Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 26
________________ कल्पवृक्षांची क्षमता कमी होते. आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या सायंकाळी आकाशात सूर्य व चंद्राचे दर्शन एकाच वेळेस झाल्यानंतर लोक घाबरतात . तेव्हा प्रथम कुलकर प्रतिश्रुतीने त्याचा खुलासा करताना सांगितले की, हा काळाचा दोष आहे. आतापर्यंत सूर्य-चंद्राचा प्रकाश ज्योतिरंग वृक्षामुळे दिसत नव्हता. तिसऱ्या कालाच्या अंतिम समयास १४ कुलकर होतात . चतुर्थ काळात तीर्थंकर , नारायण , प्रतिनारायण , चक्रवर्ती असे ६३ शलाका पुरुष होतात . सहाव्या काळाच्या शेवटी मनुष्य एक हात उंचीचा व आयू २० वर्षांची असेल . त्या वेळेस ते मरून फक्त तिर्यंच व नरक गतीत जाणार . शीत , क्षार , विष , व्रज , अग्नी, धूळ व धूम्र या सात प्रकारे सात दिवस भयंकर वर्षा होईल . सर्व पृथ्वी प्रलयमय होईल . एकेक योजनपर्यंत पृथ्वी जलमय होईल . त्यामुळे जवळजवळ सर्व जीव मरतील. श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून उत्सर्पिणीचा काळ सुरू होईल . या वेळेस प्रारंभी सात प्रकारची वर्षा होईल . पाणी , दूध , धृत , अमृत , सुगंधित पवन वगैरे . त्या वेळेस पृथ्वी शांत होईल व जीवांची उत्पत्ती होण्यास सुरुवात होईल. तो दिवस भाद्रपद शुद्ध पंचमीचा असेल . या वेळेस आपण पयूषण पर्व साजरा करतो. पाप व पुण्य : शुभभाव पुण्य व अशुभभाव पाप . पुण्याचे दोन भेद भावपुण्य आणि द्रव्यपुण्य . तसेच पापाचेही दोन भेद आहेत - भावपाप व द्रव्यपाप. शुभकर्म : जीवांची रक्षा करणे, त्यांना जीवदान देणे , सत्य बोलणे, चोरी न करणे , ब्रह्मचर्य , अपरिग्रह तसेच पूजा, भक्ती, नमन , दान , दया , मैत्री, प्रमोद हे सर्व शुभभाव आहेत . अशुभभावात हिंसा , असत्य , चोरी , गुरूची निंदा , क्रोध , मान , माया , लोभ करणे यांचा समावेश होतो. पुण्याचे ९ प्रकार : १) अन्न , २) पान , ३) स्थान , ४) शय्या , ५) वस्त्र , ६) मन , ७) वचन , ८) काया , ९) नमस्कार . पापाचे १८ प्रकार : १) प्राणतिपाद , २) मृषावाद , ३) अदत्तावान , ४) मैथुन , ५) परिग्रह , ६) क्रोध , ७) मान , ८) माया , ९) लोभ , १०) राग, ११) द्वेष , १२) कलह , १३) अभ्याख्यान , १४) पैशुन्य , १५) परपरिवाद , १६) रतिअरती , १७) माया-मृषा , १८) मिथ्यादर्शन शल्य. जैन धर्माची ओळख / १५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98