Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 66
________________ ज्या वेळेस आम्ही शरीरास पररूप मानू तेव्हा सर्व चिंता , राग-द्वेष तत्काळ दूर होतील . आपल्या चैतन्य स्वरूपास ओळखल्याशिवाय शरीरासंबंधी आपलेपणा जात नाही . शरीरासंबंधी आपलेपणा संपल्याशिवाय राग-द्वेषाचा अभाव होत नाही. रागद्वेषाचा अभाव झाल्याशिवाय हा जीव कधी सुखी होऊ शकत नाही. या जीवाला एकच रोग जडला आहे - रागद्वेष . संसारी जीव हा केव्हापासून अशुद्ध आहे तर याचे उत्तर आहे, अनादिकाळापासून . ज्याप्रमाणे खाणीतून काढलेले सोने हे किट-कालिमेसहित असते ; त्याचप्रमाणे जीव हा राग-द्वेषाने अशुद्ध आहे . परंतु , त्यात सोन्याप्रमाणेच शुद्ध होण्याची योग्यता आहे. त्याच्या शुद्धीकरणासाठी एक विशिष्ट उपाय आहे. त्यालाच आत्म-विज्ञान म्हणतात. सोने जसे प्रक्रिया करूनच शुद्ध केले जाते तसेच आत्म्याचे आहे. प्रत्येक वस्तू , ती चेतन असो वा अचेतन , सामान्य - विशेषात्मक असते . 'सामान्य' कधी बदलत नाही ते नित्य आहे. वस्तूची जी अवस्था असते ती 'विशेष' असते व ती सारखी बदलते . हेच आपण उदाहरणाने समजू. एक मुलगा बाल्यावस्थेतून किशोरावस्थेत जातो. नंतर कालक्रमानुसार किशोरचा युवा , युवाचा प्रौढ , प्रौढाचा वृद्ध होतो. परंतु , त्याचे मनुष्यत्व कायम राहते . हीच स्थिती पुद्गल वस्तूसंबंधी आहे. जसे झाडाचे खोड कापले तर ते लाकूडरूपाने परिणमित झाले . नंतर ते लाकूड जाळून कोळसा झाले . तदनंतर कोळसा हळूहळू राखरूप परिणमित झाला . परंतु , पुद्गल पदार्थ पुद्गलरूपाने अजूनही कायम आहे. एक मनुष्य मरून देव झाला . नंतर देव मरून कुत्रा झाला. तरीपण जीवत्व कायम आहे. आपल्या लक्षात सूक्ष्म परिवर्तन येत नाही. फक्त स्थूल परिवर्तनामुळे आपल्याला दिसते की, आपण आता वृद्ध झालो. परंतु , हे परिणमन हळूहळू आपल्या जन्मापासून सुरूच होते. पण, लक्षात ते वयाच्या ५०व्या वर्षी आले . स्थूल परिवर्तनच आम्ही पकडू शकतो. पुद्गलाचे पुद्गलरूपच परिणमन होते . चेतनचे चेतनरूपच परिवर्तन होते. आम्ही बर्हिरूपाने कधी मानव , कधी तिर्यंच , कधी देव होतो तर अंतरंगात कधी क्रोधी, लोभी होतो. या आत्म्यामध्ये कधी क्रोध येतो तर कधी मान तर कधी कषाय परिणामाच्या अभावी शुद्ध परिणाम. चैतन्य सामान्याला ओळखल्याशिवाय धर्माची सुरुवात संभवत नाही, हे निश्चित आहे. परंतु , विशेषामध्येच गुरफटून राहिल्यामुळे त्यातच आपलेपणाची बुद्धी होत असल्यामुळे आम्हा संसारी जैन धर्माची ओळख / ५५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98