Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 76
________________ ध्यान. व कपोत लेश्यांतच निर्माण होते. ते तिर्यंच गतीत घेऊन जाते. हे प्रथम गुणस्थानापासून सहाव्या गुणस्थानापर्यंत असते . आर्तध्यानाचे चार प्रकार आहेत . १) अनिष्ट संयोजक, २) इष्ट विर्योजक, ३) पिडा चिंतन, ४) निदान आर्तध्यान. २) रौद्रध्यान : हिंसा , असत्य , चोरी आणि परिग्रहामुळे हे ध्यान होते. हे ध्यान पाचव्या गुणस्थानापर्यंत होते . लेश्या - कृष्ण , नील व कपोत असते. यात व्यक्ती वाईट करण्यात आनंद मानते व त्या परिणामामुळे नंतर नरकात जाते . रौद्र ध्यानाचे चार प्रकार आहेत . १) हिंसानंद, २) मृषानंद, ३) चौर्यानंद, ४) परिग्रह रौद्रध्यान .. ३) धर्मध्यान : याचे चार प्रकार आहेत . १) आज्ञाविचय, २) अपायविचय, ३) विपाकविचय आणि ४) संस्थानविचय. आज्ञाविचयात देवाची आज्ञा शिरसावंद्य मानून तत्त्वाचे ग्रहण होते . अपायविचयात सन्मार्गाचा विचार व विपाकविचयात कर्माचे फळ यांचा विचार होतो . विश्वाचा , १२ भावनांचा तथा द्रव्यांच्या स्वभावाबद्दल विचार करणे संस्थानविचय धर्मध्यान आहे. हे धर्मध्यान पाचव्या , सहाव्या व सातव्या गुणस्थानात होते. ४) शुक्लध्यान : याचे चार भेद आहेत . प्रथम दोन ध्यान श्रुतकेवलींना होते. शेवटचे दोन ध्यान संयोगकेवलींना आणि अयोगी केवलींना होते. छद्मस्थाला नाही . प्रथम शुक्लध्यान ८ ते ११ गुणस्थानी , दुसरे शुक्लध्यान बाराव्या गुणस्थानी व तिसरे शुक्लध्यान तेराव्या गुणस्थानी , चौथे शुक्लध्यान चौदाव्या गुणस्थानी होते. हे चार भेद पुढीलप्रमाणे आहेत. १) पृथकत्व वितर्कविचार, २) एकत्त्व वितर्कअविचार, ३) सूक्ष्मक्रियाप्रतिपाती, ४) व्युपरत्तक्रियानिवृत्ती. मन : हे दासताचे स्रोत व मुक्तीचे द्वारही आहे . मनाने संसाराचे दार उघडते तर मनानेच संसारातून बाहेर पडता येते. मनानेच नरक व स्वर्ग साध्य आहे. योग्य अवलंबनाने तुम्ही ध्यानाकडे वळता आणि दुरुपयोग मात्र संसाराची गुलामी करण्यास भाग पाडतो . (लेखिकेचे 'मुक्तीचे द्वार : ध्यान' हे पुस्तक अधिक विस्तृत माहितीसाठी जरूर वाचावे.) जैन धर्माची ओळख / ६५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98