Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 18
________________ सूक्ष्म जीवांची हिंसा होते. रात्री सूक्ष्म जीव दिसत नाहीत : रात्री जेवण करायचे नसेल तर स्त्रियांना पण स्वाध्याय करण्यास, मंदिरामध्ये जाण्यास वेळ मिळतो. सूर्यास्तानंतर अनेक सूक्ष्म जीवांची उत्पत्ती वाढते व त्यांचे ग्रहण कळत-नकळत जेवणाबरोबर होते. २२ परिषहांचे वर्णन पण चरणानुयोगात येते . १) क्षुधा परीषह , २) तृष्णा परीषह , ३) शीत , ४) उष्ण , ५) डन्समशक , ६) नग्न , ७) अरति , ८) स्त्री, ९) चर्या , १०) आसन , ११) शयन , १२) आक्रोश , १३) बंधबंधन , १४) याचना , १५) अलाभ , १६) रोग , १७) तृष्णस्पर्श, १८) मल , १९) सत्कार-पुरस्कार , २०) प्रज्ञा , २१) अज्ञान , २२) अदर्शन परीषह. चरणानुयोगात उपदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पापाचरणापासून दूर होऊन व धर्माचरणात मग्न व्हावे म्हणून हिंसादी पापकृत्ये करू नये, हेच सांगण्यात येते. जे धर्माचरण करू इच्छितात ; त्यांच्यासाठी गृहस्थधर्म व मुनिधर्म सांगण्यात आला आहे. संपूर्ण वीतरागी होणे हेच चरणानुयोगाचे प्रयोजन आहे. चरणानुयोगाचे साहित्य : १) नियमसार - आचार्य कुंदकुंदांचा हा ग्रंथ नियमांचे वर्णन करतो. २) अष्टपाहुड - आठ पाहुड आहेत - दसंण पाहुड, चारित्र पाहुड, मोक्ष पाहुड, सुत्त पाहुड, बोध पाहुड, भाव पाहुड, शील पाहुड , लिंग पाहुड. या सर्व स्वतंत्र अशा ग्रंथरचना आहेत . ३) रत्नकरण्ड - श्रावकाचार , ४) मूलाचार, ५) भगवती आराधना, ६) सागरधर्मामृत, ७) श्रावकाचार असे अनेक ग्रंथ श्रावकाचे व मुनीचे आचरण स्पष्ट करतात . ३) करणानुयोग : करणानुयोगात जीव , कर्माचे तसेच त्रिलोकादी रचनेचे वर्णन करून जीवांना धर्मात मग्न करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. जे जीव धर्मात मग्न होऊ पाहतात ; त्यांना जीवांचे गुणस्थान, मार्गणा , कर्माचे कारण अवस्था, त्यांचे फळ तसेच स्वर्ग-नरकाची ठिकाणे जाणून पाप विमुक्त करण्याची इच्छा होते . जीवाला सूक्ष्म गोष्टींचे, गणिताचे ज्ञान करून त्याला जैनागमाकडे आकर्षित केले जाते. जो करणानुयोगाचा अभ्यास करतो त्यास द्रव्य , क्षेत्र , जैन धर्माची ओळख / ७ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98