Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 51
________________ आयुकर्माचा बंध हा आठ अपकर्षणात (अधिकतम) होतो. घातिकर्माची अप्रशस्त प्रकृती तर अघातिकर्माची प्रशस्त व अप्रशस्त प्रकृती असते . एकूण कर्म प्रकृती १४८ आहेत . घातिकर्म ४७ व अघातिकर्म १०१. १०१ + ४७ = १४८. परंतु बांधण्यास योग्य कर्म प्रकृती १२० आहेत. कर्माच्या दहा अवस्था : १) बंध , २) सत्ता , ३) उदय , ४) उदीरणा , ५) उत्कर्षण, ६) अपकर्षण, ७) संक्रमण, ८) उपशम , ९) निधत्ती , १०) निकाचित . जेव्हा जीव व कर्म परमाणूंचे मिलन होते , तेव्हा बंध होतो. काही काळासाठी ते कर्म संचित राहते . मग कर्माचा उदय होतो. कधी उदीरणा होते व त्यामुळे कर्माचा उदय लवकर होतो. जसे तिकीट काढण्यास तुम्ही रांगेत उभे आहात . रांग लांबच लांब आहे . इतक्यात तुमची मैत्रीण दिसते , जी खिडकीच्या अत्यंत जवळ आहे. तुम्ही तिला भेटता व आपले तिकीट काढण्यास सांगता . तेव्हाच कर्माची उदीरणा होते . उत्कर्षणामध्ये कर्माची स्थिती व अनुभाग पुढे जाते . जसेः उत्कर्षण अपकर्षण उदयावलीच्या बाहेरील निषेकांचे उदयावलीच्या निषेकांमध्ये येऊन मिसळणे व लवकर उदयास येणे म्हणजे कर्माची उदीरणा होय. 'पदेसाणं ठिदीणमोवट्टणा ओक्कड्डणा णामी'- धव.पु. १० तर अपकर्षणात आकृतीत दाखविल्याप्रमाणे कर्म परमाणू खाली जैन धर्माची ओळख / ४० Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98