Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 74
________________ + मनाच्या शांतीसाठी काय करावयास हवे , असे जेव्हा श्रीकृष्णाला विचारले तेव्हा ते म्हणाले की, 'मनास बघा', त्यास संयमित करा . जसे एक सारथी घोड्यांना करतो तसे . • हाच प्रश्न महावीरांना विचारला तर ते म्हणाले , 'आत्म्यास बघा!' + जे.कृष्णमूर्ती म्हणतात, 'जे होत आहे , तेच बघा. वर्तमानकाळात राहा.' द्रव्यसंग्रहात ध्यानासाठी चित्ताची स्थिरता सांगितली. • हठयोगात ओंकारस्वरूपाचे ध्यान व निर्विषय मन महत्त्वाचे आहे. तुकाराम महाराज म्हणतात , • 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी , कर कटावरी ठेवोनिया।' सगुण रूप होय. • दास कबीर म्हणतात , 'ध्यानात जागृतता हवी . चादरवर डाग लागू देऊ नका.' • ध्यान एक दिव्य साधना आहे, असे अरविंद घोष म्हणतात . त्यांनी Divine Conscious वर भर दिला आहे. भारतीय संस्कृतीतील दोन विचारधारा भारतीय संस्कृतीच्या दोन विचारधारा आहेत १) वैदिक आणि २) श्रमण. श्रमणात बौद्ध, जैन येतात . वेदकालीन ध्यानात यज्ञकर्म , दीक्षा , व्रत , ब्रह्मचर्य यांचा वापर करतात . उपनिषदात म्हटले आहे . परमात्मा हृदयात वास करतो; जसे तिळात तेल व अरण्यात अग्नी लपलेला असतो. संयमरूपी तपाने व सदाचाराने आपण त्यास प्राप्त करू शकतो. कठोपनिषदामध्ये पण ध्यानविधीचा उल्लेख आहे. महाभारतात इंद्रियांवर विजय प्राप्त करून मनास नियंत्रित कर व ध्यान कर, असा आदेश आहे. श्रीमद्भगवद्गीतेत ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग व ध्यानयोगाचा उल्लेख आहे. गीतेच्या सहाव्या अध्यायात समताभाव व ध्यानयोगाचा अधिक उल्लेख आहे. स्मृतिग्रंथात जपतपाचा उल्लेख आहे. पुराणात - सविषय तथा निर्विषय ध्यानाचा उल्लेख आहे . पुराणात सांगितले आहे की , ध्यानासारखे दुसरे कुठलेच तीर्थ नाही. कुठलाही यज्ञ नाही. म्हणून ध्यान जैन धर्माची ओळख / ६३ ATT BI Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98