SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 22
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ सिद्ध लोक ऊर्ध्व लोक (स्थावर स्वर्ग लोक लोक मध्य लोक मर्त्य लोक अधो लोक नरक लोक स्थावर लोक त्रस नाली अधोलोकाचे वर्णन असे आहे की , तिथे फक्त नारकी जीव राहतात. भयंकर वेदना व दुःखाने ते व्याप्त आहेत . ऊर्ध्वलोकात १६ स्वर्ग आहेत व तेथे पुण्यात्म-जीव जातात . त्यावर भवावतारी लोकाचे ठिकाण आहे. या लोकाच्या वर सिद्धलोक आहे. तेथे फक्त मुक्त जीव राहतात . मध्यलोकात असंख्यात द्वीप व समुद्र एकानंतर एकाला वेष्टीत झालेले आहेत . जंबूद्वीप, घातकी व पुष्कर यांचा अर्धभाग मिळून अडीच द्वीप आहेत . यात मनुष्याचा निवास आहे. शेष द्वीपात व्यंतर , भूत-पिशाच्च , तिर्यंच राहतात . जंबूद्वीपात सुमेरू पर्वताच्या दक्षिणेला हिमवान , महाहिमवान व निषाद तसेच उत्तरेला नील , रुक्मी व शिखरी हे सहा कुलपर्वत आहेत. ते या जंबूद्वीपाला भरत, हेमवत , हरी , विदेह , रम्यक , हैरण्यवत व ऐरावत इत्यादी सात क्षेत्रांत विभक्त करतात. प्रत्येक पर्वतावर एकेक महासरोवर आहे. एकंदरीत १४ नद्या आहेत . भरत व ऐरावत क्षेत्रातील दोन-दोन नद्यांमुळे व पर्वतामुळे या क्षेत्राचे सहा खंडांत विभाजन होते . यातील मध्यवर्ती खंडात आर्यलोक व शेष खंडात जैन धर्माची ओळख / ११ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy