Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 72
________________ ध्यान ध्यानत्व : जैन धर्मात ध्यानाचे अत्यंत महत्त्व आहे. म्हणून भगवंताच्या सर्व प्रतिमा त्याकडेच संकेत करतात . जीवाचे परमोत्कृष्ट ध्येय मोक्ष आहे. स्वरूपाभिमुख होण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. तत्त्वार्थसूत्रात व्याख्या अशी आहे : चित्तवृत्तींना अन्य क्रियेपासून परावृत्त करून एका विषयामध्ये स्थिर करणे म्हणजे ध्यान होय . द्रव्यसंग्रहात गाथा ५६ मध्ये सांगतात . 'अप्पा अप्पम्मि रओ इणमेव परं हवे झाणं ।' म्हणजे ज्यायोगे आत्मा आत्म्यामध्ये रममाण होऊन स्थिर होईल तेच परम-श्रेष्ठ ध्यान आहे . पतंजलीने देखील योगसूत्रात योग शब्दाची व्याख्या 'चित्तवृत्ती निरोध' अशीच केली आहे. जैनदर्शनात योग व ध्यान यांचा सविस्तर विचार केला आहे . तुकाराम महाराज म्हणतात : देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर । . जशी उसात साखर । तसा देहात ईश्वर । ज्याप्रमाणे उसात साखर आहे, त्याचप्रमाणे देहात परमेश्वर आहे. संसारात राहूनही परमार्थ साधता येतो . संसारी असावे । असोनी नसावे । ध्यान धरावे, भक्ती करावे । मानवा वेळोवेळी ।। काही लोक शारीरिक लाभ व्हावा म्हणून ध्यान करतात तर काही मानसिक शांतीसाठी . शारीरिक स्वास्थ्य , मानसिक शांती तथा ज्ञानात्मक स्वस्थता हे ध्यानाचे गौण , दुय्यम प्रतीचे फायदे आहेत . ध्यानाचा मुख्य उद्देश आहे शरीर व आत्म्याचे भिन्नत्व लक्षात आणणे व आत्म्याची पृथक् अनुभूती करणे. पंचदशीकारात म्हटले आहे . “अनात्मबुद्धि शैथिल्यं फलं ध्यानात् दिने दिने । पश्यन्नपि न यो ध्यायेत्, कोपरोन्यपशुवतं ।" जैन धर्माची ओळख / ६१ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98