Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 47
________________ नामकर्म, एक शुभ नामकर्म, एक अशुभ नामकर्म, एक सुभग नामकर्म, एक दुर्भग नामकर्म, एक सुस्वर नामकर्म, एक दुस्वर नामकर्म, नामकर्म, एक अनादेय नामकर्म, यशकीर्ती नामकर्म, नामकर्म, एक तीर्थंकर नामकर्म. एक आदे एक अयशकीर्ती नाम कर्मास चित्रकाराची उपमा दिली आहे. अशाप्रकारे नामकर्माचे ९३ भेद आहेत. कर्माचे हे विभाजन स्वयंच्या द्वारेच होते. त्याचे कारण आहे, योग आणि कषाय. योग म्हणजे मन, वचन, कायेने आत्मप्रदेशांचे कंपन होणे. या कंपनामुळेच जीवात कर्म पुद्गल परमाणूंना आकर्षित करण्याची शक्ती निर्माण होते. त्यास भावयोग म्हणतात. जीवाचे रागद्वेषाचे परिणाम किंवा भावच कषाय आहेत . कर्म आणि जीवाचा संबंध संश्लेष संबंध आहे. जर भिंत कोरडी आहे, तर त्यावर कितीही रेती (सुकी) टाकली तरी ती चिटकणार नाही. त्याचप्रमाणे जीवाचे भाव जर ओले असतील (राग-द्वेषांनी) तरच कर्म पुद्गल परमाणूंचा संबंध स्थापित होईल. कारण, कर्म परमाणू सर्वत्र विश्वात खचाखच भरलेले आहेत. पण, ते जीवाला शिवतही नाहीत. जर जीवाने राग-द्वेष विकार केलेत तरच ते आकर्षित होतात; अन्यथा नाही. पहिल्या ते दहाव्या गुणस्थानापर्यंत कषाय व योग दोन्ही असतात. पण ११, बाराव्या गुणस्थानात फक्त योगच असतो. कारण दहाव्या गुणस्थानीच लोभ कषाय (अंतिम) दूर होतो. ज्ञानावरणकर्म हे ज्ञानावर आवरण टाकते. म्हणजेच ज्ञान होऊ देत नाही. दर्शनावरणकर्म पदार्थाचे दर्शन होऊ देत नाही; ज्याप्रमाणे द्वारपाल राजाची भेट घेण्यास बाधा निर्माण करतो. जे कर्म जीवास सुख-दुःख देते, ते वेदनीय कर्म होय, जे कर्म मोहित करते ते मोहनीय कर्म भव प्राप्त करून देणारे कर्म आयुकर्म आहे. जे शरीराशी संबंधित ते नामकर्म. गोत्रकर्माने उच्च व नीच गोत्राचा बंध होतो; तर अंतरायकर्म दान, भोग, उपभोग यामध्ये विघ्न आणते. गोत्रकर्मास कुंभाराची उपमा दिली आहे. Jain Education International जैन धर्माची ओळख / ३६ For Private & Personal Use Only . www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98