Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 23
________________ म्लेंच्छ लोक राहतात. या दोन्ही क्षेत्रांत धर्म , कर्म , सुख , दुःख , आरोग्य , उंची , बुद्धी यांची हानी व वृद्धी होत असते. परंतु , इतर क्षेत्र पूर्ववत राहतात . त्यात बदल होत नाही. विदेह क्षेत्रात ३२ भाग आहेत. या क्षेत्रात कधीच धर्मविच्छेद होत नाही. आज तिथे २० तीर्थंकर आहेत . त्यापैकी सीमंधर स्वामी सर्वांना परिचित आहेत . लवणोदकाच्या तळाशी अनेक पाताळ आहेत . पृथ्वीतलापासून ७९० योजने वर आकाशात क्रमाने तारे , सूर्य , नक्षत्र , बुध, शुक्र, बृहस्पती, मंगळ व शनी इत्यादी ग्रह आहेत. मध्यलोकाचा आकार उभ्या केलेल्या अर्ध्या मृदंगाप्रमाणे आहे व ऊर्ध्वलोकाचा आकार उभ्या केलेल्या मृदंगाप्रमाणे आहे. अधोलोकाचा आकार वेत्रसनाप्रमाणे आहे . संपूर्ण लोकाची उंची १४ राजू , अधोलोकाची उंची ७ राजू व ऊर्ध्व लोकाची उंची एक लाख योजन इतकी आहे. घनोदधी, घनवात व तनुवात ही तीन वातवलये वृक्षाच्या सालीप्रमाणे 'लोका'भोवती पसरली आहेत. प्रथम घनोदधी , त्यानंतर घनवातवलय असून , शेवटी तनुवातवलय आहे. त्यानंतर निराधार आकाश आहे. ही तिन्ही वलये एकमेकांत आश्रित आहेत . अधोलोक : तो वेत्रासनाच्या आकाराप्रमाणे आहे . तो ७ राजू उंच आहे . तो खाली ७ राजू व वर १ राजू प्रमाण एवढा रुंद आहे. यात वरपासून खालपर्यंत क्रमाने रत्नप्रभा, शंकराप्रभा, वालुकाप्रभा, पंकप्रभा, धूमप्रभा, तमःप्रभा व महातमप्रभा नावांचे सात नरक आहेत . एकूण ४९ इतकी पटले आहेत . प्रत्येक पटलात विविध बिळे व गुहा आहेत . सात नरकांनंतर शेवटी १ राजू प्रमाण क्षेत्र मोकळे आहे. तेथे निगोद जीव राहतात . पटलाचे रत्नप्रभा नरकात रत्नासारखा प्रकाश , शर्कराप्रभात साखरेसारखा पांढरा प्रकाश आहे. तमःप्रभात अंधकाराने व्याप्त तर महातमप्रभात महान अंधकारयुक्त आहे. मध्यलोक : तनुवातवलयाच्या अंतर्भागापर्यंत तिर्यकलोक अर्थात मध्यलोकांची मर्यादा निश्चित झाली आहे . अडीच द्वीप व दोन सागर यांनी युक्त ४५००,००० योजन मनुष्यलोक आहे. मनुष्योत्तर पर्वताच्या बाहेर मनुष्याला जाता येत नाही . अडीच द्वीपांत पाच मेरू पर्वत आहेत. प्रत्येक मेरूला संबंधित सहा कुलधर पर्वत आहेत. त्यामुळे ते क्षेत्र सात क्षेत्रात विभाजित होते . विदेह क्षेत्राच्या दोन भागांत प्रत्येकी आठ वक्षार पर्वत , सहा विभंग जैन धर्माची ओळख / १२ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98