SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 12
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ महामंत्र णमोकार णमो अरिहंताणं । णमो सिद्धाणं । णमो आयरियाणं । णमो उवज्झायाणं । णमो लोए सव्वसाहूणं ।। एसो पंचणमोक्कारो सव्वपावप्पणासणो । मंगलाणं च सव्वेसिं पढमं हवइ मंगलम् ।। णमोकार मंत्र : जैन धर्माचे मर्म , अचाट शक्ती, माहात्म्य सर्व काही णमोकार मंत्रात आहे. णमोकार मंत्र सर्वात मुख्य व महान आहे . साऱ्या धर्माचे मूळ उगमस्थान या एका ३५ अक्षरांच्या मंगल मंत्रात आहे. णमोकार मंत्र सर्व मंत्रांचा राजा तसेच तत्त्वज्ञानाचा सार असलेला आहे. तो अति पवित्र आहे. हा मंत्र स्वयंसिद्ध आहे . अनंत जीवांनी या मंत्राचा आधार घेऊनच आपली जीवननौका संसार सागराच्या पलीकडे नेली आहे . मूळ भाषा अर्धमागधी आहे . या मंत्रातील पाच पदे सर्वोत्कृष्ट आदर्शाची प्रतीके आहेत . या मंत्राचा सरळ व साधा अर्थ असा आहे : - लोकांतील म्हणजे विश्वातील अरिहंतांना नमस्कार ! लोकांतील सर्व सिद्धांना नमस्कार! लोकांतील सर्व आचार्यांना नमस्कार ! लोकांतील सर्व उपाध्यायांना नमस्कार ! लोकांतील सर्व साधूंना नमस्कार ! पंचपरमेष्ठींना हा नमस्कार असला तरी तो निजस्वरूप परमात्म्याचे गुणगान आहे. णमो अरिहंताणं : चार घातिया कर्मदोष हेच आमचे अरि (शत्रू) आहेत . त्या राग, द्वेष , मोहाचा ज्यांनी नाश केला , तेच 'अरिहंत' होत . देवाधिदेव , इंद्र ज्यांची पूजा करतात , ते अरिहंत आहेत. जे हिताचाच मार्ग दाखवितात , ते अरिहंत होत. अरिहंत परमेष्ठीचे ४६ मूळ गुण आहेत. जन्माच्या , केवलज्ञानाच्या वेळी प्रत्येकी १० अतिशय चिन्ह, देवकृत समवसरणादिक १४ अतिशय पूर्ण रचना , अष्टप्रतिहार्य व अंतिम ज्ञानादी चतुष्ट्य असे ४६ मूळ गुण प्रगट जैन धर्माची ओळख / १ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy