Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 53
________________ तीन मुलांना मुलीच आहेत . परंतु , चौथ्या मुलास एक मुलगा झाला. हा नातूच फक्त वंश चालवेल . अगदी त्याचप्रमाणे मोहनीयकर्म करते . ज्ञानींना कर्मबंध होत नाही व झाला तर अल्प असतो. 'बंधे न ज्ञानी कर्मसे बल विराग अरू ज्ञान । यद्यपि सेवे विषयको परी असेवक जान ।' उपादान - निमित्त : जर उपादान तयार असेल तर निमित्त हे फक्त सहाय्यक असते . महावीर भगवंताची योग्यता होती म्हणूनच त्यांना सिंहाच्या पर्यायातही मार्गदर्शन व उपदेश मिळाला . तेव्हा उपादान हे महत्त्वाचे आहे. पाणी गाळून का प्यावे? पाणी गाळून घेतले नाही तर त्यात असंख्य त्रस जीव असतात व त्यांचे सेवन कळत नकळत आपल्याकडून होत असते. पांढऱ्या व जाड वस्त्रास दुहेरी करून पाणी गाळणे. गाळण्यात जमा झालेले सूक्ष्म जीव मोठ्या काळजीने कुठलीही हिंसा होणार नाही, यादृष्टीने वाहत्या पाण्यात सोडणे. अशाप्रकारे गाळून घेतलेल्या पाण्याची मर्यादा ४८ मिनिट असते . जर हरडे, लवंग, चुन्याचे प्राशुक केले तर सहा तास (दोन प्रहर) व गरम पाण्याची मर्यादा २४ तास आहे. अकृत्रिम चैत्यालय : अकृत्रिम जिन चैत्यालयांचे वर्णन : ऊर्ध्वलोकात - ८४ लाख , ९७ हजार , २३१ आहे. मध्यलोकात - ४५८ जिन चैत्यालये आहेत. अधोलोकात - ७ करोड, ७२ लाख अकृत्रिम चैत्यालय . तिन्ही लोकात - ८ करोड, ५६ लाख , ९७ हजार , ४८१ अकृत्रिम चैत्यालय आहेत. जैन धर्माची ओळख / ४२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98