SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 91
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ आहे. जैन व्याकरणही आदर्श आहे. 'प्राकृत लक्षण' हा व्याकरणातील प्रथम ग्रंथ आहे. समंतभद्रांनी तथा हेमचंद्रांनीही व्याकरणावर ग्रंथ लिहिला. हेमचंद्रांनी बाराव्या शतकात 'शब्दानुशासन' हा व्याकरण ग्रंथ लिहिला. जैन स्तोत्र साहित्य पण प्रसिद्ध आहे. पंचस्तोत्र , भक्तामरस्तोत्र, जिनवाणी संग्रह हे स्तोत्ररूपाने आहेत . जैन साहित्य हे निवृत्तिप्रधान आहे. साहित्याची छटा , सौंदर्य जाणून घेण्यास 'स्व'चे स्वरूप ज्ञान हवे. जैन साहित्यात हिताच्या , उपदेशाच्या, आत्मकल्याणाच्या गोष्टी सांगून , शाश्वत शांतीचाच शोध घेतलेला आहे . श्वेतांबर जैन आगमात भगवान महावीरांचा उपदेश गणधरांनी आगमाची रचना करून शब्दबद्ध केला, असे मानले जाते. हे सर्व ग्रंथ अर्धमागधीत असून , अत्यंत प्राचीन आहेत . त्यांची संख्या जवळजवळ ४६ आहे. काळाच्या प्रवाहात काही आगम लुप्त झालेत . तरी जे उपलब्ध आहेत , ते अत्यंत मार्गदर्शक आहेत . जैन लोकगीते प्रभावी आहेत . विविध जैन लोकगीतांतून समाजाचे रीतिरिवाज, चालीरूढी, परंपरा , तत्त्वे , उत्सव, तीर्थक्षेत्रे यांची माहिती मिळते . स्त्रीजीवनाचे प्रतिबिंबही लोकगीतांत आढळते. जैन धर्माची ओळख / ८० Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy