Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 89
________________ २) उपशम सम्यक्त्व : वरील सात प्रकृतींचा उपशम झाल्यानंतर होणारे सम्यक्त्व ते उपशम सम्यक्त्व होय. ३) क्षायोपशमिक सम्यक्त्व : वरील सात प्रकृतींपैकी (दर्शनमोहाच्या तीन व अनंतानुबंधीच्या चार प्रकृती) सहा प्रकृतींचा , सर्व घातींचा पुढे उदयात येणाऱ्याचा सवस्थारूप उपशम, वर्तमानकालीन उदय भावी क्षय ते क्षायोपशमिक सम्यक्त्व आहे. ४) सम्यक्मिथ्यात्व : सम्यक्मिथ्यात्वरूप मिश्र प्रकृतीचा उदय असताना धड सम्यक्त्व नाही व धड मिथ्यात्व नाही, असे मिश्र परिणाम होतात . ५) सासादन : अनंतानुबंधीचा उदय असताना सम्यक्त्वापासून च्युत होतो; पण मिथ्यात्वाचा उदय नसल्यामुळे तो मधल्या अवस्थेत म्हणजेच सासादन अवस्थेत असतो. ६) मिथ्यात्व : मिथ्यात्व व अनंतानुबंधी यांचा उदय असताना जे जीवाचे अतत्वश्रद्धानरूप परिणाम होतात , तेच मिथ्यात्व असते. अशाप्रकारे हे सम्यक्त्वमार्गणाचे भेद आहेत . १३) संज्ञित्वमार्गणा : ज्यांना मन असते ते संज्ञी होय . मनुष्य , देव , नारकी सर्व संज्ञीच असतात . पंचेंद्रिय तिर्यंचापैकी काही तिर्यंच संज्ञी तर काही असंज्ञी असतात . पशु-पक्षी ज्यांना मन नसते ते असंज्ञी असतात . एकेंद्रिय , द्वींद्रिय , त्रींद्रिय , चतुरिंद्रिय जीव सर्व असंज्ञी असतात .. १४) आहारमार्गणा : औदारिक-वैक्रियिक-आहारक शरीरांना योग्य अशा नोकर्म आहारमार्गणा पुद्गल परमाणूंना ग्रहण करणे, यास आहार म्हणतात . हा नोकर्म आहार जे जीव ग्रहण करतात, ते आहारक होत . जे ग्रहण करीत नाही , ते अनाहारक होत . संसार अवस्थेत कर्माचे ग्रहण एक ते १३ गुणस्थानापर्यंत सतत चालू असते. विग्रहगतीतदेखील आहार ग्रहण होतो. __ याप्रमाणे जीवाची राहण्याची १४ स्थाने आहेत. वास्तविक , हे जीवतत्त्व नाही . ते अचेतन अजीवतत्त्व आहे. यांच्याविषयी भूल करू नये. यांच्याविषयी इष्ट-अनिष्ट बुद्धी ठेवून भ्रमात राहू नये. हे सर्व जग इंद्रजाल आहे . नश्वर व अस्थिर आहे. आत्मस्वरूपात मग्न होणे , हेच जीवाचे खरे स्थान आहे. जैन धर्माची ओळख / ७८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98