Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 33
________________ सात तत्त्वे वस्तूच्या स्वरूपास तत्त्व म्हणतात . जैन दर्शनात सात तत्त्वे प्रयोजनभूत मानली आहेत. कारण , त्यांचे ज्ञान प्राप्त केल्याने आत्म्याचे कल्याण व मानव जन्माचा उद्देश सफल होतो. म्हणून प्रत्येकास त्याचे ज्ञान हवेच; अन्यथा स्व व पर असा भेद करता येणार नाही. प्रयोजनभूत सात तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत. १) जीव, २) अजीव, ३) आस्त्रव, ४) बंध, ५) संवर, ६) निर्जरा, ७) मोक्ष. जीवतत्त्व म्हणजे काय? १) जीवतत्त्व : दर्शनज्ञान स्वभावी आत्म्यास जीवतत्त्व म्हणतात . जीवद्रव्य आणि जीवतत्त्व या दोन्हींत अंतर आहे. ज्ञानदर्शनस्वभावी , त्रिकाली ध्रुव आत्माच जीवतत्त्व आहे. मी स्वयं जीवतत्त्व आहे. २) अजीवतत्त्व : आत्म्याच्या व्यतिरिक्त समस्त पदार्थांना अजीवतत्त्व म्हणतात . पुद्गल , धर्म , अधर्म , आकाश , काल ही अजीवतत्त्वे आहेत . ३) आस्त्रवतत्त्व : आत्म्यात उत्पन्न होणारे राग-द्वेष मोहरूप शुभ-अशुभ विकारी भावांना भावास्त्रव म्हणतात आणि त्या भावांच्या निमित्ताने द्रव्यकर्माचे येणे यास द्रव्यास्त्रव म्हणतात . असे आस्त्रव तत्त्वाचे भावास्त्रव व द्रव्यास्त्रव हे दोन प्रकार आहेत . आस्त्रवतत्त्व हे पाप-पुण्य येण्याचे द्वार आहे. आपण आस्त्रव कसे येतात , हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. जसे - एकदा एका शेठजीस वैद्याने आंबे खाऊ नये म्हणून सक्त बजावले . जर शेठजीने आंबे खाल्ले तर मृत्यू येईल असेही सांगितले . शेठजीने कधीच आंबे न खाण्याचा निर्णय घेतला. एकदा जंगलातून प्रवास करताना ते एका झाडाखाली विसावा घेण्यास थांबले . योगायोग असा की, ते झाड आंब्याचे होते. झाडावरील पिवळ्या जैन धर्माची ओळख / २२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98