Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 59
________________ सम्यग्दर्शन मोक्षरूपी महालात प्रवेश करण्यासाठी रत्नत्रयाच्या पायऱ्या आहेत . सम्यग्दर्शनापासूनच धर्माची सुरुवात होते. या सम्यग्दर्शनाशिवाय ज्ञान व चारित्र्याला सम्यकपणा प्राप्त होत नाही. तीन लोक व त्रिकालात या सम्यग्दर्शनासारखा हितकारी, कल्याणकारी कोणीच नाही. म्हणून प्रत्येक जीवाचे हे आद्य कर्तव्य , आद्य धर्म सम्यग्दर्शनाची प्राप्ती हा आहे . सम्यग्दर्शनाचा महिमा ज्या जीवाने जाणला तो धन्य झाला. सम्यग्दृष्टी गृहस्थास बाह्यतः संयम नसूनही अंतरंगातून परिग्रहास तो परच मानतो . तो फक्त एका नटाप्रमाणे संसारात वावरतो. त्यात आपलेपणा नसतो , ममत्व नसते . म्हणूनच देवास तो पूजनीय आहे . संपूर्णपणे गृहकार्य करीत असताना पण तो शुद्ध स्वरूपापासून हटत नाही . जागृततेची एक ज्योत त्याच्या निद्रा अवस्थेत पण कायम असते . ती ज्ञानाची व अनुभवाची ज्योत असते . हेच तर त्याच्या महतीचे गमक आहे. वीतराग व सर्वज्ञ जिनेंद्र भगवान हेच देव . निग्रंथ व आत्मध्यानी साधू हे गुरू व दयामय आत्मकल्याणकारी धर्म हाच धर्म याप्रमाणे श्रद्धा असेल तर देव , गुरू व धर्म हे सम्यक्त्वाच्या उत्पत्तीचे निमित्त आहेत . सम्यग्दृष्टी जीव हा विवेकी असून , त्यात स्वरूपी भिन्नता करण्याची कुशलता असते . आठ मद, आठ शंकादिक दोष व तीन मूढता व सहा अनायतन हे सम्यक्त्वाचे दोष आहेत. त्यांचा त्याग करावा. कुगुरू, कुदेव , कुधर्म तसेच त्यांच्या उपासकांची प्रशंसा न करणे हा अनायतन त्याग आहे. तीन मूढता : देवमूढता , गुरुमूढता व लोकमूढता या आहेत . त्यांचा त्याग करावा . तसेच आठ गर्व (मद) आहेत . कुलमद , जातिमद , रूपमद, ज्ञानमद, धनमद, बलमद, तपोमद आणि पूजामद यांचा त्याग करावा. आठ मद सोडण्यास योग्य आहेत . ते सम्यक्त्वास दूषित करतात . सम्यक्त्वाचे आठ गुण : १) निःशंकित अंग : मनवचनात दृढ विश्वास ठेवणे. जैन धर्माची ओळख / ४८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98