Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 45
________________ पण त्याचा 'हिरो' स्वयं जीव आहे. कर्मसिद्धान्त हा जीवाच्या परिणामाचा चित्रपट आहे. कर्म - ‘कर्तुःइप्सिततमं कर्म' स्वतंत्र बुद्धीने कर्ता जीवाच्या राग-द्वेष-मोहादी कारणाने कार्माण वर्गणा स्वयं परिणमित होतात . त्या परिणमनास कर्म म्हणतात. स्वतंत्र बुद्धीने कर्ता जी अवस्था प्राप्त करतो , परिणमन करतो त्यास कर्म म्हटले आहे. वर्गणा म्हणजे काय? व कार्माण वर्गणा म्हणजे काय? हा प्रश्न सहजच मनात येतो. वर्गणा म्हणजे पुद्गलस्कंध , पुद्गलांचा समूह . वर्ग म्हणजे एक परमाणू. वर्गणा म्हणजे वर्गाचे समूह व स्पर्धक म्हणजे अनंत वर्गणाचा समूह. मुख्यतः पाच प्रकारच्या वर्गणा आहेत . १) आहारवर्गणा : हे स्थूल स्कंध असतात . ते औदारिक , वैक्रियक आणि आहारक या तीन शरीररूपाने परिणमन करतात . त्या आहार वर्गणा होय . २) तैजसवर्गणा : ज्या पुद्गलस्कंधाने म्हणजेच वर्गणाने तैजस शरीर बनते , त्या तैजसवर्गणा होय. ३) भाषावर्गणा : जो पुद्गलस्कंध शब्दरूपाने परिणमन करतो , तो भाषावर्गणा होय. ४) मनोवर्गणा : ज्यामुळे द्रव्यमनाची रचना होते , त्यास मनोवर्गणा म्हणतात. ५) कार्माणवर्गणा : ज्या पुद्गलस्कंधाने कार्माण शरीर बनते , त्यास कार्माण शरीर म्हणतात . ते स्कंध अतिशय सूक्ष्म असतात. कर्माच्या प्रकृती आठ आहेत आणि त्यांचे भेद वेगवेगळे आहेत. १) ज्ञानावरण - ५ भेद , २) दर्शनावरण - ९ भेद , ३) मोहनीय - २८ भेद, ४) अंतराय - ५ भेद, ५) वेदनीय - २ भेद , ६) आयु - ४ भेद, ७) नामकर्म - ९३ भेद, ८) गोत्र - २ भेद. कर्मप्रकृतीचे दोन प्रकारे विभाजन करतात. घातिकर्म व अघातिकर्म . घातिया कर्माच्या ४७ प्रकृती आहेत ; तर अघातिकर्माच्या १०१ प्रकृती आहेत . आता बघू या ज्ञानावरण कर्म म्हणजे काय व त्याचे भेद किती आहेत? ज्ञानावर जेव्हा आवरण येते तेव्हा ते ज्ञानावरणीय कर्म असते . त्याचे पाच भेद आहेत. १) मतिज्ञानावरणी, २) श्रुतज्ञानावरणी, ३) अवधिज्ञानावरणी, ४) मनःपर्ययज्ञानावरणी, ५) केवलज्ञानावरणी. दर्शनावरणीय कर्माचे नऊ प्रकार आहेत. जैन धर्माची ओळख / ३४ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98