Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 79
________________ जन्म तो माझा जन्म, अशा जीव-अजीव तत्त्वांची विपरीत मान्यताच मिथ्यात्व आहे. २) सासादन गुणस्थान : हे गुणस्थान वर चढताना होत नाही तर चौथ्या गुणस्थानातून खाली उतरताना होते . उपशम सम्यग्दृष्टी जीवास जेव्हा अनंतानुबंधी कषायांचा उदय होतो ; तेव्हा तो सम्यकत्वापासून भ्रष्ट होतो. परंतु , मिथ्यात्वाचा उदय होत नाही. तो सासादन गुणस्थानात राहतो. या गुणस्थानाचा काळ कमीतकमी एक समय व जास्तीत जास्त सहा आवली असतो. या गुणस्थानातून तो नियमाने मिथ्यात्व गुणस्थानात जातो. ३) मिश्र गुणस्थान : सम्यगमिथ्यात्व प्रकृतीचा उदय असताना जीवाचे धड सम्यक्त्वरूपही नाही व धड मिथ्यात्वरूपही नाही, असे मिश्र परिणाम होतात , त्यास मिश्र गुणस्थान म्हणतात . श्रीखंडाप्रमाणे आंबट व गोड रसाचे परिणाम इथे असतात . या गुणस्थानात जीव देशसंयम किंवा संयम धारण करू शकत नाही. या मिश्र गुणस्थानात आयुचा बंध होत नाही. ४) अविरत सम्यक्त्व : दर्शन मोहनीय कर्माच्या तीन प्रकृती (मिथ्यात्व - सम्यग्मिथ्यात्व - सम्यक्प्रकृती) व अनंतानुबंधीच्या चार प्रकृती याप्रमाणे सात प्रकृतींचा उपशम किंवा क्षयोपशम झाल्याने जीवाचे यथार्थ श्रद्धानरूपच परिणाम म्हणजे अविरत सम्यक्त्व गुणस्थान . मिथ्यादृष्टीच्या परिणामांची शुद्धी तीन प्रकारे होते. १) अधःकरण, २) अपूर्वकरण व ३) अनिवृत्तीकरण. अधःकरणमध्ये सर्व जीवांचे परिणाम समान असतात . अपूर्वकरणात परिणामाची शुद्धता अपूर्वते ने वाढतच जाते . अनिवृत्तीकरणात सर्वांच्या परिणामांची सारखी शुद्धी होते . याप्रमाणे करणलब्धी प्राप्त करून जीव सम्यग्दर्शनाच्या द्वारी जातो . धर्माचा व मोक्षमार्गाचा प्रारंभ याच गुणस्थानापासून होतो . ज्या वेळी जीवांना यथार्थ तत्त्वज्ञान होते , यथार्थ श्रद्धान होते, त्याच समयी पूर्वी असलेले ज्ञान व चरित्र हे सम्यकज्ञान व सम्यकचरित्र होते. सम्यग्दर्शन, सम्यकज्ञान व सम्यक्चरित्र यांची एकतारूप मोक्षमार्गाची सुरुवात असते . स्वरूपाचरणामुळे संवर, निर्जरा प्राप्त होऊन जीव मोक्षमार्गी बनतो. जे सम्यकदर्शन प्राप्त करीत नाहीत; ते या संसारात नुसते भटकत राहतात. त्यांना कुठेच सुख मिळत नाही. ५) देशविरत गुणस्थान : अप्रत्याख्यानावरण कर्माचा क्षयोपक्षम असताना जीव सकल संयमाचा म्हणून देशसंयम , श्रावकाचे अणुव्रत , गुणव्रत धारण जैन धर्माची ओळख / ६८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98