Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 64
________________ शरीर म्हणतात. वैक्रियक शरीर : जे शरीर अनेक रूप, धारण करू शकते , लहान-मोठे होते ते शरीर वैक्रियक असते . जसे देव व नारकींचे शरीर. आहारक शरीर : ऋद्धिधारी सहाव्या गुणस्थानावर्ती मुनीस जेव्हा तत्त्वांबद्दल शंका किंवा जिनालयाची वंदना करण्यासाठी त्याच्या डोक्यातून एक हात लांबीचा स्वच्छ पांढरा , सप्तधातुरहित जो पुतळा निघतो, त्यास आहारक शरीर म्हणतात . तैजस शरीर : जे औदारिक , वैक्रियक आणि आहारक शरीरास कांती , तेज देते ते तैजस शरीर होय. कार्माण शरीर : आठ कर्मांच्या समूहास कार्माण शरीर म्हणतात . एका वेळेस एका जीवाचे बरोबर कमीतकमी दोन किंवा जास्तीत जास्त चार शरीरे असतात. विग्रह गतीत तैजस व कार्माण शरीर असते तर मनुष्य आणि तिर्यंच गतीत तैजस , कार्माण व औदारिक शरीर असते. देव व नारकींचे वैक्रियक, तैजस , कार्माण शरीर आणि ऋद्धिधारी मुनींची चार शरीरे असतात . जैन धर्माची ओळख / ५३ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98