Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 15
________________ जैन ध्वज जैन शासनात जैन ध्वजाचे फार महत्त्व आहे. प्रतिष्ठा पाठमध्ये मंदिराच्या शिखरकळसावर एक हात उंच असलेला ध्वज आरोग्य प्रदान करतो . दोन हात उंच-सुपुत्रादी संपत्ती , तीन हात उंच धान्य संपत्ती , चार हात उंच राजाला वृद्धी , राज्यात यश, कीर्ती व प्रताप आणतो. ध्वजारोहण करणारा विशिष्ट मंत्र म्हणून आपण ध्वजाचे आरोहण करतो. तो मंत्र असा आहे : - श्रीमज्जिनस्य जगदीश्वरता ध्वजस्य । मीनध्वजादिरिपुजालयो ध्वजस्य । तन्यासदर्शन जनागमनं ध्वजस्य । चारोपणं सुविधिवविदघे ध्वजस्य ।। जो ध्वज वृषभादिक २४ तीर्थंकरांची जगदीश्वरता व कामावर विजय . दर्शवितो , तसेच जिनबिंबाच्या दर्शनार्थांना आवाहन इत्यादींचे प्रतीक आहे , अशा ध्वजाचे मी आरोहण करतो . असा अर्थ वरील मंत्राचा आहे. जैन शासनात ध्वजाची प्रथा पूर्वीपासूनच आहे. जैन शासनातील सहधर्मी आम्ही बंधूसमान आहोत , अशी भावना ध्वजारोहणामध्ये मुख्य असते . सर्व लोकांचे कल्याण होवो, सर्व दोषांचे, विकारांचे हरण होवो तसेच जैन धर्म हा विश्वात चिरकाल शाश्वत रूपाने राहो , हाच संदेश हा ध्वज देत असतो. स्वस्तिक चिन्ह : _स्वस्तिक हे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. ऋग्वेदात त्याचे वर्णन आहे. स्वस्तिक शब्द ‘सु-अस्' या धातूपासून बनला आहे. 'सु' म्हणजे सुंदर , मंगल . 'अस्' म्हणजे अस्तित्व . तीन लोकांत तीन काळांत व प्रत्येक वस्तूत जे विद्यमान आहे तेच सुंदर , मंगल स्वरूपाचे आहे. जैन शासन हे अर्थातच सर्वांचे कल्याण करणारे आहे. स्वस्तिकाचा अर्थ असा 'स्वस्ति करोतीति स्वस्तिकः' जे स्वस्ति, कल्याण करते तेच स्वस्तिक. चार गतींचे - मनुष्य , देव, तिर्यंच व नरक तसेच तीन बिंदू सम्यग्दर्शन , सम्यग्ज्ञान व सम्यग्चारित्र यांचे प्रतीक स्वस्तिक आहे . अर्ध चंद्र जैन धर्माची ओळख / ४ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98