SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 70
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ तप तपाचे बहिरंग व अंतरंग तप असे दोन प्रकार आहेत . बहिरंग तपात - १) अनशन , २) ऊनोदरी, ३) वृत्तिपरिसंख्यान , ४) रस परित्याग, ५) विविक्त शयासन व ६) कायक्लेश असते. तर अंतरंग तपात - १) प्रायश्चित्त , २) विनय-विनयाचे चार प्रकार आहेत : ज्ञान , दर्शन , चारित्र्य व उपचार . ३) वैयावृत्त - गुरूंची , मुनींची सेवा , ४) स्वाध्याय : स्व चे अध्ययन , ५) व्युत्सर्ग आणि ६) ध्यान हे सहा प्रकार आहेत . स्वाध्यायाचेही पाच भेद आहेत : वाचन, पृच्छना, अनुप्रेक्षा, आम्नाय आणि धर्मोपदेश. या १२ प्रकारच्या तपाने जीव कर्माची निर्जरा करतो . कर्म कमी झाल्याने त्यास थोडी शांती प्राप्त होते . दोन प्रकारचे नय आहेत. १) निश्चय नय, २) व्यवहार नय. व्यवहार नयाचे असद्भूत व्यवहार व सद्भूत व्यवहार नय असे दोन प्रकार आहेत. नयाची व्याख्या : प्रमाणाने ग्रहण केलेल्या वस्तूच्या एका अंगाचे ग्रहण करणे म्हणजे नय होय . तत्त्वार्थसूत्रात सांगितले आहे : नैगमसंग्रहव्यवहारर्जुसूत्रशब्दसमाभिरूदैवम्भूता नयाः । वस्तूच्या अनेक धमपैिकी एकाच धर्माची मुख्यतः व्याख्या केली जाते पण , अन्य धर्मांचा (गुणांचा) विरोध केला जात नाही . तेव्हा ज्ञान मिळविण्याचे ते साधन नय असते . सात प्रकारचे नय आहेत - १) नैगमनय : जो नय संकल्पमात्राचे ग्रहण करतो तो नैगमनय आहे . जसे स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना जर कुणी विचारले, 'तुम्ही काय करता?' तेव्हा तो उत्तर देतो की, 'मी स्वयंपाक करीत आहे.' वास्तविक, तो स्वयंपाक करीत नसतो; पण त्यासाठी तयारी करत असतो. तेव्हा त्याचे जैन धर्माची ओळख / ५९ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy