Book Title: Jain Dharmachi Olakh
Author(s): Vijaya Gosavi
Publisher: Sumeru Prakashan Mumbai

View full book text
Previous | Next

Page 19
________________ काळ , भावाचे स्वरूप लवकर लक्षात येते . तत्त्वज्ञान निर्मळ झाल्याने तो विशेष धर्मात्मा मानला जातो . करणानुयोगात अरिहंताचे ४६ गुण , सिद्धाचे आठ गुण , आचार्याचे ३६ गुण , मुनीचे २८ गुण, उपाध्यायाचे २५ गुण, कर्माच्या १४८ प्रकृती (घातीयाच्या ४७ प्रकृती व अघातीच्या १०१ प्रकृती मिळून १४८ प्रकृती) या सर्वांचे वर्णन आहे. तसेच स्वर्ग-नरकाचे संपूर्ण सूक्ष्म वर्णन आढळते. करणानुयोगाच्या साहित्यात सूर्यप्रज्ञप्ती , चंद्रप्रज्ञप्ती , जंबूद्वीप प्रज्ञप्ती , त्रिलोयपण्णती, त्रिलोकसार , क्षेत्रमास , ज्योतिषकरण्डक आदी प्रमुख ग्रंथ आहेत . करणानुयोगातील हे विविध जैन साहित्य भारतीय साहित्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून , काही अज्ञात गोष्टींची माहिती घेणेसुद्धा शक्य आहे. ज्योतिषकरण्डकमध्ये २१ अधिकार असून , त्यात चंद्र , सूर्य , नक्षत्रांची माहिती आहे. जंबूद्वीप प्रज्ञप्तीमध्ये जंबूद्वीपाचे वर्णन आहे. तिलोयपण्णतीमध्ये त्रिलोकाचे वर्णन नऊ महाधिकारात आहे. सामान्य लोकाचे स्वरूप, नारकीलोक , भवनवासीलोक, मनुष्यलोक , तिर्यंचलोक , व्यंतरलोक, ज्योतिर्लोक, देवलोक व सिद्धलोकाचे वर्णन आहे. या ग्रंथाचे कर्ते आ. यतिवृषभाचार्य आहेत . त्यांनी अकराव्या शतकात रचना केली आहे. यात सहा अधिकार असून- सामान्यलोक , भवनलोक , व्यंतरलोक , ज्योतिर्लोक, वैमानिकलोक व नर-तिर्यंच लोकांचे वर्णन आहे. ४) द्रव्यानुयोग : प्रथमानुयोग, करणानुयोग, चरणानुयोग आणि द्रव्यानुयोग या चार अनुयोगांपैकी धार्मिक साहित्यात द्रव्यानुयोगाचे महत्त्व सर्वात अधिक आहे. तसे तर चारी अनुयोग महत्त्वाचे आहेत. यात प्रामुख्याने जीव , अजीव, कर्मसिद्धान्त , नय-निक्षेप इत्यादींची चर्चा असते . द्रव्यानुयोगाचे प्राकृत व संस्कृत ग्रंथ असे दोन विभाग साहित्याच्या दृष्टीने करता येतील . आचार्य कुंदकुंदांच्या समयसार, प्रवचनसार , नियमसार , अष्टपाहुड आणि पंचास्तिकाय इत्यादी ग्रंथांचा समावेश प्राकृत भाषेत होतो. आचार्य कुंदकुंद हे इ.स. पहिल्या शतकातले आहेत . द्रव्यसंग्रह , जीवसमास , कसायपाहुड, पंचसंग्रह, सर्वार्थसिद्धी तत्त्वार्थवार्तिक , तत्त्वार्थवृत्ती , तत्त्वार्थश्लोकवार्तिक हे देखील द्रव्यानुयोगाचेच ग्रंथ आहेत . द्रव्यानुयोगाचे ग्रंथ हे विश्व म्हणजे काय , द्रव्य म्हणजे काय , गुण म्हणजे काय, याचे वर्णन करतात . सम्यग्दर्शन म्हणजे काय? त्याचे उपाय, जैन धर्माची ओळख / ८ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98