Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 29
________________ ४) परमाणू. पंचास्तिकाच्या ७४व्या गाथेत लिहिले आहे. 'खंधा या खंधदेशा खंधपदेसा य होति परमाणू । इति ते चदुब्बियप्पा पुग्गलकाया मुणेयव्वा ।' पुद्गलाच्या विभिन्न अवस्था शास्त्रात नमूद आहेत - शब्द , बंध, स्थूलता संस्थान , भेद , अंधकार , छाया , आतप आणि उद्योत . ज्याप्रमाणे प्रकाश डोळ्यांनी दिसतो तसेच अंधकार पण चक्षुद्वारेच ग्रहण केला जातो. तम हा नीलवर्णाचा असतो म्हणून थंडपणा जाणवतो. पुद्गलाचे भेद आणखी सहा प्रकारे करण्यात येतात . १) उत्कर, २) चूर्ण, ३) खंड, ४) चूर्णिका , ५) प्रतर आणि ६) अणुचटन . ३) धर्मद्रव्य : जैन दर्शनात धर्मद्रव्याची वेगळी , विशिष्ट कल्पना आहे ; जी अन्य धर्म व दर्शनापासून भिन्न आहे. धर्मद्रव्य हे गमन करण्यास कारणीभूत आहे . हे उदासीन कारण आहे. कारण , जीव व पुद्गल यांना गती देण्यास ते कारणीभूत ठरते . पण, फक्त त्यांना गमन करायचे असेल तरच ते मदत करते , अन्यथा नाही. धर्मद्रव्य हे आकाशद्रव्याप्रमाणेच निष्क्रिय आहे. तत्त्वार्थसूत्रात म्हटले आहे - ‘निष्क्रियाणि च' ।। धर्मद्रव्य असंख्यात प्रदेशाचे आहे. पाण्यातील माशास पाणी हे गमन करण्यास निमित्त आहे. तसेच धर्मद्रव्य जीवद्रव्य व पुद्गलद्रव्यास गमन करण्यास निमित्तमात्र आहे . अलोकाशात धर्मद्रव्य नसल्याने सिद्ध भगवान स्थिर आहेत . ४) अधर्मद्रव्य : जीव व पुद्गलास थांबण्यास , स्थिर होण्यास जे निमित्त बनते , ते अधर्मद्रव्य आहे. हे पण उदासीन कारण आहे. जीव व पुदगल द्रव्यांना ते स्थिर ठेवण्यास निमित्तमात्र आहे ; ज्याप्रमाणे वृक्षाची छाया ही प्रवाशासाठी थांबण्यास सहायक आहे . अधर्मद्रव्य पण धर्मद्रव्याप्रमाणेच संख्येने एक व प्रदेशाने असंख्यात आहे. ५) आकाशद्रव्य : जे जीवादी पाच द्रव्यांना राहण्यास जागा देते , ते आकाशद्रव्य आहे . आकाशद्रव्य सर्वव्यापक व सर्वत्रच आहे . ते सर्वात विशाल द्रव्य आहे. आकाश हे अरूपी आहे. म्हणून जे निळे आकाश दिसते , ते पुद्गलाचा पर्याय आहे. जिथे जीव , पुद्गल , धर्म , अधर्म व काल द्रव्य राहतात ; त्यास लोकाकाश म्हणतात . आकाशद्रव्याचे दोन भेद आहेत - १) लोकाकाश, जैन धर्माची ओळख / १८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98