Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 17
________________ चार अनुयोग जैन आगमात चार अनुयोग आहेत : (१) प्रथमानुयोग, (२) चरणानुयोग, (३) करणानुयोग, (४) द्रव्यानुयोग जैन दर्शनाचा अभ्यास यामध्ये सामावलेला आहे. प्रत्येक अनुयोगाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याविषयी काही माहिती बघू या . १) प्रथमानुयोग : यात संसाराची विचित्रता, पाप-पुण्याचे फळ , महान पुरुषांची प्रवृत्ती इत्यादींचे विवेचन करून जीवांना धर्मरत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे फक्त लौकिक कथा जाणू शकतात, त्यात रस घेतात त्यांच्यासाठी प्रथमानुयोग आवश्यक आहे. कारण , तत्त्वांचा विषय त्यांनाही कळत नाही. प्रवचन ऐकताना फक्त कथाच तेवढ्या लक्षात राहतात. तसे नातेवाईकांत बरेच लोक असे आहेत. कथांच्या द्वारे मनोरंजन होते व शिकवण पण मिळते. सर्वसाधारण जीव लालसेने अशा कथांचे वाचन करतात व त्या वाचनातून ते पापाला वाईट व पुण्याला चांगले समजतात. ६३ शलाका पुरुष तथा २४ तीर्थंकरांचे जीवन चरित्र हे सामान्य लोकांना बोधकारक ठरते. २) चरणानुयोग : या अनुयोगात मूलाचाराची माहिती असते . मुनी , साधूंचे व्यवहार व आचरण कसे असावे , हे सांगितलेले असते . भोजनाचे ३२ अंतराय दोष व आहाराचे ४६ दोष यात सांगितले आहेत. तसेच प्रतिक्रमण भेद , मूल बीज, अग्र बीज , (काष्ठ द्विदल - चारोली , बदाम, पिस्ता - वगैरे) व पाणी गाळण्याचा विधी यात आहे. कारण , न गाळलेल्या पाण्यात असंख्य त्रस जीव असतात. एका पांढऱ्या रंगाच्या जाड्या वस्त्राने दुहेरी करून पाणी गाळणे. पाणी जर उकळून घेतले तर २४ तासांच्या आत , गाळून घेतलेले पाणी दोन घडी म्हणजे ४८ मिनिटे तर लवंग , हरडे, चुन्याने प्रासूक करून ६ तासांपर्यंत ते पाणी पिण्यास योग्य असते. रात्री भोजन केल्याने स्थूल व जैन धर्माची ओळख /६ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98