________________ डॉ. सौ. विजया कृष्णराव गोसावी एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांनी 'जैनोलॉजी' हा विषय घेऊन एम.ए. केले आहे. तसेच 'ध्यान' या विषयावर पीएच.डी. केली आहे. तत्त्वज्ञान जोपर्यंत अनुभवाच्या पातळीवर येत नाही, तोपर्यंत ते फक्त पांडित्य राहते. अनुभवाच्या जगात जाण्यास ध्यान हे एक मात्र साधन आहे. डॉ.सौ. गोसावी देशाच्या विविध भागात जाऊन जैन धर्माचा प्रचार करतात. प्रवचनाची त्यांची आपली शैली असून अत्यंत सोप्या व सरळ स्व काव्याने गुंफलेली आहे. म्हणून अंतरंगातून आलेले त्यांचे हे तत्त्वज्ञान हृदयाला स्पर्श करून जाते. त्यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी 'मुक्तीचे द्वार : ध्यान' हे पुस्तक अधिक लोकप्रिय ठरले आहे. डॉ.सौ. गोसावी यांचा जन्म विदर्भातील मूर्तिजापूर गावी झाला. त्यांचे वडील दादासाहेब आगरकर हे व्यवसायाने वकील असूनही समाजभूषक म्हणून जैन समाजात प्रसिद्ध होते. आई राजुलमती आगरकर या अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या. जैन धर्माचे संस्कार त्यांनीच लेखिकेस प्रदान केले. पती डॉ. कृष्णराव गोसावी यांनीही जैन धर्मात पीएच.डी. प्राप्त केली आहे. या दोघांची कन्या लीना या आर्किटेक्ट आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिल्लीत त्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. लेखिकेस अनेक सन्मान, पारितोषिके प्राप्त झाली आहेत. आजही त्या लहान मुलांकरिता विविध कार्यक्रम करून त्यांच्यावर जैन धर्माचे संस्कार करतात. અને Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org