Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 31
________________ गुण : ___जो द्रव्याच्या संपूर्ण भागात व सर्व अवस्थांत आढळतो; तो त्या द्रव्याचा गुण असतो; जसे जीवद्रव्याचा मुख्य गुण जाणणे आहे. तर हा गुण जीवद्रव्याची सोबत नेहमी देतो . गुण व द्रव्याचा नित्यतादात्म्य संबंध आहे. गुणाचे दोन भेद आहेत . १) सामान्य गुण, २) विशेष गुण. विशेष गुण हे प्रत्येक द्रव्याचे विशिष्ट गुण असतात . ते फक्त त्याच द्रव्यात सापडतात . जसे पुद्गलद्रव्यात स्पर्श , रस , वर्ण , गंध आढळतात . पण , हे गुण धर्मद्रव्यात नाहीत. ___सामान्य गुण मात्र सर्व द्रव्यांत असतात . सामान्य गुण अनंत आहेत . परंतु मुख्य सहा आहेत . १) अस्तित्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्य कधीच नष्ट होत नाही , त्या गुणास अस्तित्व गुण म्हणतात . २) वस्तुत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्यात अर्थक्रियाकारित्व होते , त्यास वस्तुत्व गुण म्हणतात. ३) द्रव्यत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्यात नेहमी बदल होतात , त्यांच्या अवस्था बदलतात , त्यास द्रव्यत्व गुण म्हणतात. ४) प्रमेयत्व गुण : जेव्हा द्रव्य ज्ञानाचा विषय बनते , तेव्हा प्रमेयत्व गुण असतो. ५) अगुरूलघुत्व गुण : ज्या शक्तीने द्रव्याचा द्रव्यपणा कायम राहतो. अर्थात ; एक द्रव्य दुसऱ्यात द्रव्यरूप होत नाही. एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, द्रव्यात राहणारे अनंत गुण इकडेतिकडे पसरत नाही , वेगळेवेगळे होत नाही तेव्हा त्यास अगुरूलघुत्व गुण म्हणतात . ६) प्रदेशत्व गुण : ज्या शक्तीमुळे द्रव्याचा आकार हा अवश्य असतो, त्यास प्रदेशत्व गुण म्हणतात . या प्रकारे द्रव्याचे हे सहा सामान्य गुण आहेत . गुण हे भावरूप आहेत . तथा अनादि-अनंत , अकृत्रिम आहेत . पर्याय : गुणानंतर आता पर्यायाची परिभाषा बघू या गुणांच्या कार्याला पर्याय म्हणतात . यात परिणमन होत असते. पर्यायाचे दोन भेद आहेत . १) व्यंजनपर्याय : द्रव्याच्या प्रदेशत्व गुणाच्या कार्याला व्यंजनपर्याय म्हणतात. जैन धर्माची ओळख / २० Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98