतरात्मे हे तीन प्रकारचे आहेत . १) उत्तम : जसे मुनिराज जे आपल्या शुद्ध
आत्मस्वरूपात लीन असतात . २) मध्यम : जे देशव्रती, १२ व्रते व ११ प्रतिमा पाळणारे पाचव्या गुणस्थानातील श्रावक आहेत , ते मध्यम अंतरात्मा आहेत. ३) जे अविरत आहेत, ते जघन्य अंतरात्मा आहे. हे तीन अंतरात्मे मोक्षमार्गामध्ये विहार करणारे आहेत. ३) परमात्मा : ज्याने आपल्या आत्म्याची पूर्णतः शुद्धी केली व ज्यास जन्ममरण नाही, असा तो परमात्मा. अनंत वीर्य , अनंत दर्शन , अनंत सुख, अनंत ज्ञानाने परिपूर्ण तो परमात्मा होय .
जैन धर्माची ओळख / २७
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
श्रावकधर्म
श्रावक म्हणजे आत्महित श्रवण करणारा.
श्रृणोति गुर्वादिभ्यो धर्मामिती श्रावकः अर्थात जो गुरूकडून धर्म ऐकतो. मोक्षमार्गात श्रावकाचे स्थान फार महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे इमारत उभी करण्यास पाया मजबूत असावा लागतो; त्याचप्रमाणे मूळ पाया 'श्रावकधर्म' हा मजबूत हवा. जो श्रावक धर्माचे यथायोग्य पालन करतो; त्याचा मोक्षमार्ग सहज सुलभ होतो.
नित्यनिगोद राशीतून संसार राशीत प्रवेश होणे दुर्लभ आहे . त्यात पंचेंद्रिय अवस्था दुर्लभ आहे. त्यात मनुष्यगती मिळणे अती दुर्लभ आहे. त्यातही तत्त्वज्ञानपूर्वक धर्माचरण पाळणे अत्यंत दुर्लभ आहे. सर्वप्रथम तत्त्वाचे यथार्थज्ञान प्राप्त करणे अनिवार्य आहे.
'कोटि जन्म तप तपे ज्ञानविन कर्म झरे जे ।
ज्ञानी के छिनमाहि त्रिगुप्ति सहज टरे तै ।' अर्थ :
तत्त्वज्ञानरहित शेकडो जन्मोजन्मी तप केले तरी ते सर्व व्यर्थ आहे . ज्ञानपूर्वक तीन गुप्तींचे पालन करून यथायोग्य आचरण करणाऱ्या संयमी साधुसंतांचे पूर्वी अनेक जन्मांमध्ये संचित केलेले पाप क्षणार्धात नष्ट होते. असा ज्ञानपूर्वक तपाचा महिमा आहे. धर्माचा प्रारंभ चारित्र्याशिवाय होत नाही . जे तत्त्वज्ञान आचरणसहित आहे , तेच योग्य आहे , तेच श्रेष्ठ आहे.
आत्मा एक व आत्म्याचा धर्मही एकच आहे. मोक्षमार्गही वास्तविक एकच आहे . आत्म्याचा स्वभाव शुद्ध-ज्ञान , दर्शन , ज्ञाताद्रष्टा आहे. आत्मस्वभावात अविचल स्थिर होणे यालाच मोक्ष म्हणतात . 'सिद्धी स्वात्मोपलब्धिः' आत्मस्वरूपाची जाणीव होऊन त्यात स्थिर होणे हीच समाधी, बोधी, आत्मोपलब्धी व मोक्षसुखाची प्राप्ती आहे. स्व-पराचे, हित-अहिताचे , धर्म-अधर्माचे , आत्मा-अनात्म्याचे यथार्थ भेदेविज्ञान तीच खरी बोधी आहे . त्यालाच सम्यग्दर्शन म्हणतात .
जैन धर्माची ओळख / २८
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
भेद विज्ञानतः सिद्धाः सिद्धा ये किल केचन ।
तस्यैवाभावतो बद्धाः बद्धा ये किल केचन ।। अर्थ :
आजपर्यंत जे कोणी सिद्ध झाले , ते सर्व भेदविज्ञानानेच सिद्ध झाले व जे कोणी या जगात बद्ध आहेत , ते भेदविज्ञानाच्या अभावामुळेच होय . आत्म-अनात्म तत्त्वांचे यथार्थ भेदविज्ञान हाच मोक्षाचा सुलभ उपाय आहे. परंतु , जोपर्यंत हे करणे शक्य वाटत नाही ; तोपर्यंत मंद कषायरूप राहणे योग्य आहे . यद्यपि शुभरागरूप शुभयोग हे पुण्यबंधालाच कारणीभूत होते . प्रमादी , स्वच्छंदी , असंयमी जीवन घालवून नरक, निगोदाचे दुर्गती दुःख भोगण्यापेक्षा व्रत , नियम , दया , दान , पूजा आदी व्यवहारधर्माचे यथोचित पालन करून पुण्य संपादन करून संसारातील जीवन सुगती , सुखामध्ये व्यतीत करावे व परंपरेने भविष्यकाळी मोक्षसुखाची प्राप्ती करून घ्यावी हाच एकमेव श्रावकाचा आचारधर्म आहे . मुमुक्षु हा नेहमी मोक्षाच्या पायऱ्या चढण्यास तत्पर असतो.
श्रावकाचे तीन भेद आहेत. १) पाक्षिक , २) नैष्ठिक , ३) साधक . १) पाक्षिक : श्रावकधर्म ग्रहण करणे मला प्रयोजनभूत आहे, असा ज्याचा पक्ष आहे तो सम्यग्दृष्टी श्रावक पाक्षिक श्रावक आहे. तो आठ मूलगुण व सात व्यसनांचा त्याग करतो. परंतु , त्यात अतिचार असतो. देवगुरूधर्माची यथार्थ श्रद्धा त्यास असते. २) नैष्ठिक श्रावक : हा ११ प्रतिमांचे पालन करणारा व अणुव्रत , गुणव्रत, शिक्षाव्रताचे पालन करणारा असतो. तो आठ मूलगुण व सात व्यसनांचे पालन व्यवस्थित करतो. ३) साधक : हा सर्व आरंभ , परिग्रहाचा त्याग करून अंती समाधीमरण साधून आत्मस्वभावात राहण्याचा अभ्यास करणारा योगी पुरुष असतो. तो समाधीमरण साधतो. संपूर्ण साधना त्याचे ध्येय असते . आठ मूलगुण :
आठ मूलगुणांत पाच अणुव्रते तर काही आचार्यांच्या मते पाच उदुम्बर , तीन मकार - मद्य , मांस , मधू येते; तर सात व्यसनांत - १) जुगार , २) मांस , ३) मद्य , ४) वेश्या , ५) परस्त्रीसेवन , ६) शिकार व ७) चोरी येते .
आठ प्रहरच्या नंतरचे लोणचे, चालित रस , चमड्याचे स्पर्शित हिंग, तूप, तेल , पाणी आदींचे सेवन न करणे. चमड्याचा व्यापार न करणे.
जैन धर्माची ओळख / २९
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
द्विदल अन्न , मक्खन (लोणी), फळ टाकून दही व ताक न घेणे .
श्रावकांचे आठ प्रकारे अंतराय दोष आहेत. व्यापारांचे जघन्य , मध्यम व उत्तम प्रकार आहेत . व्यापार करताना लोखंड, लाकूड , लाख , विष , मध (शहद) यांचा वापर करू नये. घोडा , बैल , गाढव , गाडी, रथ , नांगर यांना भाड्याने देऊ नये किंवा घेऊ नये.
लिंबू , चिंचेचे बीज सोडून देणे. वांगे, कंदमुळे, बर्फ - ओला , माती न खाणे , मेवा - ज्याचा रस निघून गेला ते खाऊ नये. शिळे अन्न खाऊ नये. दही आणि गूळ मिश्रित घेऊ नये. जिलेबी , दहीवडे कधीच खाऊ नये. कारण, त्यात त्रस व निगोदचे जीव उत्पन्न होतात .
सर्वप्रथम श्रावकाने अष्टमूलगुण धारण करणे आवश्यक आहे. सप्तव्यसनांचा तसेच मद्य, मास, मधू, पंच उदुंबर फळांचा त्याग करणे प्रथम आवश्यकच आहे. अष्टमूलगुण धारण केल्याशिवाय श्रावक धर्माचा खरा प्रारंभ होत नाही. काही लोक समजतात की , खाण्यात किंवा त्यागात खरा आत्मधर्म नाही. परंतु, हे बाह्य पदार्थ आपल्या शुभ, अशुभ परिणामास निमित्त कारण होतात. म्हणून आपल्या परिणामाच्या विशुद्धीसाठी या बाह्य वस्तूंचा - अभक्ष्य पदार्थांचा त्यागदेखील नितांत आवश्यक आहे. श्रावकाचा आचारधर्म पालन करण्यासाठी ११ प्रतिमांचे (अवस्था) नियमपूर्वक पालन केले पाहिजे. अकरा प्रतिमा : १) दर्शन प्रतिमा : शंकादिक आठ दोष , आठ प्रकारचा गर्व , तीन मूढता , सहा अनायतन या प्रमाणे २५ दोषांचा त्याग करून निर्मळ सम्यग्दर्शन धारण करणारा श्रावक अष्टमूलगुणांचा धारी असतो २) व्रत प्रतिमा : पाच अणुव्रते , तीन गुणव्रते (दिग्व्रत , देशव्रत , अनर्थदंडव्रत), चार शिक्षाव्रतांचे पालन करणारा श्रावक असतो. या नियमांना तो दोष लागू देत नाही. ३) सामायिक प्रतिमा : त्रिकाळ सामायिक करणे . ४) प्रोषध प्रतिमा : प्रत्येक अष्टमी, चतुर्दशीला प्रोषधसहित उपवास करणे. ५) सचित त्याग प्रतिमा : कच्चा भाजीपाला, फळे न खाणे ही सचित त्याग प्रतिमा होय. ६) रात्रीभोजन त्याग प्रतिमा : रात्री चारही प्रकारच्या आहाराचा त्याग करणे.
जैन धर्माची ओळख / ३०
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
७) ब्रह्मचर्य प्रतिमा : कामविकाराचा त्याग करणे म्हणजे ही सातवी प्रतिमा . ८) आरंभत्याग प्रतिमा : व्यापार , धंदा , चूल पेटविणे , स्वयंपाक करणे इत्यादी पाप क्रियांचा त्याग आरंभत्यागात येतो . ९) परिग्रह त्याग प्रतिमा : धन-धान्य , घर-दार , जमीन आदी परिग्रहांचा त्याग केला जातो. स्वामित्वपणा राहत नाही. १०) अनुमतिविरतित्याग प्रतिमा : पापारंभ , व्यापार-धंदा करण्याविषयी , माझ्यासाठी अमुक पदार्थ करा, असे अनुमोदन वा संमती न देणे अनुमतिविरतीत्यागात येते. ११) उद्दिष्टविरतित्याग प्रतिमा : उद्दिष्ट आहाराचा त्याग करणे, या शेवटच्या प्रतिमेचे ध्येय आहे. हा श्रावक मुनीच्या जवळ राहतो व तप करतो. ___ अशाप्रकारे या ११ प्रतिमा श्रावकाची मुनिधर्मासाठी तयारी करण्यास उपयुक्त आहेत . या श्रावकांच्या आचारधर्माचा पुढील भावी जीवनाशीदेखील निगडित संबंध आहे. हे श्रावकधर्माचे आचरण पुढील भावी जीवनातील सद्गतीचे रिझर्व्हेशन तिकीटच म्हटले तर ते चुकीचे होणार नाही . भक्ष्य-अभक्ष्य :
जे पदार्थ खाण्यास योग्य नाहीत, त्यांना अभक्ष्य म्हणतात. यांचे पाच प्रकार आहेत. ज्यात त्रस हिंसा, स्थावर हिंसा होते ते पदार्थ जे प्रमादकारक, अनिष्ट आणि अनुपसेव्य आहेत ते अभक्ष्य. कांदा, लसूण, बटाटे, गाजर, मुळी आदी कंदमुळांचा त्याग करणे. उकळलेले दूध २४ तास चांगले राहते. ताक १२ तास. तूप, गूळ, तेल एक वर्षपर्यंत, मीठ (दळलेले) ४८ मिनिटे, खिचडी, कोथिंबीर, कढी, दाळ, भाजी सहा तासापर्यंत. पोळी, पुरी, हलवा, कचोरी १२ तासपर्यंत चांगले राहते. पावसाळ्यात तीन दिवस, हिवाळ्यात सात दिवस व उन्हाळ्यात पाच दिवस पीठ चालते. श्रावकाचे षट् कर्म :
देवपूजा , गुरू-उपासना , स्वाध्याय , संयम , तप आणि दान श्रावकाची षटकर्म आहेत . यांचे पालन व्हायला पाहिजे . देवपूजा : ___सर्वज्ञ , हितोपदेशी विकारांपासून दूर अशा देवाची पूजा करणे . सुगंधित पाणी, दुधाने भगवंताची पूजा करणे. जिनमंदिरात नृत्य, गीत व वाद्याने महोत्सव करणे , वंदना करणे, चंदन-धूप चढविणे, छत्र , चामर , पताकांनी मंदिर सजविणे , श्रद्धापूर्वक देवाची पूजा , भक्ती करणे देवपूजेत येते .
जैन धर्माची ओळख / ३१
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
गुरू-उपासना :
म्हणजे अशा मुनीची सेवा करणे की , जे पंचव्रतधारी आहेत. तसेच जे दिगंबर , वीतरागी , गृहत्यागी , मन आणि विषयांवर नियंत्रण ठेवतात - त्यांची अर्चना , वंदना करणे . जे संसारास ज्ञानमार्ग , मोक्षमार्ग सांगतात , ते नमस्कार करण्यास योग्य असतात . स्वाध्याय :
यामध्ये स्वतःचे अध्ययन येते. स्वाध्यायाला परमतप म्हटले आहे संयम :
म्हणजे मन , वचन आणि शरीरावर नियंत्रण . हे नियंत्रण फक्त मनुष्यगतीतच होते . देव व इतर गतीत नाही. संयम दोन प्रकारचा आहे.
१) इंद्रिय संयम आणि २) प्राणिसंयम. प्राणिसंयमात दुसऱ्या प्राण्यांबद्दल आस्था व करुणा असते. हा संयम करणे म्हणजे दुर्लभ रत्न प्राप्त करणे होय. दानापेक्षा संयम श्रेष्ठ आहे. विषयचोर सगळीकडे नेहमी फिरत असतात. त्यांना घोड्याप्रमाणेच लगाम लावावा लागतो. तप :
असे की, जे लोक आणि परलोक दोन्हींना फलदायी होते . तापवले जाते ते तप . तपाचा उद्देश कर्माचा क्षय करणे असावा. शास्त्रात दोन प्रकारचे तप सांगितले आहे . १) बाह्य व २) आंतरिक. श्रावकाने यथाशक्ती तप करावे. दान :
सम्यग्ज्ञानादी गुणशुद्धी तसेच स्वयं व इतरांचे कल्याण व्हावे म्हणून प्रासुक द्रव्याचे दान करतात . दान देताना दात्याचे भाव व दानवस्तूत फरक असतो म्हणून दानफळात भिन्नता असते .
जैन धर्माची ओळख / ३२
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
कर्मसिद्धान्त
कर्मसिद्धान्त हे जैनदर्शनाचे असाधारण वैशिष्ट्य आहे. जगातील पापपुण्याचे जे काही व्यवहार चालू आहेत , ते सर्व कर्माचीच अगाध लीला आहे, असे सांख्यदर्शन म्हणते . परंतु , जैनदर्शनाचा कर्मसिद्धान्त हा कर्माधीनतेचा , पराधीनतेचा सूचक नसून जीवाच्या स्वाधीनतेचा सूचक आहे. वास्तविक , जीव कर्माधीन नसून उलट कर्म जीवाधीन आहे. जीव स्वयं आपल्या अपराध दोषाने , शुभ-अशुभ भाव करतो. त्यामुळे त्याला पुण्यपापकर्माचा बंध होतो. कर्म जेव्हा उदयाला येते , तेव्हा ते सुख-दुःख फळ देते . पुण्यकर्माचा उदय असेल तर सुख सामग्री प्राप्त होते. कर्म केवळ आपले फळ देण्याचे काम मात्र करते . परंतु , त्या सुख-दुःख फळाशी समरस होऊन जेव्हा जीव ते भोगतो , तेव्हा तो कर्माधीन होऊन दुःखी होतो. जीवाच्या अज्ञानामुळे व प्रज्ञेच्या अभावामुळे तो अपराधी बनतो.
जे कोणी जैनदर्शनाच्या कर्मसिद्धान्ताचा अभिप्राय कर्माधीनतेचा सूचक मानतात ; त्यांना जैनदर्शनाचा कर्मसिद्धान्त समजला नाही, असेच म्हणावे लागेल . कर्मसिद्धान्त हा जीवाच्या जीवनाचा दृश्य चित्रपट आहे. पूर्वी जीवाने जशा प्रकारचे परिणाम केलेले असतात ; त्याचे फळ त्याला वर्तमानकाळी भोगावे लागते. वर्तमानकाळी जीव जशा प्रकारचे परिणाम करतो; त्याचे फळ त्यास भविष्यकाळी नियमाने भोगावे लागते. ___ 'स्वयं कृतं कर्म यदात्मना पुरा फलं तदीयं लभते शुभाशुभं ।'
जीवाने जे पूर्वजन्मी शुभ-अशुभ परिणाम करून कर्म बांधलेले असते, त्याचेच चांगले-वाईट फळ त्याला या जन्मी भोगावे लागते . विधी , नशीब, दैव , कर्म , भविष्य हे सर्व एकार्थवाचक शब्द आहेत . भवितव्यता नामक अन्य एखादी अद्भुत , अदृश्य शक्ती नसून , जीव वर्तमानकाळी जे शुभअशुभ भाव करतो, तेच पुढील भविष्यकाळातील जीवनाचे 'दैव' ठरते .
मनुष्याला जर वर्तमान जीवनात सुख-शांती हवी असेल ; तर त्याने कर्मसिद्धान्ताचा सूक्ष्म रीतीने अभ्यास करावा . कर्म हे दृश्य चित्रपट दाखवते ,
जैन धर्माची ओळख / ३३
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
पण त्याचा 'हिरो' स्वयं जीव आहे. कर्मसिद्धान्त हा जीवाच्या परिणामाचा चित्रपट आहे. कर्म - ‘कर्तुःइप्सिततमं कर्म' स्वतंत्र बुद्धीने कर्ता जीवाच्या राग-द्वेष-मोहादी कारणाने कार्माण वर्गणा स्वयं परिणमित होतात . त्या परिणमनास कर्म म्हणतात. स्वतंत्र बुद्धीने कर्ता जी अवस्था प्राप्त करतो , परिणमन करतो त्यास कर्म म्हटले आहे. वर्गणा म्हणजे काय? व कार्माण वर्गणा म्हणजे काय? हा प्रश्न सहजच मनात येतो. वर्गणा म्हणजे पुद्गलस्कंध , पुद्गलांचा समूह . वर्ग म्हणजे एक परमाणू. वर्गणा म्हणजे वर्गाचे समूह व स्पर्धक म्हणजे अनंत वर्गणाचा समूह. मुख्यतः पाच प्रकारच्या वर्गणा आहेत . १) आहारवर्गणा : हे स्थूल स्कंध असतात . ते औदारिक , वैक्रियक आणि आहारक या तीन शरीररूपाने परिणमन करतात . त्या आहार वर्गणा होय . २) तैजसवर्गणा : ज्या पुद्गलस्कंधाने म्हणजेच वर्गणाने तैजस शरीर बनते , त्या तैजसवर्गणा होय. ३) भाषावर्गणा : जो पुद्गलस्कंध शब्दरूपाने परिणमन करतो , तो भाषावर्गणा होय. ४) मनोवर्गणा : ज्यामुळे द्रव्यमनाची रचना होते , त्यास मनोवर्गणा म्हणतात. ५) कार्माणवर्गणा : ज्या पुद्गलस्कंधाने कार्माण शरीर बनते , त्यास कार्माण शरीर म्हणतात . ते स्कंध अतिशय सूक्ष्म असतात.
कर्माच्या प्रकृती आठ आहेत आणि त्यांचे भेद वेगवेगळे आहेत. १) ज्ञानावरण - ५ भेद , २) दर्शनावरण - ९ भेद , ३) मोहनीय - २८ भेद, ४) अंतराय - ५ भेद, ५) वेदनीय - २ भेद , ६) आयु - ४ भेद, ७) नामकर्म - ९३ भेद, ८) गोत्र - २ भेद.
कर्मप्रकृतीचे दोन प्रकारे विभाजन करतात. घातिकर्म व अघातिकर्म . घातिया कर्माच्या ४७ प्रकृती आहेत ; तर अघातिकर्माच्या १०१ प्रकृती आहेत .
आता बघू या ज्ञानावरण कर्म म्हणजे काय व त्याचे भेद किती आहेत?
ज्ञानावर जेव्हा आवरण येते तेव्हा ते ज्ञानावरणीय कर्म असते . त्याचे पाच भेद आहेत.
१) मतिज्ञानावरणी, २) श्रुतज्ञानावरणी, ३) अवधिज्ञानावरणी, ४) मनःपर्ययज्ञानावरणी, ५) केवलज्ञानावरणी. दर्शनावरणीय कर्माचे नऊ प्रकार आहेत.
जैन धर्माची ओळख / ३४
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
१) चक्षुदर्शन, २) अचक्षुदर्शन, ३) अवधिदर्शन, ४) केवल ज्ञानावरणीय, ५) निद्राकर्माच्या पाच प्रकृती .
अंतराय कर्माचे - १ ) दान, २) लाभ, ३) भोग, ४) उपभोग अंतराय, ५) वीर्य अंतराय असे भेद आहेत.
मोहनीय कर्माचे मुख्यतः दोन भेद - दर्शन मोहनीय व चारित्रमोहनीय. मोहनीय कर्माचे २८ भेद आहेत.
मोहनीय कर्म हे सर्वात अधिक बलाढ्य व प्रभावी असते. मोहपाशात ते चांगलेच अडकवते. तीन दर्शन मोहनीय कर्म १ ) मिथ्यात्व, २) सम्यक्मिथ्यात्व, ३) सम्यक्प्रकृती.
२५ चरित्र मोहनीय कर्म :
1
१) अनंतानुबंधी क्रोध, २) अनंतानुबंधी मान, ३) अनंतानुबंधी माया, ४) अनंतानुबंधी लोभ, ५) अप्रत्याख्यान क्रोध, ६) अप्रत्याख्यान मान ७) अप्रत्याख्यान माया, ८) अप्रत्याख्यान लोभ, ९) प्रत्याख्यान क्रोध, १०) प्रत्याख्यान मान, ११) प्रत्याख्यान माया, १२) प्रत्याख्यान लोभ, १३ ) संज्वलन क्रोध, १४) संज्वलन मान, १५) संज्वलन माया, १६) संज्वलन लोभ, १७) हास्य, १८) रती, १९) अरती, २०) शोक, २१) भय, २२) जुगुप्सा, २३) स्त्रीवेद, २४) पुरुषवेद, २५) नपुंसकवेद अशा प्रकारे मोहनीय कर्माचे एकूण २८ भेद आहेत.
अघाती कर्माच्या १०१ प्रकृती असतात. गोत्र कर्माची दोन १) उच्च, २) नीच गोत्र. वेदनीय कर्माची दोन १) सातावेदनीय, २) असातावेदनीय. आयुकर्माच्या चार प्रकृती - १ ) तिर्यंचायू, २ ) नरकायू, ३) मनुष्यायू, ४) देवायू.
नामकर्माच्या ९३ प्रकृती असतात. चार गति कर्म, पाच शरीर कर्म, तीन अंगोपांग कर्म, एक निर्माण कर्म, पाच बंधन कर्म, पाच सघात कर्म, सहा संस्थान कर्म, सहा संहनन कर्म, पाच वर्ण कर्म, दोन गंध कर्म, पाच रस कर्म, आठ स्पर्श कर्म, चार आनुपूर्व्य कर्म, एक अगुरुलघु कर्म, एक उपघात कर्म, एक परघात कर्म, एक आताप कर्म, एक उद्योत कर्म, दोन विहायोगती असतात. एक उच्छ्वास कर्म, एक त्रस कर्म, एक स्थावर कर्म, एक बादर कर्म, एक सूक्ष्म कर्म, एक पर्याप्त कर्म, एक अपर्याप्त कर्म, एक प्रत्येक नामकर्म, एक साधारण नामकर्म, एक स्थिर नाम कर्म, एक अस्थिर
जैन धर्माची ओळख / ३५
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
नामकर्म, एक शुभ नामकर्म, एक अशुभ नामकर्म, एक सुभग नामकर्म, एक दुर्भग नामकर्म, एक सुस्वर नामकर्म, एक दुस्वर नामकर्म, नामकर्म, एक अनादेय नामकर्म, यशकीर्ती नामकर्म, नामकर्म, एक तीर्थंकर नामकर्म.
एक आदे एक अयशकीर्ती
नाम कर्मास चित्रकाराची उपमा दिली आहे. अशाप्रकारे नामकर्माचे ९३ भेद आहेत. कर्माचे हे विभाजन स्वयंच्या द्वारेच होते. त्याचे कारण आहे, योग आणि कषाय. योग म्हणजे मन, वचन, कायेने आत्मप्रदेशांचे कंपन होणे. या कंपनामुळेच जीवात कर्म पुद्गल परमाणूंना आकर्षित करण्याची शक्ती निर्माण होते. त्यास भावयोग म्हणतात. जीवाचे रागद्वेषाचे परिणाम किंवा भावच कषाय आहेत .
कर्म आणि जीवाचा संबंध संश्लेष संबंध आहे. जर भिंत कोरडी आहे, तर त्यावर कितीही रेती (सुकी) टाकली तरी ती चिटकणार नाही. त्याचप्रमाणे जीवाचे भाव जर ओले असतील (राग-द्वेषांनी) तरच कर्म पुद्गल परमाणूंचा संबंध स्थापित होईल. कारण, कर्म परमाणू सर्वत्र विश्वात खचाखच भरलेले आहेत. पण, ते जीवाला शिवतही नाहीत. जर जीवाने राग-द्वेष विकार केलेत तरच ते आकर्षित होतात; अन्यथा नाही. पहिल्या ते दहाव्या गुणस्थानापर्यंत कषाय व योग दोन्ही असतात. पण ११, बाराव्या गुणस्थानात फक्त योगच असतो. कारण दहाव्या गुणस्थानीच लोभ कषाय (अंतिम) दूर होतो.
ज्ञानावरणकर्म हे ज्ञानावर आवरण टाकते. म्हणजेच ज्ञान होऊ देत नाही. दर्शनावरणकर्म पदार्थाचे दर्शन होऊ देत नाही; ज्याप्रमाणे द्वारपाल राजाची भेट घेण्यास बाधा निर्माण करतो. जे कर्म जीवास सुख-दुःख देते, ते वेदनीय कर्म होय, जे कर्म मोहित करते ते मोहनीय कर्म भव प्राप्त करून देणारे कर्म आयुकर्म आहे. जे शरीराशी संबंधित ते नामकर्म. गोत्रकर्माने उच्च व नीच गोत्राचा बंध होतो; तर अंतरायकर्म दान, भोग, उपभोग यामध्ये विघ्न आणते. गोत्रकर्मास कुंभाराची उपमा दिली आहे.
जैन धर्माची ओळख / ३६
.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
bouqaure www
आयु ४
पर्ययज्ञानावरण
ज्ञानावरण
दर्शनावरण
वेदनीय २
मोहनीय २५
नाम ९३
गोत्र २
अन्तराय
केवलज्ञानावरण
वीर्यान्तराय
अवधिज्ञानावर
मतिज्ञानावरण
श्रुतज्ञानावरण
Ajuo asn jeuosledad Jos
निद्रा
टोर करने
असातावेदनीये
नंतर बाइबाट
लाभान्तराय
नेद्रानिद्रा
गति ४
नरकायु
चक्षुदर्शनावरण
भोगान्तराय
नुपूर्व्य
प्रचला
גוגו לקום
प्रचलाप्रचला,
सम्यक मिध्यात्व
अनन्तानुबंधी
तिर्यचायु
जाति ५
सुस्वर
मिथ्यात्व
अयज्ञः कीर्ति
सज्वलन
अप्रत्याख्यानावरण
नीचगोत्र
मनुष्यायु
हास्य
With
विहायोगति
प्रत्येकशरीर
बंधन
स्थावर
अरति
प्रत्याख्यानादरण
स्त्रीवेद
संहनन ६
अशुभ
तीर्थंकरत्व
आतप
उद्योत
सूक्ष्म
साधारण
jeonudeu uojeonpuler
उच्छ्वास
शोक
शुभ
आदय
कीर्ति
नपुसकवेट
जुगुप्सा
सुक्ष्मत्व
भय
रति
निर्माण
वर्ण ५
स्पर्श ८
बादर
गंध २
रस ५
पर्याप्ति
अपर्याप्ति
Do
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
कर्मबंधाचे कारण
'मिथ्यादर्शनाविरतिप्रमादकषाययोगाबन्धहेतवः ।।'
कर्मबंधाची कारणे पाच आहेत.
१) मिथ्यात्व : विपरीत मान्यता. मिथ्यात्वाचे दोन प्रकार, गृहीत व अगृहीत मिथ्यात्व . ग्रहीत मिथ्यात्व हे जन्माच्या नंतर कुणाच्या उपदेशामुळे, वाचनामुळे प्राप्त होते. गृहीत मिथ्यात्वाची पाच अंगे आहेत - १ ) एकान्त, २) विपरीत, ३) संशय, ४) अज्ञान व ५) विनय अगृहीत मिथ्यात्व हे मागील संस्कारामुळे येते.
२) अविरती : व्रत, नियमांचे पालन न करणे. अविरतीचे १२ प्रकार आहेत. षट्काय जीवाची हिंसा, पंचेंद्रिय विषय व मन असे १२ प्रकार आहेत.
३) प्रमाद : स्वरूपाच्या विषयी असावधानता प्रमाद म्हणजे आळस. याचे १५ प्रकार आहेत - चार विकथा (राष्ट्र, स्त्री, भोजन, राजा ), चार कषाय - क्रोध, मान, माया व लोभ, पाच इंद्रिय विषय - स्पर्शरसादी, एक निद्रा, व एक प्रणय असे एकूण १५ प्रमाद आहेत.
४) कषाय: जेव्हा आत्म्याची अशुद्ध परिणती होते ; तेव्हा राग-द्वेष- मोहादी विकार कषायरूपाने उत्पन्न होतात. कषायाचे २५ भेद आहेत. चार अनंतानुबंधी कषाय, चार अप्रत्याख्यानी कषाय, चार प्रत्याख्यानी कषाय, चार संज्वलन कषाय, नऊ नोकषाय- हास्य, रती, अरती, भय, जुगुप्सा, शोक, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद.
५ ) योग : मन-वचन-कायेमुळे आत्मप्रदेशाचे परिस्पंदन योग आहे. याचे १५ भेद - चार मन योग, चार वचनयोग व सात कायायोग. कर्मबंध चार प्रकारे होतो. त्याचे विभाजन स्वयं होते. १) प्रकृतिबंध : कुठल्या प्रकारचे कर्म बांधले जाईल; जसे की दर्शनावरण वगैरे निश्चित होते.
जैन धर्माची ओळख / ३८
-
ज्ञानावरण
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
२) प्रदेशबंध : प्रत्येक वेळी किती पुद्गल परमाणू जीवाच्या बरोबर बांधले जातील त्यास प्रदेशबंध म्हणतात. आत्मप्रदेशाचा किती भाग पुदगल परमाणू व्याप्त करतील,याचे हे प्रमाण असते ३) स्थितीबंध : कर्मरूप परिणमित पुद्गल परमाणू एका क्षेत्रात किती वेळासाठी बांधलेले राहतील, त्यास स्थितीबंध म्हणतात . जसे - एका वर्षासाठी की दोन भवासाठी वगैरे. ४) अनुभागबंध : बांधलेल्या कर्माची फळे देण्याची शक्ती अनुभागबंधात येते. कर्म तीव्र आहे की मंद , ते अनुभागाने समजते .
जोपर्यंत ही कर्म जीवाच्या प्रदेशात राहतात , तोपर्यंत त्यांना सत्ता म्हणतात. जेव्हा फळ देतात तेव्हा त्यांचा उदय असतो. ज्याप्रमाणे इलेक्ट्रिक चार्जिंग होते तेव्हा उदय असतो व कर्म बांधताना बॅटरी डिस्चार्जप्रमाणे असते. कर्माचा बंध हा सतत चालू असतो. विग्रहगतीत सुद्धा चालू असतो. कर्माचा उदय :
कर्माचा बंध झाल्यानंतर कर्म सत्तामध्ये पडलेली असतात , ज्याप्रमाणे बँकेत आपले सेव्हिंग अकाऊंटमध्ये असलेले पैसे. या काळास आबाधकाळ म्हणतात . आबाधकाळाच्या नंतर कर्माचा उदय होतो. काही परमाणू एका समयात तर दुसरे परमाणू दुसऱ्या समयात झडत असतात. या झडणाऱ्या परमाणूंच्या समूहास निषेक म्हणतात. पहिल्या वेळेत अधिक व दुसऱ्या समयात कमी परमाणू खिरतात . हे उत्तरोत्तर हीन होतात .
आयुशिवाय इतर सात कर्माची स्थिती
बंध
आबाधकाल
प्रथमकाल
उदयकाल ।
अन्तकाल
कर्माची स्थिती : मोहनीयकर्म
= ७० कोडाकोडी सागरोपम ज्ञानावरणीय , दर्शनावरणीय , वेदनीय , अंतराय = ३० कोडाकोडी सागरोपम नाम व गोत्रकर्म
= २० कोडाकोडी सागरोपम आयुकर्म
= ३३ सागरोपम जैन धर्माची ओळख / ३९
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
आयुकर्माचा बंध हा आठ अपकर्षणात (अधिकतम) होतो. घातिकर्माची अप्रशस्त प्रकृती तर अघातिकर्माची प्रशस्त व अप्रशस्त प्रकृती असते . एकूण कर्म प्रकृती १४८ आहेत . घातिकर्म ४७ व अघातिकर्म १०१.
१०१ + ४७ = १४८. परंतु बांधण्यास योग्य कर्म प्रकृती १२० आहेत. कर्माच्या दहा अवस्था :
१) बंध , २) सत्ता , ३) उदय , ४) उदीरणा , ५) उत्कर्षण, ६) अपकर्षण, ७) संक्रमण, ८) उपशम , ९) निधत्ती , १०) निकाचित .
जेव्हा जीव व कर्म परमाणूंचे मिलन होते , तेव्हा बंध होतो. काही काळासाठी ते कर्म संचित राहते . मग कर्माचा उदय होतो. कधी उदीरणा होते व त्यामुळे कर्माचा उदय लवकर होतो. जसे तिकीट काढण्यास तुम्ही रांगेत उभे आहात . रांग लांबच लांब आहे . इतक्यात तुमची मैत्रीण दिसते , जी खिडकीच्या अत्यंत जवळ आहे. तुम्ही तिला भेटता व आपले तिकीट काढण्यास सांगता . तेव्हाच कर्माची उदीरणा होते . उत्कर्षणामध्ये कर्माची स्थिती व अनुभाग पुढे जाते . जसेः
उत्कर्षण अपकर्षण
उदयावलीच्या बाहेरील निषेकांचे उदयावलीच्या निषेकांमध्ये येऊन मिसळणे व लवकर उदयास येणे म्हणजे कर्माची उदीरणा होय.
'पदेसाणं ठिदीणमोवट्टणा ओक्कड्डणा णामी'- धव.पु. १० तर अपकर्षणात आकृतीत दाखविल्याप्रमाणे कर्म परमाणू खाली
जैन धर्माची ओळख / ४०
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
उतरतात . कर्मप्रदेशाची स्थिती हीन होते . पण, उत्कर्षणात कर्मप्रदेशाची स्थिती वाढते . उपशममध्ये कर्माचा उदय होत नाही. ज्याप्रमाणे अग्नी हा भस्माच्या आत झाकलेला असतो, त्याचप्रमाणे कर्माची स्थिती असते. संक्रमणामध्ये प्रकृती , स्थिती, अनुभाग आणि प्रदेशाचे अन्य प्रकारे परिणमन करणे आहे.
‘पर प्रकृति रूपपरिणमनं संक्रमणम् ।' निधत्ती नावाच्या नवव्या अवस्थेत ना कर्माचे अन्य प्रकृतीत ना संक्रमण होते ना उदीरणा होते. पण, ते कर्म भोगावेच लागते. निकाचित कर्मात ना अपकर्षण होते , ना उत्कर्षण , ना संक्रमण , ना उदीरणा होते. त्या अवस्थेस निकाचना म्हणतात . धवला ग्रंथात त्याचे वर्णन आहे. अशाप्रकारे भिन्न रूपात व उदयात कर्म येते व जीवास हैराण करते. तेव्हा जीव म्हणतो :
कर्म उदयी आले हसत, कधी रडवते मज नकळत । हैराण झाला जीव सोसत, म्हणे मी काय केले भगवंत ।
कर्म हे भोगल्यानंतरच संपतात असे नव्हे तर अविपाक निर्जरात कर्मफळ न देता निघून जातात . सविपाक निर्जरात कर्माचे फळ भोगूनच निर्जरा होते. जी निर्जरा मोक्षमार्गास उपयुक्त आहे व जी शुद्धोपयोगाने होते ती सकाम निर्जरा होय . परंतु , जी निर्जरा मोक्षमार्गास उपयुक्त नाही , ती अकाम निर्जरा आहे.
कर्माची गती ही बलवान असते. ती तीर्थंकरांना पण सोडत नाही. परंतु , जीवात त्यापेक्षा अधिक सामर्थ्य आहे.
कर्माची तीव्रता ही आमच्या भावांवर अवलंबून आहे . जितके भाव तीव्र तसे बंध पडतात . उदा - चार भाऊ होते . एकत्र कुटुंबपद्धती होती. तेव्हा चौघे एकाच वेळी जेवणास बसले . जेवणात चटणी नसल्याने पहिला भाऊ म्हणाला , "आज चटणी नाही वाटते?'' दुसरा भाऊ म्हणाला, "तुम्हास चटणी करण्यास काय झाले?'' तिसरा भाऊ रागाने म्हणाला, "चटणी करण्यास तुम्ही कंटाळाच का केला?'' तर चौथा भाऊ रागाने म्हणाला, "प्रथम चटणी करा . नाहीतर मी जेवणारच नाही.'' चौघांचे वेगवेगळे भाव म्हणून कर्मबंध पण वेगळेवेगळे होतील.
फक्त मोहनीयकर्माच्या उदयाच्या वेळी जे भाव होतात; तेच भाव आगामी कर्मबंधाचे कारण होतात . बाकीचे सात कर्म आगामी कर्मास्त्रव आणि कर्मबंधास अकार्यकारी आहे . जसे एका पित्यास चार मुले आहेत .
जैन धर्माची ओळख / ४१
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
तीन मुलांना मुलीच आहेत . परंतु , चौथ्या मुलास एक मुलगा झाला. हा नातूच फक्त वंश चालवेल . अगदी त्याचप्रमाणे मोहनीयकर्म करते . ज्ञानींना कर्मबंध होत नाही व झाला तर अल्प असतो.
'बंधे न ज्ञानी कर्मसे बल विराग अरू ज्ञान । यद्यपि सेवे विषयको परी असेवक जान ।'
उपादान - निमित्त :
जर उपादान तयार असेल तर निमित्त हे फक्त सहाय्यक असते . महावीर भगवंताची योग्यता होती म्हणूनच त्यांना सिंहाच्या पर्यायातही मार्गदर्शन व उपदेश मिळाला . तेव्हा उपादान हे महत्त्वाचे आहे.
पाणी गाळून का प्यावे? पाणी गाळून घेतले नाही तर त्यात असंख्य त्रस जीव असतात व त्यांचे सेवन कळत नकळत आपल्याकडून होत असते. पांढऱ्या व जाड वस्त्रास दुहेरी करून पाणी गाळणे. गाळण्यात जमा झालेले सूक्ष्म जीव मोठ्या काळजीने कुठलीही हिंसा होणार नाही, यादृष्टीने वाहत्या पाण्यात सोडणे. अशाप्रकारे गाळून घेतलेल्या पाण्याची मर्यादा ४८ मिनिट असते . जर हरडे, लवंग, चुन्याचे प्राशुक केले तर सहा तास (दोन प्रहर) व गरम पाण्याची मर्यादा २४ तास आहे. अकृत्रिम चैत्यालय :
अकृत्रिम जिन चैत्यालयांचे वर्णन : ऊर्ध्वलोकात - ८४ लाख , ९७ हजार , २३१ आहे. मध्यलोकात - ४५८ जिन चैत्यालये आहेत. अधोलोकात - ७ करोड, ७२ लाख अकृत्रिम चैत्यालय . तिन्ही लोकात - ८ करोड, ५६ लाख , ९७ हजार , ४८१ अकृत्रिम चैत्यालय आहेत.
जैन धर्माची ओळख / ४२
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
ज्ञान : महिमा
ज्ञान समान न आन जगतमे, सुखको कारण ।
इह परा न अमृत जन्मजरा मृत्यु रोगनिवारक ।। ज्ञानासारखे सुख कुठेच नाही व ते जन्मजरामत्युचे रोगनिवारण करण्याचा उपाय आहे. जीवाचे दोन प्रकारचे उपयोग असतात. १) ज्ञान उपयोग , २) दर्शन उपयोग . सम्यग्ज्ञानाचे पाच व कुज्ञानाचे तीन असे ज्ञानाचे एकूण आठ प्रकार आहेत . कुज्ञानात - कुमती , कुश्रुत व कुअवधी असते; तर सम्यग्ज्ञानात १) मतिज्ञान, २) श्रुतज्ञान, ३) अवधिज्ञान, ४) मनःपर्ययज्ञान व ५) केवलज्ञान येते.
ज्ञान प्रमाणाच्या द्वारे (वस्तूचे पूर्ण गुण) व नयाच्या द्वारे जिथे वस्तूच्या एकाच धर्माचे वर्णन केले जाते. स्वार्थप्रमाण हे ज्ञानमय असते ; तर परार्थप्रमाण हे वचना प्रमाण असून , त्यात श्रुतज्ञानाचा समावेश आहे. 'नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।'
ज्ञानासारखे पवित्र काहीच नाही. सात भंगाद्वारेही ज्ञान प्राप्त होते. १) स्यात् अस्ति : आपल्या द्रव्य , क्षेत्रण काल , भावाने अस्तिरूप असणे. २) स्यात् नास्ति : परद्रव्याने नास्तिरूप असते. ३) स्यात् अस्ति नास्ति : स्वरूपाने अस्ति पण परद्रव्याने नास्ति असते. क्रमाने आस्ति व नास्ति असते. ४) स्यात् अवक्तव्य : वस्तूमध्ये युगपत् अस्ति - नास्ति गुणधर्म राहू शकतात . परंतु, त्याचे वर्णन करताना असे वाक्य नाही म्हणून वस्तू ही कथंचित् स्व-पर चतुष्टाने अवक्तव्य आहे. ५) स्यात् अस्ति अवक्तव्य : वस्तू स्वचतुष्टाने - द्रव्य , क्षेत्र , काल व भावाने अस्ति परंतु युगपत् स्व-पर चतुष्टाने अव्यक्त आहे . ६) स्यात् नास्ति अवक्तव्य : वस्तू परचतुष्टाने नास्ति आणि स्व-परचतुष्टाने अवक्तव्य आहे. ७) स्यात् अस्ति नास्ति अवक्तव्य : वस्तू क्रमाने स्व-परच्या मुळे अस्ति
जैन धर्माची ओळख / ४३
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
आणि नास्ति पण स्व-पर ने अवक्तव्यही आहे .
तत्त्वार्थसूत्रात सांगितले आहे की , सहा प्रकारे वस्तूचे ज्ञान होते . वस्तूचे ज्ञान :
निर्देशस्वामित्वसाधनाधिकरणस्थितिविधानतः । १) निर्देश : स्वरूपाचे कथन करते ; जसे तत्त्वाचे श्रद्धान म्हणजे व्यावहारिक सम्यग्दर्शन. २) स्वामित्व : अधिपतिपना , स्वामी , कर्ता , जसे - सम्यग्दर्शनाचा स्वामी भव्य , संज्ञी , पर्याप्त , पंचेंद्रिय जीवच असू शकतो. इथे स्वामीपणाचा उल्लेख आहे. ३) साधन : कुठले कारण आहे? सम्यग्दर्शनाचे कारण बाह्य आहे का? जसे शास्त्र-श्रवण , जीवाचे जातीस्मरण किंवा त्याचे कारण आंतरिक पण असू शकते. दर्शनमोहनीय कर्माचा क्षय , उपशम किंवा क्षयोपक्षम हे आंतरिक कारण असू शकते. ४) अधिकरण : आधार काय? अंतरंग आधार असेल तर आत्मा आहे. ५) स्थिती : काळ , मर्यादा किती आहे? उपशम सम्यक्त्वाचा जघन्य काळ व उत्कृष्ट काळ अंतर्मुहूर्त आहे . ६) विधान : भेद किती आहे? सम्यग्दर्शनाचे दोन भेद उत्पत्तीच्या अपेक्षेने १) निसर्गज आणि २) अधिगमज आहे तर कर्माच्या अपेक्षेने तीन भेद आहेत - १) उपशम , २) क्षायिक , ३) क्षयोपशम. ___ 'सत्-संख्या-क्षेत्र-स्पर्शन-काल-अंतर-भाव-अल्पबहुत्वैश्च ।'
सत् , संख्या , क्षेत्र , स्पर्शन , काळ , अंतर (विरहकाळ) म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याचा काळ , गुण , प्रमाण (थोडे की अधिक) एक दुसऱ्याच्या अपेक्षेने केलेले कथन याप्रमाणे या आठ प्रकारे आपण वस्तूचे कथन करतो.
___ मतिज्ञान
अवग्रह
ईहा
अवाय धारणा
व्यंजनावग्रह
अर्थावग्रह
T
स्पर्श रस घ्राण कर्ण स्पर्श रस
घ्राण
चक्षु
कर्ण
मन
जैन धर्माची ओळख / ४४
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
१) मतिज्ञान :
पाच इंद्रिय आणि मनामुळे होणारे ज्ञान ते मतिज्ञान आहे . मतिज्ञान हे परोक्ष ज्ञान असून , त्याचे ३३६ भेद आहेत . मतिज्ञान हे पाच इंद्रिय आणि मनामुळे होते . जसे हा घडा आहे. मती, स्मृती , संज्ञा , चिंता व अभिनिबोध हे पाच मतिज्ञानाचे भेद आहेत. मती म्हणजे मनन करणे. स्मृतीत पूर्वी बघितलेल्या वस्तूची ओळख पटते . जसे - हा देवदत्त आहे . संज्ञेत पूर्वीचे व वर्तमानचे दोन्ही ज्ञानाचे संकलन असते . त्याचे पण पाच प्रकार आहेत . चिंता म्हणचे तर्कज्ञान व अभिनिबोध हे अनुमान असते . अवग्रह :
हे सामान्य दर्शन झाल्याबरोबर जे विशेष ज्ञान होते ते . जसे डोळे उघडल्याबरोबर 'हा प्रकाश आहे' असे कळते ते अवग्रह होय. अवग्रहाचे दोन प्रकार आहेत. १) व्यंजनाग्रह : हे चार इंद्रियांद्वारे होते ; जे अव्यक्त व अस्पष्ट असते. २) अर्थावग्रह : हे पाच इंद्रिय व मनाद्वारे होते. प्रथम व्यंजनाग्रह ज्ञान होते नंतर अर्थावग्रह होते ईहा : अवग्रह झाल्यानंतर जी विशेष ज्ञानाची उत्कंठा होते . जसे - ‘हा घडा असावा.' अवायमध्ये हे ज्ञान निश्चयरूपाने होते . जसे - 'हा घडाच आहे .' धारणेत ही गोष्ट आठवण करून राहते , स्मरण राहते.
अवग्रहादी मतिज्ञान हे बहु, बहुविध , प्रवाहिक , अनिःसृत , अनुक्त व ध्रुव गोष्टींचे ज्ञान करते . अशाप्रकारे मतिज्ञानात अवग्रह , ईहा , अवाय, धारणा हे क्रमाने होते. २) श्रुतज्ञान :
मतिज्ञानपूर्वक होणारे ज्ञान श्रुतज्ञान होय. घड्याला बघितल्यानंतर त्याच जातीचे अनेक घडे, भिन्न देशांत , भिन्न काळांत , अनेक रंगांत, अनेक धातूंच्या रूपात जाणणे म्हणजे श्रुतज्ञान आहे. मतिज्ञानात शब्द कळतो तर श्रुतज्ञानात त्याचा अर्थही लक्षात येतो.
'हा घडा आहे.'
हे मतिज्ञान आहे ; तर 'घडा पाणी भरण्यास समर्थ आहे' हे श्रुतज्ञान होय . श्रुतज्ञानात वस्तूचे ज्ञान , संख्या , क्षेत्र , काळ , स्पर्शन , सत् , अंतर , अल्पबहुत्वाने होते. श्रुतज्ञानाचे दोन भेद - १) अंगबाह्य, २) अंगप्रविष्ट.
जैन धर्माची ओळख / ४५
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
अवधिज्ञान :
'भवप्रत्ययोवधिदेवनारकाणाम् ।' देव व नारकी यांना त्या भवामुळे अवधिज्ञान प्राप्त होते . द्रव्य , क्षेत्र , काळ , भावाच्या मर्यादेने जे रूपी पदार्थांना जाणते , ते अवधिज्ञान होय . हे चारही गतीत होऊ शकते . फक्त रूपी पदार्थांना जाणते . अवधिज्ञानाचे दोन प्रकार आहे - १) भवप्रत्यय, २) गुणप्रत्यय.
गुणप्रत्यय अवधिज्ञानाचे सहा भेद आहेत. ४) मनःपर्ययज्ञान :
जे द्रव्य , क्षेत्र , काळ आणि भावाच्या मर्यादेत दुसऱ्याच्या मनातील रूपी पदार्थांना स्पष्टपणे जाणते , त्यास मनःपर्ययज्ञान म्हणतात.
ऋजुविपुलमती मनःपर्ययः । मन , वचन , कायेच्या द्वारे दुसऱ्याच्या मनातील विचार , सरळ , वक्र रूपाने जाणणे , ते विपुलमती मनःपर्ययज्ञान आहे. मनःपर्ययज्ञानाचे ऋजुमती व विपुलमती असे दोन भेद आहेत . विपुलमती अधिक सूक्ष्म असते. ऋजुमती व विपुलमतीत क्षेत्र व भव या अपेक्षेने फरक आहे. मनःपर्यय ज्ञान हे उत्तम ऋद्धिधारीस प्राप्त होते ; तर अवधिज्ञान चारही गतीत प्राप्त होते. ५) केवलज्ञान :
'सर्वद्रव्यपर्यायेषु केवलस्य ।' . सर्व द्रव्यांना, सर्व द्रव्यांच्या त्रिकाळ पर्यायांना एकाच वेळेस जे जाणते ते केवलज्ञान आहे. एकाच वेळेस पाच प्रकारचे ज्ञान कुणालाच नसते . जर एकच ज्ञान असेल तर ते केवलज्ञान, जर दोन असतील तर मतिज्ञान व श्रुतज्ञान . जर तीन असतील तर मतिज्ञान , श्रुतज्ञान, अवधिज्ञान किंवा मनःपर्ययज्ञान असेल. जर चार असतील तर मतिज्ञान , श्रुतज्ञान , अवधिज्ञान व मनःपर्ययज्ञान असेल. ही चार ज्ञाने ज्ञानावरण कर्माच्या क्षयोपशमामुळे होतात. १) तीर्थंकर : ज्यांचे संतिशय पुण्य असते , समवशरण असते. दिव्यध्वनी खिरते. २) सामान्यकेवली : सामान्य असतात . त्यांचे समवशरण नसते. ३) उपसर्गकेवली : उपसर्ग झाल्यामुळे केवलज्ञान होते . जसे - पार्श्वनाथ भगवंताना उपसर्ग झाला होता . ४) अंतःकृतकेवली : अंतर्मुहूर्तातच मुनीदीक्षा घेतल्यानंतर केवलज्ञान होते.
जैन धर्माची ओळख / ४६
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
५) मूककेवली : वाणी खिरत नाही . ६) समुद्घातकेवली : आयुकर्म पूर्ण झाल्यानंतर जे सात कर्म बाकी राहतात . त्यांचा नाश करण्यास शरीराच्या बाहेर आत्मप्रदेश पसरतात व मोक्ष होतो त्यास समुद्घातकेवली म्हणतात . ७) अनुबद्धकेवली : एका केवलीस मोक्ष झाल्यानंतर लगेच दुसऱ्यास
होतो.
कुज्ञान :
हे अयथार्थ ज्ञान असते. हे तीन प्रकारचे आहे. १) कुमती, २) कुश्रुत, ३) कुअवधी. परोक्षज्ञान म्हणजे जे इंद्रियामुळे होते ते ज्ञान व प्रत्यक्षज्ञान म्हणजे इंद्रियाद्वारे , मनाद्वारे न होता आत्म्याच्या साहाय्याने होते ते ज्ञान, सम्यग्दृष्टीचे ज्ञान हे सम्यक व यथार्थ ज्ञान आहे. जे ज्ञान जीवास सम्यक आनंद देते तेच खरे ज्ञान आहे ; अन्यथा नाही .
___'तद् ज्ञानं यत प्रतिसमये सम्यक आनन्दायते ।" न्यायग्रंथ हे युक्तीने भरलेले आहेत . जेव्हा आम्हास वस्तूचे लक्षण माहीत असते ; तेव्हा आम्ही त्या वस्तूस भिन्न करून त्याची ओळख करून घेतो. संपूर्ण जिनागम हे न्यायशास्त्रावर आधारित आहे.
लक्षणाने वस्तू ओळखता येते हे खरे आहे. परंतु , कधी-कधी लक्षणाभास होऊ शकतो.
लक्षण
आत्मभूत (जसे अग्नीत उष्णता)
अनात्मभूत (पुरुषाचे लक्षण चष्मा)
लक्षणाभास
अव्याप्त अतिव्याप्त असंभव
(मुक्तजीव) (गाय पशुत्व) (मानवाचे लक्षण शिंग) लक्षणामुळे वस्तू भिन्न करता येते. पण त्यात अव्याप्त , अतिव्याप्त व असंभवाचा दोष नको.
जैन धर्माची ओळख / ४७
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
सम्यग्दर्शन
मोक्षरूपी महालात प्रवेश करण्यासाठी रत्नत्रयाच्या पायऱ्या आहेत . सम्यग्दर्शनापासूनच धर्माची सुरुवात होते. या सम्यग्दर्शनाशिवाय ज्ञान व चारित्र्याला सम्यकपणा प्राप्त होत नाही. तीन लोक व त्रिकालात या सम्यग्दर्शनासारखा हितकारी, कल्याणकारी कोणीच नाही. म्हणून प्रत्येक जीवाचे हे आद्य कर्तव्य , आद्य धर्म सम्यग्दर्शनाची प्राप्ती हा आहे . सम्यग्दर्शनाचा महिमा ज्या जीवाने जाणला तो धन्य झाला. सम्यग्दृष्टी गृहस्थास बाह्यतः संयम नसूनही अंतरंगातून परिग्रहास तो परच मानतो . तो फक्त एका नटाप्रमाणे संसारात वावरतो. त्यात आपलेपणा नसतो , ममत्व नसते . म्हणूनच देवास तो पूजनीय आहे . संपूर्णपणे गृहकार्य करीत असताना पण तो शुद्ध स्वरूपापासून हटत नाही . जागृततेची एक ज्योत त्याच्या निद्रा अवस्थेत पण कायम असते . ती ज्ञानाची व अनुभवाची ज्योत असते . हेच तर त्याच्या महतीचे गमक आहे.
वीतराग व सर्वज्ञ जिनेंद्र भगवान हेच देव . निग्रंथ व आत्मध्यानी साधू हे गुरू व दयामय आत्मकल्याणकारी धर्म हाच धर्म याप्रमाणे श्रद्धा असेल तर देव , गुरू व धर्म हे सम्यक्त्वाच्या उत्पत्तीचे निमित्त आहेत . सम्यग्दृष्टी जीव हा विवेकी असून , त्यात स्वरूपी भिन्नता करण्याची कुशलता असते .
आठ मद, आठ शंकादिक दोष व तीन मूढता व सहा अनायतन हे सम्यक्त्वाचे दोष आहेत. त्यांचा त्याग करावा. कुगुरू, कुदेव , कुधर्म तसेच त्यांच्या उपासकांची प्रशंसा न करणे हा अनायतन त्याग आहे.
तीन मूढता : देवमूढता , गुरुमूढता व लोकमूढता या आहेत . त्यांचा त्याग करावा . तसेच आठ गर्व (मद) आहेत . कुलमद , जातिमद , रूपमद, ज्ञानमद, धनमद, बलमद, तपोमद आणि पूजामद यांचा त्याग करावा. आठ मद सोडण्यास योग्य आहेत . ते सम्यक्त्वास दूषित करतात . सम्यक्त्वाचे आठ गुण : १) निःशंकित अंग : मनवचनात दृढ विश्वास ठेवणे.
जैन धर्माची ओळख / ४८
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
२) निःकांक्षित अंग : संसारसुखाची इच्छा न करणे हे निःकांक्षित अंग . ३) निर्विचिकित्सा अंग : शरीर अपवित्र असूनही धर्माने पवित्र अशा मुनी आदिकांचे मलिन शरीर पाहून गुणांचे स्मरण करून शरीराची घृणा न करणे , हे निर्विचिकित्सा अंग होय . ४) अमूढदृष्टी अंग : कुदेव , कुगुरू , कुधर्मादीद्वारे धर्मापासून विचलित न होणे ५) उपगूहन अंग : आत्मप्रशंसा न करणे व इतर धर्मात्म्यांचे दोष झाकणे. ६) स्थितीकरण अंग : स्वतःला व दुसऱ्याला धर्मात स्थिर ठेवणे . ७) वात्सल्य अंग : धर्मात्मा जीवावर वत्सलभाव ठेवणे व त्यांची आपत्ती निवारण हे वात्सल्य अंग होय. ८) प्रभावना अंग : पूजा , दान , तप, ज्ञानातिशय या द्वारे जिनधर्माचा उद्योत करणे. सम्यक्त्वाच्या विपरीत आठ दोष आहेत - १) शंका , २) कांक्षा, ३) विचिकित्सा , ४) मूढदृष्टी, ५) उपगूहन , ६) अस्थितीकरण , ७) अवात्सल्य , ८) अप्रभावना . या आठ दोषांना सदैव दूर करावे. सम्यक्त्वाची पाच लक्षणे आहेत - १) शम , २) संवेग , ३) निर्वेद, ४) अनुकंपा, ५) आस्तिक्य. सम्यक्त्वाचे तीन प्रकार : १) औपशमिक , २) क्षायिक, ३) क्षायोपशमिक. ___ सम्यग्दर्शनाच्या प्रकारात सर्वप्रथम औपशमिक सम्यग्दर्शन येते . जे कर्माचा उपशम झाल्यामुळे होते , ते औपशमिक . जेव्हा कर्माचा पूर्णतः क्षय होतो तेव्हा क्षायिक सम्यग्दर्शन होते. कर्माचा एकदेश उपशम तथा एकदेश क्षय झाल्याने क्षायोपशमिक भाव होतात . आत्म्याचे पाच भाव :
आत्म्याच्या पाच भावांविषयी तत्त्वार्थसूत्रात एक सूत्र आहे. औपशमिकक्षायिकौ भावौ मिश्रश्च जीवस्य स्वतत्वमौदयिकपरिणामिको च।
(तत्त्वार्थसूत्र २/१) औपशमिक , क्षायिक , मिश्र, औदयिक आणि पारिणामिक हे जीवाचे भाव आहेत.
राजवर्तिकमध्ये लिहिले आहे - 'भवन् भवतीतिवा भावः' जे व्हायचे असते तेच भाव आहे. पदार्थाच्या परिणामाला भाव म्हणतात . गोम्मटसार जीवकांडमध्ये चेतनाच्या परिणामाला भाव म्हटले आहे.
जैन धर्माची ओळख / ४९
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
'भावः चित्र परिणामः । ' आचार्य कुंदकुंदांनी पंचास्तिकायमध्ये म्हटले आहे. :
'उदयेण उवसमेण य खयेण दुहिं मिस्सि- देहिं परिणामे । जुत्ता ते जीवगुणा बहुसु य अत्थेसु वित्थिण्णा' ।। ५६ ।। अर्थ - उदयाने युक्त, क्षयाने युक्त, क्षयोपशमाने युक्त आणि परिणामाने युक्त असे जीवाचे भाव आहेत आणि त्यांनाच अनेक प्रकाराने विस्तृत केले जाते.
भाव पाच आहेत. परंतु, प्रत्येक जीवात हे पाच भाव असतीलच असे नाही. संसारी जीवात ३, ४ किंवा ५ भाव असतात. तिसऱ्या गुणस्थानापर्यंत क्षायोपशमिक, औदयिक आणि परिणामिक हे तीन भाव
असतात.
१ ) औपशमिक भाव : जो कर्माच्या उपशममुळे उत्पन्न होतो, तो औपशमिक भाव असतो. याचे दोन प्रकार आहेत. १) औपशमिक सम्यक्त्व आणि २) औपशमिक चारित्र्य : कषाय - क्रोध, मान, माया आणि लोभ तथा मिथ्यात्व सम्यक्मिथ्यात्व सम्यक्प्रकृती दर्शनमोहनीय हे तीन. एकूण
,
सात प्रकृतीच्या उपशममुळे औपशमिक सम्यक्त्व होते. इथे जीवाच्या गुणाच्या घातक कर्माचा उदय अभावारूपाने असतो.
"
7
,
२) क्षायिक भाव : आत्म्याची पूर्ण शुद्धी व घातकी कर्माचा सर्वथा क्षय झाल्याने क्षायिक भाव उत्पन्न होतात आणि अध्यात्म भाषेत शुद्ध आत्म्याच्या परिणामास शुद्धोपयोग म्हटले आहे. क्षायिक भावाचे नऊ भेद आहेत.
१) क्षायिक ज्ञान, २) क्षायिक दर्शन, ३) क्षायिक दान, ४) क्षायिक भोग, ५) क्षायिक लाभ, ६) क्षायिक उपयोग, ७) क्षायिक वीर्य, ८) क्षायिक सम्यक्त्व, ९) क्षायिक चारित्र्य.
असे नऊ भेद तत्त्वार्थसूत्रात नमूद आहेत. नीच गतीमध्ये क्षायिक भावाचा अभाव आहे.
३) क्षायोपशमिक भाव : कर्माचे एकदेश क्षय आणि एकदेश ( अंशतः ) उपशम झाल्याने क्षयोपशम होतो. इथे असे काही कर्म विद्यमान असूनही त्यांची शक्ती कमी झाल्याने ते जीवाच्या गुणांचा घात करू शकत नाही. इथे एकदेश गुण प्रकट होतात.
क्षायोपशमिक भावाचे १८ भेद आहेत
:
जैन धर्माची ओळख / ५०
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
१) चार ज्ञान , २) अज्ञान , ३) तीन दर्शन , ४) पाच दानादी लब्धी , ५) सम्यक्त्व , ६) चारित्र्य , ७) संयमासंयम .
कुज्ञानामध्ये कुमती , कुश्रुत , कुअवधीचा समावेश आहे ; तर सुज्ञानात (चार ज्ञान) मतिज्ञान , श्रुतिज्ञान , अवधिज्ञान व मनःपर्यय ज्ञानाचा समावेश आहे. तीन दर्शनात चक्षु , अचक्षु आणि अवधिदर्शनाचा समावेश आहे. इथे उदयप्राप्त सर्व घाती स्पर्धकांचा क्षय, सत्ताचा सर्व घाती स्पर्धकांचा उपशम तथा देशघाती स्पर्धकांचा उदय झाल्यावर क्षायोपशमिक भाव होतात. ४) औदयिक भाव : या भावाचे २१ भेद आहेत. १) ४ गती : नरकगती , तिर्यंचगती , मनुष्यगती व देवगती २) ४ कषाय : क्रोध , मान , माया व लोभ ३) ३ वेद : स्त्रीवेद, पुरुषवेद व नपुंसकवेद ४) ६ लेश्या : कृष्ण लेश्या , नील लेश्या , कपोत लेश्या , पीत लेश्या , पद्म लेश्या आणि शुक्ल लेश्या ५) १ मिथ्यात्व ६) अज्ञान ७) असंयम
असिद्धत्व
अशाप्रकारे औदयिक भाव २१ आहेत . इथे कर्माचा उदय आहे. ५) पारिणामिक भाव : द्रव्याची स्वाभाविक अनादी पारिणामिक शक्ती म्हणजे पारिणामिक भाव होय. इथे कर्माचे उदय , उपशम , क्षय आणि क्षायोपशमाची अपेक्षा नसते. पारिणामिक भावाचे तीन भेद आहेत - जीवत्व, भव्यत्व, अभव्यत्व . अशाप्रकारे जीवाचे सामान्य भाव मुख्यरूपाने पाच आहेत , तर विशेष भाव ५३ आहेत .
भाव
औपशमिक क्षायिक क्षायोपशमिक औदयिक पारिणामिक (२ प्रकार) (९ प्रकार) (१८ प्रकार) (२१ प्रकार) (३ प्रकार)
जैन धर्माची ओळख / ५१
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
जीवासंबंधी :
जीव हा जाणतो, पाहतो , अमूर्तिक असतो , कर्ता असतो, भोक्ता असतो , शरीरप्रमाण , संसारी , सिद्ध , ऊर्ध्वगमन करणारा असा असतो.
_ 'जीवो उवओगमओ अमृत्ति कत्ता सदेहपरिमाणो।
भोत्ता संसारथो सिद्धो सो विस्ससोड्ढगई।'
जीवाचे भेद :
संज्ञी पंचेंद्रिय जीवास दहा प्राण असतात . पाच इंद्रिय , तीन बळ , आयु आणि श्वासोच्छ्वास . व्यवहारनयाने आठ प्रकारचे ज्ञान आणि चार प्रकारचे दर्शन सामान्यतः जीवाचे लक्षण आहे; तर शुद्ध निश्चयनयाने शुद्ध दर्शन आणि ज्ञान जीवाचे लक्षण आहे .
संसारी जीवाचे दोन भेद आहेत . १) स्थावर व २) त्रस.
स्थावर म्हणजे पृथ्वी , जल , अग्नी, वायू आणि वनस्पती कायिक जीव. दोन इंद्रियांपासून ते पाच इंद्रियांपर्यंतचे जीव त्रस आहेत . शंख - दोन इंद्रिय , मुंगी - तीन इंद्रिय , माशी - चार इंद्रिय व मनुष्य , नारकी देव , हत्ती, घोडा वगैरे पंचेंद्रिय जीव आहेत . पंचेंद्रिय जीव मनसहित व मनरहित दोन्ही प्रकारचे असतात.
एकेंद्रिय जीवांत काही बादर व काही सूक्ष्म असतात आणि सर्वच जीव पर्याप्त व अपर्याप्त असतात . जे स्वयं रोखले जातात तसेच दुसऱ्यांना पण रोखतात किंवा जे आपसात टक्कर देतात , त्यांना बादर जीव म्हणतात . जे जीव दुसऱ्यांना अडवत नाही व दुसऱ्यांकडून रोखले पण जात नाही किंवा एकमेकांशी टक्कर देत नाहीत , ते सूक्ष्म जीव असतात .
ज्या जीवांची आहारादी पर्याप्ती पूर्ण होते , ते पर्याप्तक जीव असतात . ज्यांची आहारादी पर्याप्ती पूर्ण होत नाही , ते अपर्याप्त जीव असतात .
पर्याप्तीचे सहा भेद आहेत . आहार, शरीर , इंद्रिय, श्वासोच्छ्वास , भाषा आणि मन . हे सहा जेव्हा परिपूर्ण रूपाने असतात , तेव्हा ते पर्याप्त असतात.
शरीर हे पाच प्रकारचे असते.
१) औदारिक, २) वैक्रियक, ३) आहारक, ४) तैजस आणि ५) कार्माण शरीर. औदारिक शरीर : मनुष्य व तिर्यंचांच्या शरीरास (स्थूल) औदारिक
जैन धर्माची ओळख / ५२
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
शरीर म्हणतात. वैक्रियक शरीर : जे शरीर अनेक रूप, धारण करू शकते , लहान-मोठे होते ते शरीर वैक्रियक असते . जसे देव व नारकींचे शरीर. आहारक शरीर : ऋद्धिधारी सहाव्या गुणस्थानावर्ती मुनीस जेव्हा तत्त्वांबद्दल शंका किंवा जिनालयाची वंदना करण्यासाठी त्याच्या डोक्यातून एक हात लांबीचा स्वच्छ पांढरा , सप्तधातुरहित जो पुतळा निघतो, त्यास आहारक शरीर म्हणतात . तैजस शरीर : जे औदारिक , वैक्रियक आणि आहारक शरीरास कांती , तेज देते ते तैजस शरीर होय. कार्माण शरीर : आठ कर्मांच्या समूहास कार्माण शरीर म्हणतात . एका वेळेस एका जीवाचे बरोबर कमीतकमी दोन किंवा जास्तीत जास्त चार शरीरे असतात. विग्रह गतीत तैजस व कार्माण शरीर असते तर मनुष्य आणि तिर्यंच गतीत तैजस , कार्माण व औदारिक शरीर असते. देव व नारकींचे वैक्रियक, तैजस , कार्माण शरीर आणि ऋद्धिधारी मुनींची चार शरीरे असतात .
जैन धर्माची ओळख / ५३
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मा
विश्वामध्ये दोन प्रकारचे पदार्थ आहेत. एक चेतन आणि दुसरा अचेतन . ज्यांच्यात जाणण्याची शक्ती आहे किंवा जे अनुभव करू शकतात, सुखदुःखाचे वेदन करू शकतात, हे चेतन पदार्थ होय. या व्यतिरिक्त सर्व पदार्थ अचेतन आहेत. कारण, ते जड आहेत; अचैतन्यमय आहेत . जे चेतनमय आहेत, ते सर्व जीव एकाच जातीचे आहेत. परंतु, मूलभूत गुण समान असूनही त्या गुणांची अभिव्यक्ती करण्याची क्षमता सर्व जीवांत समान नाही . कारण, एकेंद्रिय जीव फक्त एकच इंद्रिय असल्यामुळे आपले अनुभव, ज्ञान सांगू शकत नाही. पंचेंद्रिय जीव मात्र पाच इंद्रियांद्वारे सहजतेने हे कार्य करू शकतो. हा जीव बीजभूत परमात्मा आहे. ज्याप्रमाणे वडाच्या बी मध्ये वडाचा वृक्ष होण्याची शक्ती, क्षमता असते; त्याचप्रमाणे प्रत्येक जीव हा पुरुषार्थाच्या जोरावर परमात्मा बनू शकतो.
जीव हा दुःखी आहे, हे सर्व जाणतात. परंतु, का दुःखी आहे, याचा विचार किंवा चिंतन फारच कमी लोक करतात. ज्या व्यक्तीमध्ये क्रोधमान- माया लोभाची अधिकता असते; ती व्यक्ती स्वतःही दुःखी असते व दुसऱ्या लोकांनासुद्धा दुःखी करते, ती व्यक्ती लोकात अप्रिय होते. ज्यास राग-द्वेष कमी असतात, त्यास आम्ही चांगला म्हणतो. तो हवाहवासा वाटतो. राग-द्वेषाचे प्रमाण आणि दुःख या दोन्हींमध्ये सरळ संबंध आहे. जीवात्मा विषयविकार = परमात्मा
राग
ग-द्वेषाच्या उत्पत्तीचा मूळ आधार आहे जीवाची अनादिकाळापासून असलेली मिथ्या मान्यता की, मी शरीर आहे. तो स्वतःस शरीररूपच मानतो व त्या शरीराशी सर्व संबंधित गोष्टी त्यास प्रिय असतात, अन्यथा नाही. ही मिथ्या मान्यता ( मी म्हणजे शरीर ) तेव्हाच दूर होईल; जेव्हा हा जीव स्वतःस ओळखेल (आत्मरूप ) आणि जाणेल की, मी शरीर नाही, शुभ-अशुभ भाव अर्थात राग-द्वेषसुद्धा मी नाही. मी तर या सर्वांहून भिन्न अशा ज्ञानाचा मालक म्हणजे आत्मा आहे.
जैन धर्माची ओळख / ५४
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
ज्या वेळेस आम्ही शरीरास पररूप मानू तेव्हा सर्व चिंता , राग-द्वेष तत्काळ दूर होतील . आपल्या चैतन्य स्वरूपास ओळखल्याशिवाय शरीरासंबंधी आपलेपणा जात नाही . शरीरासंबंधी आपलेपणा संपल्याशिवाय राग-द्वेषाचा अभाव होत नाही. रागद्वेषाचा अभाव झाल्याशिवाय हा जीव कधी सुखी होऊ शकत नाही. या जीवाला एकच रोग जडला आहे - रागद्वेष . संसारी जीव हा केव्हापासून अशुद्ध आहे तर याचे उत्तर आहे, अनादिकाळापासून . ज्याप्रमाणे खाणीतून काढलेले सोने हे किट-कालिमेसहित असते ; त्याचप्रमाणे जीव हा राग-द्वेषाने अशुद्ध आहे . परंतु , त्यात सोन्याप्रमाणेच शुद्ध होण्याची योग्यता आहे. त्याच्या शुद्धीकरणासाठी एक विशिष्ट उपाय आहे. त्यालाच आत्म-विज्ञान म्हणतात. सोने जसे प्रक्रिया करूनच शुद्ध केले जाते तसेच आत्म्याचे आहे.
प्रत्येक वस्तू , ती चेतन असो वा अचेतन , सामान्य - विशेषात्मक असते . 'सामान्य' कधी बदलत नाही ते नित्य आहे. वस्तूची जी अवस्था असते ती 'विशेष' असते व ती सारखी बदलते . हेच आपण उदाहरणाने समजू. एक मुलगा बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत जातो. नंतर कालक्रमानुसार किशोरचा युवा , युवाचा प्रौढ , प्रौढाचा वृद्ध होतो. परंतु , त्याचे मनुष्यत्व कायम राहते . हीच स्थिती पुद्गल वस्तूसंबंधी आहे. जसे झाडाचे खोड कापले तर ते लाकूडरूपाने परिणमित झाले . नंतर ते लाकूड जाळून कोळसा झाले . तदनंतर कोळसा हळूहळू राखरूप परिणमित झाला . परंतु , पुद्गल पदार्थ पुद्गलरूपाने अजूनही कायम आहे. एक मनुष्य मरून देव झाला . नंतर देव मरून कुत्रा झाला. तरीपण जीवत्व कायम आहे.
आपल्या लक्षात सूक्ष्म परिवर्तन येत नाही. फक्त स्थूल परिवर्तनामुळे आपल्याला दिसते की, आपण आता वृद्ध झालो. परंतु , हे परिणमन हळूहळू आपल्या जन्मापासून सुरूच होते. पण, लक्षात ते वयाच्या ५०व्या वर्षी आले . स्थूल परिवर्तनच आम्ही पकडू शकतो. पुद्गलाचे पुद्गलरूपच परिणमन होते . चेतनचे चेतनरूपच परिवर्तन होते. आम्ही बर्हिरूपाने कधी मानव , कधी तिर्यंच , कधी देव होतो तर अंतरंगात कधी क्रोधी, लोभी होतो. या आत्म्यामध्ये कधी क्रोध येतो तर कधी मान तर कधी कषाय परिणामाच्या अभावी शुद्ध परिणाम. चैतन्य सामान्याला ओळखल्याशिवाय धर्माची सुरुवात संभवत नाही, हे निश्चित आहे. परंतु , विशेषामध्येच गुरफटून राहिल्यामुळे त्यातच आपलेपणाची बुद्धी होत असल्यामुळे आम्हा संसारी
जैन धर्माची ओळख / ५५
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
जीवांना त्या चैतन्याला पकडणे असंभव वाटते . सामान्य (आत्मा) आमच्यापासून दूर उभा आहे. परंतु , विशेष (राग-द्वेष) अत्यंत जवळ आहेत . आत्मा हा केंद्रबिंदू आहे तर परीघ आहेत आमचे विकार , आमचे शरीर . परिघास वर्तुळ (चक्कर) मारून आम्ही केंद्रबिंदूजवळ जाऊ शकत नाही. त्याकरिता केंद्राकडेच सन्मुख होऊन अग्रेसर व्हावयास पाहिजे.
आम्ही सर्व आमच्या आत्म्याला विसरून गेलोत . जसा एखादा नाटक कलाकार रामाच्या भूमिकेत स्वतःस रामच समजून बसला तर फार विचित्र, दुःखमय अवस्था होईल. त्या कलाकारास रामाच्या भूमिकेतून स्वतःच्या भूमिकेत (रमेश) यावेच लागेल . जर तो पुन्हा रमेश झाला तर सुखी होईल . त्याचप्रमाणे आम्हास आमचे आत्मरूप ठाऊक हवे. ज्ञानाच्या सर्वप्रथम आणि मौलिक अशा सूत्राच्या द्वारे भगवान सांगतात की, आपल्या त्या चैतन्य सामान्याचा आश्रय घेऊनच हा जीव शेवटी राग-द्वेषाचा अभाव करू शकतो व सुखाचा अधिकारी बनू शकतो. मग ते नाटक नाटकच राहील व त्यात अनेक विविध भूमिका करताना तो जीव अलिप्तच राहील . कारण, त्यास आपले रूप, अस्तित्व कळाले.
___ एकदा स्वतःस जाणल्यानंतर कुठलाही अहंकार , ममकार राहणार नाही कारण , सर्व काही परच वाटते.
वस्तु विचारे ध्यायते मन पावे विश्राम । . ही अवस्था त्या जीवाची होते. कारण, आता करण्यासारखे काहीच उरले नाही.
किती सांगू मी सांगू कुणाला आज परमात्मा मला भेटला
हा सुखाचा आनंदी ठेवा । आपल्या स्वभावाचा अनुभव कसा येईल? अनुभव करण्यापूर्वी त्या निजस्वभावाला बुद्धीच्या स्तरावर विस्ताराने समजणे आवश्यक आहे. स्वभाव त्याला म्हणतात की, वस्तूची अवस्था बदलली तरी सुद्धा बदलत नाही, नेहमी कायम राहतो. जसे - साखरेचा स्वभाव आहे, गोडपणा. साखरेला मातीत मिसळा, चहात मिसळा, पाण्यात मिसळा, गरम करा किंवा थंड सरबतामध्ये टाका, तरी तिचा गोडपणा कायम राहतो. याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव जाणणे . जरी ज्ञान कमी-जास्त होत असले , तरी जाणण्याची क्रिया प्रत्येक अवस्थेत कायम असते. जर जाणणे हा जीवाचा स्वभाव आहे, तर
जैन धर्माची ओळख / ५६
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
राग-द्वेषाचा त्याच्याशी काय संबंध आहे , असा प्रश्न मनात डोकावतो. हेच आपण एका सुंदर उदाहरणाने समजू. जर साखरेला गरम केले तर त्यात 'गरमपणा' व 'गोडपणा' दोन्ही गोष्टी दिसतील . परंतु , गरमपणा हा संयोगामुळे आहे . अग्नीच्या संयोगाने साखर गरम केली. परंतु , तो संयोग (अग्नी) दूर होताच साखर थंड होईल व फक्त गोडपणाने कायम राहील. तसेच जीवात पण 'जाणणे' व 'राग-द्वेष' हे दोन्ही असतात. परंतु , फक्त जाणणे हाच जीवाचा मूळ स्वभाव आहे . बाकी राग-द्वेष हे कर्मामुळे आलेले भाव आहेत . ते कर्माच्या वियोगाबरोबर निघून जातील. जाणणे हा भावच जीवाचे लक्षण आहे, हे आता लक्षात आले असेलच.
आत्म्याच्या सोबत शरीराचा संबंध त्याच प्रकारचा आहे . जसा की , शरीराच्या सोबत कपड्याचा असतो .
देव देहलमे रहे पर देहसे जो भिन्न है
है राग उसमे किन्तु उस राग से भी अन्य है। शरीर एक माध्यम आहे. जाणणारा तर चैतन्यच आहे, शरीर नाही. शुद्धात्म्यामध्ये जेव्हा ती शक्ती प्रगट होते , व्यक्त होते तेव्हा तो कोणत्याही इतर पदार्थाच्या सहायतेशिवाय त्रिलोकवर्ती सर्व पदार्थांना , त्यांच्या पर्यायांना प्रत्यक्ष जाणतो. आत्म्याला जाणण्याचा उपाय
प्रत्येक व्यक्ती प्रतिसमयी तीन क्रिया करते . आम्ही प्रथम दोन क्रिया नेहमी जाणत असतो . आम्ही रोगी झाल्यास त्याचे अस्तित्व जाणतो व त्याचा त्रास पण जाणतो. पण, तो त्रास जो बघतो, त्यास मात्र जाणत नाही. इथेच आमचे सर्व गणित चुकते . जाणणारा जाणत आहे ; परंतु आम्ही त्यास पकडत नाही. कारण, आमचे मागील संस्कार नाहीत. पण, तरी ती सूक्ष्मता आम्ही मानवदेही जाणतो , लोभाला जाणतो. पण, स्वतःला का नाही जाणत? कारण , त्या 'स्व'मध्ये आपलेपणा नाही, एकत्व नाही तसेच तादात्म्य नाही. बोलत असताना सुद्धा मी फक्त बोलणारा नाही तर फक्त जाणणारा आहे. चालण्याच्या क्रियेला मी जाणणारा आहे. याप्रकारे या जीवाला 'स्व' व 'परा 'मध्ये भेदज्ञान करावयास पाहिजे म्हणजे तो लपून बसलेला 'स्व' पकडता येईल, हे सर्वांनाच शक्य आहे. प्रयत्न , रुची. पुरुषार्थ फक्त हवा . आचारांगसूत्रात सांगितले आहे - 'जे आया से विण्णाया, जे विण्णाया से आया ।"
जैन धर्माची ओळख / ५७
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
अर्थात जो विज्ञाता आहे तोच आत्मा आहे व जो आत्मा आहे तोच विज्ञाता आहे.
एकदा डॉ. राधाकृष्णन मुलांना वर्गात शिकवत होते . वर्गातील एक मुलगा उभा राहिला व म्हणाला, "सर , तुम्ही नेहमी आत्म्याचीच गोष्ट सांगता. परंतु , आजपर्यंत कधी आत्मा दाखविला नाही. प्रथम तो दाखवा, तरच आम्ही मानू.''
डॉ . राधाकृष्णनांनी त्यास जवळ बोलाविले व विचारले , “तू कोण आहेस?'' तो म्हणाला, “मी बुद्धिवान मुलगा आहे .'' तर सर म्हणाले, 'मला दाखव तुझी बुद्धी .'' मुलगा म्हणाला, “सर बुद्धी सूक्ष्म आहे. कशी दाखवू?'' डॉ. राधाकृष्णन म्हणाले, "आत्मा तर त्याहून सूक्ष्म आहे. त्यास जाणण्यास अंतर्दृष्टी हवी . ती असेल तर आत्म्याचे दर्शन या जन्मीच शक्य आहे.'
आत्मा सूक्ष्म असला तरी त्यास लक्षणाने आम्ही ओळखू शकतो. 'जाणतो तोच मी' तत्वार्थसूत्रात 'उपयोगो लक्षणम्' म्हटले आहे, तर भगवतीसूत्रात ‘उवओग लक्खणे णं जीवो ।'
ज्ञानालाच आत्मा म्हटले आहे. आत्मा वचनातीत आहे. वाणीद्वारे त्याचे वर्णन तंतोतंत करता येत नाही. म्हणून शेवटी संतांनी पण 'नेति-नेति' म्हणून संबोधिले.
चार्वाक म्हणतो, आत्मा जड आहे. बौद्ध धर्म अनात्म मानतो. वेदान्तात आत्मा एक आहे. गीतेत आत्म्यास नित्य मानले; परंतु जैन दर्शन आत्म्यास परिणामी नित्य मानते.
_ 'देव जवळी अंतरी, भेट नाही जन्मभरी।' असे तुकाराम महाराज म्हणतात . आमच्या देहात परमेश्वर बसलेला आहे. तरी जन्मभर भेट नाही. तेव्हा मानव जन्मी त्यास शोधायचे काम करावयाचे आहे , हे नक्की.
आत्म-अनुभवाच्या वेळी स्वभावाचा स्पर्श मात्रच होतो . परंतु , तो स्पर्श अनुभवास येतो , सर्व जग शून्यवत होते. शरीराचे भिन्नत्व लक्षात येते. 'मी असा आहे' याचे भान होते. निर्विकल्प अवस्थेत जीव जातो. फक्त आनंद-आनंद असतो . कबीर म्हणतात -
'सहजे सहजानंद, अंतर्दृष्टी परमानंद । जहाँ देखो वहाँ आत्मानंद, सहज छूटे विषयानंद ।'
जैन धर्माची ओळख / ५८
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
तप
तपाचे बहिरंग व अंतरंग तप असे दोन प्रकार आहेत .
बहिरंग तपात - १) अनशन , २) ऊनोदरी, ३) वृत्तिपरिसंख्यान , ४) रस परित्याग, ५) विविक्त शयासन व ६) कायक्लेश असते.
तर अंतरंग तपात - १) प्रायश्चित्त , २) विनय-विनयाचे चार प्रकार आहेत : ज्ञान , दर्शन , चारित्र्य व उपचार . ३) वैयावृत्त - गुरूंची , मुनींची सेवा , ४) स्वाध्याय : स्व चे अध्ययन , ५) व्युत्सर्ग आणि ६) ध्यान हे सहा प्रकार आहेत . स्वाध्यायाचेही पाच भेद आहेत : वाचन, पृच्छना, अनुप्रेक्षा, आम्नाय आणि धर्मोपदेश.
या १२ प्रकारच्या तपाने जीव कर्माची निर्जरा करतो . कर्म कमी झाल्याने त्यास थोडी शांती प्राप्त होते .
दोन प्रकारचे नय आहेत. १) निश्चय नय, २) व्यवहार नय.
व्यवहार नयाचे असद्भूत व्यवहार व सद्भूत व्यवहार नय असे दोन प्रकार आहेत. नयाची व्याख्या :
प्रमाणाने ग्रहण केलेल्या वस्तूच्या एका अंगाचे ग्रहण करणे म्हणजे नय होय . तत्त्वार्थसूत्रात सांगितले आहे :
नैगमसंग्रहव्यवहारर्जुसूत्रशब्दसमाभिरूदैवम्भूता नयाः । वस्तूच्या अनेक धमपैिकी एकाच धर्माची मुख्यतः व्याख्या केली जाते पण , अन्य धर्मांचा (गुणांचा) विरोध केला जात नाही . तेव्हा ज्ञान मिळविण्याचे ते साधन नय असते .
सात प्रकारचे नय आहेत - १) नैगमनय : जो नय संकल्पमात्राचे ग्रहण करतो तो नैगमनय आहे . जसे स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना जर कुणी विचारले, 'तुम्ही काय करता?' तेव्हा तो उत्तर देतो की, 'मी स्वयंपाक करीत आहे.' वास्तविक, तो स्वयंपाक करीत नसतो; पण त्यासाठी तयारी करत असतो. तेव्हा त्याचे
जैन धर्माची ओळख / ५९
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
म्हणणे सत्यही आहे.
२) संग्रहनय : समस्त पदार्थांचे ग्रहण केले जाते तेव्हा संग्रहनय असतो. जसे सत्, द्रव्य वगैरे.
३) व्यवहारनय : जो नय संग्रहन याद्वारे प्राप्त वस्तूंचे विधिपूर्वक भेद करतो, तो व्यवहारनय होय. जसे सत्चे द्रव्य व गुण दोन भेद आहेत. ४) ऋजुसूत्रनय : जो फक्त वर्तमानकाळातील पदार्थांचे ग्रहण करतो तो ऋजुसूत्रनय.
५) शब्दनय : जो नय लिंग, संख्या दूर करून भेदरूप शब्दास ग्रहण करतो तो शब्दनय. जसे- दोर (पुल्लिंग), भार्या (स्त्री), कलत्र (नपुंसकलिंग) हे तीन शब्द भिन्न-भिन्न लिंगवाचक आहेत. हा नय स्त्री पदार्थास लिंगभेदाचे तीन रूप मानतो.
६) समाभिरूढनय : जो नय भिन्न अर्थांचे उल्लंघन करून फक्त एकाच अर्थरूपाने ग्रहण करतो तो समाभिरूढनय आहे. जसे - इंद्र, पुरंदर हे दोन्ही इंद्र आहेत; परंतु अर्थ भिन्न-भिन्न आहेत .
७) एवंभूतनय : जी वर्तमानाची क्रियारूप असते त्याच अर्थाने ग्रहण करणे म्हणजे एवंभूतनय होय. जसे पूजा करताना पुजारी, अभ्यास करताना तो विद्यार्थी होय.
अशाप्रकारे नयाद्वारे वस्तूचे ज्ञान होते.
व्यवहारनय : दोन प्रकार
-
१) असद्भूत व्यवहारनय, २) सद्भूत व्यवहारनय. या प्रत्येकाचे पुन्हा उपचरित, अनुपचरित असे दोन भेद / प्रकार आहेत.
ज्याप्रमाणे बदाम व त्याचे टरफल दोन्ही महत्त्वपूर्ण आहे. ते टरफल बदामासाठी जरूरी आहे. कारण, ते सुरक्षिततेचे प्रतीक आहे. मूढता : तीन मूढता आहेत.
१) लोकमूढता : स्थान, माहात्म्याविषयी अंधश्रद्धा असणे.
२) देवमूढता : मानवी गुण धारण करणाऱ्या देवदेवतांवर विश्वास . ३) पाखंडी मूढता : ढोंगी साधूबद्दल आदर दाखविणे.
पाच चारित्र्ये :
१) सामायिक, २) छेदोपस्थाप्य, ३) परिहार विशुद्धी, ४) सूक्ष्मसांपराय, ५) यथाख्यात ही पाच चारित्र्ये आहेत.
जैन धर्माची ओळख / ६०
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
ध्यान
ध्यानत्व :
जैन धर्मात ध्यानाचे अत्यंत महत्त्व आहे. म्हणून भगवंताच्या सर्व प्रतिमा त्याकडेच संकेत करतात . जीवाचे परमोत्कृष्ट ध्येय मोक्ष आहे. स्वरूपाभिमुख होण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. तत्त्वार्थसूत्रात व्याख्या अशी आहे : चित्तवृत्तींना अन्य क्रियेपासून परावृत्त करून एका विषयामध्ये स्थिर करणे म्हणजे ध्यान होय . द्रव्यसंग्रहात गाथा ५६ मध्ये सांगतात .
'अप्पा अप्पम्मि रओ इणमेव परं हवे झाणं ।' म्हणजे ज्यायोगे आत्मा आत्म्यामध्ये रममाण होऊन स्थिर होईल तेच परम-श्रेष्ठ ध्यान आहे . पतंजलीने देखील योगसूत्रात योग शब्दाची व्याख्या 'चित्तवृत्ती निरोध' अशीच केली आहे. जैनदर्शनात योग व ध्यान यांचा सविस्तर विचार केला आहे . तुकाराम महाराज म्हणतात :
देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर । .
जशी उसात साखर । तसा देहात ईश्वर । ज्याप्रमाणे उसात साखर आहे, त्याचप्रमाणे देहात परमेश्वर आहे. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो .
संसारी असावे । असोनी नसावे । ध्यान धरावे, भक्ती करावे । मानवा वेळोवेळी ।। काही लोक शारीरिक लाभ व्हावा म्हणून ध्यान करतात तर काही मानसिक शांतीसाठी . शारीरिक स्वास्थ्य , मानसिक शांती तथा ज्ञानात्मक स्वस्थता हे ध्यानाचे गौण , दुय्यम प्रतीचे फायदे आहेत . ध्यानाचा मुख्य उद्देश आहे शरीर व आत्म्याचे भिन्नत्व लक्षात आणणे व आत्म्याची पृथक् अनुभूती करणे. पंचदशीकारात म्हटले आहे .
“अनात्मबुद्धि शैथिल्यं फलं ध्यानात् दिने दिने । पश्यन्नपि न यो ध्यायेत्, कोपरोन्यपशुवतं ।"
जैन धर्माची ओळख / ६१
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
अर्थात - ध्यान , आत्म्याची शरीरात असलेली बुद्धी कमी करते . हेच खरे फळ आहे, हे माहीत असूनही मानव ध्यान करणार नाही तर त्याच्यासारखा दुसरा पशू कोण असणार? ध्यानाचा महिमा सांगताना भगवती आराधनेत लिहिले आहे -
‘एवं कसायजुद्धमि हवदि खवयस्य आउयं झाणं ।' अर्थ - कषायशुद्धी करण्यास प्रवृत्त साधकासाठी ध्यान हे एक शस्त्र (आयुध) आहे.
ज्याप्रमाणे रत्नांत हिरा , गंधात चंदन , मण्यांमध्ये वैडूर्य मणी श्रेष्ठ आहे. तसेच कर्मक्षय करण्यास प्रवृत्त साधकांसाठी ध्यान श्रेष्ठ आहे.
'एकाग्रचिंतायोगनिरोधोवाध्यानाम्' ध्यानाची दोन रूपे :
प्रवृत्यात्मक निवृत्तात्मक सालम्बन निरालम्बन सबीज
निर्बीज वास्तविक , ध्यानात सर्वत्र आपलेच बिंब दिसायला लागते व दुसरे . काहीच शिल्लक राहत नाही . ध्यान ही जीवन जगण्याची कला आहे. विभिन्न मते : • आ कुंदकुंदांनी ध्यानाला सम्यग्दर्शन व ज्ञानाने परिपूर्ण सांगितले आहे. • तत्त्वार्थसूत्रात चित्ताच्या निरोधाला ध्यान म्हटले आहे. + ध्यानशतक व आदिपुराणात स्थिर अध्यवसान , म्हणजे एका वस्तूच्या अवलंबन करणाऱ्या मनास ध्यान म्हटले आहे . + सांख्यसूत्रात रागाच्या विनाशास तथा विष्णुपुराणात फक्त परमात्म्याकडे एकाग्रतास (बाकीच्या विषयांपासून परावृत्त होऊन) ध्यान म्हटले आहे . • ध्यानशतकात आर्त , रौद्र, धर्म व शुक्ल ध्यानाचा उल्लेख आहे. + ध्यानाची आवश्यकता आहे : भूतकाळाचा भार हलका करण्यास मदत होते.
ध्यानात मी माझ्याद्वारे. माझ्यात , माझ्यासाठीच ध्यान करतो. कपडे धुणाऱ्या धोब्याचे जसे 'कपड्यावरच' लक्ष असते , त्याचप्रमाणे ध्यानात फक्त 'स्व'वरच लक्ष असते. • बुद्ध म्हणतात की, मनाची शांती प्राप्त करण्यास श्वासावर लक्ष केंद्रित करायला हवे.
जैन धर्माची ओळख / ६२
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
+ मनाच्या शांतीसाठी काय करावयास हवे , असे जेव्हा श्रीकृष्णाला विचारले तेव्हा ते म्हणाले की, 'मनास बघा', त्यास संयमित करा . जसे एक सारथी घोड्यांना करतो तसे . • हाच प्रश्न महावीरांना विचारला तर ते म्हणाले , 'आत्म्यास बघा!' + जे.कृष्णमूर्ती म्हणतात, 'जे होत आहे , तेच बघा. वर्तमानकाळात राहा.'
द्रव्यसंग्रहात ध्यानासाठी चित्ताची स्थिरता सांगितली. • हठयोगात ओंकारस्वरूपाचे ध्यान व निर्विषय मन महत्त्वाचे आहे.
तुकाराम महाराज म्हणतात , • 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी , कर कटावरी ठेवोनिया।' सगुण रूप होय. • दास कबीर म्हणतात , 'ध्यानात जागृतता हवी . चादरवर डाग लागू देऊ नका.' • ध्यान एक दिव्य साधना आहे, असे अरविंद घोष म्हणतात . त्यांनी Divine Conscious वर भर दिला आहे.
भारतीय संस्कृतीतील दोन विचारधारा
भारतीय संस्कृतीच्या दोन विचारधारा आहेत १) वैदिक आणि २) श्रमण. श्रमणात बौद्ध, जैन येतात .
वेदकालीन ध्यानात यज्ञकर्म , दीक्षा , व्रत , ब्रह्मचर्य यांचा वापर करतात . उपनिषदात म्हटले आहे . परमात्मा हृदयात वास करतो; जसे तिळात तेल व अरण्यात अग्नी लपलेला असतो. संयमरूपी तपाने व सदाचाराने आपण त्यास प्राप्त करू शकतो. कठोपनिषदामध्ये पण ध्यानविधीचा उल्लेख आहे.
महाभारतात इंद्रियांवर विजय प्राप्त करून मनास नियंत्रित कर व ध्यान कर, असा आदेश आहे. श्रीमद्भगवद्गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग व ध्यानयोगाचा उल्लेख आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायात समताभाव व ध्यानयोगाचा अधिक उल्लेख आहे. स्मृतिग्रंथात जपतपाचा उल्लेख आहे.
पुराणात - सविषय तथा निर्विषय ध्यानाचा उल्लेख आहे . पुराणात सांगितले आहे की , ध्यानासारखे दुसरे कुठलेच तीर्थ नाही. कुठलाही यज्ञ नाही. म्हणून ध्यान
जैन धर्माची ओळख / ६३
ATT
BI
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
आवश्यक आहे. योगवसिष्ठात म्हटले आहे : जेव्हा योगी आपल्या मनास शांत करतो, तेव्हा त्यास ब्रह्मतत्त्व प्राप्त होते . पातंजल योगसूत्रात अष्टांगयोगाचा उल्लेख आहे. ध्यानाचा क्रमांक सातवा आहे. चित्ताच्या वृत्तींचा निरोध हेच ध्यान आहे. ते अभ्यास आणि वैराग्याने प्राप्त होते.
दोन प्रकारची समाधी आहे - सबीज आणि निर्बीज. निर्बीज समाधीत आत्मा परमात्मा बनतो . अद्वैत वेदान्तात अज्ञानास दूर करून (अविद्यास) ब्रह्माची प्राप्ती करावी. वेदान्ताच्या अनुसार समाधी दोन प्रकारची आहे - सविकल्प , निर्विकल्प .
एक संत म्हणतो , जो सत्याच्या जवळ असतो तोच ध्यानी . स्वयंमध्ये स्थिर होणे , हेच ध्यान आहे . Do not seek, if you want to seek, stop!
जैनदर्शनात संवर व निर्जरास महत्त्व आहे. त्यासाठी तप आवश्यक व तपात ध्यान आवश्यक आहे. अस्तित्वाशिवाय ध्यानसंभव नाही.
आमच्या शरीरात मस्तकाचे जे स्थान तेच ध्यानाचे आहे . भगवान महावीरांनी 'अप्पणा सच्चमेसेज्जा', सत्य स्वयं शोधा म्हटले आहे . भगवान महावीरांपासून तर आचार्य कुंदकुंदांपर्यंत सर्वांनी ध्यानाचे महत्त्व सांगितले आहे. आचार्य हरिभद्रसुरीने योग व ध्यानाचे ग्रंथ लिहिले - योगशतक, योगविशिंका , योगबिंदू, योगदृष्टीसमुच्चय . शुभचंद्रानी ज्ञानार्णवमध्ये तसेच यशोविजयजींनी हीच परंपरा पुढे नेली. आचार्य महाप्रज्ञांनी 'प्रेक्षाध्यान' द्वारे ध्यान पुनर्जीवित केले.
'अकम्मे जाणई पासई' जो काही करत नाही तो जाणतो , बघतो . Lord Buddha म्हणाले,
There is no meditation without knowledge nor is there wisdom without meditation. He who posses both is indeed close to Nirvana.
ध्यान त्या चित्तात उत्पन्न होते , जे निर्मळ व पवित्र आहे. ज्याचे चित्त ध्यानात प्रसन्न आहे , तो धर्मात स्थिर होऊन मोक्षास प्राप्त होतो.
जैनदर्शनात ध्यानाचे चार भेद प्रसिद्ध आहेत . १) आर्तध्यान : इष्टाचा संयोग व अनिष्टाचा वियोग यांचेच वारंवार चिंतन करण्यात येते. मनाच्या आवडणाऱ्या (मनोज्ञ) वस्तूंचा वियोग झाल्यावर पुन्हा त्यांच्या संयोगाची इच्छा करणे , वेदना दूर व्हाव्यात तथा पुढील काळात भोगाची इच्छा करणे, निदान करणे आर्तध्यान आहे. हे ध्यान कृष्ण , नील
जैन धर्माची ओळख / ६४
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
ध्यान.
व कपोत लेश्यांतच निर्माण होते. ते तिर्यंच गतीत घेऊन जाते. हे प्रथम गुणस्थानापासून सहाव्या गुणस्थानापर्यंत असते . आर्तध्यानाचे चार प्रकार आहेत . १) अनिष्ट संयोजक, २) इष्ट विर्योजक, ३) पिडा चिंतन, ४) निदान आर्तध्यान. २) रौद्रध्यान : हिंसा , असत्य , चोरी आणि परिग्रहामुळे हे ध्यान होते. हे ध्यान पाचव्या गुणस्थानापर्यंत होते . लेश्या - कृष्ण , नील व कपोत असते. यात व्यक्ती वाईट करण्यात आनंद मानते व त्या परिणामामुळे नंतर नरकात जाते . रौद्र ध्यानाचे चार प्रकार आहेत . १) हिंसानंद, २) मृषानंद, ३) चौर्यानंद, ४) परिग्रह रौद्रध्यान .. ३) धर्मध्यान : याचे चार प्रकार आहेत . १) आज्ञाविचय, २) अपायविचय, ३) विपाकविचय आणि ४) संस्थानविचय.
आज्ञाविचयात देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून तत्त्वाचे ग्रहण होते . अपायविचयात सन्मार्गाचा विचार व विपाकविचयात कर्माचे फळ यांचा विचार होतो . विश्वाचा , १२ भावनांचा तथा द्रव्यांच्या स्वभावाबद्दल विचार करणे संस्थानविचय धर्मध्यान आहे. हे धर्मध्यान पाचव्या , सहाव्या व सातव्या गुणस्थानात होते. ४) शुक्लध्यान : याचे चार भेद आहेत . प्रथम दोन ध्यान श्रुतकेवलींना होते. शेवटचे दोन ध्यान संयोगकेवलींना आणि अयोगी केवलींना होते. छद्मस्थाला नाही . प्रथम शुक्लध्यान ८ ते ११ गुणस्थानी , दुसरे शुक्लध्यान बाराव्या गुणस्थानी व तिसरे शुक्लध्यान तेराव्या गुणस्थानी , चौथे शुक्लध्यान चौदाव्या गुणस्थानी होते. हे चार भेद पुढीलप्रमाणे आहेत.
१) पृथकत्व वितर्कविचार, २) एकत्त्व वितर्कअविचार,
३) सूक्ष्मक्रियाप्रतिपाती, ४) व्युपरत्तक्रियानिवृत्ती. मन : हे दासताचे स्रोत व मुक्तीचे द्वारही आहे . मनाने संसाराचे दार उघडते तर मनानेच संसारातून बाहेर पडता येते. मनानेच नरक व स्वर्ग साध्य आहे. योग्य अवलंबनाने तुम्ही ध्यानाकडे वळता आणि दुरुपयोग मात्र संसाराची गुलामी करण्यास भाग पाडतो .
(लेखिकेचे 'मुक्तीचे द्वार : ध्यान' हे पुस्तक अधिक विस्तृत माहितीसाठी जरूर वाचावे.)
जैन धर्माची ओळख / ६५
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
गुणस्थान
"गुणसण्णा सा च मोह जोग भवा ।"
राग, द्वेषभाव व योगभाव यांच्या निमित्त वश जीवाच्या दर्शन-ज्ञानचरित्र गुणांची , श्रद्धा , रुची , प्रतीती , वृत्ती या स्वभावाचे जे प्रकार त्यांना गुणस्थान म्हणतात .
जीवांचे हे परिणाम असंख्यात लोकप्रमाण , असंख्यात प्रकारचे होतात . परंतु, त्यांना प्रामुख्याने १४ प्रकारच्या गुणस्थानांमध्ये अंतर्भूत केले आहे .
हा जीव अनादिकाळापासून आपल्या स्वभावास विसरून या परभावालाच आपला स्वभाव समजून अपराध दोषाने संसारात ८४ लाख योनींत सतत प्रवास करीत आहे. त्याला त्याचे काय फळ मिळते, याचा चित्रपट म्हणजे ही १४ गुणस्थाने होय. याचा अभ्यास गोम्मटसार जीवकांड या ग्रंथात सविस्तररूपाने आहे. आठव्या गाथेत सांगितले आहे. लक्षण:
जे हिंदु लाक्खिज्जते उदयादिसु संभवेहि भावेहि ।।
जीवा ते गुणसण्णा णिहिट्ठा सव्वदरसीहि ।। मोहनीय कर्माचा उदय-उपशम , क्षय, क्षयोपशम झाला असता जीवाचे जे भाव होतात ; त्या परिणामाची जी स्थाने असतात त्यांना गुणस्थान म्हणतात, गुणस्थानाचे प्रकार : ही १४ आहेत . त्यापैकी १ ते ४ ही सम्यग्दर्शन गुणाची मुख्यता ठेवून गुणस्थानांची नावे दिलेली आहेत. १) मिथ्यात्व , २) सासादन , ३) मिश्र , ४) अविरतसम्यक्त्व , ५) देशविरत , ६) प्रमत्तविरत, ७) अप्रमत्त , ८) अपूर्वकरण, ९) अनिवृत्तीकरण, १०) सूक्ष्म सांपराय, ११) उपशांत मोह , १२) क्षीणमोह, १३) सयोग केवली, १४) अयोग केवली. १) मिथ्यात्व : विपरीत मान्यता असते. मिथ्या श्रद्धा त्याला मिथ्यात्त्व म्हणतात . गोम्मटसारमध्ये १७व्या गाथेत म्हटले आहे :
जैन धर्माची ओळख / ६६
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
मिच्छत्तं वेदंतो जीवो विवरीयदसणो होदि ।
ण य धम्म रोचेदि ह महरं ख रसं जहा जरिदो ।। अर्थ : मिथ्यात्व कर्माचा उदय असताना जीवाचे असे विपरीत परिणाम होतात . जसे ज्वराने पीडित माणसाला गोड पदार्थ कडवट वाटतो . त्याप्रमाणे या विपरीत दृष्टी माणसाला धर्माची कथा मुळीच आवडत नाही . मिथ्यात्वाचे पाच प्रकार - १) एकान्त , २) विपरीत, ३) विनय , ४) संशय, ५) अज्ञान. ___ मी श्रीमंत , गरीब , सुंदर-कुरूप, मी , माझी पत्नी , माझे घर , शरीराचा
आध्यात्मिक विकासक्रम गुणस्थान
अयोग केवली संयोग केवली क्षीण मोह
उपशांत मोह
सूक्ष्म साम्पराय
अनिवृत्तिकरण
अपूर्वकरण अप्रमत्त विरत
प्रमत्त विरत
देश विरत
अविरत सम्यकत्व
सम्याग्मिथ्यात्व
सासादन सम्यकत्व
मिथ्यात्व
जैन धर्माची ओळख / ६७
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
जन्म तो माझा जन्म, अशा जीव-अजीव तत्त्वांची विपरीत मान्यताच मिथ्यात्व
आहे.
२) सासादन गुणस्थान : हे गुणस्थान वर चढताना होत नाही तर चौथ्या गुणस्थानातून खाली उतरताना होते . उपशम सम्यग्दृष्टी जीवास जेव्हा अनंतानुबंधी कषायांचा उदय होतो ; तेव्हा तो सम्यकत्वापासून भ्रष्ट होतो. परंतु , मिथ्यात्वाचा उदय होत नाही. तो सासादन गुणस्थानात राहतो. या गुणस्थानाचा काळ कमीतकमी एक समय व जास्तीत जास्त सहा आवली असतो. या गुणस्थानातून तो नियमाने मिथ्यात्व गुणस्थानात जातो. ३) मिश्र गुणस्थान : सम्यगमिथ्यात्व प्रकृतीचा उदय असताना जीवाचे धड सम्यक्त्वरूपही नाही व धड मिथ्यात्वरूपही नाही, असे मिश्र परिणाम होतात , त्यास मिश्र गुणस्थान म्हणतात . श्रीखंडाप्रमाणे आंबट व गोड रसाचे परिणाम इथे असतात . या गुणस्थानात जीव देशसंयम किंवा संयम धारण करू शकत नाही. या मिश्र गुणस्थानात आयुचा बंध होत नाही. ४) अविरत सम्यक्त्व : दर्शन मोहनीय कर्माच्या तीन प्रकृती (मिथ्यात्व - सम्यग्मिथ्यात्व - सम्यक्प्रकृती) व अनंतानुबंधीच्या चार प्रकृती याप्रमाणे सात प्रकृतींचा उपशम किंवा क्षयोपशम झाल्याने जीवाचे यथार्थ श्रद्धानरूपच परिणाम म्हणजे अविरत सम्यक्त्व गुणस्थान . मिथ्यादृष्टीच्या परिणामांची शुद्धी तीन प्रकारे होते. १) अधःकरण, २) अपूर्वकरण व ३) अनिवृत्तीकरण.
अधःकरणमध्ये सर्व जीवांचे परिणाम समान असतात .
अपूर्वकरणात परिणामाची शुद्धता अपूर्वते ने वाढतच जाते . अनिवृत्तीकरणात सर्वांच्या परिणामांची सारखी शुद्धी होते . याप्रमाणे करणलब्धी प्राप्त करून जीव सम्यग्दर्शनाच्या द्वारी जातो . धर्माचा व मोक्षमार्गाचा प्रारंभ याच गुणस्थानापासून होतो . ज्या वेळी जीवांना यथार्थ तत्त्वज्ञान होते , यथार्थ श्रद्धान होते, त्याच समयी पूर्वी असलेले ज्ञान व चरित्र हे सम्यकज्ञान व सम्यकचरित्र होते. सम्यग्दर्शन, सम्यकज्ञान व सम्यक्चरित्र यांची एकतारूप मोक्षमार्गाची सुरुवात असते . स्वरूपाचरणामुळे संवर, निर्जरा प्राप्त होऊन जीव मोक्षमार्गी बनतो. जे सम्यकदर्शन प्राप्त करीत नाहीत; ते या संसारात नुसते भटकत राहतात. त्यांना कुठेच सुख मिळत नाही. ५) देशविरत गुणस्थान : अप्रत्याख्यानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जीव सकल संयमाचा म्हणून देशसंयम , श्रावकाचे अणुव्रत , गुणव्रत धारण
जैन धर्माची ओळख / ६८
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
करतो, त्यास देशविरत गुणस्थान म्हणतात . या गुणस्थानात तो त्रसजीवाचा घात करीत नाही म्हणून विरत . परंतु , स्थावर जीवाची हिंसा त्याला नाइलाजाने करावी लागते म्हणून अविरत असतो. म्हणून या गुणस्थानास विरताविरत असे दुसरे नाव आहे . श्रावकाचे मुख्यतः तीन भेद आहेत - १) पाक्षिक, २) नैष्ठिक, ३) साधक. ६) प्रमत्तविरत : संज्वलन व नोकषाय यांचा उदय असताना मलजनक प्रमाद (आत्मस्वरूपात स्थिरता) असतो म्हणून प्रमत्त म्हणतात . पण, प्रत्याख्यान आवरण कर्माचा क्षयोपशम असल्यामुळे तो महाव्रत धारण करू शकतो. मुनीचे २८ मूलगुण यात प्रत्येकी पाच महाव्रत , समिती , इंद्रियनिरोध , सहा आवश्यक , सात इतर गुण (स्नान न करणे , दंत न घासणे, केशलोच करणे, नग्नता , जमिनीवर झोपणे, उभे राहून आहार करणे, दिवसा एक वेळ जेवण करणे) यांचा समावेश होतो. प्रमाद १५ प्रकारचे आहेत - चार विकथा , चार कषाय , पाच इंद्रिय विषय , एक निद्रा व एक प्रणय (रागद्वेष). जीव सहाव्या व सातव्या गुणस्थानात सारखा चढ-उतार करीत असतो. ७) अप्रमत्त गुणस्थान : जेव्हा संज्वलन कषाय व नऊ नोकषाय (हास्य , रती , शोक , अरती , भय , जुगुप्सा , स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद) यांचा मंद उदय असतो; तेव्हा प्रमादरहित जीव ध्रुवस्वभावात स्थिर होतो, त्यास अप्रमत्त गुणस्थान म्हणतात . या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त असतो. ८) अपूर्वकरण : या गुणस्थानात जीवाचे परिणाम पूर्वी कधीही इतके शुद्ध झाले नव्हते , असे अपूर्व विशुद्ध होतात. म्हणून या गुणस्थानास अपूर्वकरण गुणस्थान म्हणतात. या गुणस्थानात चार आवश्यक होतात - १) स्थितीकांडकघात : अशुभ कर्माची स्थिती कमी होते. २) अनुभागकांडकघात : अशुभकर्माचे फळ कांडकसमूह रूपाने कमी होते. ३) गुणसंक्रमण : अशुभप्रकृतीचे शुभप्रकृतीत रूपांतर होते . ४) गुणश्रेणीनिर्जरा : गुणाकार श्रेणीने अशुभकर्माची निर्जरा होते.
या गुणस्थानाचा काळ अंतर्मुहूर्त आहे. इथे अशुभकर्म कमी होऊन शुभकर्म वाढतात. ९) अनिवृत्तीकरण : इथे सर्वांचे समान विशुद्ध परिणाम असतात . याचा काळ अंतर्मुहूर्त असतो. १०) सूक्ष्मसांपराय : येथे केवळ सूक्ष्म लोभ शिल्लक राहतो , अशा विशुद्ध
जैन धर्माची ओळख / ६९
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
परिणामास सूक्ष्मसांपराय गुणस्थान म्हणतात . या गुणस्थानातून वर चढणारा उपशम श्रेणीचा जीव अकराव्या गुणस्थानात जातो व सत्तेतील चरित्र्यमोहनीय कर्माच्या उदयाने अंतर्मुहूर्तात नियमाने खाली पडतो. पण , क्षपक श्रेणीचा जीव सरळ बाराव्या गुणस्थानात जाऊन पुढे १३, १४व्या गुणस्थानात जातो व मुक्त होतो . तो खाली पडत नाही. ११) उपशांत मोह : जेथे चरित्रामोहनीयच्या २१ प्रकृतीचा उपशम झाला असताना जीवाचे वीतरागी, निर्मळ शुद्ध परिणाम होतात, त्यास उपशांत मोह गुणस्थान म्हणतात . १२) क्षीणमोह : चारित्र्यमोहाचा संपूर्णपणे क्षय झाला असताना जीवाचे निर्मळ परिणाम होतात. १३) सयोग केवली गुणस्थान : या गुणस्थानात चार घाती कर्मांचा पूर्णपणे नाश होतो. जीवाला आपले स्वभाव चतुष्ट्य अनंतज्ञान , अनंतदर्शन , अनंतसुख , अनंतवीर्य प्राप्त होतात. आत्मा हा परमात्मा बनतो. इथे नऊ क्षायिक लब्धी प्राप्त होतात. येथे काययोग असतो म्हणून सयोग केवली म्हणतात. त्यांना शरीर असते म्हणून सकल परमात्मा पण म्हणतात .
समवसरणामध्ये सर्वज्ञ भगवान भव्य जीवांना उपदेश देतात . सिंहासनावर अधर बसतात . दिव्यध्वनी खिरते . हे सर्व काही नियतिवश , नियोगवश होते . त्या क्रियाकडे अरिहंत भगवानचे लक्ष नसते , रुची नसते , राग नसतो. अरिहंत भगवान १८ दोषांनी रहित असतात . ते केवलज्ञानाने लोक-अलोकातील सर्व वस्तू व त्यांचे पर्याय यांना युगपत् जाणतात . जे सत्य ज्ञान असते, ते फक्त दर्पणाकडे बघते. त्यातील चेहऱ्याकडे नाही. णमो अरिहंताणं हे नमोकाराचे प्रथम पद व प्रथम नमस्कार आहे. अरिहंत भगवान आम्हास सत्याचा मार्ग दाखवितात म्हणून प्रथम त्यांनाच वंदन केले आहे.
या गुणस्थानात काल हा कमीतकमी अंतर्मुहूर्त व जास्तीत जास्त एक कोटी पूर्वाला आठ वर्षे व अंतर्मुहूर्त कमी इतका असतो. शेवटी विहार बंद होतो व जीव समाधी योग धारण करतो. आयुकर्माची स्थिती संपत आली असताना जर इतर तीन अघाती कर्मांची स्थिती जास्त असेल ; तर ती स्थिती कमी करण्यासाठी केवली भगवान समुद्घात करतात . १४) अयोगकेवली गुणस्थान : जेव्हा अरिहंत भगवान योग निरोध करून समाधियोग धारण करतात, तेव्हा योगाचा अभाव होतो. नवीन कर्माचा
जैन धर्माची ओळख / ७०
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
आस्त्रव-बंधाचा पूर्ण अभाव होतो. शेवटी चारही अघाती कर्मांचा नाश होतो. त्यांचे परम औदारिक शरीर कापरासारखे उडून बाह्य वातावरणात मिळून जाते . त्यांचा आत्मा एका समयात ऊर्ध्वगमन करून सिद्धशीलेत विराजमान होतो , तेव्हा तो मुक्त होतो. त्यालाच सिद्ध भगवान म्हणतात . ते पुन्हा जन्ममरणाचे दुःख व चक्र भोगत नाहीत.
सुख आणि दुःखाच्या अपेक्षेने आपण गुणस्थानांचे चार प्रकारे विभाजन करू शकतो. जसे -
१) पहिल्या ते तिसऱ्या गुणस्थानापर्यंत जीव सर्व दुःखी आहे . २) चौथ्या ते दहाव्या गुणस्थानवी जीव दुःखीही आहे व सुखीही आहे. ३) अकराव्या आणि बाराव्या गुणस्थानवर्ती मुनिवर पूर्णपणे सुखी आहेत . ४) तेरावे व चौदावे गुणस्थानी अरिहंत भगवान अनंत सुखी आहेत .
प्रथम गुणस्थानात जीवांची संख्या अनंतानंत आहे . चतुर्थ गुणस्थानी पल्ल्याच्या असंख्यात भाग प्रमाण आहे. पहिल्या गुणस्थानात मनुष्याची संख्या जगतच्या श्रेणीच्या असंख्यात भाग प्रमाण आहे. चतुर्थ गुणस्थानी मनुष्याच्या अपेक्षेने ७०० करोड आहे . पंचम गुणस्थानी १३ करोड , सहाव्या गुणस्थानात पाच करोड, ९३ लाख ९८ हजार २०६ आहे. सातव्या गुणस्थानी जीवांची संख्या दोन करोड ९६ लाख ९९ हजार १०३ आहे. ज्ञानावरणकर्माचा उदय एक ते १२ गुणस्थानापर्यंत . दर्शनावरणकर्माचा उदय एक ते १२ गुणस्थानापर्यंत . नामकर्माचा उदय एक ते १४ गुणस्थानापर्यंत होतो . आयुकर्माचा उदय एक ते १४ गुणस्थानापर्यंत होतो . गोत्रकर्माचा उदय एक ते १४ गुणस्थानापर्यंत होतो. वेदनीयकर्माचा उदय एक ते १४ गुणस्थानापर्यंत होतो . मोहनीयकर्माचा उदय एक ते १० गुणस्थानापर्यंत असतो . अंतरायकर्माचा उदय एक ते १२ गुणस्थानापर्यंत असतो.
अशाप्रकारे गुणस्थानांचे वर्णन शास्त्रामध्ये आहे.
जैन धर्माची ओळख / ७१
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
मार्गणा
ज्या योगे किंवा ज्या ठिकाणी जीव शोधले जातात , जीवाचे अस्तित्व जाणले जाते त्यास मार्गणा म्हणतात . जीवाच्या भिन्न-भिन्न परिणामाने जीवास भिन्न-भिन्न अवस्था प्राप्त होतात . ती १४ मार्गणा स्थाने आहेत .
१) गती , २) इंद्रिय , ३) काय , ४) योग , ५) वेद, ६) कषाय , ७) ज्ञान , ८) संयम , ९) दर्शन , १०) लेश्या , ११) भव्यत्व , १२) सम्यक्त्व , १३) संज्ञित्व , १४) आहारकत्व . या १४ प्रकारांनी जीवाचा शोध लावला जातो. १) गतिमार्गणा :
गती नामकर्माचा उदय असताना जीव जी अवस्था धारण करतो, त्यास गती म्हणतात . गती चार आहेत. १) नरकगती, २) तिर्यंचगती, ३) मनुष्यगती, ४) देवगती. नरकगतीत अत्यंत दुःख व वेदना भोगाव्या लागतात . बहु आरंभ व बहु परिग्रह - या परिणामांनी नरकायूचा बंध पडतो. तेथील जीवांना अवधिज्ञान असते. पूर्वभवातील स्मरणाने ते एक दुसऱ्यांना फार त्रास देतात. त्यांच्या वैक्रियिक शरीराचे तुकडे-तुकडे होऊन ते पुन्हा जुळतात . पण , त्यांना मरण येत नाही. केलेल्या पापकर्मांची फळे भोगण्यास नरकगती मिळते.
तिर्यंचगती नामकर्माचा उदय असताना जे शरीर मिळते , त्यास तिर्यंच म्हणतात . तिर्यंच जीवाचे पाच भेद आहेत . १) एकेंद्रिय, २) द्विंद्रिय, ३) त्रिंद्रिय, ४) चतुरिंद्रिय, ५) पंचेंद्रिय. एकेद्रियाला एक इंद्रिय स्पर्श, द्विंद्रियाला स्पर्श व रस इंद्रिय , त्रिंद्रियाला स्पर्श , रस , घ्राण इंद्रिय , चतुरिंद्रियाला स्पर्श , रस , घ्राण , चक्षू हे चार इंद्रिय असतात . जसे - माशी, भुंगा, पतंग. पंचेंद्रियास पाच इंद्रिय असतात . त्यात जलचर , स्थलचर व नभचर प्राणी येतात. त्यांना तीव्र , प्रगट मैथुन संज्ञा असते. क्रूर व कुटिल बुद्धी असते . तिर्यंचामध्ये सामान्य तिर्यंच , पंचेंद्रिय , योनिमती , पर्याप्त व अपर्याप्त भेद असतात .
जैन धर्माची ओळख / ७२
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
.
%
० ०
5
ar mx
मार्गणामध्ये जीवस्थान , गुणस्थान, योग, उपयोग आणि लेश्या-दर्शक यंत्र क्रम मार्गणा मार्गणानाम जीवस्थान गुणस्थान योग उपयोग लेश्या संख्या भेदसंख्या
१-गती-मार्गणा नरकगती ... तिर्यंचगती... १४ ५ १३ ९ ६ मनुष्यगती देवगती २-इंद्रिय-मार्गणा
एकेंद्रिय ६ २ द्विंद्रिय
त्रिंद्रिय ४ चतुरिंद्रिय
पंचेंद्रिय
0
mururur
०
3
5 w a vol
* .dad
• < < <
3 < www
m mmu
मनुष्यगती नामकर्माचा उदय असताना , जे मनुष्यगतीमध्ये जन्म धारण करतात ; त्यांना मनुष्य म्हणतात . मनुष्यजातीमध्ये मान कषाय तीव्र असतो. मनुष्याचे कर्मभूमिज, भोगभूमिज, आर्य, म्लेंच्छ इत्यादी भेद आहेत. १) सामान्य मनुष्य, २) योनिमती मनुष्य , ३) पर्याप्त मनुष्य व ४) अपर्याप्त मनुष्य अशा चार प्रकारांनी मनुष्यगतीचे वर्णन आहे . देवगती नामकर्माचा उदय असताना जे देवगतीत जन्म धारण करतात; त्यांना देव म्हणतात . देवांना आठ सिद्धी प्राप्त असतात . देवांचे चार भेद आहेत . १) भवनवासी, २) व्यंतर, ३) ज्योतिष्क, ४) वैमानिक. भवनवासी देवांचे दहा भेद आहेत . ते पृथ्वीच्या खाली खरभाग-पंकभागात राहतात . व्यंतर देवांचे आठ भेद आहेत . १) किन्नर, २) किंपुरुष, ३) महोरग, ४) गंधर्व, ५) यक्ष, ६) राक्षस , ७) भूत व ८) पिशाच्च . ___ ज्योतिष्क देवांचे पाच भेद आहेत . १) सूर्य, २) चंद्र, ३) ग्रह, ४) नक्षत्र, ५) प्रकीर्णक तारका.
चौथे देव वैमानिक आहेत . ते उच्च कोटीचे असतात . ऊर्ध्वलोकांत १६ स्वर्ग , नऊ अनुदिश , नऊ ग्रैवेयक , पाच पंचोत्तर असतात . २) इंद्रियमार्गणा : इंद्रियांचे दोन भेद आहेत - १) द्रव्यइंद्रिय , २) भावइंद्रिय.
जैन धर्माची ओळख / ७३
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
शरीर नामकर्माच्या उदयाने शरीरामध्ये अशी चिन्ह-विशेष असतात की , ज्यांच्याद्वारे भावेंद्रिय जाणण्याचे कार्य करतात , त्यास द्रव्येद्रिय म्हणतात . स्पर्श इंद्रिय सर्व शरीरभर आहे. पण, बाकीची इंद्रिये डोळे, कान यांचे विशिष्ट स्थान आहे. द्रव्येद्रियद्वारे आपापल्या विषयांना जाणण्याची क्षयोपशमरूप लब्धी व उपयोग याला भावेंद्रिय म्हणतात . इंद्रिये पाच आहेत - १) स्पर्शनेंद्रिय, २) रसनेंद्रिय, ३) घ्राणेंद्रिय, ४) चक्षुरिंद्रिय, ५) कर्णेद्रिय. ३) कायमार्गणा : त्रस-स्थावर नामकर्माचा उदय असताना जे त्रस व स्थावरकाय धारण करतात ; त्यांना त्रसकाय व स्थावरकाय जीव म्हणतात. १) त्रसकाय : द्वींद्रिय , त्रिंद्रिय , चतुरिंद्रिय , पंचेंद्रिय आहेत . २) स्थावरकाय : पृथ्वी , पाणी , वारा , अग्नी, वनस्पती एकेंद्रिय जीव हे स्थावरकाय आहेत . स्थावरचे दोन भेद आहेत - १) बादर, २) सूक्ष्म . जे दुसऱ्याकडून अडविले जाते व जे दुसऱ्यास अडविते , अशा स्थूल शरीराला बादरकाय म्हणतात.
कायमार्गणा
त्रसकाय
स्थावरकाय
विकलेंद्रिय सकलेंद्रिय बादर सूक्ष्म (द्वींद्रिय ,त्रिंद्रिय ,चतुरिंद्रिय) (पंचेंद्रिय)
जे शरीर दुसऱ्यास अडवीत नाही , जे दुसऱ्याकडून अडविले जात नाही; त्यास सूक्ष्मकाय म्हणतात . बादरकाय कुणाच्या तरी आधाराने राहतात ; तर सूक्ष्मकाय जीव निराधार असतात .
वनस्पतिकायाचे दोन भेद आहेत - १) प्रत्येक, २) साधारण.
ज्या शरीराचा एकच स्वामी असतो ते प्रत्येक वनस्पतिकाय व एकाच शरीराचे जेव्हा अनंतजीव स्वामी असतात ; तेव्हा ते साधारण वनस्पतिकाय होय. प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद आहेत - १) सप्रतिष्ठित वनस्पती आणि २) अप्रतिष्ठित . ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पतिकाय जीव असतात ; त्यास प्रतिष्ठित म्हणतात व ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पतिकाय जीव राहत नाही ; ती अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे व ती आपण भक्ष्य करू शकतो.
जैन धर्माची ओळख / ७४
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
साधारण वनस्पतिकाय निगोद जीवामध्ये असे अनंत जीव आहेत की, ज्यांनी आतापर्यंत त्रसपर्याय धारण केला नाही . ते नित्य निगोदात राहतात . या निगोद राशीवर सहा महिने आठ समयात ६०८ जीव संसारराशीत येतात व तितकेच संसारस्थ जीव दर सहा महिने आठ समयात मुक्त होतात , असा नियमच आहे. ४) योगमार्गणा : मन-वचन-कायेच्या अवलंबनाने जे आत्मप्रदेशामध्ये स्पंदन-हलन-चलन होते , त्यास योग म्हणतात . योगाचे मुख्य तीन भेद आहेत . १) मनोयोग, २) वचनयोग, ३) काययोग.
मनोयोगाचे चार भेद - १) सत्य, २) असत्य, ३) उभय, ४) अनुभव . वचनयोगाचे चार भेद आहेत . पण , काययोगाचे सात भेद आहेत . ५) वेदमार्गणा : वेदनामक नोकषायाचा उदय किंवा उदीरणा असताना जीवाचे स्पर्शनेंद्रियाद्वारे विषयसेवन करण्याचे मोहयुक्त परिणाम होतात, त्यास वेद म्हणतात . पुरुषवेदात स्त्रीसुखाची तर स्त्रीवेदात पुरुषसुखाची कामना असते . पुरुषवेद हा फार प्रभावी असल्याने तो सातव्या नरकात जाण्याचे व मोक्षप्राप्तीचेही प्रयत्न करू शकतो. ६) कषायमार्गणा : हे संसाराला वाढविणारे आहेत . कषायाचे मुख्य चार भेद आहेत- क्रोध , मान , माया आणि लोभ . याचे प्रत्येकी चार भेद आहेत . १) अनंतानुबंधी : जो सम्यग्दर्शनाचा घात करतो. तो हा नरकबंध घडवितो. २) अप्रत्याख्यानावरण : ज्यामुळे श्रावक देशचरित्र धारण करू शकत नाही . हा कषाय पृथ्वीच्या रेषेप्रमाणे लवकर मिटतो. हा तिर्यंचगतिबंधाला कारण होतो. ३) प्रत्याख्यानावरण : ज्यामुळे मुनीचे चरित्र धारण होत नाही तो. हा वाळूच्या रेखासमान लवकर मिटतो. हा मनुष्यगतिबंधाला कारणीभूत होतो. ४) संज्वलन : जो यथाख्यात चारित्र्याचा घात करतो, त्यास संज्वलन कषाय म्हणतात. हा जलरेखासमान तत्काळ मिटतो. देवगतीस कारणीभूत
होतो.
७) ज्ञानमार्गणा : जे तिन्ही लोकांतील पदार्थांना त्यांच्या त्रिकालवर्ती द्रव्यगुण-पर्यायसह प्रत्यक्ष अथवा परोक्ष जाणते , त्यास ज्ञान असे म्हणतात
ज्ञानाचे पाच भेद आहेत - १) मतिज्ञान , २) श्रुतज्ञान, ३) अवधिज्ञान, ४) मनःपर्ययज्ञान आणि ५) केवलज्ञान. मतिज्ञानाचे एकूण ३३६ भेद आहेत . ४८ व्यंजन अवग्रहाचे, ७२
जैन धर्माची ओळख / ७५
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
अर्थअवग्रहाचे , ईहाचे ७२, अवायचे ७२ व धारणाचे ७२ मिळून ३३६ भेद होतात . श्रुतज्ञानाचे १) अंगबाह्य व २) अंगप्रविष्ट हे दोन भेद आहेत . अंगप्रविष्टाचे १२ भेद आहेत . वरील पाचही ज्ञानांचे वर्णन पुढे आले आहे. ८) संयममार्गणा : व्रताचे ग्रहण, समितीचे पालन , कषायांचा निग्रह अनर्थदंडाचा त्याग , इंद्रियविषयावर जय या सर्वांना संयम म्हणतात . संयमाचे पाच भेद आहेत. १) सामायिक, २) छेदोपस्थापना, ३) परिहार विशुद्धी, ४) सूक्ष्मसांपराय, ५) यथाख्यात. सामायिकात :
सर्व सावध योगाचा त्याग करतात. सामायिकपासून च्युत झाले असताना त्यामध्ये पुनःस्थिर होणे ती , छेदोपस्थापना होय. ही ६ ते नवव्या गुणस्थानी होते. परिहार विशुद्धीत ३० वर्षे सुखी जीवन घालवून नंतर दीक्षा ग्रहण करतात . यथाख्यात संयमात मोहकर्माचा उपशम व क्षय झाल्याने तो आत्म्यात लीन होतो .
जीवनसमास १४ आहेत . १) एकेद्रियाचे दोन भेद - बादर, सूक्ष्म २) तीन विकलत्रय - दोन , तीन , चार इंद्रिय ३) पंचेंद्रियाचे दोन भेद - संज्ञी-असंज्ञी यांचे पर्याप्त व अपर्याप्त भेद
इंद्रियांचे विषय २८ आहेत . पाच रस , पाच वर्ण , दोन गंध , आठ स्पर्श, सात स्वर , एक मन . ९) दर्शनमार्गणा : छमस्थ जीवाला प्रथम दर्शन होते व नंतर ज्ञान होते. सामान्यविशेषात्मक पदार्थाचे जे सामान्य ग्रहण त्यास दर्शन म्हणतात . हे दर्शन निराकार असते. सामान्य प्रतिभास असतो. दर्शनाचे चार भेद आहेत . १) चक्षुदर्शन - जे प्रकाशते , दिसते ते चक्षुदर्शन होय . २) अचक्षुदर्शन - चक्षुशिवाय बाकीच्या इंद्रियांनी होणारा पदार्थाचा सामान्य प्रतिभास ते अचक्षुदर्शन . ३) अवधिदर्शन - अवधिज्ञानाच्या पूर्वी होणारा जो सामान्य प्रतिभास ते अवधिदर्शन होय. ४) केवलदर्शन - केवलज्ञानाबरोबर होणारा जो सामान्य प्रतिभास ते
जैन धर्माची ओळख / ७६
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
केवलदर्शन असते. १०) लेश्यामार्गणा : ज्या परिणामांनी जीव शुभ-अशुभ भावांनी , अनात्मभावाने लिप्त होतो; त्या भावांना आत्मसात करतो, त्यास लेश्या म्हणतात . कषाययुक्त योग परिणाम म्हणजेच लेश्या होय . लेश्या सहा प्रकारची असते. १) कृष्ण, २) नील, ३) कपोत, ४) पीत, ५) पद्म व ६) शुक्ल. लेश्या : तीन लेश्या कृष्ण , नील , कपोत अशुभ आहेत; तर तीन शुभ लेश्या आहेत - पीत , पद्म व शुक्ल . या प्रत्येक लेश्यांचा विशिष्ट भाव व रंग असतो. लेश्याचे दोन मुख्य भेद - १) द्रव्यलेश्या, २) भावलेश्या. द्रव्यलेश्या - शरीर नामकर्माचा उदय असताना शरीराचा जो कृष्ण-नील आदी वर्ण ती द्रव्यलेश्या होय. भावलेश्येत जीवाचे कषाययुक्त योग परिणाम असतात.
नारकी जीवाची द्रव्यलेश्या कृष्णलेश्या असते . भोगभूमीतील जीवाची द्रव्यलेश्या सूर्याप्रमाणे पीतवर्ण असते . जघन्य भोगभूमीत हरित वर्णाची कपोतलेश्या असते. कृष्णलेश्यावाला जीव हा क्रूर व क्रोधी असतो. तो झाडास मुळासकट उपटतो . तो दयाधर्म करीत नाही . नीललेश्यावाला आळशी , प्रमादी असतो. कपोतलेश्यावाला जीव रुष्ट होणे, दुसऱ्याची निंदा करणे, तीव्र शोक भावांनी ग्रासित असतो . पीतलेश्याचा जीव मृदू भाषण करतो, कृत्य-अकृत्य , भक्ष्य-अभक्ष्याचा विचार करतो. पद्मलेश्यावाला त्यागी, भद्रपरिणामी , क्षमाशील , देवगुरूशास्त्र यांची भक्ती करणारा असतो. शुक्ललेश्याचा जीव पक्षपात न करता समभाव ठेवणे, रागद्वेष न करणे हे करतो. ११) भव्यत्वमार्गणा : यात जीवाचे भव्यत्व व अभव्यत्व यांचे वर्णन असते. ज्याप्रमाणे विवाहित स्त्री गर्भवती होण्याची शक्यता असते; त्याप्रमाणे भव्य जीवाला मोक्षमार्ग मिळण्याची शक्यता असते. परंतु , विधवा स्त्रीला अपत्य होण्याच्या अशक्यतेइतकेच अभव्य जीवास मोक्ष मिळणे अशक्य असते . १२) सम्यक्त्वमार्गणा : सहा द्रव्ये , पाच अस्तिकाय द्रव्ये, सात तत्त्वे यांचे जसे स्वरूप शास्त्रात सांगितले; तसे यथार्थ श्रद्धान करणे ते सम्यग्दर्शन होय . सम्यक्त्वमार्गणेचे सहा भेद आहेत . १) क्षायिक सम्यक्त्व : दर्शनमोहाच्या तीन प्रकृती व अनंतानुबंधीच्या चार प्रकृतींचा क्षय झाल्यावर आत्मतत्त्वाचे जे दर्शन ते क्षायिक सम्यग्दर्शन .
जैन धर्माची ओळख / ७७
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
२) उपशम सम्यक्त्व : वरील सात प्रकृतींचा उपशम झाल्यानंतर होणारे सम्यक्त्व ते उपशम सम्यक्त्व होय. ३) क्षायोपशमिक सम्यक्त्व : वरील सात प्रकृतींपैकी (दर्शनमोहाच्या तीन व अनंतानुबंधीच्या चार प्रकृती) सहा प्रकृतींचा , सर्व घातींचा पुढे उदयात येणाऱ्याचा सवस्थारूप उपशम, वर्तमानकालीन उदय भावी क्षय ते क्षायोपशमिक सम्यक्त्व आहे. ४) सम्यक्मिथ्यात्व : सम्यक्मिथ्यात्वरूप मिश्र प्रकृतीचा उदय असताना धड सम्यक्त्व नाही व धड मिथ्यात्व नाही, असे मिश्र परिणाम होतात . ५) सासादन : अनंतानुबंधीचा उदय असताना सम्यक्त्वापासून च्युत होतो; पण मिथ्यात्वाचा उदय नसल्यामुळे तो मधल्या अवस्थेत म्हणजेच सासादन अवस्थेत असतो. ६) मिथ्यात्व : मिथ्यात्व व अनंतानुबंधी यांचा उदय असताना जे जीवाचे अतत्वश्रद्धानरूप परिणाम होतात , तेच मिथ्यात्व असते.
अशाप्रकारे हे सम्यक्त्वमार्गणाचे भेद आहेत . १३) संज्ञित्वमार्गणा : ज्यांना मन असते ते संज्ञी होय . मनुष्य , देव , नारकी सर्व संज्ञीच असतात . पंचेंद्रिय तिर्यंचापैकी काही तिर्यंच संज्ञी तर काही असंज्ञी असतात . पशु-पक्षी ज्यांना मन नसते ते असंज्ञी असतात . एकेंद्रिय , द्वींद्रिय , त्रींद्रिय , चतुरिंद्रिय जीव सर्व असंज्ञी असतात .. १४) आहारमार्गणा : औदारिक-वैक्रियिक-आहारक शरीरांना योग्य अशा नोकर्म आहारमार्गणा पुद्गल परमाणूंना ग्रहण करणे, यास आहार म्हणतात . हा नोकर्म आहार जे जीव ग्रहण करतात, ते आहारक होत . जे ग्रहण करीत नाही , ते अनाहारक होत .
संसार अवस्थेत कर्माचे ग्रहण एक ते १३ गुणस्थानापर्यंत सतत चालू असते. विग्रहगतीतदेखील आहार ग्रहण होतो. __ याप्रमाणे जीवाची राहण्याची १४ स्थाने आहेत. वास्तविक , हे जीवतत्त्व नाही . ते अचेतन अजीवतत्त्व आहे. यांच्याविषयी भूल करू नये. यांच्याविषयी इष्ट-अनिष्ट बुद्धी ठेवून भ्रमात राहू नये. हे सर्व जग इंद्रजाल आहे . नश्वर व अस्थिर आहे. आत्मस्वरूपात मग्न होणे , हेच जीवाचे खरे स्थान आहे.
जैन धर्माची ओळख / ७८
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
जैन इतिहास
जैन इतिहासात महान वीर, युगपुरुष, ऋषभनाथांपासून महावीरांपर्यंत २४ तीर्थंकर होऊन गेले. त्यांनी जगाला अहिंसा, सत्य, समता, अपरिग्रह, मानवतेची शिकवण दिली. जर विश्वातील प्रत्येकाने जैन तत्त्वांचा अंगीकार केला तर अशांतता दूर होईल.
जैन इतिहास हा खरोखरच प्रबळ, प्रभावी आहे. जैन इतिहासाने अनेक महान युगपुरुषांची महती वर्णिलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भरत, बाहुबली, श्रेणिक राजा, अजातशत्रू, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार, राजा खारवेल, समुद्रगुप्त, हर्ष, सम्राट अशोक, जितशत्रू यांची नावे प्रमुख आहेत.
राजा
श्रवणबेळगोळची जगप्रसिद्ध गोमटेश्वराची दिव्य आणि विशाल मूर्ती जैनांच्या उज्ज्वल इतिहासाचे ज्वलंत प्रतीक गेली हजार वर्षे उभे आहे. चांमुडराय, जैनांचे आचार्य हेही वादविवादात तथा जैन धर्माच्या प्रचारात अग्र ठरलेत. आचार्य परंपराही महान व प्राचीन आहे. त्यांनी सर्व भाषांत ग्रंथ लिहिण्याचे कार्य केले. ते अति विद्वान, प्रभावशाली, वीतरागी, निर्लोभी, सत्यवादी तथा अहिंसेचे पुजारी होते. ते शांतिदूत होते. जैन साहित्य :
जैन साहित्य हे अतिप्राचीन, मौलिक व विज्ञानाला धरून आहे. जैन साहित्य हे समुद्राएवढे विशाल आहे. जैन साहित्य सर्व भाषांत आहे. मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगू, तामीळ, गुजराती, संस्कृत, प्राकृत, शौरसेनी, अर्धमागधी, इंग्रजी इत्यादी अनेक भाषांत ते लिहिले गेले. जगाच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग करायला सर्वश्रेष्ठ आहे. जैनकथा, पुराण हे मधुर, सुरस, उपदेशात्मक असतात. अनेक शिलालेखांद्वारे जैन साहित्याची प्राचीनता सिद्ध होते. जैन साहित्य नाटक, काव्य, कथा इत्यादींमध्ये अग्रेसर
जैन धर्माची ओळख / ७९
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
आहे. जैन व्याकरणही आदर्श आहे. 'प्राकृत लक्षण' हा व्याकरणातील प्रथम ग्रंथ आहे. समंतभद्रांनी तथा हेमचंद्रांनीही व्याकरणावर ग्रंथ लिहिला. हेमचंद्रांनी बाराव्या शतकात 'शब्दानुशासन' हा व्याकरण ग्रंथ लिहिला.
जैन स्तोत्र साहित्य पण प्रसिद्ध आहे. पंचस्तोत्र , भक्तामरस्तोत्र, जिनवाणी संग्रह हे स्तोत्ररूपाने आहेत . जैन साहित्य हे निवृत्तिप्रधान आहे. साहित्याची छटा , सौंदर्य जाणून घेण्यास 'स्व'चे स्वरूप ज्ञान हवे. जैन साहित्यात हिताच्या , उपदेशाच्या, आत्मकल्याणाच्या गोष्टी सांगून , शाश्वत शांतीचाच शोध घेतलेला आहे .
श्वेतांबर जैन आगमात भगवान महावीरांचा उपदेश गणधरांनी आगमाची रचना करून शब्दबद्ध केला, असे मानले जाते. हे सर्व ग्रंथ अर्धमागधीत असून , अत्यंत प्राचीन आहेत . त्यांची संख्या जवळजवळ ४६ आहे. काळाच्या प्रवाहात काही आगम लुप्त झालेत . तरी जे उपलब्ध आहेत , ते अत्यंत मार्गदर्शक आहेत . जैन लोकगीते प्रभावी आहेत . विविध जैन लोकगीतांतून समाजाचे रीतिरिवाज, चालीरूढी, परंपरा , तत्त्वे , उत्सव, तीर्थक्षेत्रे यांची माहिती मिळते . स्त्रीजीवनाचे प्रतिबिंबही लोकगीतांत आढळते.
जैन धर्माची ओळख / ८०
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
आधुनिक विज्ञान व जैन धर्म
आधुनिक विज्ञानाचा उगम जैन साहित्यातूनच झाला आहे , हे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही . जैन धर्माने अध्यात्मवाद , भौतिकवाद विज्ञानाद्वारे सिद्ध करून दाखविले आहेत . जैन तत्त्वज्ञान आंधळेपणाने श्रद्धा ठेवा , हे सांगत नसून प्रत्येक तत्त्व हे पडताळून पाहा , असाच सल्ला देते . जैन धर्मातील प्रत्येक आचार-विचार , तत्त्व शास्त्रशुद्ध आहेत. प्रत्येक जैनतत्त्व विज्ञानाच्या कसोटीवर उतरते . विज्ञान हे धर्माच्या अभावी आंधळे आणि धर्म हा विज्ञानाच्या अभावी लंगडा आहे . दर्शन व धर्म या दोघांचा उद्देश एकच आहे - सत्याचा शोध घेणे.
डेमोकेटसने (इ.स.पू. ४६०-३७०) परमाणूची कल्पना प्रथम मांडली. परंतु , त्याही पूर्वी जैनदर्शनाचा अणू-परमाणविषयीचा सिद्धान्त प्रसिद्ध आहे. परमाणू म्हणजे ज्याला आदी-अंत नाही , जो इंद्रियग्राह्यच नाही आणि तो अविभाज्य असतो, हे प्रतिपादन जैन धर्मात कित्येक युगांपासून अस्तित्वात आहे. भगवंतांनी त्यांचे वर्णन अत्यंत सूक्ष्म पद्धतीने तथा त्यांचे प्रकार सांगून केले आहे . हजारो वर्षांपूर्वी पुनर्जन्म सिद्धान्त जैन धर्माने मांडला . त्याचाच स्वीकार अनेक धर्मांनीही केला. परमाणूची गती, शक्ती यांचे सविस्तर वर्णन मिळते. तसेच स्कंध म्हणजे काय? याची व्याख्या पण जैन धर्मात मिळते. यावरून स्पष्ट आहे की , या शास्त्रज्ञांना अजून पुष्कळ काही शोधायचे आहे , संशोधन करायचे आहे .
संपूर्ण विश्व हे सहा द्रव्यांनी बनले आहे. द्रव्य म्हणजे काय, याचे कथन जैनदर्शन करते. शरीर हे नश्वर असून आत्माच नित्य आहे, हे जैनदर्शनाचे मुख्य तत्त्व आहे.
कर्मसिद्धान्ताचे सूक्ष्म वर्णन फक्त जैनदर्शनात आहे. कर्मांचे आठ प्रकार , त्यांची कारणे , लक्षण या सर्वांचा ऊहापोह त्यात केलेला आहे . संपूर्ण लोकात कार्माण वर्गणा (कर्म बंध करणारे परमाणू) भरलेल्या आहेत आणि त्या फक्त जीवाने केलेल्या भावांमुळे त्याच्याकडे आकृष्ट होतात व
जैन धर्माची ओळख / ८१
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
कर्मबंधाची सुरुवात होते.
जगाचा आकार हा कमरेवर दोन्ही हात ठेवून उभा असलेला पुरुष असा आहे. मंत्रशास्त्र , शरीरशास्त्र यांचे पण वर्णन जैनदर्शनात आहे. ११व्या व १२व्या शतकात मंत्रशास्त्राचा जैनागमात उल्लेख सापडतो. मंत्रसाधनेचा हेतू आत्मकल्याणच आहे . पंचणमोकार हा एक महामंत्रच आहे. स्वप्ने का पडतात , त्यांचे फळ काय असते , हे पण खुलासेवार नमूद आहे . जैनागमानुसार स्वप्नांचे अंतरंग , कारण ज्ञानावरण, दर्शनावरण व अतंराय कर्माचा क्षयोपशम तसेच मोहनीयकर्माचा उदय असतो. अनादिकाळापासून आत्म्याचा कर्माशी संबंध आला आहे. तेव्हापासून त्याने शरीर धारण केले आहे. जीवांच्या विग्रहगतीपासून मृत्यूपर्यंतचे वर्णन केलेले आहे . शरीराची रचना ही नामकर्मामुळे होते. गर्भात आल्यापासून त्याचा अंत होईपर्यंतच्या सर्व अवस्थांचे वर्णन जैनाचार्यांनी केले आहे.
ईश्वर आपणास काहीच देत नाही तर आपल्या कर्माप्रमाणे ते मिळत असते . शरीररचनेचे वर्णन हे शरीरशास्त्राप्रमाणेच योग्य वाटते . वनस्पतीस जीव असतो, हे जैन धर्माचे अती प्राचीन कथन आहे . विज्ञानाने ते फक्त आता जाणले आहे. वनस्पती एकेंद्रियच जीव आहे. त्याचप्रमाणे जल , अग्नी , वायू, पृथ्वी हे पण एकेंद्रियच जीव आहेत . तेव्हा त्यांचा वापर योग्य करावा . वनस्पतीकायचे दोन प्रकार आहेत - सूक्ष्म व बादर. ___जैन ज्योतिष हे अनेक ग्रंथांनी भरलेले आहे . त्यापैकी मंडलप्रवेश , लोकविजय मंत्र , ज्योतिषकरंडक, सूर्यप्रज्ञप्ती , चंद्रप्रज्ञप्ती इत्यादी ग्रंथ आहेत . जैन ज्योतिष हे लौकिक कारणासाठी नसून , आध्यात्मिक जगताचे लोक अलोकाशाचे वर्णन आहे . जैन भूगोलात तिन्ही लोकाचे , तेथील वातावरण, पर्वत , नद्या , क्षेत्र , आयू, उंची , आहार या सर्वांचे वर्णन आढळते . त्यांच्या आकृती व नकाशा मिळतो .
जैनशास्त्रात आयुर्वेदाचे प्रगाढ ज्ञान भरलेले आहे . जैन आयुर्वेदात मद्य , मांस व मधूचे सेवन कुठेच सांगितले नाही. अनेक रोगांवर रामबाण उपाय म्हणून आयुर्वेदाकडे आज बघितले जाते.
जैन गणितशास्त्रात लौकिक गणितामध्ये संख्या , मापन , अष्टपरिकर्माचा समावेश होतो. धवलादी ग्रंथात अलौकिक व सूक्ष्म गणित आढळते . क्षेत्र , काळ , वस्तू , धान्य , मापनाचे मापन आढळते . सूर्यप्रज्ञप्ती , गोम्मटसार , जंबूद्वीपपण्णत्तीमध्ये गणितपद्धती काटेकोरपणे वापरली जाते.
जैन धर्माची ओळख / ८२
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
जैनांची राजनीती व शासनसंस्था, कायदाही प्रसिद्ध आहेत. जैनांचे तीर्थंकर हे क्षत्रिय असून, उत्तम शासन करायचे. गृहस्थावस्थेत उत्तम शासनसंस्थेचा आदर्श त्यांनी दाखविला. ते पराक्रमी, अजिंक्य, चक्रवर्ती, वीर होते. जैन ग्रंथांत राजा कसा असावा, न्यायव्यवस्था कशी असावी, याचेही वर्णन सापडते. नि:पक्षपणे न्यायदान करणे, , हे राजाचे प्रमुख कर्तव्य ठरते. जैन कायदाही प्राचीन आहे. भगवान वृषभनाथ हे जैन कायद्याचे मूळ संस्थापक होते. भद्रबाहुसंहिता हा ग्रंथ २३०० वर्षांहून प्राचीन आहे. तो भद्रबाहू श्रुतकेवलीच्या वेळचा आहे.
संपूर्ण वैज्ञानिक छोट्या-मोठ्या शोधाचा भरीव पाया केवळ जैन तत्त्वज्ञान आहे. स्याद्वादाची महती व अनेकान्ताची शैली, सर्वच प्रश्नांची उत्तरे देण्यास समर्थ आहेत. जैन धर्म पूर्णपणे आस्तिक अथवा नास्तिकही झाला नाही. तो स्वैराचारीही झाला नाही किंवा कर्मकांडीही बनला नाही. तो पूर्णपणे अरण्यवासी झाला नाही तर सगळ्या अतीत सिद्धान्तांचे रक्षण करीत त्याने व्यवहारवाद सांभाळला. तो वाद सापेक्षवादाने 'सगळे काही होता' आणि निरपेक्षवादाने 'काहीच नव्हता. '
भौतिक वा आध्यात्मिक पद्धतीने प्राप्त झालेल्या सर्व ज्ञान-विज्ञानाची आधारशिला जैन तत्त्वज्ञान आहे. येथे कोणत्याही शाश्वत मूल्यांचा विरोध नाही. व्यवस्थेचे सुंदर चित्र जैन तत्त्वज्ञानात दिसते. प्रत्येक वस्तू स्वतः सिद्ध आहे. वस्तूंचे अस्तित्व अबाधित आहे. वस्तू उत्पाद - व्यय - ध्रौव्यात्मक आहे. ध्रुवांश हे द्रव्यात्मक, नित्य आहे. तर उत्पाद - व्यय हे अशाश्वत व पर्यायात्मक, परिणमनशील आहे. प्रत्येक वस्तू ही निरंतर बदलत असते. तिचे रूप, रंग, अवस्था बदलतात, पण द्रव्यत्व कायम असते. इतर धर्मांबद्दल इथे द्वेष नाही. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश व काल हे पाच द्रव्य जड आहेत तर जीव हे द्रव्य चैतन्यमय आहे.
माझे 'अस्तित्व' कोठे व कसे आहे? त्यासंबंधीची जिज्ञासा जीवास सत्याचा शोध घेण्यास भाग पाडते. प्रत्येक जीवात ईश्वर होण्याची शक्ती असते. फक्त त्या शक्तीचा विकास ज्ञानाद्वारे करायचा आहे. आत्म्याच्या ४७ शक्तींची महिमा जैन तत्त्वज्ञानात गायली आहे. निश्चयनय व व्यवहारनयाच्या द्वारे आत्म्याची ओळख होते. गुणस्थानाच्या पायऱ्या श्रावक व मुनींचा विकासक्रम दाखवितात. स्थूलातून सूक्ष्माकडे, परिचिताकडून अपरिचिताकडे जाण्याचा मार्ग म्हणजे तत्त्वज्ञान.
जैन धर्माची ओळख / ८३
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
विविध तत्त्वज्ञान प्रणाली : ___जगातील सर्व एकान्तवादाची संख्या ३६३ मते आहेत . त्यापैकी १) सांख्याचा नित्यवाद , २) बौद्धांचा क्षणिकवाद, ३) नैयायिकांचा समवायवाद, ४) वैशेषिकांचा विशेषवाद , ५) वेदान्ताचा ब्रह्माद्वैतवाद , ६) ईश्वरवादीचा ईश्वर सृष्टिकर्तृत्ववाद , ७) चार्वाकांचा निरीश्वरवाद , ८) शून्यवादीचा शून्यवाद इ. असे वाद प्रसिद्ध आहेत . परंतु जैन धर्म हा अनेकान्ताने श्रृंगारित आहे. जीव हा जीवरूपाने आहे; परंतु अजीवरूपाने जीव नाही . हे अनेकान्ताचे सरळ सोपे उदाहरण देता येईल . हेच जैन धर्माचे वैशिष्ट्य आहे . अग्रेसर जैन महिला : जैनकला।
__ जैन महिलाही अग्रेसर आहेत. त्यात ब्राह्मी , सुंदरी, चंदनबाला , सीतादेवी, अंजनादेवी , अचला, अमोदिनी , कौशिकी , जीवनंदा प्रसिद्ध आहेत . जैनकला जगप्रसिद्ध आहेत. समवाययोगसूत्रात ७२ कलांचे वर्णन केलेले आहे. जैनाचार्यांनी १८ लिपी, कला वर्णिल्या आहेत . जैन मूर्तिकलाही फार प्रसिद्धीस आली . जैन मूर्ती या भव्य , सुंदर , मोहक , वीतरागी स्वरूपाच्या असतात . मूर्तिकलेत श्रवणबेळगोळची बाहुबली मूर्ती , अजंठा, वेरूळ लेण्यांतील महावीरांची मूर्ती जगप्रसिद्ध आहेत. सध्याच्या काळात जयपूरला या मूर्ती बनवितात .
जैन संगीत साधना अती प्राचीन आहे . तीर्थंकरांच्या गर्भकल्याणच्या वेळी स्वर्गातील इंद्र , देव संगीतयुक्त स्तुती म्हणून पूजा करीत असत . सा, रे, ग, म, प, ध , नि या सात स्वरांचा उल्लेख स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षाच्या टीकेत श्रीशुभचंद्राचार्यांनी केला आहे . संगीत रत्नाकर व संगीत समयसार यामध्ये देशी रागाचे वर्णन आहे..
___ जगातील सर्व जीव सुखी राहो , मैत्री , करुणा , दयाभाव जागृत राहो, हाच जैन धर्माचा संदेश आहे. जैन धर्म निवृत्तिमूलक असला तरी स्वकल्याणाबरोबर विश्वकल्याणही साधण्यास सांगतो. विश्वकल्याणाची मंगल भावना उरी बाळगूनच जैन धर्म जगात ज्ञानाचा प्रकाश पसरवितो. समवसरण :
जैन धर्मातील समवसरणाचे वर्णन अद्वितीय आहे . या समवसरणात १२ सभा असतात. त्यामध्ये सर्व भव्य जीव राग, द्वेष , वैर सोडून एकत्र बसतात . पशु, पक्षी, देव , मानव हे मांडीला मांडी लावून बसतात . सभोवतालच्या १०० योजनांचा परिसर सुख , आनंदाने बहरून येतो.
जैन धर्माची ओळख / ८४
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
समवसरणात अर्हत भगवान प्रत्येकाला समजेल या भाषेत आत्मकल्याणाचा मार्ग सांगतात.
जैन धर्माची तत्त्वे विश्वकल्याणकारी , उच्च व आदर्श असल्यामुळे त्याचा प्रसार सर्व जगात होणे आवश्यक आहे .
तुम्ही जगा व इतरांना जगू द्या , हे जैन तत्त्वज्ञानाचे , जैन धर्माचे बीज आहे. सारही आहे. अहिंसा तत्त्वाचे बोट धरून सर्व विश्वाचे कल्याण करणारा जैन धर्म अप्रतिम आहे .
-
जैन धर्माची ओळख / ८५
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
दातारांची नावे
रु.१०,०००/रु.१०,०००/
१) श्री. कृष्णा आबाराव गोसावी ........... २) सौ. लीना अनुराग गर्ग .... ३) सौ. सुनीता सतीश आगरकर ......... ४) सौ. स्मिता राहुल गोसावी . ५) सौ. शरयू माणिकराव वालचाळे .......... ६) श्रीमती सुषमा मो. आहेरकर ........... ७) श्री. शरद भागवतकर ........... ८) श्रीमती सुनीता सुभाषचंद्र बुबणे ९) सौ. अंजली अशोक बीडकर १०) एक शुभचिंतक ..........
रु. ३,०००/रु. ३,०००/रु. २,००१/रु. २,००१/रु. २,००१/रु. १,००१/रु. १,००१/रु. ५०१/
पुषण .....
जैन धर्माची ओळख / ८६
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________ डॉ. सौ. विजया कृष्णराव गोसावी एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांनी 'जैनोलॉजी' हा विषय घेऊन एम.ए. केले आहे. तसेच 'ध्यान' या विषयावर पीएच.डी. केली आहे. तत्त्वज्ञान जोपर्यंत अनुभवाच्या पातळीवर येत नाही, तोपर्यंत ते फक्त पांडित्य राहते. अनुभवाच्या जगात जाण्यास ध्यान हे एक मात्र साधन आहे. डॉ.सौ. गोसावी देशाच्या विविध भागात जाऊन जैन धर्माचा प्रचार करतात. प्रवचनाची त्यांची आपली शैली असून अत्यंत सोप्या व सरळ स्व काव्याने गुंफलेली आहे. म्हणून अंतरंगातून आलेले त्यांचे हे तत्त्वज्ञान हृदयाला स्पर्श करून जाते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी 'मुक्तीचे द्वार : ध्यान' हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले आहे. डॉ.सौ. गोसावी यांचा जन्म विदर्भातील मूर्तिजापूर गावी झाला. त्यांचे वडील दादासाहेब आगरकर हे व्यवसायाने वकील असूनही समाजभूषक म्हणून जैन समाजात प्रसिद्ध होते. आई राजुलमती आगरकर या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. जैन धर्माचे संस्कार त्यांनीच लेखिकेस प्रदान केले. पती डॉ. कृष्णराव गोसावी यांनीही जैन धर्मात पीएच.डी. प्राप्त केली आहे. या दोघांची कन्या लीना या आर्किटेक्ट आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्लीत त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. लेखिकेस अनेक सन्मान, पारितोषिके प्राप्त झाली आहेत. आजही त्या लहान मुलांकरिता विविध कार्यक्रम करून त्यांच्यावर जैन धर्माचे संस्कार करतात. અને