________________
तेव्हा.' चुकांमुळेच थांबले आहे हे सर्व. जप-तपाची आवश्यकता नाही, चुकरहित होण्याची गरज आहे. मूळ चूक कोणती? 'मी कोण आहे ?' याचे अज्ञान. ती चूक कोण मिटवतात? ज्ञानी पुरुषच.
दोष कशा प्रकारे निघतो? दोष शिरला कसा हे जर समजले तर त्यास काढण्याचा मार्ग सापडतो. दोष श्रद्धेने, प्रतीतीने शिरतो आणि निघतो सुद्धा श्रद्धेने व प्रतीतीने. शंभर टक्के माझीच चूक आहे अशी जेव्हा प्रतीती होते, त्यानंतर त्या चुकांचे एक परसेन्ट सुद्धा रक्षण केले जात नाही तेव्हा मग त्या चुका जातात!
जे कोणी भगवंत झाले ते सर्व स्वतःच्या चुकांना संपवून भगवंत झाले! परम पूज्य दादाश्री सांगतात की, 'चूक कोणाला दिसते? तर चुक रहित चारित्र्य संपूर्ण दर्शनात असते आणि चूक असलेले वर्तन ज्याच्या वर्तनात असते, त्याला 'आम्ही' मुक्त झालेला म्हणतो. आम्हाला आमच्या अगदी सूक्ष्म तसेच सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम सगळ्याच चुका दिसतात.'
__ दोष होतो, त्याची शिक्षा नाही पण दोष दिसला याचे बक्षिस आहे. बक्षिसाने दोष जातो. म्हणून आत्मज्ञानानंतर स्वतः स्वतः बद्दल निष्पक्षपाती होतो, म्हणून स्वतःच्या सर्वच चुका पाहू शकतो!
शुद्ध उपयोगीला कोणतेही कर्म स्पर्शत नाही.
बुद्धी नेहमी समाधान शोधत असते, स्थिरता शोधत असते. बुद्धी स्थिर केव्हा होते? दुसऱ्यांचे दोष पाहिले तर बुद्धी स्थिर होते किंवा मग स्वतःचे दोष पाहिले तरीही बुद्धी स्थिर होते.
अज्ञानतेत दुसऱ्यांचेच दोष पाहते, स्वतःचे दोष दिसतच नाहीत. बुद्धी स्थिर होत नाही म्हणून डळमळत राहते. नंतर संपूर्ण अंत:करण हालवून टाकते, काहूर माजवते.
मग जेव्हा बुद्धी दुसऱ्यांचे दोष दाखवते तेव्हा स्वतःला खरे मानून