Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 73
________________ अर्थात - ध्यान , आत्म्याची शरीरात असलेली बुद्धी कमी करते . हेच खरे फळ आहे, हे माहीत असूनही मानव ध्यान करणार नाही तर त्याच्यासारखा दुसरा पशू कोण असणार? ध्यानाचा महिमा सांगताना भगवती आराधनेत लिहिले आहे - ‘एवं कसायजुद्धमि हवदि खवयस्य आउयं झाणं ।' अर्थ - कषायशुद्धी करण्यास प्रवृत्त साधकासाठी ध्यान हे एक शस्त्र (आयुध) आहे. ज्याप्रमाणे रत्नांत हिरा , गंधात चंदन , मण्यांमध्ये वैडूर्य मणी श्रेष्ठ आहे. तसेच कर्मक्षय करण्यास प्रवृत्त साधकांसाठी ध्यान श्रेष्ठ आहे. 'एकाग्रचिंतायोगनिरोधोवाध्यानाम्' ध्यानाची दोन रूपे : प्रवृत्यात्मक निवृत्तात्मक सालम्बन निरालम्बन सबीज निर्बीज वास्तविक , ध्यानात सर्वत्र आपलेच बिंब दिसायला लागते व दुसरे . काहीच शिल्लक राहत नाही . ध्यान ही जीवन जगण्याची कला आहे. विभिन्न मते : • आ कुंदकुंदांनी ध्यानाला सम्यग्दर्शन व ज्ञानाने परिपूर्ण सांगितले आहे. • तत्त्वार्थसूत्रात चित्ताच्या निरोधाला ध्यान म्हटले आहे. + ध्यानशतक व आदिपुराणात स्थिर अध्यवसान , म्हणजे एका वस्तूच्या अवलंबन करणाऱ्या मनास ध्यान म्हटले आहे . + सांख्यसूत्रात रागाच्या विनाशास तथा विष्णुपुराणात फक्त परमात्म्याकडे एकाग्रतास (बाकीच्या विषयांपासून परावृत्त होऊन) ध्यान म्हटले आहे . • ध्यानशतकात आर्त , रौद्र, धर्म व शुक्ल ध्यानाचा उल्लेख आहे. + ध्यानाची आवश्यकता आहे : भूतकाळाचा भार हलका करण्यास मदत होते. ध्यानात मी माझ्याद्वारे. माझ्यात , माझ्यासाठीच ध्यान करतो. कपडे धुणाऱ्या धोब्याचे जसे 'कपड्यावरच' लक्ष असते , त्याचप्रमाणे ध्यानात फक्त 'स्व'वरच लक्ष असते. • बुद्ध म्हणतात की, मनाची शांती प्राप्त करण्यास श्वासावर लक्ष केंद्रित करायला हवे. जैन धर्माची ओळख / ६२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98