Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 56
________________ १) मतिज्ञान : पाच इंद्रिय आणि मनामुळे होणारे ज्ञान ते मतिज्ञान आहे . मतिज्ञान हे परोक्ष ज्ञान असून , त्याचे ३३६ भेद आहेत . मतिज्ञान हे पाच इंद्रिय आणि मनामुळे होते . जसे हा घडा आहे. मती, स्मृती , संज्ञा , चिंता व अभिनिबोध हे पाच मतिज्ञानाचे भेद आहेत. मती म्हणजे मनन करणे. स्मृतीत पूर्वी बघितलेल्या वस्तूची ओळख पटते . जसे - हा देवदत्त आहे . संज्ञेत पूर्वीचे व वर्तमानचे दोन्ही ज्ञानाचे संकलन असते . त्याचे पण पाच प्रकार आहेत . चिंता म्हणचे तर्कज्ञान व अभिनिबोध हे अनुमान असते . अवग्रह : हे सामान्य दर्शन झाल्याबरोबर जे विशेष ज्ञान होते ते . जसे डोळे उघडल्याबरोबर 'हा प्रकाश आहे' असे कळते ते अवग्रह होय. अवग्रहाचे दोन प्रकार आहेत. १) व्यंजनाग्रह : हे चार इंद्रियांद्वारे होते ; जे अव्यक्त व अस्पष्ट असते. २) अर्थावग्रह : हे पाच इंद्रिय व मनाद्वारे होते. प्रथम व्यंजनाग्रह ज्ञान होते नंतर अर्थावग्रह होते ईहा : अवग्रह झाल्यानंतर जी विशेष ज्ञानाची उत्कंठा होते . जसे - ‘हा घडा असावा.' अवायमध्ये हे ज्ञान निश्चयरूपाने होते . जसे - 'हा घडाच आहे .' धारणेत ही गोष्ट आठवण करून राहते , स्मरण राहते. अवग्रहादी मतिज्ञान हे बहु, बहुविध , प्रवाहिक , अनिःसृत , अनुक्त व ध्रुव गोष्टींचे ज्ञान करते . अशाप्रकारे मतिज्ञानात अवग्रह , ईहा , अवाय, धारणा हे क्रमाने होते. २) श्रुतज्ञान : मतिज्ञानपूर्वक होणारे ज्ञान श्रुतज्ञान होय. घड्याला बघितल्यानंतर त्याच जातीचे अनेक घडे, भिन्न देशांत , भिन्न काळांत , अनेक रंगांत, अनेक धातूंच्या रूपात जाणणे म्हणजे श्रुतज्ञान आहे. मतिज्ञानात शब्द कळतो तर श्रुतज्ञानात त्याचा अर्थही लक्षात येतो. 'हा घडा आहे.' हे मतिज्ञान आहे ; तर 'घडा पाणी भरण्यास समर्थ आहे' हे श्रुतज्ञान होय . श्रुतज्ञानात वस्तूचे ज्ञान , संख्या , क्षेत्र , काळ , स्पर्शन , सत् , अंतर , अल्पबहुत्वाने होते. श्रुतज्ञानाचे दोन भेद - १) अंगबाह्य, २) अंगप्रविष्ट. जैन धर्माची ओळख / ४५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98