Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 49
________________ कर्मबंधाचे कारण 'मिथ्यादर्शनाविरतिप्रमादकषाययोगाबन्धहेतवः ।।' कर्मबंधाची कारणे पाच आहेत. १) मिथ्यात्व : विपरीत मान्यता. मिथ्यात्वाचे दोन प्रकार, गृहीत व अगृहीत मिथ्यात्व . ग्रहीत मिथ्यात्व हे जन्माच्या नंतर कुणाच्या उपदेशामुळे, वाचनामुळे प्राप्त होते. गृहीत मिथ्यात्वाची पाच अंगे आहेत - १ ) एकान्त, २) विपरीत, ३) संशय, ४) अज्ञान व ५) विनय अगृहीत मिथ्यात्व हे मागील संस्कारामुळे येते. २) अविरती : व्रत, नियमांचे पालन न करणे. अविरतीचे १२ प्रकार आहेत. षट्काय जीवाची हिंसा, पंचेंद्रिय विषय व मन असे १२ प्रकार आहेत. ३) प्रमाद : स्वरूपाच्या विषयी असावधानता प्रमाद म्हणजे आळस. याचे १५ प्रकार आहेत - चार विकथा (राष्ट्र, स्त्री, भोजन, राजा ), चार कषाय - क्रोध, मान, माया व लोभ, पाच इंद्रिय विषय - स्पर्शरसादी, एक निद्रा, व एक प्रणय असे एकूण १५ प्रमाद आहेत. ४) कषाय: जेव्हा आत्म्याची अशुद्ध परिणती होते ; तेव्हा राग-द्वेष- मोहादी विकार कषायरूपाने उत्पन्न होतात. कषायाचे २५ भेद आहेत. चार अनंतानुबंधी कषाय, चार अप्रत्याख्यानी कषाय, चार प्रत्याख्यानी कषाय, चार संज्वलन कषाय, नऊ नोकषाय- हास्य, रती, अरती, भय, जुगुप्सा, शोक, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद. ५ ) योग : मन-वचन-कायेमुळे आत्मप्रदेशाचे परिस्पंदन योग आहे. याचे १५ भेद - चार मन योग, चार वचनयोग व सात कायायोग. कर्मबंध चार प्रकारे होतो. त्याचे विभाजन स्वयं होते. १) प्रकृतिबंध : कुठल्या प्रकारचे कर्म बांधले जाईल; जसे की दर्शनावरण वगैरे निश्चित होते. जैन धर्माची ओळख / ३८ Jain Education International For Private & Personal Use Only - ज्ञानावरण www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98