Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 85
________________ शरीर नामकर्माच्या उदयाने शरीरामध्ये अशी चिन्ह-विशेष असतात की , ज्यांच्याद्वारे भावेंद्रिय जाणण्याचे कार्य करतात , त्यास द्रव्येद्रिय म्हणतात . स्पर्श इंद्रिय सर्व शरीरभर आहे. पण, बाकीची इंद्रिये डोळे, कान यांचे विशिष्ट स्थान आहे. द्रव्येद्रियद्वारे आपापल्या विषयांना जाणण्याची क्षयोपशमरूप लब्धी व उपयोग याला भावेंद्रिय म्हणतात . इंद्रिये पाच आहेत - १) स्पर्शनेंद्रिय, २) रसनेंद्रिय, ३) घ्राणेंद्रिय, ४) चक्षुरिंद्रिय, ५) कर्णेद्रिय. ३) कायमार्गणा : त्रस-स्थावर नामकर्माचा उदय असताना जे त्रस व स्थावरकाय धारण करतात ; त्यांना त्रसकाय व स्थावरकाय जीव म्हणतात. १) त्रसकाय : द्वींद्रिय , त्रिंद्रिय , चतुरिंद्रिय , पंचेंद्रिय आहेत . २) स्थावरकाय : पृथ्वी , पाणी , वारा , अग्नी, वनस्पती एकेंद्रिय जीव हे स्थावरकाय आहेत . स्थावरचे दोन भेद आहेत - १) बादर, २) सूक्ष्म . जे दुसऱ्याकडून अडविले जाते व जे दुसऱ्यास अडविते , अशा स्थूल शरीराला बादरकाय म्हणतात. कायमार्गणा त्रसकाय स्थावरकाय विकलेंद्रिय सकलेंद्रिय बादर सूक्ष्म (द्वींद्रिय ,त्रिंद्रिय ,चतुरिंद्रिय) (पंचेंद्रिय) जे शरीर दुसऱ्यास अडवीत नाही , जे दुसऱ्याकडून अडविले जात नाही; त्यास सूक्ष्मकाय म्हणतात . बादरकाय कुणाच्या तरी आधाराने राहतात ; तर सूक्ष्मकाय जीव निराधार असतात . वनस्पतिकायाचे दोन भेद आहेत - १) प्रत्येक, २) साधारण. ज्या शरीराचा एकच स्वामी असतो ते प्रत्येक वनस्पतिकाय व एकाच शरीराचे जेव्हा अनंतजीव स्वामी असतात ; तेव्हा ते साधारण वनस्पतिकाय होय. प्रत्येक वनस्पतीचे दोन भेद आहेत - १) सप्रतिष्ठित वनस्पती आणि २) अप्रतिष्ठित . ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पतिकाय जीव असतात ; त्यास प्रतिष्ठित म्हणतात व ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पतिकाय जीव राहत नाही ; ती अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती आहे व ती आपण भक्ष्य करू शकतो. जैन धर्माची ओळख / ७४ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98