Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 35
________________ ७) मोक्षतत्त्व : ज्ञानानंदस्वभावी आत्म्याच्या लक्षामुळे आत्म्याची पूर्ण शुद्धता, वीतरागता हे भावमोक्ष आहे व त्याच्या निमित्ताने द्रव्यकर्माचा पूर्णतः नाश होणे द्रव्यमोक्ष आहे. आता पुन्हा जन्म-मरणाचे फेरे नाहीत. सुनो सुनो हे भव्य जीवो, जैन धर्म की वाणी । छह द्रव्य और सात तत्त्वकी सुंदर इक कहानी / अशाप्रकारे ही सात तत्त्वे आहेत. सात तत्त्वांत आस्त्रव व बंधतत्त्व हे दुःखाचे कारण आहे आणि दुःखरूप असल्याने सोडण्यास योग्य आहे. जीवतत्त्व हेच परमश्रेष्ठ तत्त्व आहे. त्याच्याच साहाय्याने मोक्ष प्राप्त होतो. संवर व निर्जरा ही दोन्ही तत्त्वे आम्हास सुखमार्गी घेऊन जातात म्हणून प्रगट करण्यास योग्य आहेत. मोक्षतत्त्व तर परमध्येय आहे. या सात तत्त्वांत जीव व अजीवतत्त्व सामान्य आहेत; तर बाकीची पाच तत्त्वे विशेष आहेत. या सात तत्त्वांचे ज्ञान होणे फार महत्त्वाचे आहे. कारण, त्यांच्याशिवाय स्व व पर मध्ये भेद करण्याचे साधन नाही. तेव्हा फक्त या सात तत्त्वांच्या ज्ञानाने आम्ही आमचा मोक्षमार्ग सोपा व सरळ करू शकतो. जीव अजीव Jain Education International आस्त्रव सात तत्त्वे बंध संवर जैन धर्माची ओळख / २४ For Private & Personal Use Only निर्जरा मोक्ष www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98