Book Title: The Science of Money Abr Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust
Catalog link: https://jainqq.org/explore/034338/1

JAIN EDUCATION INTERNATIONAL FOR PRIVATE AND PERSONAL USE ONLY
Page #1 -------------------------------------------------------------------------- ________________ G 100NCE SEK 023 20 पैशांचा व्यवहार 201051 ₹२००० दादा भगवान कथित An भारतीय रिज़र्व बैंक 5CT 199410 NO DOLLARS दुक 10 heard fra दो हजार रुपये NRIA रुपय 8PK 6CDIR RESERVE BANK OF INDIA 2000 SCT 199410 पैसे कमावणे हा बुद्धीचा खेळ नाही, किंवा मेहनतीचे फळही नाही. ते तर तुम्हाला, तुम्ही पूर्व जन्मी केलेल्या पुण्याच्या फळस्वरूप मिळतात. 36-77 Page #2 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कथित पैशांचा व्यवहार मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबहन अमीन अनुवाद : महात्मागण NOR । Page #3 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रकाशक : श्री अजित सी. पटेल दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079 ) 39830100 © All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights. प्रथम आवृत्ति : 5,000 अगस्त 2017 भाव मूल्य : ‘परम विनय' आणि 'मी काहीच जाणत नाही', हा भाव! द्रव्य मूल्य : 25 रुपये मुद्रक : अंबा ऑफसेट B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341 Page #4 -------------------------------------------------------------------------- ________________ त्रिमंत्र વર્તમાનતીર્થકર , શ્રીર્સમવારમાં नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवझायाणं नमो लोए सव्यसाहूर्ण एसो पंच नमुहारो, सब पावप्पणासणो मंगलाणं च सव्वेसि, पढम हवद मंगलम् ॥१॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥२॥ ॐ नमः शिवाय ॥३॥ जय सच्चिदानंद Page #5 -------------------------------------------------------------------------- ________________ (दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके) मराठी १. भोगतो त्याची चूक १३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार २. एडजस्ट एवरीव्हेर १४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ३. जे घडले तोच न्याय १५. मानव धर्म ४. संघर्ष टाळा १६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ५. मी कोण आहे ? १७. सेवा-परोपकार क्रोध १८. दान चिंता १९. त्रिमंत्र ८. प्रतिक्रमण २०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी ९. भावना सुधारे जन्मोजन्म २१. चमत्कार १०. कर्माचे विज्ञान २२. सत्य-असत्याचे रहस्य ११. पाप-पुण्य २३. वाणी, व्यवहारात १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार २४. पैशांचा व्यवहार हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत २२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य ४. आत्मबोध २३.दान ५. मैं कौन हूँ? २४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल २६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर २७. निजदोष दर्शन से... निर्दोष टकराव टालिए २८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय २९. क्लेश रहित जीवन चिंता ३०. गुरु-शिष्य १२. क्रोध ३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण ३२. सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ? ३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार ३४. पाप-पुण्य १६. अंतःकरण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ? ३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र ३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे. । Page #6 -------------------------------------------------------------------------- ________________ दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. रेल्वेच्या प्लेटफॉर्म नंबर तीनच्या बाकावर बसलेल्या श्री अंबालाल मूळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरुपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रकट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशाप्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातच्या चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष. त्यांना प्राप्ती झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्ती करवित असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट! ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रकट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर 'चौदालोक'चे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रकट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो." व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही, कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवित असत. Page #7 -------------------------------------------------------------------------- ________________ आत्मज्ञान प्राप्तीची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना ? दादाश्री परम पूज्य दादाश्री गावोगावी, देशविदेश परिभ्रमण करून मुमुक्षूंना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करवित होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन ( नीरूमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरूमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूंना सत्संग व आत्मज्ञानप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूंना आत्मज्ञानप्राप्ती करवून देत होते, हे कार्य नीरूमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञानप्राप्ती नंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरमणतेचा अनुभव घेत आहेत. - पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्राप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आजसुद्धा मोकळा आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलित करू शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करूनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो. 6 Page #8 -------------------------------------------------------------------------- ________________ निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल. प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदंडावर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींच्या गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करून वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतुने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रूटींसाठी आपली क्षमा प्रार्थितो. वाचकांना... ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'पैसानो व्यवहार' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदुभाऊ' या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वत:चे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेले काही गुजराती शब्द जसेच्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत. Page #9 -------------------------------------------------------------------------- ________________ संपादकीय 'बिनहक्काचे विषयभोग नरकात घेऊन जातात,' 'बिनहक्काची लक्ष्मी तिर्यंचगतित(पशूयोनित) घेऊन जाते' -दादाश्री संस्कारी घराण्यात बिनहक्काच्या विषयासंबंधीची जागृती बऱ्याच ठिकाणी दिसते परंतु बिनहक्काच्या लक्ष्मीसंबंधीची जागृती दिसून येणे खूप कठिण आहे. हक्काची आणि बिनहक्काची लक्ष्मी यांची सीमारेषाच सापडत नाही, तेही ह्या भयंकर कलियुगात ! परम ज्ञानी दादाश्रींनी त्यांच्या स्याद्वाद देशनेत आत्मधर्माच्या सर्वोत्तम टोकाचे सर्व स्पष्टीकरण केलेले आहे, इतकेच नव्हे, तर व्यवहार धर्माचे सुद्धा तितक्याच उच्च दर्जाचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे निश्चय आणि व्यवहार या दोन्ही समांतर पंखांनी मोक्षमार्गात झेप घेणे शक्य होते! आणि ह्या काळात व्यवहारात सर्वात विशेष प्राधान्य दिले गेले असेल तर ते केवळ पैशालाच! आणि हा पैशांचा व्यवहार जोपर्यंत आदर्शपणे होत नाही, तोपर्यंत व्यवहार शुद्धी शक्य नाही. आणि ज्याचा व्यवहार बिघडला त्याचा निश्चय बिघडल्याशिवाय राहणारच नाही! त्यासाठी ह्या काळाला अनुरुप पैशांच्या संपूर्ण दोषरहित आदर्श व्यवहाराचे सुंदर विश्लेषण दादाश्रींनी केले आहे. आणि असा दोषरहित आणि आदर्श लक्ष्मीचा (पैशांचा) व्यवहार दादाश्रींच्या जीवनात पाहायला मिळाला, तो या महा महा पुण्यवंतांना! धर्मात, व्यापारात, गृहस्थजीवनात लक्ष्मी संबंधी स्वतः प्रामाणिक राहून दादाश्रींनी जगाला एक आश्चर्यजनक आदर्श दाखविला आहे. दादाश्रींचे सूत्र होते 'व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.' धर्म आणि व्यापार या दोन्हींमध्ये आदर्शाची सांगड दर्शविली आहे ! दादाश्रींनी स्वत:च्या खाजगी जीवनात स्वखर्चासाठी कधीही कुणाचा एक पैसा सुद्धा स्वीकारला नव्हता. उलट स्वत:चे पैसे खर्च करून गावोगावी सत्संग देण्यासाठी जात असत, मग तो प्रवास ट्रेनने असो किंवा प्लेनने ! करोडो रुपये, सोन्याचे दागिने वगैरे भक्तजनांनी त्यांच्या पुढे ठेवले पण Page #10 -------------------------------------------------------------------------- ________________ दादाश्रींनी कधीही त्याचा स्वीकार केला नाही. दान करण्याची ज्यांची खूपच प्रबळ इच्छा असेल अशा व्यक्तींना लक्ष्मी सन्मार्गी, मंदिरात किंवा लोकांसाठी अन्नदानात वापरण्यास सुचवत असत. आणि ते सुद्धा त्या व्यक्तिच्या ऐपतीची खाजगी माहिती त्याच्याकडून तसेच त्याच्या कुटुंबियांकडून विस्तारपूर्वक मिळवून, त्यात सर्वांची राजीखुशीने सहमती आहे, हे कळल्यानंतरच त्यांना 'होकार' देत असत! संसार व्यवहारात पूर्णपणे आदर्शपूर्वक राहणारा, संपूर्ण वीतराग पुरुष आजवर या जगात पाहण्यात आला नव्हता, असा पुरुष या काळात जगाला पाहावयास मिळाला. त्यांची वीतराग वाणी जगाला सहजतेने प्राप्त झाली. जीवन व्यवहारात उदर निर्वाहासाठी लक्ष्मीची प्राप्ती अनिवार्य आहे, मग ती नोकरी करून असो किंवा धंदा-व्यवसाय करून असो किंवा अन्य कोणत्याही प्रकारे असो, पण या कलियुगातही व्यवसाय करीत असताना सुद्धा वीतरागांच्या मार्गाने कसे चालता येईल, याचा अचूक मार्ग दादाश्रीनी स्वतःच्या अनुभवाच्या योगे जगापुढे प्रस्तुत केला. लोकांनी कधी पाहिले तर सोडा, पण कधी ऐकलेही नसेल, अशा 'अतुलनीय' भागीदाराचा 'रोल' स्वत:च्या जीवन व्यवहाराद्वारे जगाला दर्शविला. आदर्श शब्द सुद्धा तिथे फार छोटा वाटतो. कारण 'आदर्श' हे तर सामान्य माणसाने आपल्या अनुभवाने ठरवलेली वस्तू आहे. जेव्हा दादाश्रींचे जीवन तर अपवादरुपी आश्चर्य आहे. व्यापार करत असताना लहान वयापासून, वयाच्या बावीसाव्या वर्षापासून ज्यांच्यासोबत भागीदारीचा धंदा सुरु केला तो त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्या मुलांसोबत सुद्धा आदर्शपणे निभावला. कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायात लाखो रुपये कमावले, पण त्यांचा असा नियम होता की स्वतः जर नॉन मॅट्रीकच्या डिग्रीने नोकरी केली तर किती पगार मिळेल? तर पाचशे किंवा सहाशे. म्हणून तितकेच रुपये घरात आणायचे, बाकीचे पैसे धंद्यातच राहू द्यायचे, जेणेकरून नुकसान प्रसंगी कामी यावे! आणि आयुष्यभर हा नियम त्यांनी अचूकपणे पाळला! भागीदाराच्या मुला-मुलींच्या लग्न प्रसंगी सुद्धा होणारा खर्च त्यांनी फिफ्टी-फिफ्टी (निम्मा) पार्टनरशीपमध्ये केला! अशी आदर्श भागीदारी जगात कुठेही पाहायला मिळेल का? Page #11 -------------------------------------------------------------------------- ________________ दादाश्रींनी व्यवसाय आदर्शपणे, अतुल्यपणे केला, पण तरीसुद्धा त्यांचे चित्त तर सदैव आत्मा प्राप्त करण्यातच होते. १९५८ मध्ये आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कित्येक वर्षे व्यवसाय चालू राहिला. पण स्वतः आत्म्यात राहून, मन-वचन-काया, जगाला आत्मा प्राप्त करवून देण्यासाठी गावोगावी, जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करण्यात घालविले. अशी कोणती अलौकिक दृष्टी प्राप्त झाली की जीवनात व्यापार-व्यवहार आणि अध्यात्म दोन्ही एकाचवेळी सिद्धीच्या शिखरावर राहून शक्य झाले? लोकसंज्ञेत लक्ष्मीलाच प्राधान्य आहे, पैशालाच अकरावा प्राण म्हटले आहे, असा प्राण समान पैशांचा व्यवहार जो आपल्या जीवनात घडत आहे, त्या संबंधात देण्या-घेण्याचे, फायदा-तोट्याचे, या जन्मात लक्ष्मी टिकण्याचे आणि पुढील जन्मी सोबत घेऊन जाण्याचे, जे मार्मिक सिद्धांत आहेत, तसेच लक्ष्मीच्या स्पर्शाचे जे नियम आहेत, ते सर्व, ज्ञान दृष्टीने पाहून आणि व्यवहारात अनुभवून दादाश्रींच्या वाणीद्वारे जी विस्तारीत माहिती प्राप्त झाली, तो हा 'पैशांचा व्यवहार' सूज्ञ वाचकांना आयुष्यभर सम्यक जीवन जगण्यासाठी सहाय्यक ठरेल, हीच अभ्यर्थना! - डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद 10 Page #12 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार (संक्षिप्त) (१) लक्ष्मीजीचे येणे-जाणे संपूर्ण जगाने लक्ष्मीलाच मुख्य मानली आहे ना! प्रत्येक कार्यात लक्ष्मीलाच प्राध्यान्य दिले जाते, म्हणून लक्ष्मीवरच जास्त प्रीति आहे. लक्ष्मीवर जास्त प्रीति आहे तोपर्यंत देवावर प्रीति जडत नाही. देवावर प्रीति जडली की लक्ष्मीवरची प्रीति उडून जाते. दोघांपैकी एकावर प्रीति असते, एक तर लक्ष्मीवर किंवा नारायणावर! तेव्हा तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे राहा! लक्ष्मी वैधव्य देईल. लग्न केले तर वैधव्यही येणारच ना? आणि नारायण तर लग्नही लावत नाहीत आणि वैधव्यही देत नाहीत. निरंतर आनंदात ठेवतात, मुक्ततेच्या भावात ठेवतात.. म्हणजे गोष्ट तर समजून घ्यायला हवी ना? नुसत्या थापा मारुन कुठपर्यंत चालेल? आणि उपाधी तर कुणालाही नकोच असते. हा मनुष्य देह उपाधीपासून मुक्ती मिळविण्यासाठी आहे, केवळ पैसे कमविण्यासाठी नाही. पैसे कसे कमावतात? मेहनतीने कमावले जातात की बुद्धीने? प्रश्नकर्ता : दोन्ही प्रकारे. दादाश्री : जर मेहनतीने पैसे मिळत असतील तर मेहनत मजुरी करणाऱ्याजवळ बरेच पैसे असायला हवे होते. कारण हे मजूरच जास्त मेहनत करतात ना! आणि पैसे जर बुद्धीने कमावता येत असते तर हे सगळे पंडित आहेतच ना! पण त्यांच्या चपला तर मागून अर्ध्या झिजलेल्या Page #13 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार असतात! पैसे कमावणे हा काही बुद्धीचा खेळ नाही, की मेहनतीचे फळ सुद्धा नाही. ही तर तुमची पूर्वजन्माची पुण्याई किती आहे त्याच्या फळस्वरुपाने तुम्हाला (पैशांची) प्राप्ती होते. आणि तोटा, हा पूर्वी केलेल्या पापाच्या फळस्वरुपाने असतो. लक्ष्मी पुण्य आणि पापाच्या आधीन असते. म्हणून जर लक्ष्मी हवी असेल तर आपण पुण्य-पापाकडे लक्ष द्यायला हवे. लक्ष्मीजी तर पुण्यवंतांच्या मागेमागेच फिरत असते, आणि मेहनत करणारे लक्ष्मीजीच्या मागेमागे फिरत असतात. त्यामुळे आपण हे समजून घ्यायला हवे की पुण्य पदरी असेल तर लक्ष्मी आपल्या मागे येईल. अन्यथा मेहनत करून तर भाकरी मिळेल, खायला प्यायला मिळेल आणि एखादी मुलगी असेल तर तिचे लग्न करता येईल. खरेतर पुण्याईशिवाय लक्ष्मी मिळत नाही. यात खरी हकीकत काय आहे, तू जर पुण्यवान आहेस तर उपद्व्याप कशाला करतोस? आणि जर पुण्यवान नाहीस तरीपण उपद्व्याप कशासाठी करतोस? पुण्यवंत तर कसे असतात? हे अमलदार दमून भागून घरी परत येतात, तेव्हा बाईसाहेब काय म्हणतात, 'दीड तास उशीर का झाला, कुठे गेले होते?' पाहा हे पुण्यवंत(!) पुण्यवंताची ही अशी स्थिती असते? पुण्यवंताला तर हवेची उलटी झुळूक देखील लागत नाही. लहानपणापासूनच ही क्वॉलिटी (गुणवत्ता) वेगळीच असते! त्यांना अपमानाचा योग येतच नाही. जिथे जातील तिथे 'यावे... यावे स्वागत आहे' अशाच सुयोगात वाढत असतात. आणि याला पाहिले तर इथून धक्का, तिथून बुक्का! याचा अर्थच काय? पुण्याई संपली की परत जसा होता तसाच! अर्थात् तू जर पुण्यवान नाहीस तर रात्रभर पट्टा बांधून फिरत राहिलास, (खूप मेहनत केलीस) तरी सकाळी काय पन्नास रुपये पदरी पडतील? म्हणून धडपड धडपड करू नकोस. आणि जे काही मिळाले त्यात खाऊन-पिऊन शांतपणे झोपून जा ना, म्हणजे झाले ! लक्ष्मी म्हणजे पुण्यवान लोकांचे काम. पुण्याचा हिशोब असा आहे की खूप श्रम करतो आणि कमीत कमी मिळवतो, हे फारच थोडे, Page #14 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार नावापुरते पुण्य म्हणता येईल. त्यानंतर, शारीरिक श्रम फार करावे लागत नाही पण बोलण्याची, म्हणजे वाणीची मेहनत करावी लागते, वकिलांसारखी, त्यास थोडी जास्त पुण्याई म्हणता येईल, श्रमजीवी पेक्षा. आणि त्याच्याही पुढे काय? तर वाणीची डोकेफोड करावी लागत नाही, शारिरीक श्रमाची झंझट नाही, केवळ मानसिक डोकेफोड करून कमाई करतो, तो जास्त पुण्यशाली म्हटला जाईल. आणि त्याच्याही पुढचे काय? नुसता संकल्प केला, त्याक्षणीच सर्वकाही हजर! संकल्प केला तेवढीच मेहनत. संकल्प केला की दोन बंगले आणि हे एक गोदाम, असा संकल्प केला की लगेच सर्व हजर! तो महा पुण्यवान. संकल्प केला तेवढीच मेहनत, बस. संकल्प करावा लागतो. संकल्प केल्याशिवाय होत नाही. थोडीतरी मेहनत पाहिजे ना! संसार, हा बिना मेहनतीचे फळ आहे. म्हणून उपभोग करा. पण उपभोग करता सुद्धा आला पाहिजे. भगवंतांनी तर सांगितले आहे की या जगात जितक्या आवश्यक वस्तू आहेत, त्या जर तुला कमी पडल्या तर दुःख होणे स्वाभाविक आहे. या क्षणी हवाच बंद झाली, आणि श्वास पण घेणे अवघड होऊन जीव गुदमरायला लागला, तर आपण म्हणू शकतो हे लोक दुःखी आहेत. श्वासोच्छवास अवघडून जीव गुदमरु लागला असे वातावरण निर्माण झाले तर तिथे आपण दु:ख म्हणू शकतो. दुपारची वेळ झाली आणि दोन-तीन वाजेपर्यंत काही खायलाच मिळाले नाही, तर आपण समजू शकतो याला काही दुःख आहे. ज्याच्याशिवाय देह जिवंत राहू शकणार नाही, अशा ज्या आवश्यक वस्तू, त्या नाही मिळाल्या तर त्यास दुःख म्हणता येईल. ते सर्व तर आहेच, ढिगभर आहे, पण त्याचा उपभोगही करीत नाहीत. आणि दुसऱ्याच फंदात पडलेले आहेत. त्या उपभोगताच येत नाही. अजिबात नाही. कारण एक मिलमालक जेवायला बसला, तर बत्तीस प्रकारचे पदार्थ ताटात असतात. पण तो तर मनाने गिरणीत अडकलेला असतो. मालकीण बाईंनी विचारले, 'सांगा तरी आज कशाची भजी बनविली आहे?' तर तो म्हणेल 'मला माहित नाही, तू सारखी विचारु नकोस.' तर असा आहे हा सारा प्रकार. हे जग तर असे आहे. इथे उपभोग घेणारे पण असतात आणि मेहनत करणारे पण असतात, सगळे सरमिसळ असते. मेहनत करणारा मानतो की Page #15 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार हे 'मी करत आहे.' त्याला अहंकार असतो. तर उपभोग करणाऱ्याला तसा अहंकार नसतो. पण तेव्हा त्याला भोक्तेपणाचा रस प्राप्त होतो. मेहनत करणाऱ्यांना अहंकाराचा गर्वरस मिळत असतो. ४ एक शेठ मला म्हणतात, 'या माझ्या मुलाला काही सांगा ना त्याला मेहनत करायची नाही आणि नुसती चंगळ करीत राहतो.' मी म्हटले ‘त्याला काहीही सांगण्यासारखे नाही. तो स्वतःच्या वाट्याचे पुण्य उपभोगत आहे. आपण त्यात ढवळाढवळ कशाला करायची ?' तर ते मला म्हणाले, 'त्यालाही समंजस नाही का बनवायचे' ? मी म्हटले, 'जगात जो उपभोगत आहे त्याला समंजसच म्हणावा. बाहेर फेकून देईल त्याला वेडा म्हणावा. मेहनत करीत राहतो तो तर मजूर म्हटला जातो. पण मेहनत करतो त्याला अहंकाराचा रस मिळतो ना! लांब कोट चढवून हिंडू लागला की लोक म्हणतात 'या शेठ, शेठ आले,' असे स्वागत झाले की धन्य ! आणि उपभोग घेणाऱ्याला तशी मोठेपणाची पर्वा नसते. आपण आपले भोगले तेवढे खरे. जगाचा नियम असा आहे की, हिंदुस्तानात जोवर बिन बरकतीचे असे लोक गोळा होत राहतील, तोपर्यंत लक्ष्मी वाढत राहील. आणि बरकत असलेल्याकडे पैसे जाऊ देणार नाही. थोडक्यात बिन बरकतीच्या माणसांना लक्ष्मी प्राप्त झाली आहे. म्हणजे योग्यता नाही अशा माणसांकडे लक्ष्मी गोळा झाली आहे, आणि डायनिंग टेबलावर बसून जेवण मिळते. परंतु खायचे-प्यायचे कसे ते मात्र त्यांना जमत नाही. या काळातील जीव हे भोळे असतात. कुणी गंडवले, तरी हरकत नाही. उच्च जाति, नीच जाति, कसलीच पर्वा नाही. असे भोळे आहेत त्यामुळे लक्ष्मी खूप मिळते. लक्ष्मी तर, फार जागृत असेल त्यालाच मिळत नाही. जो फार जागृत असेल तो कषाय ( क्रोध - मान - माया - लोभ) पण फार करीत राहतो. दिवसभर कषायच करीत राहतो. आणि हे ( भोळे) तर जागृत नाहीत आणि कषाय सुद्धा नाहीत, म्हणून मग काही भानगडच नाही ना! त्यांच्याकडे लक्ष्मी येते परंतु लक्ष्मीचा वापर कसा करावा हे त्यांना माहित नसते. बेभानपणे सगळी निघून जाते. आजच्या युगात हे जे धन आहे ना, ते सर्व खोटेच आहे. फारच Page #16 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार थोडे खरे धन आहे. दोन प्रकारची पुण्याई असते. एक पापानुबंधी पुण्य की जे अधोगतिकडे घेऊन जाते, असे पुण्य, आणि जे उर्ध्वगतित घेऊन जाईल ते पुण्यानुबंधी पुण्य. परंतु असे धन फारच थोडे उरले आहे. अलीकडे लोकांजवळ हे जे पैसे दिसतात, ते पापानुबंधी पुण्याचे पैसे आहेत. आणि ते तर निव्वळ कर्मबंधनच करवितात व भयंकर अधोगति ओढवून घेतात. पुण्यानुबंधी पुण्य तर कसे असते? निरंतर अंतरशांतीसह वैभव असते आणि तिथे धर्मही असतो. आजची लक्ष्मी पापानुबंधी पुण्याईची आहे, त्यामुळे ती क्लेश घडवून आणते, त्यापेक्षा ती कमी असलेली बरी. घरात क्लेश तर शिरणार नाही. आज तर जिथे जिथे लक्ष्मीला प्राधान्य आहे तिथे क्लेशचे वातावरण पाहायला मिळते. मीठ-भाकर बरी, पण असले पंचपक्वान्नांचे भोजन नको. या काळात जर खरी लक्ष्मी घरात आली तर एकच रुपया असू दे, ओहोहो.... किती सुख प्रदान करून जाईल. पुण्यानुबंधी पुण्य तर घरात सर्वांना सुखशांती देऊन जाईल! घरात सर्वांना केवळ धर्माचेच विचार येत राहतील. मुंबईत एका उच्च संस्कारी कुटुंबातील भगिनीला मी विचारले, 'घरात क्लेश तर होत नाही ना?' तर त्या भगिनीने उत्तर दिले, 'रोज सकाळी क्लेशाचाच नाष्टा असतो!' मी म्हटले, 'म्हणजे तुमचे नाष्ट्याचे पैसे वाचले तर! नाही का?' त्यांनी उत्तर दिले, 'नाही, तरी पण (पैसे) काढायचेच. ब्रेड वर लोणी लावत राहायचे.' म्हणजे क्लेश पण चालू आणि नाष्टा पण चालू. अरे, कुठल्या प्रकारचे मनुष्य आहात?! नेहमी, लक्ष्मी जर निर्मळ असेल तर सर्वकाही चांगले राहते, मन पण चांगले राहते. ही तर बिनहक्काची लक्ष्मी शिरल्यामुळे क्लेश होत आहेत. आम्ही तर लहानपणापासून ठरविले होते की शक्य तो जी आपल्या मेहनतीची नाही अशी बिनहक्काची लक्ष्मी घरी येऊच द्यायची नाही. तर आज सहासष्ट वर्षे झाली, पण घरात खोटी (बिनहक्काची) लक्ष्मी येऊच दिली नाही. म्हणून तर घरात कधीही क्लेश झालाच नाही. घरात ठरवूनच टाकले होते की इतक्या पैशातच घर चालवायचे. धंद्यात लाखो रुपये कमावतो पण हे 'पटेल' (दादाजी) जर नोकरी करायला गेले तर त्यांना Page #17 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार किती पगार मिळेल? फार तर सहाशे-सातशे रुपये मिळतील. धंधा, हा तर पुण्याईचा खेळ आहे. त्यामुळे नोकरीत मिळू शकतील तितकेच पैसे घरखर्चासाठी वापरायचे. बाकीचे धंद्यातच राहू द्यायचे. इन्कमटॅक्सवाल्याची मागणी आली, तर आपण सांगायचे, जी रक्कम शिल्लक ठेवली होती ती वापरा. कधी कुठला अॅटॅक (संकट) येईल हे सांगता येत नाही. आणि जर ते शिल्लक ठेवलेले पैसे खर्चुन टाकले असतील तर तिकडे इन्कमटॅक्सवाल्याचा अॅटॅक आला तर इकडे आपल्याकडे तो दुसरा (हार्ट) अॅटॅक येईल. सगळीकडे अॅटॅक घुसले आहेत ना? याला जीवन कसे म्हणता येईल? तुम्हाला काय वाटते? चूक घडत आहे असे नाही का वाटत? तर आपण ही चूक सुधारण्याची आवश्यकता आहे. लक्ष्मी सहजपणे जमा होत असेल तर होऊ द्या. किंतू तिचा आधार घेऊन बसायचे नाही. आधार धरुन हुश्श्... कराल, परंतु केव्हा तो आधार सरकून जाईल, हे सांगता येत नाही. म्हणून सावध राहून चला ज्यामुळे अशाता वेदनीय(दु:ख परिणाम) आले तेव्हा त्यात हादरुन जाण्याची वेळ येणार नाही. प्रश्नकर्ता : सुंगधासह लक्ष्मी, ही लक्ष्मी कशी असते? दादाश्री : ती लक्ष्मी आपल्यास कुठल्याही प्रकारे कष्ट पडू देत नाही. घरात फक्त शंभर रुपयेच असतील, तरी आपणास काळजी वाटत नाही. कुणी बातमी दिली की उद्यापासून साखरेवर कंट्रोल (रेशनिंग) येणार आहे, तरीपण मनात काळजी वाटत नाही. धडधड होत नाही. वर्तन कसे सुगंधित, वाणी कशी सुगंधित, आणि त्याला पैसे कमावण्याचा विचार सुद्धा येत नाही, असे तर त्याचे पुण्यानुबंधी पुण्य असते. पुण्यानुबंधी पुण्य असलेली लक्ष्मी असेल त्याला पैसे मिळवण्याचा विचार देखील येत नाही. ही तर सगळी पापानुबंधी पुण्याईची लक्ष्मी आहे. तिला लक्ष्मी म्हणता येणारच नाही! निव्वळ पापाचेच विचार येत राहतात 'पैसे कसे गोळा करू, कसे गोळा करू' यालाच पाप म्हणायचे. असे म्हणतात, की पूर्वीच्या काळी श्रीमंतांकडे पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असायची! ती लक्ष्मी त्यांच्याकडे गोळा होत होती, त्यांना गोळा करावी लागत नव्हती. जेव्हा की ह्या लोकांना तर लक्ष्मी गोळा करावी लागते. पूर्वीची लक्ष्मी Page #18 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार तर सहजपणे त्यांच्याकडे येत असे. ते स्वतः तर असे म्हणत असत की, 'हे प्रभू! ही राजलक्ष्मी मला स्वप्नात पण नको.' आणि तरी पण ती येतच राहायची. ते काय म्हणत असत की आत्मलक्ष्मी असू दे, पण ही राजलक्ष्मी आम्हास स्वप्नात सुद्धा नको.' पण तरी ती येतच राहायची. हे पुण्यानुबंधी पुण्य. आम्हाला पण संसार रुचत नव्हता. माझेच सांगायचे, तर मला स्वतःला कोणत्याही (संसारी) गोष्टीत रुचीच नव्हती. पैसे मिळाले तरी ओझे वाटत असे. माझे स्वतःचे पैसे दिले तरी ओझे वाटायचे. पैसे घेऊन जाताना पण ओझे वाटायचे, घेऊन येताना पण ओझे वाटत होते. प्रत्येक बाबतीत ओझे वाटत होते, हे ज्ञान होण्यापूर्वी असे वाटायचे. प्रश्नकर्ता : आमचे विचार असे आहेत की धंद्यात इतके ओतप्रोत आहोत की लक्ष्मीचा मोह सुटतच नाही, त्यातच बुडून गेलो आहोत. दादाश्री : आणि तरी सुद्धा पूर्ण संतोष होत नाही ना! असेच वाटते ना की पंचवीस लाख मिळवू, पन्नास लाख गोळा करू, सतत असेच वाटत राहते ना? असे आहे, पंचवीस लाख तर मी पण जमा करण्याच्या नादात राहिलो असतो, पण मी तर हिशोब मांडून बघितला की इथे तर आयुष्याचे एक्सटेन्शन मिळत नाही. शंभर ऐवजी हजारेक वर्ष जगायला मिळत असतील तर मेहनत केलेली कामाची. पण इथे तर आयुष्याचा काही नेम नाही. एक स्वसत्ता आहे, दुसरी परसत्ता आहे. स्वसत्ता की ज्यात स्वतः परमात्मा होऊ शकतो. जेव्हा की पैसे कमावून घेण्याची सत्ता तुमच्या हातात नाही, ती परसत्ताच आहे, तर पैसे कमावणे चांगले की परमात्मा होणे चांगले ? पैसे कोण देत आहे हे मी जाणून आहे. पैसे मिळवण्याची सत्ता जर स्वतःच्या हातात असती तर भांडण करून सुद्धा कुठूनही मिळवले असते. पण ती परसत्ता आहे. त्यामुळे सगळे मुसळ केरात. काहीही निष्पन्न होत नाही. एका माणसाने मला विचारले की लक्ष्मी कशासारखी असते? तेव्हा मी म्हणालो झोपेसारखी. काही जणांना अंथरुणात पडल्याबरोबर झोप Page #19 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार येते. आणि काही प्रयत्न करून दमतात तरी झोप लागत नाही, तर काहींना झोपेसाठी गोळ्या घ्याव्या लागतात. थोडक्यात, लक्ष्मी ही तुमच्या सत्तेची बाब नाही, ती परसत्ता आहे. त्यामुळे परसत्तेची उपाधी आपण का करावी? म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की वाटेल तेवढी धडपड केली तरीही पैसे मिळतील असे नाही. ही गोष्ट ‘इट हॅपन्स' (आपोआप होत आहे) आहे. एवढे खरे की तुम्ही त्यात निमित्त आहात. कोर्ट-कचेरीत येणे-जाणे हे निमित्त आहे. तुमच्या तोंडून जी वाणी निघते, ते सर्व निमित्त आहे, तेव्हा तुम्ही त्यात जास्त लक्ष देऊ नका. आपोआपच लक्ष द्यायचे तिथे दिले जाईल आणि त्यात आपल्याला काही अडचण येणार नाही. हे तर मनातल्या मनात धरुन चालता की जर मी नसेन तर चालणारच नाही. या कोर्ट-कचेऱ्या सर्व बंद पडतील. असे तुम्ही मानता. खरेतर त्यात काही तथ्य नाही. ही लक्ष्मी प्राप्त होणे, म्हणजे त्यासाठी कितीतरी कारणे एकत्रित होतात तेव्हा लक्ष्मी प्राप्त होते. एखाद्या डॉक्टराच्या वडिलांच्या गळ्यात कफ चिकटून बसला, आणि आपण डॉक्टरांना सांगितले की तुम्ही तर इतकी मोठमोठी ऑपरेशन्स केली आहेत, तर हा जाम झालेला कफ खेचून काढा ना! तर तेव्हा म्हणेल, 'नाही. काढायला जाण्यापूर्वीच मृत्यू ओढावेल. अर्थात् अशा गोष्टीत आपले काहीच चालत नाही. सर्वकाही एव्हिडन्स एकत्र होऊन घडते! मला ज्ञान प्राप्त झाले तेही सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्सच्या आधाराने ! हे जे करोडपति बनले आहेत ते स्वत:च्या हुशारीने नाही घडले. परंतु ते आपल्या मनातल्या मनात मानतात की मी (करोडपती) झालो. एवढीच भ्रांती आहे. आणि ज्ञानीपुरुषाला ही भ्रांती नसते. 'जसे आहे तसे' सांगतात! की बाबा, असे घडले होते. 'मी सूरतच्या स्टेशनवर बसलो होतो, आणि हे असे घडले.' तेव्हा हा मानतो की मी दोन करोड मिळवले! खरेतर हे सर्व तम्ही सोबत घेऊन आला आहात... पण तुम्ही असे मानून बसले आहात की 'हे सर्व मी केले' एवढेच. इगोईजम (अहंकार) आहे. आणि हा इगोईजम काय करतो? इगोईजमच्या आधारे तुम्ही तुमच्या पुढील जन्माची योजना आखत आहात. Page #20 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार अशा प्रकारे जन्मोजन्मीची योजना आखतच असतो जीव, आणि त्यामुळे त्याचे जन्म-मरण थांबतच नाही. योजना बंद होईल, तेव्हा त्याची मोक्षाला जाण्याची तयारी सुरु होईल. एकही जीव असा नसेल की जो सुख शोधत नसेल! त्यात पण त्याला कायमचे शाश्वत सुखच हवे! त्याला असे वाटते की लक्ष्मीमध्ये सुख आहे, पण त्यात सुद्धा आत धगधग होत असते. एकीकडे धगधग आणि दुसरीकडे कायमच्या सुखाची प्राप्ती, हे एकाचवेळी शक्यच नाही. दोन्ही गोष्टींचा विरोधाभास आहे. त्यात लक्ष्मीजींचा दोष नाही. त्याचा स्वत:चाच दोष आहे. ___ जगातील सर्व वस्तू एक दिवस अप्रिय वाटतील परंतु आत्मा तर स्वतःचेच स्वरुप आहे, तिथे द:ख कधीच नसते. जगात तर पैसे देणारा सुद्धा अप्रिय वाटू शकतो. पैसे कुठे ठेवायचे याचीच पंचाईत! थोडक्यात म्हणजे, पैसे असतील तरी दु:ख, आणि नसतील तरी दु:ख. प्रधान मंत्री झाला तरी दु:ख, गरीब असला तरी दुःख, भिकारी असला तरी दुःख, विधवा झाली तरी दुःख, संसार थाटला तिलाही दुःख, सात नवरे असतील तिलाही दुःख. दुःख, दुःख, आणि दुःख. अहमदाबादच्या शेठजींना सुद्धा दुःख. याचे कारण काय असू शकेल? प्रश्नकर्ता : त्यांना संतोष नाही. दादाश्री : ह्यात सुख होतेच कुठे? सुख नव्हतेच. हे तर भ्रांतीमुळे असे भासते. जसे एखाद्या दारुड्याचा एक हात गटारीत पडला असेल तरी तो म्हणेल, हो, आत तर कसा गारवा वाटतो, फार छान आहे. हे असे दारुमुळे वाटते. बाकी यात सुख असणारच कसे? निव्वळ खरकटेच आहे हे सारे! ___ या जगात सुख नाहीच. सुख असूच शकत नाही आणि जर सुख असते तर मुंबई अशी नसती. सुख नाहीच मुळी, हे तर भ्रांतीचे सुख आहे. आणि ती निव्वळ टेम्पररी एडजस्टमेन्ट आहे. पैशाचे ओझे वाहण्यासारखे नाही. बँकेत जमा झाले की हुश्श् म्हणणार आणि बुडाले म्हणजे दु:ख होणार, या जगात काहीच हश्श् करण्यासारखे नाही, कारण हे सर्व टेम्पररी आहे. Page #21 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार माणसाला कशी दु:खे असतात? एक माणूस मला म्हणाला की माझे बँकेत काहीच नाही. अगदी रिकामा झालो. नादार झालो. मी विचारले, 'देणे किती होते?' तर म्हणाला देणे नव्हते. मग तो नादार म्हटला जाणार नाही. बँकेत हजार, दोन हजार आहेत. नंतर मी विचारले 'बायको तर आहे ना?' तर तो म्हणाला 'बायको काय विकता येते?' मी म्हटले, 'नाही, पण तुझे दोन डोळे आहेत, ते तुला दोन लाखात विकायचे आहेत का?' हे डोळे, हे हात, पाय, डोके या सर्व मिळकतीची तू किंमत तर लाव. बँकेत दमडी पण नसली, तरी तू करोडपती आहेस. तुझ्याजवळ केवढी मोठी इस्टेट आहे. ती विकायची आहे का, बोल, हे दोन हात पण तू विकणार नाहीस. तुझ्याजवळ किती मोठी इस्टेट आहे. ही सर्व इस्टेटच आहे असे समजून समाधानाने राहायचे. पैसे येवोत किंवा न येवोत पण दोन वेळचे जेवण मिळाले पाहिजे. प्रश्नकर्ता : जीवनात आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल तर काय करावे? दादाश्री : एक वर्ष पाऊस नाही पडला तर शेतकरी काय म्हणतात, की आमची आर्थिक परिस्थिती फार खालावली. असे म्हणणार की नाही? परत दुसऱ्या वर्षी पाऊस पडला तर त्यांची परिस्थिती सुधारते, म्हणून जेव्हा आर्थिक स्थिती खालावलेली असेल तेव्हा धीर धरायला हवा. खर्च कमी करून टाकावा आणि मिळेल त्या मार्गाने मेहनत, प्रयत्न वाढवायला हवेत. अर्थात् खालावलेली परिस्थिती असेल तेव्हा हे असे सर्व करावे. बाकी चांगली परिस्थिती असेल तेव्हा तर गाडी नीट रुळावर चालतच असते ना! या देहाला आवश्यक तेवढेच अन्न पुरवण्याची गरज आहे. त्याला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही, नाहीतर हे त्रिमंत्र दररोज ऐकेक तास बोला ना! हे बोलल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. म्हणजे याचा उपाय करायला हवा. उपाय केल्यावर परिस्थिती सुधारेल. तुम्हाला हा उपाय आवडेल का? या दादा भगवानांचे नाव तासभर घेतले तर पैशांचा ढीग होईल. पण तसे करीत नाही ना! हजारो लोकांना पैसे मिळालेत! हजारो लोकांच्या Page #22 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार अडचणी दूर झाल्या! 'दादा भगवानांचे' नाव घेतले आणि पैसे मिळाले नाही तर ते 'दादा' नव्हेत! पण घरी गेल्यानंतर ही माणसे अशा प्रकाराने 'दादा भगवान'चे नाव घेत नाहीत ना! लक्ष्मी तर कशी आहे ? कमाई करताना दु:ख, जपून ठेवताना दुःख, रक्षण करतना दुःख, आणि खर्च करताना सुद्धा दुःख. घरात लाख रुपये आले की ते सांभाळून ठेवण्याची काळजी वाटते. कोणत्या बँकेत ते सुरक्षित राहतील, हे बघावे लागते. शिवाय नातेवाईकांना कळले तर लगेच त्यांची धावपळ सुरु. सर्व मित्रमंडळीची धावपळ सुरु, म्हणतील काय की, 'अरे, यार माझ्यावर एवढा सुद्धा विश्वास नाही? मला फक्त दहा हजारच पाहिजे, मग काय? नाईलाजाने द्यावे लागतात. पैसा जास्त असेल तरी दुःख आणि अगदी टंचाई असेल तरी दुःख. तर नॉर्मल असलेलेच बरे, अन्यथा लक्ष्मी वापरताना सुद्धा दुःख होते. लोकांना तर लक्ष्मी सांभाळताही येत नाही, आणि त्याचा उपभोग घेताही येत नाही. उपभोग घेताना म्हणतील इतके महाग? इतकी महाग वस्तू कशी घ्यायची? अरे, भोगायला मिळते ते भोग की मुकाट्याने ! परंतु उपभोग घेताना सुद्धा दुःख, कमावताना सुद्धा दुःख, कमाई करताना माणसे वैताग आणतात अशा परिस्थितीत कमावायचे, अरे, कित्येक तर उसने दिलेले पैसे परत देतच नाहीत. म्हणजे मिळवतानाही दुःख आणि सांभाळतानाही दुःख. कितीही जपून ठेवले तरी बँकेत पैसा टिकतच नाही ना! बँकेत खात्याचे नावच क्रेडिट आणि डेबिट, पुरण आणि गलन! लक्ष्मी जाते तेव्हा पण फार दुःख देते. काही माणसे इन्कमटॅक्स गिळून बसलेले असतात. पंचवीस पंचवीस लाख रुपये दाबून बसलेले असतात. पण त्यांना माहित नाही की हे सर्व पैसे जातील. मग इन्कमटॅक्सवाल्याची नोटीस येईल तेव्हा पैसे कोठून काढणार? ही तर निव्वळ फसवणूकच आहे. हे जे लोक फार ऊँच चढतात, त्यांना फार जोखिम! परंतु हे त्यांना समजतच नाही ना! उलट दिवसभर इन्कमटॅक्स कसा वाचवता येईल, याकडेच लक्ष असते. म्हणून तर आम्ही सांगत असतो ना की, ही माणसे तिर्यंच (जनावर) गतीचे रीर्टन तिकिट घेऊन आलेली आहेत. Page #23 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार जगातील सर्व लोकांची मेहनत कोल्हूच्या बैलासारखी वाया जात आहे, तो मालक बैलाला पेंड खायला लावतो, तर इथे बायको चतकोर चपाती वाढते की चालले पुढे ! दिवसभर बैलासारखा राब-राब राबत राहतो. ___अहमदाबादचे शेठजी दोन गिरण्यांचे मालक आहेत, तरी त्यांच्या उकाड्याचे इथे वर्णन होऊ शकत नाही. दोन दोन गिरण्यांचे मालक तरीही केव्हा फेल होतील, हे सांगता येत नाही. तसे तर शाळेत असताना बऱ्यापैकी पास होत होते, पण इकडे फेल होऊन जातील! कारण त्यांनी बेस्ट फुलिशनेसची सुरुवात केली आहे. डिसऑनेस्टी इज द बेस्ट फुलिशनेस!(अप्रामाणिकता सर्वातमोठी मूर्खता आहे) या फुलिशनेसला सुद्धा काही मर्यादा तर असतेच ना? की मग बेस्टपर्यंत ओढतच राहायचे? तर आज बेस्ट फुलिशनेसपर्यंत पोहोचले आहेत. मी पैशाचा हिशोब काढला होता. 'हे पैसे आपण वाढवत वाढवत गेलो तर कुठपर्यंत पोहोचतील?' तर या जगात कुणाचाही पहिला नंबर लागलेला नाही. लोक म्हणतात की ‘फोर्डचा' पहिला नंबर आहे तर चार वर्षात कुणा दुसऱ्याचे नाव ऐकायला मिळते. तात्पर्य असे की कुण्या एकाचा नंबर कायमचा टिकत नाही, निष्कारण इथे धावपळ करत राहण्यात काय अर्थ आहे ? पहिल्या घोड्याला बक्षिस दिले जाते, दुसऱ्या-तिसऱ्याला थोडे कमी दिले जाते. चौथ्याने तर तोंडात फेस काढत-काढत मरायचे? मी म्हटले, 'असल्या रेसकोर्समध्ये मी कशाला उतरु? ही माणसे तर मला चौथा, पाचवा, बारावा किंवा शंभरावा नंबर सुद्धा देतील! तर मग आपण कशाला फेस काढायचा तोंडातून? फेस निघायची पाळी नाही का येणार? पहिला येण्यासाठी घावत सुटला पण नंबर आला बारावा! मग चहा सुद्धा पाजणार नाही कोणी. तुम्हाला काय वाटते? लक्ष्मी ‘लिमिटेड' आहे आणि लोकांची मागणी आहे 'अनलिमिटेड'! कुणाला विषय विकाराची अटकण (जे बंधनरुप होत असते, पुढे जाऊ देत नाही) पडलेली असते, कुणाला मान मिळविण्याची अटकण पडलेली असते. अशा वेगवगळ्या प्रकाराच्या अटकण पडलेल्या असतात. Page #24 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार तशीच ही पैशांची अटकण पडलेली असते, तो सकाळी अंथरुणातून उठला की पैशाचे ध्यान सुरु होते! ही पण एक मोठी अटकण म्हणायची. प्रश्नकर्ता : पण पैशांशिवाय तर चालत नाही ना? दादाश्री : चालत नाही, पण पैसे येतात कसे, ते या लोकांना माहित नाही आणि पैशांच्या मागे धाव धाव धावतात. पैसे तर घामासारखे येतात, जसे कुणाला जास्त घाम येतो तर कुणाला कमी येतो. आणि घाम जसा आल्याशिवाय राहत नाही, तसा पैसाही मिळतच असतो ना लोकांना! मला तर मुळापासूनच पैशांची अटकण नव्हती. बावीस वर्षाचा होतो तेव्हापासून मी व्यवसाय करीत होतो पण तरीही माझ्या घरी जे कुणी येतील त्यांना माझ्या व्यवसायाची माहिती पण नव्हती. उलट मीच त्यांना विचारत असे की 'तुम्हाला काही अडचण वगैरे तर नाही ना?' पैशांचीच आठवण येणे ही पण जोखीमच आहे, तर त्याची भक्ति करणे, ही तर केवढी मोठी जोखीम? माणूस एका जागी भक्ति करू शकतो. एक तर पैशांची भक्ति करू शकतो किंवा आत्म्याची. दोन्ही ठिकाणी माणसाचा उपयोग (चित्त केंद्रीत) होऊ शकत नाही. दोन्हीकडे उपयोग कसा राहू शकेल? एका ठिकाणीच राहतो. तेव्हा काय करावे? एक शेठजी भेटले होते. तसे तर ते लखपती होते. माझ्यापेक्षा १५ वर्षांनी मोठे होते, पण त्यांचे माझ्याशी चांगले पटत होते! त्या शेठजींना मी एकदा विचारले, ही तुमची मुले तर कोट-पॅन्ट घालून हिंडतात आणि तुम्ही फक्त एवढेसे धोतर, ते सुद्धा दोन्ही गुढगे उघडे दिसतील असे का घालता? ते शेठ देवळात दर्शनासाठी निघाले की असे उघडे दिसायचे. एवढीशी धोती-लंगोट मारुन चाललेत असे वाटायचे! एवढीशी बंडी आणि पांढरी टोपी घालून दर्शनासाठी असे धावपळ करताना ते दिसायचे. मी म्हटले, 'मला असे वाटते की ही सर्व संपत्ति तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात?' तर मला म्हणाले, 'नाही घेऊन जाता येत, अंबालाल भाऊ, सोबत नेता येत नाही.' मी म्हटले 'तुम्ही तर हुशार, आम्हा पाटलांना फारशी समज नसते. Page #25 -------------------------------------------------------------------------- ________________ १४ पैशांचा व्यवहार पण तुमची तर अक्कलवान जात, कुठूनतरी हुडकून काढले असेल!' तर म्हणाले 'छे! छे! कुणालाही सोबत नेता येत नाही.' नंतर त्यांच्या मुलाला विचारले की, 'तुमचे वडील तर असे सांगत होते, ' तर तो म्हणतो कसा की, 'सोबत घेऊन जाता येत नाही हेच उत्तम आहे. सोबत घेऊन जाणे जर शक्य असते ना, तर माझे वडील तर फार पक्के आहेत, आमच्या डोक्यावर तीन लाखाचे देणे सोडून जातील असे आहेत. माझ्यासाठी कोट-पॅन्ट सुद्धा राहू देणार नाहीत. आमची तर वाट लावून देतील, असे पक्के आहेत! प्रश्नकर्ता : मुंबईतील शेठजी दोन नंबरचे पैसे गोळा करीत असतात त्याचा काय इफेक्ट (परिणाम) होतो ? दादाश्री : त्यामुळे कर्मबंध पडतो. ते पैसे दोन नंबरचे किंवा एक नंबरचेही असतात. म्हणजे खरे, खोटे सर्व पैसे कर्मबंधन करवितात. नाहीतरी कर्मबंधन तर होतच असते. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्मबंधन होतच असते. दोन नंबरच्या पैशांमुळे वाईट कर्मबंध पडतो. तेव्हा मग जनावरांच्या गतीमध्ये जावे लागते, पशू योनीत जावे लागते. आणखी काही विचारायचे आहे का ? प्रश्नकर्ता : ही माणसे पैशांच्या मागे धावतात तर त्यांना कधी संतोष का होत नाही ? दादाश्री : कुणी जर आपणास सांगितले की संतोष राखा, तर आपण म्हणू की बाबा, तुम्ही संतोष ठेवत नाही, आणि मला का बरे सांगायला आलात? वस्तुस्थिती अशी आहे की संतोष आपण ठरवल्याने राहू शकेल असा नाही. त्यात सुद्धा कुणाच्या सांगण्याने संतोष राहू शकेल असे तर नाहीच. संतोषाचे तर असे आहे की जितके ज्ञान असेल त्यानुसार आपोआपच, सहजपणे संतोष राहतोच. संतोष ही करण्यासारखी गोष्ट नव्हे, तो तर परिणाम आहे. तुम्ही जशी परीक्षा दिली असेल तसा परिणाम येईल. त्याचप्रमाणे जितके ज्ञान असेल तितक्या प्रमाणात संतोष राहील. संतोष व्हावा म्हणून तर लोक इतके श्रम करतात ! बघा ना, शौचालयात सुद्धा दोन कामे करतात. दाढी आणि दोन्ही कामे उरकतात! इतका मोठा लोभ असतो ! यालाच तर इंडियन पझल म्हणतात. Page #26 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार काही वकील तर शौचालयात बसून दाढी करतात. त्यांची धर्मपत्नी मला सांगत होती की आमच्याबरोबर कधी बोलत सुद्धा नाहीत. म्हणजे ते केवढे एकलकोंडे झाले आहेत. एकच बाजू, एकच कोपरा, आणि परिणामी रेसकोर्स(घोडदौड) असते ना! जी लक्ष्मी येते, ती परत तिथे जाऊन टाकून येतात! घ्या आता! इथे गाईचे दूध काढून तिथे गाढवाला पाजतात! या कलियुगात पैशांचा लोभ करून स्वतःचा जन्म वाया घालवतात आणि मनुष्यपणात आर्तध्यान-रौद्रध्यान करीत राहतात, त्याने मनुष्यपणा सुद्धा गमावतात. मोठमोठ्या राज्याचा भरपूर उपभोग घेऊन आले आहेत हे लोक. हे काही भिकारी नव्हते, पण आता मात्र मन भिकाऱ्यासारखे होऊन गेले आहे. त्यामुळे हे पाहिजे आणि ते पाहिजे, अशी हाव सुटत राहते. नाहीतर ज्याचे मन संतुष्ट असेल त्याला काहीच दिले नाही, तरीही तो राजश्री (समाधानी) असतो. पैसा ही अशी वस्तू आहे की त्यामुळे माणसाची दृष्टी लोभा प्रति जाते. लक्ष्मी तर वैरभाव वाढवणारी वस्तू आहे. त्यापासून जितके दूर राहता येईल तितके उत्तम! आणि जर खर्च करायचा असेल तर चांगल्या कामासाठी खर्च केले तर ती चांगली गोष्ट आहे. पैसे तर जितके येण्याचा योग असेल तितकेच येतील. धर्मात पडले तरी तेवढेच येतील आणि अधर्मात पडले तरी तेवढेच येतील. परंतु अधर्मात पडले तर दुरुपयोग होऊन दुःख पदरी पडेल, आणि धर्मात सदुपयोग होईल व सुख मिळेल, शिवाय मोक्षाला जाता येईल हा मोठा फायदा. बाकी पैसे तर मिळायचे असतील तेवढेच मिळतील. ___ पैशासाठी सारखा विचार करत राहणे, ही एक वाईट सवय आहे, ही सवय वाईट का म्हणायची? तर समजा एका माणसाला खूप ताप आला असेल. त्याला घाम सुटावा म्हणून आपण त्याला वाफ देऊन त्याचा ताप उतरवितो. वाफ देण्यामुळे पुष्कळ घाम सुटतो. पण मग रोज असे करून त्याचा घाम काढतच राहिलो तर त्याची काय स्थिती होईल? त्याला काय वाटते, की या उपचाराने एक दिवस मला चांगला फायदा झाला होता. माझे अंग हलके झाले होते. तर हे असे मी रोज करीन. आता रोजच्या रोज असा उपचार करून घाम काढतच राहिला तर काय परिस्थिती होईल? Page #27 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार लक्ष्मी ही तर बायप्रोडक्ट आहे. जसे, आपला हात चांगला राहील की पाय चांगला राहील याचा रात्रंदिवस विचार करावा लागतो का? नाही, कशामुळे? हाता-पायाची काय आपल्याला गरज नाही? आहे, पण त्याचा विचार करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीचाही विचार करू नये. जर का आपला हात दुखत असेल तर त्याच्या उपचारापुरता विचार करावा लागतो, तसेच काही वेळा पैशांचाही विचार करावा लागतो, पण मग तेवढ्या पुरताच. नंतर विचार करण्याची आवश्यकताच नाही. दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही. लक्ष्मीचे स्वतंत्र ध्यान करू नये. एका बाजूला लक्ष्मीचे ध्यान आहे, तर दुसऱ्या बाजूला दुसरे ध्यान आपण चुकत असतो. स्वतंत्र ध्यान लक्ष्मीचेच नव्हे, तर स्त्रीचे सुद्धा करायचे नसते. स्त्रीच्या ध्यानात रमला तर स्त्रीसारखा होऊन जाईल! लक्ष्मीच्या ध्यानात रमला तर लक्ष्मीसारखा चंचल होऊन जाईल. लक्ष्मी तर सर्व ठिकाणी फिरत राहते निरंतर, तसा तोही फिरतच राहतो. लक्ष्मीचे ध्यान तर करायचेच नसते. मोठ्यात मोठे रौद्रध्यान आहे ते, ते आर्तध्यान नाही, पण रौद्रध्यान आहे ! कारण स्वतःच्या घरी खायला प्यायला आहे, सर्वकाही आहे, तरीही आणखी जास्त लक्ष्मी मिळावी अशी आशा बाळगून असतो, म्हणजे दुसऱ्यांकडे तेवढी टंचाई पडायची. दुसऱ्याला टंचाई भोगावी लागेल, असे प्रमाण भंग करू नका. नाहीतर तुम्ही अपराधी ठराल! आपणहून सहजपणे आली तर त्याचा गुन्हा तुम्हाला लागत नाही. सहजपणे ५ लाख येवोत किंवा पन्नास लाख येवोत. पण मग आल्यानंतर लक्ष्मीला रोखून ठेवायची नसते. लक्ष्मी काय म्हणते? की आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करू नका, जितकी आली तितकी देऊन टाका. लक्ष्मीचे अंतराय कुठवर असतात? जोपर्यंत कमाई करून घेण्याची इच्छा असते तोपर्यंत! पैशाकडे दुर्लक्ष झाले की मग ढिगभर येतात. खाण्याची गरज नाही का? शौचाला जाण्याची गरज नाही का? तशीच लक्ष्मीचीही गरज आहे. संडास जसे आठवण न करता होते, तशीच लक्ष्मी सुद्धा आठवण न करता येते. __ एक जमीनदार माझ्याकडे आला आणि मला विचारु लागला, 'जीवन जगण्यासाठी किती हवेत? माझ्याकडे हजार एकर जमीन आहे, Page #28 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार बंगला आहे, दोन मोटारी आहेत, आणि बँक बॅलेन्सही चांगले आहे. तर माझ्याजवळ किती असावे ? १७ मी म्हटले, 'हे बघ, प्रत्येकाची आवश्यकता किती असावी याचा अंदाज, त्याच्या स्वत:च्या जन्माच्यावेळी काय स्थिती होती, त्यावरुन संपूर्ण जीवन जगण्यासाठीचे प्रमाण तू नक्की कर. हाच सर्व सामान्य नियम आहे. हे सर्व तर एक्सेस (अति) म्हणायचे. आणि एक्सेस तर विष असते, मरशील !' प्रत्येक व्यक्तिला आपल्या घरात आनंद वाटतो. झोपडीत राहणाऱ्याला बंगल्यात आनंद वाटत नाही आणि बंगल्यात राहणाऱ्याला झोपडीत आनंद वाटत नाही. याचे कारण आहे, त्याच्या बुद्धीचा आशय. जो जसे आपल्या बुद्धीच्या आशयात भरुन घेऊन आला असेल, तसेच फळ त्याला प्राप्त होते. बुद्धीच्या आशयात जे भरलेले असते त्याचे दोन फोटो निघतात. एक पापफळ आणि दुसरे पुण्यफळ. बुद्धीच्या आशयाचे प्रत्येकाने विभाजन केले, तर १०० टक्क्यातून बहुतेक टक्के मोटार, बंगला, मुलं-मुली आणि बायको, या सर्वांसाठी भरले. ते सर्व मिळवण्यात पुण्य खर्च झाले आणि धर्मासाठी जेमतेम एक किंवा दोन टक्के बुद्धीच्या आशयात भरले. जर कोणी बुद्धीच्या आशयात लक्ष्मीची प्राप्ती करायची आहे असे भरुन आला, तर त्याचे पुण्य खर्च होऊन लक्ष्मीचा ढीग होईल. दुसरा कोणी बुद्धीच्या आशयात लक्ष्मी प्राप्त व्हावी असे घेऊन तर आला पण त्याला पुण्याचा खप होण्याऐवजी पापफळ समोर आले, म्हणून लक्ष्मीजींनी तोंडच फिरवून घेतले. खरेतर, हा इतका रोख-ठोक हिशोब आहे की कुणाचे काहीही चालू शकत नाही. तिथे हे दुर्भागी असे मानतात की मी दहा लाख रुपये मिळवले. अरे शहण्या, ही तर पुण्याई खर्च झाली आणि ती सुद्धा चुकीच्या मार्गाने. त्यापेक्षा तुझा बुद्धीचा आशय बदल. धर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. या जड वस्तू मोटार, बंगला, रेडियो, यांची भजना करून त्यांच्यासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा नाही. धर्मासाठी, आत्मधर्मासाठीच बुद्धीचा आशय बांधण्यासारखा आहे. तुम्हाला जे प्राप्त आहे ते असू द्या, परंतु या पुढे मात्र आशय बदलून संपूर्ण १०० टक्के धर्मासाठीच ठेवा. सद्या Page #29 -------------------------------------------------------------------------- ________________ १८ पैशांचा व्यवहार मा० मिगत. आम्ही आमच्या बुद्धीच्या आशयात १०० टक्के धर्म आणि जगत कल्याणाची भावना घेऊन आलो आहोत. दुसऱ्या कोणत्याही जागी आमचे पुण्य खर्च झालेच नाही. पैसे, मोटार, बंगला, मुलगा, मुलगी कशातही नाही. आम्हाला जे कोणी भेटले, आणि ज्ञान प्राप्त केले, त्यांनी दोन-पाच टक्के धर्मासाठी-मुक्तीसाठी ठेवले होते, त्यामुळे आमच्याशी भेट झाली. आम्ही सर्व शंभरचे शंभर टक्के धर्मातच टाकले, त्यामुळे सगळीकडून आम्हाला धर्मासाठी 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' मिळाले. कोणी बाहेरचा मनुष्य माझ्याजवळ व्यावहारिक सल्ला घेण्यासाठी आला की 'मी कितीही प्रयत्न केले तरी काही उपजत नाही,' असे म्हणाला, तर मी त्याला सांगतो, 'सद्या तुझ्या पापाचा उदय आहे, त्यामुळे कुणाकडून उसने रुपये जरी घेऊन आलास, तर रस्त्यातच तुझा खिसा कापला जाईल! त्यामुळे अशावेळी तू घरी बसून निवांतपणे जे काही शास्त्रवाचन करीत असशील ते कर आणि देवाचे नामस्मरण करीत रहा. ___ पापाचे पुरण करीत आहेत, (बी पेरतो) ते जेव्हा गलन होईल (फळ येईल) तेव्हा कळेल! तेव्हा हादरुन जाशील! विस्तवावर बसवले आहे असे वाटेल! पुण्याचे पुरण करशील तेव्हा कळेल की किती वेगळाच आनंद आहे ! म्हणूनच जे काही पुरण कराल ते समजून उमजून करा, की जेव्हा गलन होईल तेव्हा कशा प्रकारचे परिणाम भोगावे लागतील! पुरण करताना सतत ध्यानात असू दे, पाप करताना, कुणाला लुबाडून पैसे गोळा करताना, सतत ध्यानात असू दे की याचे पण गलन होणार आहे. ते पैसे बँकेत जमा केले तरीही ते जाणार तर आहेतच. त्याचे सुद्धा गलन तर होणारच आहे. शिवाय ते पैसे मिळवताना जे पापकर्म केले, जे रौद्रध्यान केले, ते त्याच्या धारासहित, हिशोबासोबत येईल ते पुन्हा अधिक आणि जेव्हा त्याचे गलन होईल तेव्हा तुझी काय दैनावस्था होईल? निसर्ग काय म्हणतो? त्याने किती पैसे वापरले हे आमच्याकडे बघितले जात नाही, तर त्याला कोणते वेदनीय कर्म भोगावे लागले, शाता( सुख) परिणाम की अशाता( दुःख) परिणाम, एवढेच आमच्याकडे बघितले जाते. पैसे नसले तरी शाता भोगेल, आणि पैसे असले तरीही Page #30 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार अशाता भोगत राहील. अर्थात् तो जे शाता की अशाता वेदनीय कर्म भोगत आहे, हे त्याच्या पैशांवर अवलंबून नसते. १९ आता आपल्याजवळ थोडी कमाई आहे. अगदी शांती-समाधान आहे, कोणतीही अडचण नाही, तर तेव्हा म्हणायचे की 'चला, आपण देवदर्शनाला निघूया!' आणि हे जे सर्व, पैसे कमविणाच्या नादात असलेले, त्यांनी अकरा लाख रुपये मिळवले, त्यास हरकत नाही, परंतु जर पन्नास हजारचा तोटा येण्याची वेळ आली तर त्यांना अशाता वेदनीय उत्पन्न होणार. 'अरे, अकरा लाखातून पन्नास हजार वजा करून टाक ना!' तर म्हणतो कसा, छे! पण तसे केले तर एकूण रक्कम कमी होईल ना ! अरे शहाण्या, रक्कम तू कशाला म्हणतोस ? कुठून आली ही रक्कम ? ती तर जबाबदारीवाली रक्कम होती, त्यामुळे कमी झाली तर आता आरडाओरड करू नकोस. रक्कम वाढली तर तू खुष होतोस आणि कमी झाली तर ? अरे, खरी पुंजी तर 'आतमध्ये' दडलेली आहे, आणि तू कशाला हार्टफेल करून घेऊन ती सर्व पुंजी उधळून टाकायला निघाला आहेस ? हार्टफेल झाला तर सर्व पुंजी वायाच गेली, नाही का ? दहा लाख रुपये बापाने मुलाला दिले असतील आणि बाप म्हणेल की 'मी आता आध्यात्मिक जीवन जगेन !' तर इथे मुलगा नेहमी दारु पिण्यात, मांसाहार करण्यात शेयरबाजारात, या सगळ्यात ते पैसे गमावून टाकतो. कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे कधीच स्वत:जवळ राहत नाही. अरे, आज तर सच्ची कमाई, खऱ्या मेहनतीचे पैसे सुद्धा टिकत नाही, तर खोटी कमाई कशी बरे टिकणार ? म्हणून पुण्याईचे पैसे हवेत, जे अप्रमाणिकतेने गोळा केले नसतील. आणि चोख दानत असेल अशी संपत्ति असेल तरच ती सुख देऊ शकेल. नाहीतर सध्याच्या दुषमकाळातील पैसे, तेही पुण्याईचेच म्हटले जातात, परंतु पापानुबंधी पुण्याईचे, त्याने निव्वळ पापाच बांधले जाते ! एक मिनिटसुद्धा जगणे कठीण, असा हा संसार ! जबरदस्त पुण्याई असली तरीपण अंतरदाह शांत होत नाही. अंतरदाह निरंतर जळतच असतो! चोहीकडून सगळे फर्स्ट क्लास संयोग असतात, तरीपण अंतरदाह चालूच Page #31 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार असतो. त्याचे शमन कसे करावे? शेवटी पुण्य सुद्धा संपून जाते. जगाचा नियम आहे की पुण्य संपले मग काय होणार? तर पापाचा उदय होणार. हा तर अंतरदाह आहे. पापाचा उदय झाला की बाहेरचा दाह पण सुरु होतो. त्यावेळी तुझी काय दैनावस्था होईल? म्हणून सावध व्हा, असे भगवंत सांगतात. हे तर पुरण-गलन स्वभावाचे आहे. जितके पुरण झाले तेवढे गलनही होणार. आणि गलन झाले नाही, तरी पंचाईत. पण गलन होत आहे तेवढे परत खाल्ले जाते. हा श्वास घेतो ते पुरण केले आणि उच्छवास काढला ते गलन झाले. सर्वकाही पुरण-गलन स्वभावाचे आहे. म्हणून आम्ही शोधून काढले की 'टंचाई नाही आणि अधिकही नाही! आमच्याकडे कधीही लक्ष्मीची कमतराताही भासत नाही आणि ऊतूही जात नाही!' कमतरता असलेला कोमेजून जातो आणि अधिक असलेल्याला सुज येते. ऊतू जाणे म्हणजे काय की लक्ष्मीजी तिथून दोन-तीन वर्षांपर्यंत हलतच नाही. लक्ष्मी तर चालत-फिरत असलेली बरी, नाहीतर दुःखदायी होते. मला कधी टंचाई पण झाली नाही. आणि जास्तही झाली नाही. लाख येण्यापूर्वी कोणताही बॉम्ब येतो आणि खर्च होतो. त्यामुळे ऊतू जाण्याचा प्रश्नच कधी उद्भवत नाही, आणि टंचाई पण झाली नाही. प्रश्नकर्ता : लक्ष्मी कशामुळे कमी होते? दादाश्री : चोरीमुळे. जिथे मन-वचन-कायेने चोरी होत नसेल तिथे लक्ष्मीजीची कृपा होते. लक्ष्मीचे अंतराय चोरीमुळे घडतात. ट्रिक (चलाखी) आणि लक्ष्मी यांचे वैर आहे. स्थूल चोरी बंद होते तेव्हा तर उच्च कुळात जन्म होतो. परंतु सूक्ष्म चोरी म्हणजे ट्रिक्स करणे, हे तर हार्ड(तीव्र) रौद्रध्यान आहे आणि त्याचे फळ नर्कगति आहे. हे कापड मापताना ताणून कमी दिले, तर ते हार्ड रौद्रध्यान आहे. ट्रिक तर अजिबात नसावी. ट्रिक केली कशास म्हणतात? 'फार उत्तम माल आहे' असे सांगन भेसळयुक्त माल देऊन जो मनात खुष होतो. आणि जर आपण विचारले की, 'असे करणे बरे आहे का?' तर म्हणतो कसा, 'हे तर असेच करावे लागते,' पण ज्याला प्रामाणिकपणाची इच्छा आहे त्याने काय म्हणावे Page #32 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार २१ की, 'माझी इच्छा तर चांगलाच माल देण्याची आहे, पण हा असा माल आहे तो घेऊन जा.' इतके सांगितले तरी आपली जबाबदारी राहत नाही! म्हणजे ही सर्व माणसे कितपत प्रामाणिक आहेत? जोपर्यंत त्यांना काळाबाजाराचा अधिकार प्राप्त झाला नाही तोपर्यंत. प्रश्नकर्ता : लक्ष्मी किती प्रमाणात मिळवली पाहिजे? दादाश्री : असे काही नाही. रोज सकाळी आंघोळ करावी लागते ना? तर कुणी असा विचार करतो की एकच तांब्या पाणी मिळाले तर काय होईल? तसेच लक्ष्मीचाही विचार करत राहण्याची गरज नाही. दीड बालदी मिळेल ते निश्चतच आहे आणि दोन तांबे मिळतील तर तेही निश्चितच आहे. त्यात कुणीही कमी जास्त करू शकत नाही. म्हणून मन-वचन-कायेने तू लक्ष्मीसाठी प्रयत्न कर, पण इच्छा मात्र करू नकोस. ही लक्ष्मीजी म्हणजे एका प्रकारे बँकबॅलेन्स आहे. बँकेत(पूर्वीची) शिल्लक असेल, तरच मिळेल ना? कुणी लक्ष्मीची इच्छा केली, तर लक्ष्मीजी म्हणतात, 'तुला या जुलैमध्ये पैसे मिळणार होते, पण ते आता पुढच्या जुलैमध्ये मिळतील.' आणि जर कुणी म्हटले, 'मला पैसे नकोत.' तर तोही मोठा गुन्हा आहे. लक्ष्मीजीचा तिरस्कारही करू नये आणि इच्छाही बाळगू नये. त्यांना तर नमस्कार केला पाहिजे. त्यांचा विनय केला पाहिजे. कारण ती तर हेड ऑफिसात आहे. लक्ष्मीजींचे आगमन, तर त्याचा काळ परिपक्व झाला की होणारच असते. हे तर इच्छा करीत राहिल्याने अंतराय (विलंब) होतो, लक्ष्मीजींचे म्हणणे असे की, 'ज्या काळी ज्या परिसरात राहायला हवे त्याकाळीच राहायला पाहिजे, आणि आम्ही योग्य वेळेवर पाठवूनच देतो. तुझा प्रत्येक ड्राफ्ट वगैरे सर्वकाही तुला अगदी वेळेवर मिळेल. पण माझी इच्छा मात्र करू नकोस. कारण जे नियमशीर आहे, ते व्याजासकट पाठवून देतो. जो इच्छा करीत नाही, त्याला वेळेवर पाठवून देतो.' लक्ष्मीजी आणखी काय म्हणतात? की, 'तुला मोक्ष हवा असेल तर हक्काची लक्ष्मी मिळेल त्याचाच स्वीकार कर, कुणाचेही हिसकावून किंवा लुबाडून घेऊ नकोस. या लक्ष्मीजींची जेव्हा आमच्याशी भेट होते तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की 'बडोद्यात मामाची पोळ, आणि सहावे घर, जेव्हा अनुकूल Page #33 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार असेल तेव्हा आपले स्वागत आहे आणि जेव्हा जायची इच्छा असेल तेव्हा जावे. आपलेच घर आहे. स्वागत आहे.' एवढे आम्ही सांगतो. आम्ही विनय चुकत नाही. २२ दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीजींना कधीही झिडकारू नये. काही जण म्हणतात की 'हमको नहीं चाहिए, लक्ष्मीजी को तो हम टच भी नहीं करते.' ते लोक लक्ष्मीजींना शिवत नाहीत त्यास हरकत नाही, पण जे अशी वाणी बोलतात, अशी भावना करतात ही जोखीम आहे. पुढचे कितीतरी जन्म लक्ष्मीशिवाय भटकावे लागेल. लक्ष्मीजी तर 'वीतराग' आहेत, 'अचेतन वस्तू' आहेत. त्यास कधीही झिडकारू नये. कुणालाही झिडकारले मग ते चेतन असो किंवा अचेतन असो, त्याची प्राप्ती होणार नाही. आम्ही 'अपरिग्रही आहोत' असे बोलायला हरकत नाही. पण 'लक्ष्मीजीला कधीही शिवणार नाही' असे बोलू नये. लक्ष्मीजी तर साऱ्या जग व्यवहाराचे ‘नाक' म्हटले जाते. 'व्यवस्थित शक्तिच्या' नियमाच्या आधारावर सर्व देवी-देवता प्रस्थापित आहेत, म्हणून कधीही त्यांचा तिरस्कार करू नये. लक्ष्मीचा त्याग करायचा नाही, पण अज्ञानाचा त्याग करायचा आहे. काही माणसे लक्ष्मीचा तिरस्कार करतात. जर कोणत्याही वस्तूचा तिरस्कार केला तर ती वस्तू पुन्हा कधी मिळतच नाही. केवळ निस्पृह होणे, हा तर मोठा वेडेपणाच आहे. संसारी भाव करण्यात आम्ही निस्पृही आहोत आणि आत्म्यासंबंधी भाव करण्यात सस्पृही आहोत. सस्पृही - निस्पृही असेल तरच त्याला मोक्ष मिळेल. म्हणून प्रत्येक प्रसंगाचे स्वागत करा. काळे नाणे कशास म्हणायचे, ते समजावतो. हे पूराचे पाणी घरात घुसले तर काय आपण खुष व्हायचे की घर बसल्या पाणी आले ? मग जेव्हा पूर ओसरला की पाणी तर वाहून जाईल पण नंतर जो चिखल उरेल तो धुवून काढता, काढता तर नाकी नऊ येतील. हे काळे नाणे पूराच्या पाण्यासारखे आहे. ते रोमारोमात डंख मारुन जाईल. म्हणून मला शेठजींना सांगावे लागले की सावध राहा. Page #34 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार जोपर्यंत आडधंदा सुरु होत नाही तोपर्यंत लक्ष्मीजी घर सोडून जात नाही. आडधंदा म्हणजे लक्ष्मी जाण्याचे निमित्त होय ! २३ हा काळ कसा आहे ? या काळाच्या लोकांना तर कुठून माल गोळा करायचा, कसे दुसऱ्यांचे हिसकावून घ्यायचे, भेसळ करून माल कसा विकायचा, बिनहक्काचा विषय भोग करायचा, यातून सवड मिळाली तर दुसरे काही शोधणार ना? या सर्वांमुळे सुख काही वाढले नाही. सुख तर केव्हा म्हणता येईल ? मेन प्रोडक्शन केले तर. हा संसार तर बायप्रोडक्ट आहे. पूर्वी काही पुण्य केले म्हणून देह मिळाला. भौतिक वस्तू मिळाल्या, बायको मिळाली, बंगला मिळाला. जर मेहनत केल्याने मिळत असते, तर मजूराला सुद्धा मिळाले असते, पण तसे नाही. आजच्या लोकांची चुकीची समजूत झाली आहे. म्हणून हे बायप्रोडक्शनचे कारखाने सुरु झाले आहेत. बायप्रोडक्शनचा कारखाना सुरु करायचा नसतो. मेन प्रोडक्शन, म्हणजेच 'ज्ञानीपुरुषां' कडून मोक्षाचे साधन प्राप्त करून घेतले की मग संसाराचे बायप्रोडक्शन तर आपसूकच फुकटात मिळेल. बायप्रोडक्शनसाठी तर अनंत अवतार वाया घालवले, दुर्ध्यान करून ! एकदा मोक्ष प्राप्त झाला की सगळा घुमाकूळ संपेल ! या भौतिक सुखापेक्षा अलौकिक सुख मिळवायला हवे की ज्या सुखाने आपल्याला तृप्ती मिळेल. या लौकिक सुखाने तर उलट मनस्ताप वाढतो. ज्या दिवशी पन्नास हजाराची विक्री होते ना, तेव्हा नोटा मोजूनमोजूनच माणूस थकून जातो. डोके असे फिरते की खाणे-पिणे सुद्धा नकोसे वाटते. कारण मला पण विक्रीचा पैसा मिळत होता, ते मी पाहिले होते, की तेव्हा डोक्याची काय स्थिती होत असते ! हे सर्वच मी अनुभवले आहे. मी तर हा समुद्र पोहून बाहेर निघालोय, त्यामुळे मला हे सर्व कळते की तुम्हाला काय होत असेल. जास्त रुपये आले की जास्त गुदमरायला होते, मेंदू डल (मंद) होऊन जातो आणि काहीच आठवत नाही, बैचेनी, बैचेनी होत राहते. हे तर नोटाच मोजत राहतात, पण त्या नोटा सर्व इथल्या इथेच पडून राहिल्या आणि मोजणारे मात्र निघून गेले ! नोटा तर सांगतातच, 'की तुला समजून घ्यायचे असेल तर समजून घे की, 'आम्ही (इथेच ) राहू आणि तू जाशील!' म्हणून आपण त्याच्याशी वैर बांधायचे नाही, पैशाला Page #35 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार सांगावे की, 'आपण यावे' कारण त्याची गरज आहे! सर्वांचीच गरज आहे ना? पण त्यामागेच तन्मायाकार राहिलो, तर मोजाणारे गेले आणि पैसे राहिले. तरीपण मोजावे तर लागतेच, मोजल्याशिवाय तर गत्यंतरच नाही ना? एखादाच असा शेठ असेल की जो त्याच्या मुनिमला सांगतो की 'बाबा, मला जेवताना अडचण करू नका, पैसे आले तर तुम्ही निवांतपणे मोजून तिजोरीत ठेवा आणि तिजोरीतून घ्या.' त्यात दखल करीत नाही, असा शेठ क्वचितच असेल ! हिंदुस्तानात असे दोन-चार शेठ असतील, जे निर्लेप राहू शकतात! ते माझ्यासारखे! मी कधीही पैसे मोजत नाही!! हा कसला नसता व्याप!! आज वीस-वीस वर्षे झाली, मी लक्ष्मी हातात घेतली नाही. त्यामुळेच तर इतका आनंदात असतो ना! जोपर्यंत व्यवहार आहे, तोपर्यंत लक्ष्मीजींची आवश्यकता आहे, हे मान्य आहे परंतु त्यात तन्मयाकार होऊ नका. तन्मयाकार नारायणाशी व्हायचे, फक्त लक्ष्मीजींच्याच मागे लागलो तर नारायण चिडतील. लक्ष्मीनारायणाचे तर देऊळ आहे ना! लक्ष्मी काही सर्व सामान्य वस्तू आहे ? पैसे कमावताना जसा आनंद होतो, तसाच आनंद खर्च करताना सुद्धा झालाच पाहिजे. पण तेव्हा तर म्हणतो की, 'इतके सारे पैसे खर्च झाले!' ____ पैसे खर्च होऊन जातील अशी जागृती ठेवायचीच नाही. म्हणून (चांगल्या कामासाठी) पैसे वापरा असे म्हटले आहे, की ज्याने लोभवृत्ती सूटेल, आणि पुन्हा पुन्हा दिले जातील. भगवंतांनी सांगितले हिशोब करत बसू नका. भविष्यकाळाचे ज्ञान असेल तरच हिशोब करा. अरे, तुला हिशोबच करायचा असेल तर उद्या मेलो तर! असा हिशोब कर की?! रुपयांचा नियम असा आहे की ते काही काळापर्यंत टिकणार आणि मग निघून जाणार. जाणार म्हणजे जाणारच. रुपया फिरतच राहतो, मग तो फायदा घेऊन येईल, नुकसान घेऊन येईल, किंवा व्याजही घेऊन येईल, पण फिरत तर राहणारच. तो बसून राहत नाही. तो स्वभावानच चंचल आहे. त्यामुळे जेव्हा हा वर चढतो(धनवान होतो) तेव्हा त्याला फसल्यासारखे वाटते. उतरताना मात्र कठीण होते. चढताना तर हौशीने, Page #36 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार खुशाल चढून जातो. चढताना असा पकडून-पकडून जोरात चढतो, पण उतरताना मांजर कसे मडक्यात तोंड खुपसते, जोर लावून खुपसते आणि मग परत काढताना कशी अवस्था होते? तसे घडते. हे धान्याचे बी सुद्धा तीन-पाच वर्षात निर्जीव होऊन जाते, नंतर उगवत नाही. पूर्वीतर लक्ष्मी पाच पिढ्यांपर्यंत टिकायची, तीन पिढ्यांपर्यंत तर टिकायचीच. आणि आता तर एक पीढी सुद्धा टिकत नाही, माणसाच्या हयातीत येते आणि त्याच्या हयातीतच निघून सुद्धा जाते. एक पीढी सुद्धा टिकत नाही, अशी ही लक्ष्मी आहे. ही तर पापानुबंधी पुण्याची लक्ष्मी आहे. त्यात थोडी पुण्यानुबंधी पुण्याची लक्ष्मी असते, ती तुम्हाला येथे (दादाजींच्या सत्संगात) येण्याची प्रेरणा देते, आमच्याशी भेट घालून देते आणि येथे तुम्हाला खर्चही करायला लावते. सन्मार्गाने लक्ष्मी वापरली जाते. नाहीतर हे सर्व धूळीतच जायचे. सगळं गटारातच जाणार. ही मुले आपण मिळविलेल्या लक्ष्मीचाच उपभोग करतात ना, आपण मुलांना म्हटले की तुम्ही माझ्या लक्ष्मीचा उपभोग करता. तर ते म्हणतात, 'तुमची कसली? आम्ही आमच्याच लक्ष्मीचा उपभोग करतोय' असे म्हणतात. म्हणजे गटारातच गेले ना सगळे ! या जगाला यथार्थपणे, 'जसे आहे तसे' समजता आले तर जीवन जगण्यासारखे आहे, यथार्थ जाणून घेतले तर संसारीक चिंता, उपाधी होणार नाहीत. तेव्हा मग जीवन जगण्यासारखे वाटेल! ___ (२) लक्ष्मीशी जुळलेला व्यवहार श्रीमंती काय केल्याने मिळू शकते? लोकांना अनेक प्रकारे मदत केली असेल, तेव्हा लक्ष्मी आपल्या घरी येते ! नाहीतर लक्ष्मी येत नाही. लक्ष्मी तर देण्याची इच्छा असेल त्यांच्याकडेच येते. जो दुसऱ्यांसाठी झिजतो, स्वत:ची फसवणूक पण होऊ देतो, नोबिलिटी ठेवतो, त्याच्याकडे Page #37 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार लक्ष्मी येते. लक्ष्मी निघून गेली असे वाटते खरे, पण परत होती तिथेच येऊन उभी राहते. पैसे कमविण्यासाठी पुण्याची गरज आहे. बुद्धीच्या जोरावर पैसे मिळविण्यासाठी धडपड केल्याने तर उलट पाप बांधले जाते. माझ्यात बुद्धी नाही म्हणून पाप बांधले जात नाहीत. आमच्यात (दादाश्री) बुद्धी एक परसेन्टही नाही! दयाळू, दुसऱ्याचा विचार करणारा स्वभाव माझा! वसुली करण्यासाठी जायचे झाले तर तिथे उलट पैसे देऊन येईन!!! तसे तर वसुली करण्यासाठी कधी जातच नव्हतो. पण कधी जायचे झाले, आणि त्या दिवशी ते अडचणीत असतील तर उलट त्यांना देऊन परत येईन. माझ्या खिशात उद्याच्या खर्चासाठी काही ठेवले असतील तर तेही देऊन येईन. आणि दुसऱ्या दिवशी खर्च करताना हात आखडून राहायचा. असे माझे जीवन व्यतीत झाले आहे. प्रश्नकर्ता : जास्त पैसे झाले की माणूस मोहात अडकतो, असेच ना? जास्त पैसे असणे म्हणजे ते दारु सारखेच आहे, नाही का? दादाश्री : प्रत्येकाची नशा चढते. जर नशा चढत नसेल तर पैसे जास्त झाले तरी हरकत नाही. पण नशा चढली की झाला दारुड्या, मग त्या खुमारीतच भरकटत असतात लोकं! इतरांचा तिरस्कार करतात, 'हा गरीब आहे, असा आहे, तसा आहे.' आला मोठा श्रीमंत, लोकांना गरीब म्हणणारा! स्वतः श्रीमंत! माणसाला गरीबी केव्हा येईल हे सांगता येत नाही. तुम्ही म्हणता तसेच आहे! नशा वाढत असते. आयुष्यभर जगातील लोक पैशांच्या मागेच लागले आहेत. आणि पैशांनी तृप्त झाला असेल, असा एकही मनुष्य मी पाहिला नाही. तर मग हे सर्व गेले कुठे? अर्थात् ही सर्व थापेबाजीच चालत आहे. धर्माचे एक अक्षरही समजत नाहीत आणि सगळे असेच चालत राहते. म्हणून जेव्हा संकट येऊन ठेपते, तेव्हा काय करावे हे त्यांना कळतच नाही. डॉलर येऊ Page #38 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार २७ लागले की उड्या मारत राहील. पण अडचण पडली की मार्ग कसा काढायचा ते समजत नाही. त्यामुळे निव्वळ पापाचीच शिदोरी बांधतो. त्या वेळेला पाप न बांधता वेळ कशी निभावून घ्यावी इतके समजले तर तोच धर्म आहे. नेहमी सूर्योदय होतो आणि सूर्यास्त होतो, हा जगाचा नियम आहे. तर हा कर्मोदय होतो तेव्हा पैसे आपोआपच वाढत जातात सर्व प्रकारे गाड्या-बीड्या, बंगले, वाढत जातात. सगळेच वाढत जाते. पण जेव्हा चेन्ज होतो तेव्हा सगळे विखुरले जाते. आधी जमा होते नंतर विखुरले जाते त्यावेळी शांती टिकवून असावे, हा सर्वात मोठा पुरुषार्थ! सख्खा भाऊ पन्नास हजार डॉलर परत करत नाही. अशा परिस्थितीत जीवन कसे व्यतीत करायचे हा पुरुषार्थ म्हणायचा. सख्ख्या भावाने पन्नास हजार डॉलर घेतलेले परत दिले नाही आणि वरुन शिव्या दिल्या. अशा परिस्थितीत जीवन कसे जगावे, हा पुरुषार्थ आहे. आणि जर एखाद्या नोकराने, ऑफिसातून दहा हजाराचा माल चोरी केला. तिथे कसे वर्तन करावे हा पुरुषार्थ आहे. नाहीतर अशावेळी योग्य समज नसल्यामुळे सर्वकाही धुळीत मिळून जाते आणि स्वत:चा जन्म वाया जातो. प्रश्नकर्ता : आपल्या आप्तवाणीत सांगितलेलेच आहे ना की 'तू जर कुणाला हजार-दोन हजार रुपये देतोस, तर ते कशाला देतोस? ते तू तुझ्या अहंकारासाठी आणि मानासाठी देतोस. दादाश्री : मान विकला त्याने. त्याने 'अहंकार' विकला तर तो आपण घ्यायला हवा. आपण खरीदावा. मी तर आयुष्यभर अहंकाराची खरेदी करत होतो. अहंकार विकत घ्यावा. प्रश्नकर्ता : म्हणजे काय दादा? दादाश्री : तुमच्याजवळ पाच हजार मागायला आला, त्याच्या डोळयात लाज दिसते की नाही?! Page #39 -------------------------------------------------------------------------- ________________ २ . पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : मागतो त्यावेळी तो लाज सोडून आपल्याला 'अहंकार' विकतो. तर आपण तो खरीदावा. जर आपल्याजवळ शिल्लक असेल तर! पैसे मागायला जाणे बरे वाटते? सख्ख्या काकाजवळ मागायला जाणे सुद्धा आवडेल का? का नाही आवडत? अरे, नातेवाइकाकडे मागायला सुद्धा आवडत नाही. वडिलांजवळ मागायला पण आवडत नाही. हात पसरायला नकोसे वाटते. प्रश्नकर्ता : त्याचा अहंकार आपण विकत घेतला. पण त्याचा अहंकार आपल्या काय कामाचा? दादाश्री : ओहोहो! त्याचा अहंकार विकत घेतला. म्हणजे त्याच्यात ज्या शक्ति आहेत त्या आपल्यात प्रकट झाल्या! तो बिचारा अहंकार विकायला आला. प्रश्नकर्ता : हात-पाय चांगले असताना सुद्धा कुणी जर भीक मागू लागला, तर त्याला दान देण्यास मनाई करणे हा गुन्हा आहे का? । दादाश्री : दान दिले नाही त्यास हरकत नाही, पण तुम्ही जर त्याला म्हणालात की, 'असा रेड्यासारखा धष्टपुष्ट असून सुद्धा हे असे का करतोस? असे आपण म्हणता कामा नये. तुम्ही सांगा की 'बाबा, मी देऊ शकत नाही.' समोरच्या माणसाला दु:ख होईल असे आपण बोलूच नये. वाणी अशी गोड असावी की ज्याने समोरच्या माणसाला सुखद वाटेल. वाणी हे तर सर्वात मोठे धन आहे आपल्याजवळ. दुसरे धन तर टिकेल किंवा नाही सुद्धा टिकणार, पण वाणीचे धन हे सदैव टिकणारे असते. तुम्ही चांगले शब्द बोललात, तर समोरच्या माणसाला आनंद होईल. तुम्ही त्याला पैसे नाही दिले तरी हरकत नाही, पण चांगले गोड शब्द बोला ना! इथे मोठा बंगला बांधला तर तुम्ही जगाचे भिकारी बनाल. छोटा बंगला तर जगाचे तुम्ही राजे! कारण हे पुद्गल(जे पुरण आणि गलन Page #40 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार होते) आहे. हे पुद्गल जर वाढले तर आत्मा (प्रतिष्ठित आत्मा) हलका होऊन जातो. आणि पुद्गल हलके झाले तर आत्मा जड होतो. या संसारचे दुःख जे आहे, ते आत्म्याचे विटामिन आहे. आणि जे सुख आहे, ते देहाचे विटामिन आहे. रुपयाचा स्वभाव नेहमीच कसा असतो? चंचल, म्हणून तुम्ही दुरुपयोग होणार नाही अशा पद्धतीने त्याचा सदुपयोग करावा. त्याला स्थिर राहू देऊ नका. ही संपत्ति किती प्रकारची म्हणायची? तेव्हा म्हणे स्थावर (अचल) आणि जंगम(चल). जंगम संपत्ति म्हणजे हे रुपये, डॉलर्स इत्यादी, आणि स्थावर म्हणजे हे घर इत्यादी. पण त्यातही स्थावर संपत्ति ही जास्त टिकते. आणि जंगम म्हणजे रोकडे डॉलर्स वगैरे जे असतात, ते तर जाण्याच्या मार्गाचेच समजा ना. अर्थात् रोकडचा स्वभाव कसा आहे? तर दहा वर्षानंतर अकराव्या वर्षी टिकत नाही. नंतर सोन्याचा स्वभाव तो चाळीस-पन्नास वर्षे टिकण्याचा आहे. आणि स्थावर मिळकतीचा स्वभाव शंभर वर्षे टिकण्याचा आहे. अर्थात् सर्वांचा मुदत काळ हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. पण शेवटी तर सर्व जाणारच आहे. त्यामुळे हे सर्व समजून-ऊमजून करावे. हे व्यापारी पूर्वी काय करायचे, रोकडे पैसे पंचवीस टक्के व्यापारात, पंचवीस टक्के, व्याजावर ठेवत होते, पंचवीस टक्के सोन्यात आणि पंचवीस टक्के घरासाठी गुंतविणार. अशा प्रकारे आपल्या मुद्दलाची व्यवस्था करीत असत. फार हुशार लोक! या काळात तर मुलांना असे काही शिकवलेलेही नसते. कारण या काळात तेवढी मुद्दलच उरत नाही, तर शिकवणार काय? या पैशांचे काम असे आहे की अकराव्या वर्षी पैसा नाश पावतो, नेहमीच, दहा वर्षांपर्यंतच चालतो. तर ही खऱ्या पैशांची गोष्ट. समजलात ना? खोट्या पैशांची तर गोष्टच वेगळी! खरे धन ते अकराव्या वर्षी संपते ! प्रश्नकर्ता : शेयर बाजारात सट्टाबाजी करणे चांगले की सोने घेतलेले बरे! दादाश्री : शेयर बाजारात तर जाऊच नये. शेयर बाजारात तर खेळाडू लोकांचेच काम. मधले सर्व तर फार अडचणीत सापडतात. यात Page #41 -------------------------------------------------------------------------- ________________ ३० पैशांचा व्यवहार तर खेळाडूचाच फायदा होतो! पाच-सात मुख्य खेळाडू मिळून भाव ठरवून टाकतात. त्यामुळे मधल्या लोकांची वाट लागते! पण यात कुणाचा तरी फायदा होतोच ना! तर यात मोठ्या खेळाडूंचा फायदा होतो, कारण ते रात्रंदिवस हेच करत असतात ना! हे मधले लोक जे इथून कमावून तिथे टाकतात, ते सर्वच मारले जातात. आणि छोटे लोक जे झेप घेऊ शकत नाहीत त्यांचा खर्च जेमतेम निघतो. म्हणून आमच्या नातेवाईकाने जेव्हा मला विचारले, तेव्हा मी त्यांना सांगितले की तुम्ही तर यात पडूच नका. प्रश्नकर्ता : दादाजी, आपले अमेरिकन महात्मा विचारतात की आम्ही जी थोडीफार कमाई केली आहे, ती घेऊन इंडियाला परतावे का? मुलांची विशेष काळजी वाटते, कारण हवे तसे संस्कार त्यांना इथे मिळत नाहीत. दादाश्री : होय, हे सर्व तर खरे आहे. इथे जर पुरेसे पैसे कमावून घेतले असतील तर आपण आपल्या घरी, इंडियाला परत यावे. मुलांना चांगले शिक्षण द्यावे. प्रश्नकर्ता : आपण म्हणालात की पैसे कमावून घेतले की निघून जावे, परंतु पैशांची तर काही लिमीट नसते, त्यामुळे आपण अशी काही लिमीट आखून द्या. सांगा की इतकी लिमीट झाली की पैसे घेऊन आम्ही इंडियाला परत जाऊ. दादाश्री : होय, हिंदुस्तानात तुम्हाला काही धंदा-रोजगार करायचा असेल, तर त्यासाठी काही भांडवल वगैरे लागेल, तेव्हा व्याजाने पैसे घ्यायची पाळी येऊ नये अशी व्यवस्था करावी. थोडेफार बँकेकडून घ्यावे लागले तर ठीक आहे. बाकी कुणी उधार देणार नाही. तिथे तर कुणी उधार देत नाही, पण इथे अमेरीकेतही कोणी देणार नाहीत, बँकच उधार देईल. म्हणजे तेवढे सोबत घेऊन यायचे. बिझनेस तर करावाच लागेल ना, तिथेही खर्च तर काढावा लागणार ना! पण तिथे इंडियात मुले खूप चांगली होतात. इथे डॉलर मिळतात, पण संस्कारांची कमतरता आहे ना! ___ अमेरीकेत आम्हाला मोठ्या दुकानात घेऊन जातात. म्हणतात, चला दादाजी. तर दुकान बिचारे आमच्या पाया पडत राहते, की धन्य Page #42 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार आहे! जरा सुद्धा दृष्टी बिघडवली नाही आमच्यावर! संपूर्ण दुकानातल्या कोणत्याही वस्तूवर दृष्टी बिघडवली नाही! आमची दृष्टी बिघडणारच नाही ना. आम्ही पाहतो सर्व पण आमची दृष्टी बिघडत नाही. आम्हाला कुठल्याही वस्तूची काय गरज? मला कोणत्याही वस्तूचा खपच नाही ना! तुझी दृष्टी तर बिघडते ना! प्रश्नकर्ता : आवश्यकता असेल ती वस्तू घ्यावी लागते. दादाश्री : आमची दृष्टी बिघडत नाही. दुकान आम्हाला असे नमस्कार करीत राहते, की असा पुरष पाहिलाच नाही कधी! पुन्हा तिरस्कारही नाही. फर्स्ट क्लास, रागही नाही, द्वेषही नाही. काय म्हटले? वीतराग! आले वीतराग भगवंत! एक महात्मा विचारतात की शेयर बाजाराजाचे कामकाज मी बंद करावे की सुरू ठेवावे? मी म्हटले बंद करून टाका. आतापर्यंत जेवढे केले तेवढे पैसे खेचून घ्या, पण आता मात्र बंद करायला हवे. नाहीतर अमेरीकेत आला काय आणि गेला काय, सारखेच होईल! होते तसेच्या तसे. रिकामे खिसे घेऊन घरी जावे लागेल. व्याज घेण्याच्या व्यापारात पडलेला मनुष्य, हा मनुष्य मिटून कोण बनेल, हे केवळ देवालाच माहित! तुम्ही बँकेत ठेवलेत तर हरकत नाही, दुसऱ्या कुणाला उधार दिलेत तरी हरकत नाही, पण व्याज खाण्याच्या नादी लागला, तो दोन टक्के, दीड टक्के, सव्वा टक्के, अडीच टक्केच्या भट्टीत पोळत राहतो. अशा माणसाचे पुढे काय होईल ते सांगता येत नाही. सध्या मुंबईत सर्वांचीच अशी स्थिती झालेली आहे. ___ व्याज घेण्यास हरकत नाही, पण हा तर व्याज घेण्याचा व्यापारच सुरु करतो, धंदाच व्याज खाण्याचा. तुम्ही काय करायला हवे? ज्याला व्याजाने दिले त्याला सांगावे की बँकेत जितके व्याज देतात तितके व्याज तुम्ही मला द्यावे लागेल. आणि तरीही समजा एखाद्या माणसाजवळ व्याज देण्याची ऐपत नाही, मुद्दल सुद्धा नाही, तर तिथे मौन राहावे. त्याला दु:ख होईल असे वर्तन करू नये. आपले पैसे बुडाले असे समजून चालवून घ्यायचे. समुद्रात पडले, तर त्याचे काय करता येईल? Page #43 -------------------------------------------------------------------------- ________________ 3 पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : जर सरकार एबाव नॉर्मल टॅक्स थोपत असेल, तर नोर्मेलिटी आणण्यासाठी लोक टॅक्सची चोरी करतात, तर त्यात काय चुकीचे आहे ? दादाश्री : लोभी माणसाचा लोभ कमी करण्यासाठी टॅक्स ही उत्तम वस्तू आहे. लोभी माणसाचे कसे असते की पाच करोड झाले तरी मरेपर्यंत त्याला संतोष होत नाही. तेव्हा मग वरच्यावर असा दंड मिळतो, त्यामुळे तो मागे वळतो, म्हणून ही तर चांगली गोष्ट आहे. इन्कमटॅक्स कशास म्हणायचा? जर पंधरा हजाराहून अधिक कमावत असेल तर. पंधरा हजारापर्यंत तर ते लोक सोडतात बिचारे, मग त्या पंधरा हजारात एका छोट्या कुटुंबाला चैनीत खाण्या-पिण्यात अडचण होणार नाही! छोट्या कुटुंबावर आफ्रिकेत जास्त टॅक्स लावत नाही ना! प्रश्नकर्ता : देवाची भक्ति करणारे गरीब का असतात आणि दुःखी का असतात? दादाश्री : भक्ति करणारे? त्याचे असे आहे, भक्ति करणारे दुःखी असतात असे काही नसते, पण काही माणसे तुम्हाला दु:खी दिसतात! बाकी, भक्ति केल्यामुळे तर ह्या लोकांकडे बंगले-गाडी आहेत. तात्पर्य भगवंताची भक्ति करणारा दुःखी असेल असे घडत नसते, पण हे दु:ख तर त्याच्या मागच्या जन्माचा हिशोब आहे. आणि सध्या भक्ति करत आहे हा त्याचा नवीन हिशोब आहे. त्याचे तर जेव्हा फळ येईल, तेव्हा येईल. तुम्हाला समजले ना? हे तर पूर्वी जे जमा केलेले त्याचे फळ त्याला आज मिळाले. आणि आता जे करीत आहे, जे चांगले करीत आहे त्याचे फळ त्याला नंतर मिळेल. समजले ना? तुम्हाला समजेल अशी गोष्ट आहे ना? समजत नसेल तर सोडून देऊ ही गोष्ट. प्रश्नकर्ता : मानसिक शांती मिळविण्यासाठी माणसाने कुणी गरीब अशक्त माणसांची सेवा करावी, की मग देवाची भजना करावी? किंवा मग कुणाला दान द्यावे? काय करावे? Page #44 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार दादाश्री : मानसिक शांती हवी असेल तर आपल्या वाट्याचे दुसऱ्याला खाऊ घालावे. उद्या आईसक्रीमचा डबा भरून घेऊन ये आणि या सर्वांना खाऊ घाल. मग त्यावेळी किती आनंद होतो ते तू मला सांग. या कबूतरांना, पक्ष्यांना तू दाणे घालतोस तेव्हा ते किती आनंदाने उड्या मारतात. आणि तू त्यांना दिलेस, तुझी स्वतःची वस्तू दुसऱ्यांना दिलीस, की आत आनंदाची सुरुवात होते. आता रस्त्याने चालताना एखादा माणूस पडला आणि त्याचा पाय मोडला आणि रक्त वाहू लागले, त्यावेळी तुझे धातेर फाडून पट्टी बांधलीस तर तेव्हा तुला आनंद होईल. या मुला-मुलींची लग्ने कशी होतात? असे आहे ना, मुलींच्या लग्नात खर्च जास्त होतो, मुली स्वत:चे सर्व घेऊनच येतात, त्याच बँकेत जमा करवितात. मुलींचे पैसे बँकेत जमा होतात आणि वडील खुष होतात की बघा, मुलीच्या लग्नात मी सत्तर हजार रुपये खर्च केले, त्या काळात! त्या काळची गोष्ट करीत आहे. अरे बाबा, तू काय केलेस? तिचे पैसे बँकेत जमा होते. तू तर आहेस तसाच आहेस, ‘पावर ऑफ एटर्नी' आहेस. त्यात तुझे काय? पण रुबाब मात्र तो करतो. आणि एखादी मुलगी (स्वत:च्या नशीबात) तीन हजार घेऊन आली असेल, आणि त्या वेळेला तिच्या बापाच्या व्यवसायात मंदीचा काळ असेल. तर तिचे लग्न तीन हजारातच होईल. कारण ती जितके पैसे घेऊन आली आहे तितका खर्च केला जातो. ह्या मुले-मुली सर्वांचे स्वतःचेच पैसे आहेत. आपण जे जमा करून ठेवतो ना, ते तर त्याची वहीवाट तेवढी आपण सांभाळतो. बस, तेवढेच आपल्या हातात असते. आपल्याकडे लोक म्हणतात, मी दुधात धुवून पैसे परत करीन. अरे वेड्या, हा अहंकार व्यर्थ आहे. मोठा आला दुधाने धुवून देणारा। मला पैसे परत करायचे आहेत असा भाव करावा, तेव्हा मग दिले जातील. घेताना, 'मला परत करायचे आहेत,' असे मनात ठरवून जो पैसे घेतो, त्याचा व्यवहार फार सुंदर होतो, हे मी पाहिले आहे ! आधी काहीतरी निश्चय तर करायला हवा ना! नंतर विपरीत संयोग जुळून आले, ती Page #45 -------------------------------------------------------------------------- ________________ ३४ पैशांचा व्यवहार गोष्ट वेगळी आहे, परंतु आपला निश्चय तर असला पाहिजे ना! हेच तर 'पझल' आहे! आपण विचारले की साहेब आपण काळजीत आहात की काय? तर म्हणतात, 'काय करू? ही तीन दुकाने, इथे सांभाळायचे तिथे सांभाळायचे!' आणि शेवटी स्मशानात जाताना नारळ तर फक्त चारच घेऊन जायचे. दुकाने तीन असोत, दोन असोत किंवा एक असो. नारळ तर चारच, आणि ते सुद्धा बिन पाण्याचे. म्हणेल कसा, 'तीन दुकाने सांभाळायची आहेत मला, एक दुकान फोर्टमध्ये आहे, एक कापडाचे दुकान इथे आहे, एक भूलेश्वरमध्ये आहे.' पण शेठजीचे तोंड तर एरंडेल पिल्यासारखे दिसते! जेवताना सुद्धा दुकान, दुकान, दुकान! रात्री स्वप्नात सुद्धा कापडाचे तागे मापत असतो! मरताना त्याची गोळाबेरीज येईल, म्हणून सावधानी बाळगा. धंद्याचे विचार कुठवर करायचे? तर जोपर्यंत ओझे वाटत नाही, तोपर्यंत करायचे. ओझे वाटू लागले की मग बंद करायचे. नाहीतर मरणच ओढवून घेत आहात हे समजून घ्या. चार पाय आणि वरुन शेपूट जास्तीचे मिळेल. मग हंबरणार! चार पाय आणि शेपूट समजलात ना तुम्ही? (३) व्यवसाय, सम्यक् समजपूर्वक हिंदुस्तानात मनुष्याचा जन्म मिळाला, म्हणजे तो मोक्षाच्या हेतूसाठीच असतो. त्यासाठीच आपले जीवन आहे. जर हा हेतू ठेवला असेल तर त्यात जेवढे मिळेल तेवढे खरे. पण हेतू तर असायला हवाच ना? हे खाणे-पिणे सर्व त्यासाठीच आहे. आपणास समजले ना? जीवन कशासाठी जगायचे आहे? फक्त कमविण्यासाठीच? जीवमात्र सुखाच्या शोधात आहे. सर्व दु:खापासून मुक्ति कशी मिळवायची हे समजण्यासाठीच जीवन जगायचे आहे. त्यातून मोक्षमार्ग प्राप्त करून घ्यायचा आहे. मोक्षमार्गासाठीच हे सर्वकाही आहे. Page #46 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार दोन अर्थासाठी (हेतूसाठी) लोक जगतात. आत्मार्थी जगणारा तर क्वचितच कोणी विरळा असतो. बाकीची सर्व माणसे लक्ष्मी अर्थीच जगतात. दिवसभर लक्ष्मी, लक्ष्मी, आणि लक्ष्मी ! लक्ष्मीच्या मागे तर सर्व जग वेडे झाले आहे ना! पण त्यात सुख नसतेच कधीही ! बंगले तसेच रिकामे असतात आणि दुपारी स्वतः असतो कारखान्यात. तेव्हा मग बंगल्याचा उपभोगही घेऊ शकत नाही. म्हणून आत्मज्ञान जाणून घ्या ! ही अशी आंधळी भटकंती कुठवर ? ३५ कुणी विचारले की मी कोणता धर्म पाळावा ? तर आम्ही सांगतो की या तीन वस्तूंचे पालन कर, बाबा : (१) एक तर नीतिमत्ता ! तुझ्याजवळ पैसे कदाचित कमी-जास्त असतील तरी हरकत नाही, पण नीतिमत्तेचे पालन अवश्य करावे, एवढे तरी कर, बाबा. (२) नंतर दुसरे म्हणजे, ऑब्लाइजिंग नेचर (परोपकारी स्वभाव) असावा. मदत करण्यासाठी आपल्याजवळ पैसे नसले तर बाजारात जाताना विचारावे 'तुम्हाला बाजारातून काही आणायचे असेल तर मला सांगा, मी निघालोय बाजारात.' अशा प्रकारे इतरांची मदत करावी. हा झाला ऑब्लाइजिंग नेचर. (३) आणि तिसरे म्हणजे, त्याचा मोबदला मिळावा अशी इच्छा करू नकोस. सारे जग मोबदला मिळवण्याची इच्छा बाळगणारे आहे. तुम्ही इच्छा केली तरी मोबदला मिळेल आणि इच्छा नाही केली तरी मोबदला मिळेल. अशा अॅक्शन रिॲक्शन येतात. इच्छा ही तुमची भीक आहे, की जी वाया जाते. प्रश्नकर्ता : आत्म्याच्या प्रगतीसाठी काय करत राहायला हवे ? दादाश्री : त्याने प्रामाणिकपणाची निष्ठा बाळगून चालायला हवे. ती निष्ठा अशी आहे की जेव्हा खूप आखडून जाण्याचा प्रसंग येतो, तेव्हा आत्मशक्तिचा आविर्भाव होतो. आणि जेव्हा पैशांची टंचाई नसते, भरपूर पैसे-बिशे असतात, तोवर आत्मा काही प्रकट होत नाही. प्रामाणिकपणा, हा एकच मार्ग आहे. केवळ भक्ति केल्याने होईल असे काही घडणार Page #47 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार नाही. प्रामाणिकपणा नसेल तर भक्ति करण्याचा काही अर्थ नाही. प्रामाणिकपणा जोडीला हवाच. प्रामाणिकपणामुळे मनुष्य पुन्हा मनुष्याच्या जन्माला येतो. आणि जी माणसे भेसळ करतात, बिनहक्काचे हिसकावून घेतात, बिनहक्काचा भोग करतात, ती सर्व इथून दोन पायातून चार पायात जातात. यात कोणी तसूभरही फरक करू शकत नाही. कारण बिनहक्काचे उपभोगणे हा त्याचा स्वभावच बनला आहे. म्हणून तिथे जनावरात गेला की मग भोग घेतो. तिथे तर कुणी कुणाची बायकोच नाही ना! सगळ्या बायका स्वत:च्याच की! इथे मनुष्यात तर लोक विवाहित असतात, म्हणून कुणाच्या पत्नीवर कुदृष्टी करू नकोस. पण ही तर सवयच होऊन गेलेली असते, स्वभाव झालेला असतो, त्यामुळेच तर जनावरात जातो. तिथे एक जन्म, दोन जन्म भोग घेऊन झाले की मग शहाणा होतो. तर हे सर्व जन्म त्याला सरळ करतात. सरळ झाला की मग इथे येतो. पुन्हा वाकड्यात शिरला, तर पुन्हा तिथे पाठवून सरळ केले जाते. म्हणजे असे सरळ होत होत शेवटी तो मोक्षासाठी लायक बनतो. जोपर्यंत वाकडा चालतो तोपर्यंत मोक्ष होत नाही. नीतिमय पैसा आणला तर त्यास हरकत नाही. पण अनीतिमय पैसा आणला तर समजा आपल्याच पायावर कु-हाड मारली आणि तिरडी निघेल तेव्हा ते पैसे इथेच पडून राहतील. ते मग जातात निसर्गाच्या जप्तीत. आणि त्याने इथे जो गुंता निर्माण केला, तो परत त्याला भोगावा लागणार. देवाचे भजन केले नाही पण नीतिपूर्वक राहिला तरी पुष्कळ झाले. देवाची भक्ति करतो पण नीतिपूर्वक राहत नाही त्याला काही अर्थच नाही. ते मीनिंगलेस आहे. पण तरी आपण तसे बोलू नये, नाहीतर तो परत देवाला सोडून अनीतिच वाढवत राहील. तात्पर्य, नीति सोड़ नका. त्याचे फळ चांगले येईल जगात सुख एका जागीच आहे. जिथे संपूर्ण नीति असेल. प्रत्येक व्यवहारात संपूर्ण नीति असेल, त्या जागी सुख असेल. आणि दुसरे म्हणजे जो समाजसेवक असेल, जो स्वतःसाठी नव्हे, तर परक्यासाठी जीवन जगत असेल, तर त्याला फार सुख असते, पण ते भौतिक सुख आहे. ते मूर्छचे सुख म्हणायचे. Page #48 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ३७ ही वाक्ये तुमच्या दुकानात लिहून ठेवा. (१) प्राप्ताला भोगा. अप्राप्ताची चिंता करू नका. (२) जो भोगतो त्याची चूक. (३) डिसऑनेस्टी इज द बेस्ट फुलीशनेस! जगात काहीच नाही, असे नाही. सर्व वस्तू आहेत या जगात. पण म्हणतात ना की 'सकल पदारथ है जगमांही, भाग्यहीन नर पावत नाही.' अर्थात जितकी कल्पना करता येईल तितक्या सर्व वस्तू जगात असतात पण तुमचे अंतराय(नशीबाचा अडथळा) असता कामा नये, तर त्या वस्तू तुम्हाला मिळतील. सत्यनिष्ठा पाहिजे. ईश्वर काही मदत करायला रिकामा नाही. तुमची दानत खरी असेल तेव्हाच तुमचे काम होईल. लोक म्हणतात, 'खऱ्याला ईश्वर मदत करतो!' पण नव्हे, तसे नाही. ईश्वर जर खऱ्याला मदत करत असेल तर खोट्याचा काय गुन्हा? ईश्वर काय पक्षपाती आहे ? ईश्वराला तर सर्वठिकाणी निष्पक्षपाती राहायला पाहिजे ना? ईश्वर तशी कुणालाही मदत करीत नाही. ईश्वर यात हस्तक्षेप करीतच नाही. ईश्वराच्या नामस्मरणानेच आनंद होतो. त्याचे कारण काय, तर ती मूळ वस्तू आहे. आणि ते स्वतःचेच स्वरुप आहे. म्हणून आठवण होताच आनंदाची अनुभूति होते. आनंदाचा लाभ घडतो. बाकी ईश्वर काही करीत नाही. ते काही देतच नाहीत. आणि त्यांच्यापाशी काही नाहीच, तर देणार काय? प्रश्नकर्ता : दादाजी, व्यवहार कशा पद्धतीने करावा? दादाश्री : विषमता होता कामा नये. समभाव ठेऊन निकाल करावा. आपल्याला जिथून काम करवून घ्यायचे आहे, तिथला मॅनेजर म्हणाला की, 'दहा हजार रुपये काढा, तरच तुमचा पाच लाखाचा चेक मिळेल.' आता आपल्या चोख व्यापारात किती फायदा झाला असेल? पाच लाख रुपयात दोन लाख आपल्या घरचे असतील आणि तीन लाख Page #49 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार इतर लोकांचे देणे असेल, तर आता त्या लोकांना अडकवून ठेवणे हे योग्य आहे का? म्हणून आपण त्या मॅनेजरला समजावण्याचा प्रयत्न करावा की, 'बाबा, धंद्यात मला नफा मिळाला नाही,' असे - तसे सांगून जर पाचपर्यंत तयार झाला तर ठीक नाहीतर शेवटी दहा हजार देऊनही आपला चेक मिळवून घ्यावा. आता तिथे 'मी लाच का देऊ?' असा आग्रह धरुन बसलात तर ज्यांचे पैसे धंद्यात गुंतवले आहेत त्यांना काय उत्तर देणार ? ते सर्व मागणारे तुम्हाला रागाच्याभरात शिव्या देतील ! तेव्हा जरा समजून घ्या. वेळेनुसार मार्ग काढा. ३८ लाच देणे हा गुन्हा नाही. ज्या वेळेस जो व्यवहार येऊन ठेपला, त्या वेळेस एडजस्ट होणे तुला जमले नाही, तर तो गुन्हा ठरेल. आता अशा वेळी कुठपर्यंत सत्याचे शेपूट धरुन बसायचे ? ! तर, जोपर्यंत आपल्याला एडजस्टमेन्ट करून घेता येईल, आपल्याजवळ लोकांचे कर्ज फेडण्याइतकी बँक बॅलेन्स असेल आणि लोक आपल्याला शिव्या देत नसतील, तोपर्यंत धरुन ठेवायचे, पण जर बँक बॅलेन्स कमी पडत असेल आणि पैसे मागणाऱ्यांच्या शिव्या खायची वेळ आली तर काय करावे ? तुम्हाला काय वाटते ? प्रश्नकर्ता : होय, बरोबर आहे. 4 दादाश्री : मी तर आमच्या व्यापारात सांगत होतो की, 'बाबा, देऊन ये पैसे. आपण जरी चोरी करत नाही की असले - तसले काही गैर करत नाही, तरी पण पैसे देऊनच ये.' नाहीतर लोकांना धक्के खायला लावायचे, हे आपल्यासारख्या भल्या माणसाचे काम नव्हे. अर्थात लाच दिली त्यास मी गुन्हा मानत नाही, परंतु ज्यांनी आपल्याला माल दिला, त्यांना आपण वेळेवर पैसे दिले नाही, तर त्यास मी गुन्हा म्हणतो. रस्त्यात थांबवून लुटारुंनी पैसे मागितले तर तुम्ही देणार की नाही ? की सत्यासाठी देणार नाही ? प्रश्नकर्ता : द्यावे लागतात. दादाश्री : तिथे कसे मुकाट्याने देता ? आणि इथे का देत नाही ? Page #50 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार हे दोन नंबरचे लुटारु आहेत. तुम्हाला असे नाही का वाटत की हे दोन नंबरचे लुटारु आहेत ! हे सुधारलेले लुटारु आणि ते बिनसुधारलेले लुटारु ! हे सिविलाइज्ड लुटारु आणि ते अनसिविलाइज्ड लुटारु!!! प्रश्नकर्ता : दादाजी आपण तर भगवत् प्राप्तीचा मार्ग पत्करला आहे. त्याचबरोबर आपण मोठ्या व्यवसायात सुद्धा गुंतलेले आहात. तर या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? दादाश्री : चांगला प्रश्न आहे की 'हसणे आणि पीठ खाणे' हे कसे शक्य आहे? काय म्हणता की, एकीकडे व्यवसाय करीत आहात आणि एकीकडे भगवत् प्राप्तीचा मार्ग पण पत्करला आहे, हे दोन्ही कसे शक्य झाले? पण ते शक्य आहे. बाहेरचे वेगळे चालत असते आणि आतले वेगळे चालत असते, असे आहे. दोन्ही गोष्टी वेगळ्याच आहेत. हे 'चंदुभाऊ' (वाचकांनी स्वत:चे नाव समजावे) आहेत ना, ते चंदुभाऊ वेगळे आहेत आणि आत्मा वेगळा आहे. आत दोन्ही वेगळे होऊ शकतील असे आहे. दोघांचे गुणधर्म सुद्धा वेगळे आहेत. जसे इथे सोने आणि तांबे दोन्ही एकत्रित झाले असतील, तर त्यांना परत वेगळे करायचे असेल तर करता येईल की नाही? प्रश्नकर्ता : येईल. दादाश्री : त्याचप्रमाणे या दोघांना ज्ञानीपुरुष वेगळे करू शकतात, ज्ञानीपुरुष जे पाहिजे ते करू शकतात. आणि तुम्हालाही जर वेगळे करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या येथे, लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर या. व्यवसाय चालत राहतो, पण व्यवसायात एक क्षणसुद्धा आमचा उपयोग नसतो. केवळ नाव असते तिथे. परंतु आमचा उपयोग एक क्षणसुद्धा तिथे नसतो. महिन्यातून एकदा दोन तासासाठी कदाचित मला जावे लागते आणि तेव्हा जातो सुद्धा परंतु आमचा उपयोग त्यात नसतो. उपयोग नसतो म्हणजे काय, ते समजले का तुम्हाला? हे लोक दान मागण्यासाठी जातात ना? तर कुणाकडे दान घेण्यासाठी गेलो, व आपण Page #51 -------------------------------------------------------------------------- ________________ ४० पैशांचा व्यवहार म्हणालो की या शाळेसाठी दान द्या, तर ती व्यक्ति आपल्याला मनापासून वेगळे ठेऊन व्यवहार करते. करते की नाही? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : तसेच यात (आत) सर्व वेगळे राहू शकते. यात वेगळे ठेवायचे मार्ग असतात सर्व. आत्माही वेगळा आहे आणि हे चंदुभाऊ पण वेगळे आहेत. व्यवसायात मी चित्त ठेवले नाही. व्यवसायात आयुष्यभर चित्त ठेवले नाही. व्यवसाय केला आहे हे खरे. मेहनत केली असेल, काम केले असेल, पण त्यात चित्त गुंतवले नाही. प्रश्नकर्ता : धंद्यात चिंता होते, फार अडचणी येतात. दादाश्री : चिंता झाली की समजून जायचे काम जास्त बिघडणार. चिंता झाली नाही तर समजायचे की काम बिघडणार नाही. चिंता कार्याची अवरोधक आहे. चिंतेमुळे तर धंद्याचे मरण ओढावेल. ज्यात चढ-उतार असतो त्याचेच नाव धंदा. पुरण-गलन आहे ते. पुरण झाले की गलन झाल्याशिवाय राहतच नाही. या पुरण-गलनमध्ये आपली काही मिळकत नाही, आणि जी आपली मिळकत आहे, त्यातून काहीच पुरण-गलन होत नाही. असा चोख व्यवहार आहे ! तुमच्या घरात तुमची बायको-मुले सर्व भागीदार आहेत ना? प्रश्नकर्ता : सुख-दुःखाच्या भोगात तर आहेत. दादाश्री : तुम्ही तुमच्या बायको-मुलांचे पालक समजले जाता. तर एकट्या पालकानेच का चिंता करावी? आणि घरची माणसे तर उलट म्हणत असतात की तुम्ही आमची काळजी करू नका. प्रश्नकर्ता : चिंतेचे स्वरुप काय आहे? जन्म झाला तेव्हा तर चिंता नव्हती, मग आली कुठून? दादाश्री : जसजशी बुद्धी वाढते तसतशी बेचैनी वाढते. जन्म झाला तेव्हा बुद्धी होती? व्यापार-धंद्यासाठी विचार करण्याची आवश्यकता असते Page #52 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार पण त्याच्या पुढे गेलात तर काम बिघडते. व्यापार-धंद्यासाठी दहा-पंधरा मिनटे विचार करायला हवा, पण त्याच्या पुढे जाऊन विचारांचे पीळ चढू लागले तर नोर्मालिटीच्या बाहेर गेलात असे म्हटले जाईल, तेव्हा त्यास सोडून द्या. व्यवसायाचे विचार तर येतील पण विचारांच्या गुंत्यात गुंतून राहिलो, तर मग त्याचे ध्यान उत्पन्न होते आणि त्यामुळे चिंता सुरु होते, आणि ही चिंता तर फार नुकसान करणारी आहे. प्रश्नकर्ता : मनात ठरवलेले असते की आर्तध्यान-रौद्रध्यान करायचे नाही, परंतु दुकान तोट्यातच चालत आहे, त्यामुळे हे असे होतच राहणार ना? काय करणार? दादाश्री : हे बघ, दुकान तोट्यात चालत आहे. तू तर तोट्यात चालत नाहीस ना? तोटा दुकानाला होत आहे. दुकानदारीचा स्वभावच असा असतो की त्यात तोटा पण होतो आणि नंतर फायदाही होतो. तात्पर्य असे की फायदा तोटा हे चालायचेच ! आम्ही व्यवसायाचे काम सुरु करण्यापूर्वी काय करतो? तर जेव्हा स्टीमर समुद्रात सोडायची असते, तेव्हा भटजीकडून पूजा-पाठ वगैरे सर्व करवून घेतो, सत्यनारायणाची पूजा, दुसरे आवश्यक पूजा-पाठ सुद्धा करवून घेतो. गरज भासली तर स्टीमरची देखील पूजा करतो. नंतर स्टीमरच्या कानात आम्ही सांगतो, 'तुला जेव्हा बुडायचे असेल तेव्हा बुड बाई, आमची तशी इच्छा नाही! आमची इच्छा नाही!!' असे जर बोललो नाही तर मग निस्पृह झालो असेच म्हटले जाईल, मग तर ती बुडून जाईल. आमची इच्छा नाही, असे सांगितले तर त्यामागे आमची शक्ति काम करीत असते. आणि जर बुडाली तर आपल्याला माहितच आहे की आपण कानात सांगितले होतेच ना! आपण नव्हते का सांगितले? म्हणजे एडजस्टमेन्ट घेत राहिलो तरच जगात निभाव लागेल! मनाचा स्वभाव कसा आहे की मनासारखे झाले नाही की मन निराश होऊन जाते. तसे होऊ नये म्हणून हे सर्व उपाय करायचे. मग सहा महिन्यानंतर बुडेल की दोन वर्षांनंतर, आम्ही तेव्हा एडजस्टमेन्ट घेऊन टाकतो की सहा महिने तरी निभावून नेले. व्यापार म्हणजे कसा Page #53 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार असतो, की हे टोक की ते टोक, आशेचे महाल निराशा आणल्याशिवाय राहत नाही. संसारात वीतराग राहणे फार कठीण आहे. ती तर आमची (दादाजींची) जबरदस्त ज्ञानकला आणि बुद्धिकला, दोन्हीही असल्यामुळे आम्ही वीतराग राहू शकतो. पूर्वी एकदा, आमच्या कंपनीत मोठे नुकसान झाले होते. ज्ञान होण्यापूर्वीची ही गोष्ट, तेव्हा आम्हाला रात्रभर झोप येत नव्हती. सारखी चिंता होत राहायची. तेव्हा आतून उत्तर मिळाले की यावेळी या नुकसानीची चिंता कोणाकोणाला होत असेल? मला असे वाटले की माझे भागीदार कदाचित चिंता करीत नसतीलही. मी एकटाच चिंता करीत बसलो आहे. आणि बायको-मुले सर्वच, भागीदार आहेत, पण त्यांना तर काही माहितच नाही. आणि तरी त्यांची गाडी चालत आहे, तर मी एकटाच मूर्ख की ही सर्व चिंता करीत बसलो आहे ! त्यानंतर मग माझी अक्कल ठिकाण्यावर आली. एकच पक्ष घेऊन बसला आहात? ज्या कोपऱ्यात जगाची माणसे जाऊन बसली आहेत, त्या कोपऱ्यात तुम्ही पण बसले आहात? फायद्याच्याच पक्षात. तुम्ही लोकांच्या विरुद्ध चालावे. लोक फायदा मागतात तेव्हा आपण म्हणावे 'तोटा होऊ दे.' तोटा मागणाऱ्याच्या पदरी कधी चिंता येत नाही. फायदा शोधत राहणारा नेहमी चिंतेतच असतो आणि तोटा पत्करायची तयारी दाखविणाऱ्याच्या पदरी चिंता कधी येत नाही, याची आम्ही गॅरंटी देत आहोत. आम्ही काय सांगतो ते कळतय ना? धंद्याला सुरुवात केली की माणस मनात अंदाज बांधतो की या कामात निदान चोवीस हजार तर नक्कीच मिळतील! आता जेव्हा फोरकास्ट करतो, तेव्हा पुढे परिस्थिती बदलूही शकते याचा विचार करण्यास मात्र तो विसरतो. सरळ तसेच फोरकास्ट करतो. थोडक्यात, आम्ही सुद्धा आयुष्यभर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय केलेला आहे, सर्व प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट केलेले. आणि समुद्रात जेटी सुद्धा बांधलेल्या आहेत. आता तिथे, धंद्याच्या सुरवातीला काय करीत होतो? जिथे पाच लाखाचा फायदा होऊ शकेल असे वाटत असेल, तिथे आधीच मनात ठरवित होतो की लाखभर मिळाले तरी पुरे आहेत. नाहीतर शेवटी बिना Page #54 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार नफा-नुकसान, इन्कमटॅक्सचे पैसे निघाले, व जेवण खर्च निघाला तरी चालेल. आणि नंतर मिळतात तीन लाख. तर पाहा, मनात केवढा आनंद वाटतो. कारण मानले होते त्यापेक्षा खूप जास्तच मिळाले. नाहीतर चाळीस हजार, गृहीत धरुन बसला आणि मिळाले वीस हजार, तर दु:खी होऊन जातो!! धंद्याची दोन मुले, एकाचे नाव तोटा आणि दुसऱ्याचे नाव नफा. तोटा नावाचा मुलगा कुणालाही आवडत नाही, पण दोघे एकत्र असतातच. दोघांचाही जन्म झालेलाच असतो. धंद्यात नुकसान होत असेल तर ते दिवसा होते का रात्री? आपण खूप श्रम घेतले, चोहीकडून काळजी घेतली, तरी काही पदरी पडले नाही, तर आपण समजून घ्यायला हवे की सध्या आपले संयोग बरोबर नाहीत. आता अशा परिस्थितीत जास्त जोर लावला तर उलट नुकसानच होईल, त्यापेक्षा अशावेळी आपण आत्म्याचे काम करून घ्यावे. गेल्या जन्मी हे केले नाही त्यामुळेच तर ही सर्व भानगड झाली. ज्याला आपले ज्ञान मिळाले असेल त्यांची तर गोष्टच वेगळी आहे, पण जरी आपले ज्ञान मिळाले नसेल तरीही, देवाच्या भरोश्यावर आपली नाव आपण सोडतोच ना! त्याला मग काही करावे लागते का? 'जशी देवाची इच्छा' असेच म्हणतात ना? आणि बुद्धीने मापायला गेलो, तर त्याचा कधी मेळच बसणार नाही. जेव्हा संयोग बरोबर नसतात, तेव्हा लोक कमाई करायला निघतात. खरेतर तेव्हा भक्ति करायला हवी. संयोग बरोबर नसतील अशावेळी काय करायला पाहिजे? आत्म्याचे, स्वत:च्या आत्म्यासंबंधी सत्संग इत्यादी, करत राहायचे. भाजी नसली तर नसू दे, खिचडी पुरते पैसे तरी निघतील ना? असे आहे, की योग असेल तर कमाई होईल, नाहीतर नफ्याच्या बाजारातही तोटा मिळेल, आणि जर योग असेल तर तोट्याच्या बाजारात सुद्धा फायदा होईल. योगायोगाच्या गोष्टी आहेत या साऱ्या! नफा-नुकसान, काहीही आपल्या ताब्यात नाही. म्हणून नॅचरल एडजस्टमेन्टच्या आधारावर चला. दहा लाख मिळवल्यानंतर एकदम पाच Page #55 -------------------------------------------------------------------------- ________________ ४४ पैशांचा व्यवहार लाखाचे नुकसान झाले तर? हे तर एक लाखाचे नुकसान सुद्धा पचवू शकत नाहीत ना! मग दिवसभर रडारड, चिंता, करत बसतात! अरे, वेडे सुद्धा होऊन जातात! असे वेडे झालेले आत्तापर्यंत मी बरेच पाहिले आहेत! प्रश्नकर्ता : दुकानात गिहाईक यावे म्हणून मी दुकान लवकर उघडतो आणि उशीरा बंद करतो, हे बरोबर आहे ना? दादाश्री : ग्राहकांना आकर्षित करणारे तुम्ही कोण? इतर लोक ज्यावेळी दुकान उघडतात त्यावेळी तुम्हीही उघडायचे. लोक सात वाजता उघडत असतील आणि तुम्ही साडे नऊ वाजता उघडले तर तेही बरोबर नाही. आणि लोक जेव्हा बंद करतील तेव्हा तुम्ही सुद्धा बंद करून घरी जावे. व्यवहार काय सांगतो की लोक काय करतात ते बघा. ती जेव्हा झोपतात तेव्हा तुम्ही पण झोपा. रात्री दोन वाजेपर्यंत धुमाकूळ घातला तर त्यास काय म्हणावे? जेवल्यानंतर विचार करत बसता का, की कसे पाचन होईल? त्याचा परिणाम सकाळी पाहायला मिळतोच ना? असेच धंद्यात सुद्धा आहे. खाण्या-पिण्याच्यावेळी चित्त कारखान्यात जात नसेल तर, कारखाना बरोबर आहे, पण जर खाण्या-पिण्याच्यावेळी चित्त कारखान्यात पळत असेल, तर तो कारखाना काय कामाचा? आपले हार्टफेल करविणारा कारखाना काय उपयोगाचा? तात्पर्य काय की नॉर्मालिटी समजून घ्या. परत कारखान्यात तीन शिफ्ट चालवतो. त्यात हा नवीन लग्न झालेला आहे, तेव्हा बायकोच्या मनाचेही समाधान व्हायला पाहिजे ना! घरी गेल्यावर बायको तक्रार करेल, की 'तुम्ही तर मला भेटतही नाहीत. माझ्याशी दोन शब्द सुद्धा बोलत नाही. तर हे योग्य नाही ना! संसारात योग्य दिसेल असा व्यवहार असला पाहिजे, नाही का? । घरात वडिलांबरोबर किंवा इतर मंडळीबरोबर धंद्याच्या बाबतीत मतभेद होऊ नये यासाठी तुम्ही पण 'होय बरोबर आहे,' असे सांगा. 'जसे चालत आहे तसे चालू द्या,' असे म्हणायचे पण घरात सर्वांनी मिळून असे काही ठरवायला हवे की इतकी रक्कम जमा केल्यानंतर आपल्याला जास्त नकोत. असे ठरवायला हवे. Page #56 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : त्यात कुणीही सहमत होणार नाही, दादा. दादाश्री : तर मग ते उपयोगाचे नाही. सर्वांनी मिळून ठरवायला हवे. जर ते दोनशे वर्षांच्या आयुष्याचे एक्स्टेशन मिळवून देत असतील, तर आपण चार शिफ्ट चालू करू. प्रश्नकर्ता : पण आता धंदा केवढा वाढवायला पाहिजे? दादाश्री : धंद्याचा व्याप एवढा असावा की आपल्याला निवांत झोपता येईल. जेव्हा आपल्याला बंद करायचा असेल तेव्हा बंद करता येईल, असे असले पाहिजे. धंदा वाढवून-वाढवून नसती दगदग ओढावून घ्यायची नाही. या ग्राहक आणि दुकानदाराचा संबंध तर असतोच ना? व्यापाऱ्याने दुकान बंद केले तर काय ते संबंध तुटून जातील? नाही तुटत. ग्राहक तर आठवण काढणारच की 'ह्या व्यापाऱ्याने माझ्याबरोबर असा व्यवहार केला होता, असला खराब माल मला दिला होता.' लोक तर वैरभावना लक्षात ठेवतात. मग जरी या जन्मी तुम्ही दुकान बंद केले पण मग पुढच्या जन्मी तो तुम्हाला सोडणार काय? नाही सोडणार. वैराची वसुली करूनच सोडणार. म्हणूनच भगवंतांनी सांगितले आहे की, 'कोणत्याही उपायाने वैर सोडा.' आमचे एक परिचित पैसे उसने मागून घेऊन गेले, आणि मग पैसे परत करायला आलेच नाहीत. तेव्हा आम्ही समजून गेलो की हा वैराचा हिशोब असेल, तर भले घेऊन जाऊ दे, एवढेच नव्हे तर आम्ही त्यानां सांगितले की, 'आता तू आम्हाला पैसे परत करू नकोस, त्याची तुला सूट आहे.' म्हणजे पैसे सोडून सुद्धा वैर जर सुटत असेल तर सोडा. मिळेल त्या मार्गाने वैर सोडा, अन्यथा एका माणसाबरोबर जोडलेले वैर भटकंतीचे कारण बनेल. ____ लाखो रुपये गेले तरी आम्ही(दादाजी) जाऊ देतो. कारण शेवटी रुपये जाणार आहेत आणि आम्ही राहणार आहोत. काहीही असो पण आम्ही कषाय होऊ देत नाही. लाख रुपये गेले तर त्यात काय झाले? आपण तर सलामत आहोत. Page #57 -------------------------------------------------------------------------- ________________ ४६ पैशांचा व्यवहार ह्या सर्व बाबी वेगळ्या ठेवा. धंद्यात तोटा झाला तर असे म्हणा की धंद्याला तोटा झाला. कारण आपण (स्वतः) नफा किंवा तोट्याचे मालक नाही. मग तोटा आपल्या डोक्यावर का घ्यावा? आपल्याला नफा किंवा तोटा यांचा स्पर्शच होत नाही. आणि जर तोटा झाला आणि इन्कमटॅक्सवाला आला, तर धंद्याला सांगावे हे धंद्या! तुला पैशांची भरपाई करायची आहे. तुझ्याजवळ असतील तर तू चुकते कर. ___ आम्हाला कुणी विचारले की, 'या वर्षी तोटा झाला आहे का?' तर आम्ही म्हणतो, 'नाही बाबा, आमचा तोटा नाही झाला, धंद्याचा तोटा झाला आहे. आणि फायदा झाला तर सांगतो की, 'धंद्याचा फायदा झाला आहे.' आम्हाला नफा-नुकसान कधी नसतेच. काही वेळी कुणी शेठजी आग्रह धरतात की 'नाही, तुम्हास तर प्लेनने कलकत्त्यास यावेच लागेल. मी 'नाही, नाही' म्हटले तरी त्यांचा आग्रह चालूच राहतो. तेव्हा मग तिथे कमी-जास्तचा हिशोब करायचाच नाही. ज्या दिवशी तोटा होतोय असे वाटत असेल, त्या दिवशी आपण पाच रुपये 'अनामत' नावाने जमा करून टाकायचे. म्हणजे आपल्याजवळ शिल्लक, अनामत शिल्लक राहील. कारण या खातेवह्या काय कायमच्या आहेत? दोन-चार किंवा आठ वर्षाने फाडून नाही का टाकत? जर खऱ्या असतील तर कुणी फाडेल काय? हे सर्व तर मनाचे समाधान करण्याचे साधन आहेत. तर ज्या दिवशी आपल्याला दीडशेचे नुकसान झाले असेल त्या दिवशी आपण पाचशे रुपये अनामत खात्यात जमा करून टाकले की साडे तीनशेची शिल्लक आपल्याजवळ राहील. म्हणजे दिडशेच्या तोट्याऐवजी साडेतीनशेची शिल्लक आपल्याला दिसणार. असे आहे. हे सर्व जग गप गुणिले गप एकशे चव्वेचाळीस आहे, बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस नाहीत. बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस झाले असते तर तो एक्जेक्ट सिद्धांत म्हटला गेला असता. संसार म्हणजे गप्पगप्पे एकशे चव्वेचाळीस(थापेबाजी नुसती)? आणि मोक्ष म्हणजे बारा गुणिले बारा एकशे चव्वेचाळीस. समभाव कशास म्हणतात? समभाव फायदा आणि तोटा यांना Page #58 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ४७ एकसारखे म्हणत नाही. समभाव म्हणजे फायद्याच्या ऐवजी तोटा झाला, तरी हरकत नाही, फायदा झाला तरीही हरकत नाही. फायद्याने उत्तेजना होत नाही आणि तोट्याने डिप्रेशन येत नाही. म्हणजे त्याचा परिणाम होत नाही. स्वतः द्वंद्वांतीत झालेला असतो. ____ मी तर धंद्यात तोटा झाला असेल तरीही लोकांना सांगून टाकतो, फायदा झाला तरीही सांगतो! पण लोकांनी मला विचारले तरच, नाहीतर माझ्या धंद्या बद्दल मी बोलतच नाही. कुणी विचारले की, 'तुम्हाला सद्या धंद्यात तोटा झाला आहे, असे ऐकायला मिळते, तर ही गोष्ट खरी आहे काय?' तर तेव्हा मी सांगतो, 'होय, ही गोष्ट खरी आहे का?' आमच्या भागीदारांनी कधी पण अशी आडकाठी घेतली नाही की तुम्ही का असे सांगून टाकता? कारण असे सांगून टाकलेले बरे, जेणे करून लोक आपल्याला उधार देत असतील तर देणार नाहीत. आणि आपले देणे वाढायचे कमी होऊन जाईल. लोक तर काय म्हणतात? अरे, शहाण्या 'असे सांगायचे नसते, नाहीतर लोक व्याजाने पैसे देणार नाहीत. अरे, पण कर्ज तर आपलेच वाढेल ना, म्हणून तोटा झाला तर सरळ सांगून टाकावे की बाबा, आम्हाला तोटा झाला आहे. नुकसान झाल्यावर उघड करून टाकायचे, जेणे करून स्वत:चे ओझे हलके होईल. नाहीतर आतल्या आत गुदमरत राहिल्याने ओझे जाणवते. जितक्या अडचणी येतील त्यांना गिळून टाकाव्या. ज्ञान होण्यापूर्वी जेव्हा आम्ही व्यापार करत होतो तेव्हा फार अडचणी आल्या होत्या. त्यातून पार उतरलो तेव्हाच तर हे ज्ञान झाले ना! आमचा मुलगा-मुलगी मृत्यू पावले तेव्हा पेढे खाऊ घातले होते! आम्ही तर काय करत होतो की धंद्यात एकदम अडचण आली, तर आम्ही कोणालाही सांगत नव्हतो. आणि हीराबांना (दादाश्रींच्या पत्नी) बाहेरुन कळले की धंद्यात अडचण आली आहे आणि जर त्यांनी विचारले की 'धंद्यात तोटा झाला आहे का?' तर आम्ही उत्तर देत होतो की, 'छे! छे! घ्या हे पैसे, पैसे मिळाले आहेत, तुम्हाला पाहिजेत का? त्यावर हीराबा म्हणायच्या की लोक तर म्हणतात तोटा झाला आहे. तेव्हा Page #59 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार मी सांगायचो, नाही, नाही तसे काही नाही, उलट आम्ही जास्त कमावले आहे. पण ही गोष्ट खाजगीच ठेवा! आमच्या धंद्यात तोटा झालावर कित्येकांना दुःख होत असे. ते मला विचारायचे की 'किती नुकसान झाले आहे ? फार तोटा झाला का?' तर मी त्यांना सांगायचो की, 'तोटा झाला होता, पण अलीकडे अचानकच एक लाख रुपयाचा फायदा झाला!' असे म्हटल्याने त्यांना शांती वाटते. हे सर्व तर मी अनुभवाने निष्कर्ष काढले होते. खरेतर व्यवसाय करताना सुद्धा पैशाचा विचार मला येत नव्हता. पैशाचा विचार करीत राहतो, त्या सारखा मूर्ख कुणीच नाही. पैसे तर किती मिळतील हे आपल्या कपाळी लिहिलेलेच असते! आणि तोटा हा सुद्धा लिहिलेलाच असतो. आपण विचार करत नाही तरी पण तोटा येतो की नाही? धंद्यात कुणी धूर्त माणसे भेटली आणि आपले पैसे उडवू लागली, तर आपण मनात समजून जायचे की आपले पैसे खोटे आहेत, म्हणून आपल्याला अशी माणसे भेटली आहेत. नाहीतर अशी धूर्त माणसे भेटण्याचे कारणच काय? माझ्या बाबतीत पण एकदा असे घडले होते. एकदा खोटा पैसा आला होता. तेव्हा सगळी धूर्त, चालबाज माणसेच भेटली. तेव्हापासून मी ठरवले की आता असे धन नकोच. धंदा कोणता चांगला की ज्यात हिंसा होत नसेल, कुणालाही आपल्या धंद्यामुळे दुःख होत नसेल. हे तर धान्य विक्रीचा धंदा असेल तर शेरभर धान्यातून थोडसे काढून घेणार. हल्ली तर लोक भेसळ करायला शिकले आहेत. त्यात सुद्धा खायच्या वस्तूमध्ये भेसळ करणारे तर जनावरात जन्म घेतात. चार पाय मिळाले म्हणजे पडणार तर नाही ना? व्यापार धर्माने करा. नाहीतर अधर्म शिरेल. धंद्यात मन बिघडले तरी फायदा ६६,६१६ होईल आणि मन नाही बिघडले तरीही फायदा ६६,६१६ राहिल, तर मग कोणता धंदा करावा? धंद्यात प्रयत्न करत राहायचे नंतर, 'व्यवस्थित शक्ति' आपसूकच सर्व जुळवून देईल. तुम्ही मात्र प्रयत्न करत राहा, त्यात कंटाळा करू नका. देवाने सांगितले आहे की सर्वकाही 'व्यवस्थित' आहे. फायदा Page #60 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार हजाराचा की लाखाचा होणार असेल तर चलाखी केल्याने एक पैसाही वाढणार नाही. उलट चलाखी केल्याने तर पुढच्या जन्माचा नवा हिशोब तयार होईल, हे जास्तीचे! प्रश्नकर्ता : आपल्याशी कुणी चलाखी करत असेल तर आपण सुद्धा चलाखी करायला हवी ना? हल्ली तर लोक असेच करतात. दादाश्री : अशा प्रकारेच चलाखीचा रोग लागू होतो ना! पण ज्याला 'व्यवस्थित शक्तिचे' ज्ञान हजर असेल तो धीर धरु शकतो. जर कुणी आपल्याशी चलाखी करायला आला तर आपण काहीतरी उपाय करून मागच्या दाराने निघून जावे, आपण समोर चलाखी करू नये. ____ म्हणजे थोडक्यात सांगायचे तर आंघोळीच्या पाण्यासाठी किंवा रात्री झोपताना गादीसाठी किंवा असल्याच काही वस्तुंसाठी तुम्ही विचार सुद्धा करीत नाही, तरीपण त्या सर्व वस्तू तुम्हाला मिळतात की नाही? तसेच लक्ष्मीच्या बाबतीतही सहज राहावे. पैसे कमावण्याची भावना करण्याची गरज नाही. प्रयत्न भले असू द्या. भावना केल्याने काय होते की जर पैसे मी खेचून घेतले तर दुसऱ्याच्या वाट्याला येणार नाहीत. म्हणून निसर्गाने जो क्वोटा (हिस्सा) निर्माण केला आहे, तोच राहू द्या ना, मग भावना करायची गरजच काय? असे मी सांगू इच्छितो. लोकांची होणारी पापं तरी बंद होतील. हे मला सांगायचे आहे. या एका वाक्यातच मोठे सार सामावले आहे, पण जर नीट समजून घेतले तर. असे काही नाही की माझे हे ज्ञान प्राप्त करण्याची गरज आहे. ज्ञान घेतले नसेल, पण त्याला जर इतके कळले की हे सर्व हिशोबानुसारच (स्वतःचे नशीब) आहे. हिशोबाच्या बाहेर काहीही घडत नाही, म्हणूनच मेहनत करून सुद्धा तोटाच पदरी पडतो तेव्हा आपल्याला नाही का समजत? मेहनत म्हणजे मेहनत, मग मिळायलाच हवे, पण नाही! तसे घडत नाही. तोटा हा सुद्धा होतच असतो ना! असा भाव करतात त्याची हरकत आहे, दुसरे काही नाही. इतर क्रियांसाठी माझा विरोध नाही. जोपर्यंत खोटे समजत नाही तोपर्यंत खोटे घडतच जाते. Page #61 -------------------------------------------------------------------------- ________________ ५० पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : व्यवसायात हेच खरे आहे, हे माहित असूनसुद्धा आम्ही खरी गोष्ट सांगू शकत नाही. दादाश्री : म्हणजेच व्यवहार हा आपल्या ताब्यात नाही. निश्चय आपल्या ताब्यात आहे. बी पेरणे आपल्या ताब्यात आहे, परंतु फळ मिळविणे आपल्या ताब्यात नाही. म्हणून आपण भावना करावी. चुकीचे घडले तरीपण भावना चांगलीच करावी की असे होऊ नये. शेठ कुणाला म्हणायचे? तर आपल्या आश्रितांवर कधीही आवाज वाढवून बोलत नसेल त्याला शेठ म्हणायचे. शेठ जर नोकरावर रागवत असेल तर आपण समजून जायचे की हा शेठ स्वतःच असिस्टंन्ट आहे !! शेठजीचा चेहरा तर कधीच बिघडलेला दिसणार नाही. शेठ म्हणजे शेठच दिसायला हवा. तो जर दटावत राहिला, तर सर्वांसमोर त्याची काय किंमत राहणार? मग तर नोकर पण त्याच्या पाठीमागे बोलतील की या शेठजीत काही दम नाही. नुसता दात ओठ खात असतो. जळले, असा शेठ होण्यापेक्षा तर गुलाम होणे परवडेल. एवढे खरे, की समस्यांचे समाधान करण्यासाठी जर तुम्हाला गरज भासली तर मध्यस्थी काही एजन्सी ठेवा. परंतु ओरडण्याचे काम शेठजींनी स्वतः करू नये! नोकरही स्वतःच लढतात, शेतकरीही स्वत:च लढतात, आणि जर तुम्ही शेठ सुद्धा स्वतःच लढत राहिले तर मग व्यापाऱ्यासारखे राहिलेच कुठे? शेठ तर कधीही असे करत नाही. कधी गरज भासली तर मध्ये एजन्सी तयार करा किंवा मध्यस्थी, अशा माणसाची नेमणूक करा की जो त्यांच्या तर्फे लढेल. पण शेठ स्वतः भांडायला येत नाही. नंतर शेठ दोघांमध्ये समाधान घडवून आणतो. १९३० साली सर्वात मोठा मंदीचा काळ आला होता. त्या काळात शेठ लोकांनी बिचाऱ्या मजूरांचे फार शोषण केले होते. ते आता तेजीचा काळ आल्यावर मजूर शेठच्या नाकी नऊ आणतात. असा हा जगाचा, एकेमेकांचे शोषण करण्याचा रिवाज आहे. मंदीच्या काळात शेठ शोषण करतात आणि तेजीच्या काळात मजूर शोषण करतात. दोघांचीही एका मागून एक अशी पाळी येतेच. म्हणून हे शेठ जेव्हा तक्रार करतात, तेव्हा मी त्यांना सांगतो की १९३० मध्ये तुम्ही मजूरांची गय केली नाही म्हणून Page #62 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ५१ आता ते तुमची गय करणार नाहीत, मजूरांचे शोषण करण्याची पद्धत ठेऊच नका. तर मग तुमचीही पाळी येणार नाही. अरे, भयंकर कलियुगातही कोणी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही! घरात सुद्धा तेजी-मंदी येते. तेव्हा मंदीच्या काळात आपण बायको वर रुबाब मारला असेल, तर नंतर तेजी येते तेव्हा ती आपल्यावर रुबाब जमवते. म्हणून तेजी-मंदीत एकसमान राहावे. एकसमान राहिल्याने सर्व छान चालेल. _हे जग एकक्षणही न्यायाबाहेर जात नाही. क्षणोक्षणी न्यायच होत असतो! अन्याय सहनच करू शकत नाही. जो अन्याय केला आहे, तो पण न्यायच होत राहिला आहे ! प्रश्नकर्ता : धंद्यात मोठे नुकसान झाले आहे तर काय करू? हा धंदा बंद करून टाकू, की दुसरा नवीन धंदा सुरु करू? फार देणे झाले आहे. दादाश्री : कापसाच्या धंद्याची नुकसान भरपाई किराणामालाचे दुकान काढून होणार नाही. धंद्यात आलेल्या तोट्याची भरपाई धंद्यानेच होऊ शकेल. नोकरी केल्याने ती भरपाई होणार नाही 'कॉन्ट्रॅक्ट' च्या कामाचे नुकसान, पान-बीडीचे दुकान उघडून भरली जाणार काय? ज्या बाजारात घाव लागला असेल, त्या बाजारातच तो बरा होईल. तिथेच त्याचे औषध असते. ____ आपला मनोभाव असा असावा की आपल्यामुळे कोणत्याही जीवाला किंचित्मात्रही दु:ख होऊ नये. संपूर्ण कर्ज फेडले जावे, असा आपला शुद्ध भाव असावा. लक्ष्मी तर अकरावा प्राण आहे. त्यामुळे कुणाचीही लक्ष्मी आपल्याजवळ राहता कामा नये. आपली लक्ष्मी कुणाकडे राहिली त्यास हरकत नाही. पण ध्येय निरंतर हेच असावे की मला पै पै चुकती करायची आहे. ध्येय लक्षात ठेऊन मगच तुम्ही खेळ खेळा. पण खेळाडू होऊ नका. खेळाडू झालात तर तुम्ही संपलेच समजा! प्रश्नकर्ता : आता हे सांगा की माणसाची दानत कोणत्या कारणाने बिघडते? Page #63 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार दादाश्री : जेव्हा त्याचे वाईट घडणार असेल तेव्हा त्याच्या मनात फोर्स उत्पन्न होतो की 'तू असा फिरुन जा ना, मग जे होईल ते होऊ दे.' त्याचे बिघडणार आहे म्हणून. 'कमिंग इवेन्ट्स कास्ट देअर शेडोज बिफोर.' (जे घडणार आहे त्याची सावली आधीच पडत असते.) ५२ प्रश्नकर्ता : पण काय तो त्या घडणाऱ्या घटनेला थांबवू शकतो ? दादाश्री : होय, थांबवू शकतो. जर त्याला हे ज्ञान प्राप्त झाले असेल की 'वाईट विचार जरी आले तरीही तू त्याचा पश्चाताप कर. त्याने जर असे म्हटले की, 'हे चुकीचे आहे, असे घडू नये.' अशा प्रकारे थांबवू शकतो. वाईट विचार मनात येतात ते मुळात पूर्वीच्या ज्ञानाच्या आधारावर येत असतात. परंतु आजचे ज्ञान त्याला असे सांगते की हे करण्यासारखे नाही. त्यामुळे मग तो थांबवू शकतो. आले लक्षात? ही गोष्ट स्पष्ट होत आहे ना ? दानत बिघडवायची म्हणजे पाच लाख रुपयांसाठी बिघडवायची असे नाही. जळलं, पंचवीस रुपयांसाठी सुद्धा नियत बिघडू शकते! अर्थात् यात उपभोग घेण्याच्या इच्छेचा प्रश्न नाही पण त्याला अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले आहे की, ' द्यायचे कशाला ?' देण्यापेक्षा आपण इथेच वापरुया की. पुढचे पुढे पाहून घेऊ. असे उलटे ज्ञान मिळाले आहे त्याला. म्हणून आता आम्ही सर्वांना असे सांगू शकतो की, बाबा, हवे तितके व्यवसाय-धंदे करा, नुकसान झाले तरी हरकत नाही, परंतु मनात मात्र एक भाव दृढ असू द्या की मला सर्वांचे पैसे परत करायचेच आहेत. कारण पैसा कुणाला प्रिय नसतो ? हे मला सांगा. कुणाला प्रिय नसतो? सर्वांनाच प्रिय असतो. त्यामुळे, त्याचे पैसे बुडले तरी चालेल असा भाव सुद्धा आपल्या मनात उत्पन्न होता कामा नये. काहीही झाले तरी, मला पैसे परत करायचेच आहेत, असा निर्णय पहिल्यापासून मनात धरुन ठेवला पाहिजे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. दुसऱ्या कशात नादारी काढली असेल तर चालू शकेल पण पैशाच्या बाबतीत नादारी काढू पैसे दुःखदायी आहेत. पैशाला, तर अकरावा प्राण म्हटला आहे. कुणाचेही पैसे बुडवू नये. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. नये. कारण म्हणून Page #64 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ___ ५३ प्रश्नकर्ता : मनुष्य देणे मागे ठेऊन मृत्यू पावला तर काय होते? दादाश्री : देणे ठेऊन मृत्यू पावला तर? देणे मागे सोडून मृत्यू झाला पण तरी मनात मरेपर्यंत एक गोष्ट निश्चितपणे असायला हवी की मला हे पैसे परत करायचेच आहेत. काय? या जन्मी शक्य नसेल, तर पुढच्या जन्मी पण मला नक्कीच परत करायचे आहेत. असा भाव ज्याचा मनात आहे, त्याला कोणतीही अडचण येणार नाही. नियम असा आहे की पैसे घेते वेळीच ठरवलेले असते की याचे पैसे मला परत द्यायचे आहेत. त्या नंतर मग दर चार दिवसांनी ते लक्षात राहिले पाहिजे की, 'हे पैसे मला शक्य तितक्या लवकर परत करायचे आहेत.' अशी भावना करावी. अशी भावना असेल तरच पैसे परत दिले जातील, नाहीतर हरि हरि, राम तुझी माया. तुम्ही कुणाचे पैसे उसने घेतले असतील आणि तुमची भावना शुद्ध असेल, तर समजावे की तुम्ही ते पैसे परत करू शकाल. मग त्या गोष्टीची चिंता करायची गरज नाही. मनोभाव शुद्ध आहे की नाही, हेच तपासायचे, हेच त्याचे लेव्हल (मापदंड) आहे. समोरच्या माणसाची भावना शुद्ध आहे की नाही, यावरुन आपल्याला कळेल. जर त्याची भावना शुद्ध राहत नसेल तर आपण समजून घ्यावे की आपले पैसे बुडणार आहेत. भावना शुद्ध असायलाच हवी. भावना म्हणजे, तुमच्या अधिकारात तुम्ही काय कराल? तर म्हणे, 'आज जर माझ्याकडे तेवढे पैसे असते तर आजच सर्व परत केले असते! याला म्हणतात शुद्ध भावना. त्याची भावना तर हीच असेल की लवकरात लवकर पैसे परत करू! प्रश्नकर्ता : कुणी दिवाळे काढले आणि नंतर पैसे परत केलेच नाही तर काय त्याला दुसऱ्या जन्मी पैसे परत करावे लागतात? दादाश्री : त्या माणसाला परत पैशाचे तोंडही बघायला मिळत नाही. त्याच्याजवळ पैसे येतच नाहीत. आपला कायदा काय म्हणतो की पैसे परत करायच्या बाबतीत तुमचे भाव बिघडायला नकोत, तर नक्कीच एक दिवस तुमच्या हातात पैसे येतील आणि कर्जफेड होईल. माणसाजवळ Page #65 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार कितीही पैसे असले तरी शेवटी पैसे काही सोबत येणार नाहीत. म्हणून मोक्षाचे काम साधून घ्या. आता परत मोक्षमार्ग मिळणार नाही. एक्याऐंशी हजार वर्षांपर्यंत मोक्षमार्ग हाती लागणार नाही. हा सर्वात शेवटचा 'स्टॅन्ड' (मुक्काम) आहे. आता या पुढे कोणताही 'स्टॅन्ड' नाही. पैशाचे किंवा इतर संसारातील वस्तूंचे देणे नसते, राग-द्वेष यांचे देणे असते. पैशाचे देणे असते तर आम्ही असे म्हटले असते की, बाबा, पाचशे मागत आहे तर तू पाचशे पूर्णच परत कर, नाहीतर तुझी सुटका होणार नाही! आम्ही तर काय म्हणतो की, या बाबतीचा निकाल लाव, शेवटी पन्नास देऊन पण तू निकाल कर, आणि मग त्याला विचार की 'बाबा, तू खुष आहेस ना?' आणि तो जर म्हणाला की 'होय, मी खुष आहे.' म्हणजे झाला निकाल. तुम्ही जिथे जिथे राग-द्वेष केले असतील, ते राग-द्वेष तुम्हाला परत मिळतील. कोणत्याही परिस्थितीत हिशोब चुकता करा. हिशोब चुकता करण्यासाठी हा जन्म आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्वकाही अनिवार्य आहे. एक सावकार स्वतःच्या कर्जदाराला खूप त्रास देत होता. तेव्हा तो बिचारा मला म्हणाला, 'हा सावकार मला खूप शिव्या देतो.' मी म्हटले, 'तो पुन्हा आला की मला कळव.' नंतर जेव्हा तो सावकार(घेणेकरी) आला, तेव्हा त्याने मला बोलविले. मी त्यांच्या घरी गेलो. मी बाहेरच्या खोलीत बसलो होतो. आतल्या खोलीत सावकार त्या माणसाला हवे तसे ओरडून बोलत होता. 'तुम्ही अशी नालायकी करता? ही तर बदमाशी आहे, वाटेल तशा शिव्या देऊ लागला. मग मी आत गेलो आणि म्हणालो, 'तुम्ही यांना पैसे दिले आहेत ना?' तर म्हणाला 'होय,' मी म्हणालो, "हे बघा, मी देण्याचे एग्रीमेन्ट(करार) केले आहे आणि तुम्ही घेण्याचे एग्रीमेन्ट केलेले आहे. आणि तुम्ही ज्या शिव्या देत आहात, ती 'एक्स्ट्रा आईटम'(जास्तीचे) देत आहात. त्याचे पेमेन्ट तुम्हाला चुकते करावे लागेल. शिव्या देण्याची अट करारात नव्हती. प्रत्येक शिवीचे चाळीस रुपये कट Page #66 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार केले जातील. विनय चुकला ही तर 'एक्स्ट्रा आइटम' झाली म्हणायची, कारण तुम्ही कराराच्या बाहेर गेला आहात." असे म्हटल्यावर तो हमखास ताळ्यावर येईल. आणि पुन्हा अशा शिव्या देणार नाही. एका व्यक्तिने तुमचे अडीचशे रुपये परत दिले नाही आणि तुमचे अडीचशे बुडाले. त्यात चूक कुणाची ? तुमचीच ना ? भोगतो त्याची चूक. या ज्ञानाप्रमाणे धर्म घडला, त्यामुळे समोरच्या माणसावर आरोप करणे, कषाय करणे, वगैरे सर्वकाही सुटून जाईल. अर्थात 'भोगतो त्याची चूक' ही समज तर मोक्षापर्यंत घेऊन जाईल अशी आहे. हे तर एक्जॅक्ट विज्ञान बाहेर पडले आहे की, 'भोगतो त्याची चूक. ' प्रश्नकर्ता : दादाजी, हे ज्ञान उत्पन्न झाले त्यापूर्वी आपली बरीच भूमिका तयार झाली असेल, नाही का ? दादाश्री : भूमिका म्हणायची, तर मला काही येत नव्हते. येत नव्हते म्हणून तर मेट्रीक नापास होऊन बसून राहिलो. माझ्या भूमिकेत एक चारित्र्यबळ मात्र फार मोठे होते, हे मी पाहिले होते, आणि तरीही चोऱ्या केल्या होत्या. शेतात झाडावर बोरे आली की मित्रांसोबत जात होतो. तर आंब्याचे झाड कुणा दुसऱ्याचे आणि कैऱ्या आम्ही तोडत होतो, ही चोरी नाही का म्हणायची ? तर लहानपणात सर्व मुले कैऱ्या खाण्यासाठी शेतात निघाली की आम्ही पण सोबत जात होतो. आणि मी सुद्धा खात होतो, पण घरी मात्र कधीही घेऊन जात नव्हतो. आणि दुसरे, व्यवसाय सुरु केला तेव्हापासून, मी माझ्या स्वतःसाठी, माझ्या व्यवसायासंबंधी कधीही विचार केला नाही. आमचा व्यवसाय चालत होता तसा चालत रहायचा, पण जर तुम्ही आमच्याकडे आलात तर सर्वात आधी तुमची विचारपूस करेन 'आपले कसे काय चालले आहे ? आपल्याला काही आडचण तर नाही ना ? म्हणजे असे तुमचे समाधान करेन! नंतर दुसरे कोणी आले की त्यांना विचारायचे की तुमचे कसे चालले आहे ? सर्व ठीक आहे ना? म्हणजे लोकांच्या अडचणी दूर करण्याच्या व्यापातच असायचो. आयुष्यभर हाच धंदा केला होता. याखेरीज दुसरा कसला धंदाच केला नाही, कधीही. Page #67 -------------------------------------------------------------------------- ________________ पद पैशांचा व्यवहार पण तरी व्यवसायात मात्र कुशल होतो. कोणत्यातरी मुद्दावर कोणी चार महिन्यापासून गोंधळत असेल, तर त्या अडचणीचा तोड मी एका दिवसात काढून देत होतो. कारण कुणाचेही दुःख मला सहन होत नव्हते. अरे! कोणास नोकरी मिळत नसली, तर शेवटी चिठ्ठी लिहून देत होतो. असे-तसे काहीही करून उपाय शोधून काढायचो. मी जेव्हा व्यवसाय करीत होतो तेव्हा आमच्या भागीदारासोबत मी एक नियम नक्की केला होता. की जर मी नोकरी करत असेन, तर त्यात मला जितका पगार मिळेल, तेवढेच पैसे तुम्ही माझ्या घरी पाठवायचे. त्याहून जास्त पैसे पाठवू नका. म्हणजे ते पैसे अगदी चोखच असणार. दुसरे उरलेले पैसे या धंद्यातच राहू द्यायचे, ऑफिसात. तेव्हा त्यांनी मला विचारले, की 'मग त्या पैशांचे काय करायचे?' तेव्हा माझे उत्तर असे की इन्कमटॅक्सवाल्याने सांगितले की 'दीढ लाख भरा' दादाच्या नावाचे, तर तेव्हा तुम्ही ते भरुन टाकायचे. म्हणजे मला पत्र लिहण्याची गरज नाही. प्रश्नकर्ता : आम्ही कोणाला पैसे दिले असतील आणि तो जर पैसे परत करत नसेल, तर अशा वेळी ते पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही? की मग आपले देणे चुकते झाले असे समजून संतोष मानून बसून राहायचे? दादाश्री : तसे नव्हे, तो परत करू शकेल, अशी जर त्याची स्थिती असेल तर प्रयत्न करावा आणि जर पैसे परत करण्याची त्याची ऐपत नसेल, तर प्रयत्न सोडून द्यावा. प्रश्नकर्ता : म्हणजे प्रयत्न करायचे की मग असे समजायचे की तो देणार असेल तर आपल्याला घर बसल्या देऊन जाईल आणि जर तो आला नाही, तर आपले देणे होते ते चुकते झाले, असे समजून गप्प बसायचे? दादाश्री : नाही, नाही. इथपर्यंत मानून घ्यायची गरज नाही. आपण स्वाभाविकपणे प्रयत्न करावा. आपण त्याला सांगायचे की 'बाबा, मला सद्या पैशांची फार अडचण आहे, तेव्हा जर आपल्यालाकडे सोय होत असेल तर कृपया पाठवून द्या.' अशा प्रकारे विनयपूर्वक, विनम्रपणाने Page #68 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ५७ सांगावे. आणि तरीही नाही मिळाले तर समजायचे की आपला पूर्वीचा काही हिशोब होता तो चुकता झाला. परंतु आपण प्रयत्नच नाही केला तर तो आपल्याला मूर्ख समजेल आणि उलट दिशेने जाईल. हा संसार म्हणजे कोडेच आहे. यात मनुष्य बिचारा मार खाऊन खाऊन मरून जातो! अनंत जन्मापासून मारच खात राहिला आणि जेव्हा सटका होण्याची वेळ येते तरीही स्वत:ची सुटका करून घेत नाही. पण मग सुटका करून घेण्याची अशी संधी पुन्हा येतच नाही ना! आणि जो सर्व बंधनापासून मुक्त झालेला आहे तोच आपल्याला सोडवू शकतो. जो स्वत:च बंधनात आहे तो आपल्याला कसे सोडवेल? जो मुक्त झाला आहे त्याचेच महत्व आहे. 'याने जर पैसे परत दिले नाही तर काय होईल? असा विचार केल्याने तर आपले मन कमकुवत होत जाते. म्हणून कोणाला पैसे दिल्यानंतर ठरवूनच टाका की काळ्या चिंधीत बांधून समुद्रात सोडत आहे, मग काय तुम्ही त्याची आशा करणार? देण्यापूर्वीच परतीची आशा न ठेवता द्या, अन्यथा देऊच नका. असे आहे, आपण कुणाकडून पैसे उसने घेतले असतील, किंवा दिले असतील, जगात घेणे-देणे करणे भागच आहे ना! म्हणजे आपण काही लोकांना पैसे दिले असतील, त्यातून कोणी पैसे परत केले नाही तर त्याच्यासाठी मन कुरकुर करत राहते की 'केव्हा देईल? केव्हा देईल?' आता असे केल्याने काय फायदा? आमच्या बाबतीत पण असे घडले होते ना! पैसे परत येतील की नाही याची काळजी आम्ही पूर्वीपासूनच करत नव्हतो. पण साधारण प्रयत्न नक्कीच करायचो. त्या व्यक्तिला सांगून बघायचो. आम्ही एका माणसाला ५०० रुपये दिले होते. आता अशी रक्कम काही वहीखात्यावर लिहिलेली नसते आणि चिठ्ठीत सुद्धा सही वगैरे नसते. तर त्या गोष्टीला वर्ष, दीड वर्ष झाले असेल. माझ्याही कधी लक्षात राहिले नव्हते. पण एक दिवस त्या माणसाची भेट झाली, आणि तेव्हा मला आठवले, मी त्याला म्हणालो, 'ते पाचशे रुपये तुम्ही पाठवून द्या.' तर तो म्हणतो कसा की ‘कोणते पाचशे?' मी म्हटले, 'तुम्ही माझ्याकडून घेऊन गेला होतात Page #69 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ते.' तर तो म्हणाला 'तुम्ही कधी मला उसने दिले होते? रुपये तर, मी तुम्हाला दिले होते, विसरलात की काय?' मी लगेच समजलो. मग मी म्हणालो, 'हो, माझ्या लक्षात आहे तर, मग आता उद्या येऊन घेऊन जा. तेव्हा दुसऱ्या दिवशी त्याला पैसे देऊन टाकले. तो मनुष्य गळ्यात पडला की तुम्ही माझे पैसे देत नाही, मग काय करणार? असे सर्व घडलेले. अशा या जगात कसा निभाव लागेल? आपण कुणालातरी पैसे दिले, तर जसे पैसे काळ्या चिंधीत बांधून समुद्रात टाकल्यानंतर त्याच्या परतीची आशा करणे, यासारखी मूर्खता आहे ही. जर पैसे परत आले तर जमा करून घ्यायचे, आणि त्या दिवशी त्याला चहा पाजून म्हणायचे 'बाबा, तुमचे उपकार आहे की तुम्ही पैसे परत आणून दिले, नाहीतर या काळात पैसे परत मिळणे दुर्लभच आहे. तुम्ही परत दिले हेच मोठे आश्चर्य म्हणायचे.' तो जर म्हणाला 'व्याज मिळणार नाही' तर आपण म्हणायचे, 'मुद्दल आणून दिलेस तेच फार झाले! आले का लक्षात? जग हे असे आहे. ज्याने घेतले आहे त्याला परत करण्याचे दुःख आहे, उधार देतो त्याला परत मिळतील की नाही याचे दुःख आहे. आता यात सुखी कोण? आणि खरेतर सर्व 'व्यवस्थित' आहे! परत देत नाही हेही 'व्यवस्थित' आहे, आणि डबल दिले तर तेही 'व्यवस्थित' आहे. प्रश्नकर्ता : आपण त्या माणसाला पदरीचे पाचशे का दिले? दादाश्री : पुन्हा कोणत्याही जन्मात त्याची गाठ पडण्याचा प्रसंग येऊ नये, म्हणून. लोकांना जेव्हा हे कळले की माझ्याकडे पैसे आले आहेत, तेव्हा माझ्याकडे पैसे मागण्यासाठी येऊ लागले. तेव्हा मग १९४२ पासून १९४४ पर्यंत त्या सर्वांना मी देत राहिलो. नंतर १९४५ मध्ये मी ठरवले की आता आपल्याला मोक्षमार्गावरच चालायचे आहे. तेव्हा आता या लोकांशी मेळ कसा बसणार? मी विचार केला की दिलेल्या पैशांची वसुली करायला गेलो, तर ते परत पैसे मागायला येतील, आणि हा व्यवहार चालूच राहील. वसुली करायला गेलो तर पाच हजार देऊन परत दहा हजार मागायला येतील, त्यापेक्षा हे पाच हजार त्यांच्याजवळ राहिले तर तो मनात म्हणेल, Page #70 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ५९ 'यांची (दादाजींची) परत भेट झाली नाही तर उत्तम.' आणि कधी वाटेत जाताना मी दिसलो, तर दुसऱ्या दिशेने निघून जाईल, हे माझ्या पण लक्षात येते. म्हणजे अशा प्रकारे मी सुटलो, मी या सर्वांना सोडू इच्छित होतो आणि या सर्वांनी सोडले मला!! निसर्गाचा न्याय काय म्हणतो? की 'जे घडले ते करेक्ट,' जे घडले तोच न्याय. जर तुम्हास मोक्षाला जायचे असेल तर जे घडले, त्यालाच न्याय समजा, आणि जर तुम्हास भटकत राहायचे असेल तर कोर्टाच्या न्यायाने निकाल लावा. निसर्ग काय सांगतो? घडले तोच न्याय आहे, असे जर तुम्ही समजाल, तर तुम्ही निर्विकल्पी होत जाल आणि जर कोर्टाच्या न्यायाच्या दिशेने तुम्ही पुढे गेलात तर विकल्पी होत जाल. तीन-तीनदा फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा कर्जदार भेटणार नाही. आणि जर का भेटला, तर तो आपल्यावरच चिडतो. हा मार्ग असा आहे की घर बसल्या तुम्हाला पैसे परत द्यायला येईल. पाच-सातवेळा तुम्ही त्याच्याकडे वसुलीसाठी जाऊन आलात, तरी शेवटी तो म्हणतो की 'महिन्यानंतर या' आणि त्याक्षणी जर तुमचे परिणाम बदलले नाहीत, तर घर बसल्या पैसे मिळतील, पण तुमचे परिणाम बदलतात ना? 'हा तर बेअक्कल माणूस आहे, नालायक आहे. येथे येणे वाया गेले.' असे तुमचे परिणाम बदलतात ना! तुम्ही तिथे परत गेले तर तो शिव्या देईल. तुमचे परिणाम बदलतात त्यामुळे समोरचा माणूस बिघडणार नसेल तरीही बिघडतो. प्रश्नकर्ता : याचा अर्थ असाच ना की आपणच समोरच्या माणसाला बिघडवतो? दादाश्री : आपणच आपले सर्वकाही बिघडविले आहे. ज्या काही अडचणी आहेत, त्या सर्व आपणच घडवून आणल्या आहेत. आता त्यास सुधारण्याचा उपाय काय? तर समोरचा कितीही दुःख देत असेल, तरीही त्याच्यासाठी मनात एकही उलट विचार करायचा नाही, हाच त्याला सुधारण्याचा उपाय. यात आपलेही सुधरते आणि त्याचेही सुधरते. लोकांच्या मनात उलट-सुलट विचार आल्याशिवाय राहत नाहीत, म्हणून तर आम्ही समभावे निकाल करण्यास सांगितले आहे. समभावे निकाल म्हणजे काय? की त्याच्या बाबतीत काही विचारच करायचा नाही. Page #71 -------------------------------------------------------------------------- ________________ ६० पैशांचा व्यवहार आणि वसुली करायला गेल्यावर एखादा माणूस पैसे देत नसेल, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून तो देत नसेल, तर त्याचा अंत पाहत मागे लागू नये. तो आपल्याशी वैर बांधेल! आणि तो जर भूत झाला तर आपल्याला त्रास देईल. त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून देऊ शकत नाही, त्यात त्याचा बिचाऱ्याचा काय गुन्हा? असून सुद्धा न देणारे असतात की नाही लोक? प्रश्नकर्ता : असून सुद्धा देत नसतील तर काय करायचे? दादाश्री : असून सुद्धा देत नसतील त्याला काय करणार आपण? जास्तीत जास्त म्हणजे दावा दाखिल करणार! दुसरे काय? त्याला मारहाण केली तर पोलिस आपल्याला पकडून नेतील ना? खरेतर कोर्टात न जाणे हेच उत्तम. शहाणा मनुष्य कोर्टात जाणार नाही. माझे असतील तर मला मिळतील. नाही मिळाले तर राहिले. पण असल्या भूतांना परत बोलविणार नाही. विनाकारण भूते त्रास देतात. अजून केस जिंकेल तेव्हा जिंकेल पण त्या पूर्वी तर 'बेअक्कल आहात, गाढव कुठले! असे म्हणाणार. हे अकलेचे बारदान! आणि हा माणूस! गाढव नाही! प्रत्येक ठिकाणी असे बोलायचे असते का? आपल्याकडे ते भक्त आहेत ना, वकील, ते म्हणतात, आम्ही सुद्धा असेच बोलतो. अरे, कशी निर्लज्ज माणसं आहात तुम्ही? हे तर ठीक आहे, की ती माणसं बिचारी सौम्य आहेत, म्हणून ऐकून घेतात. नाहीतर पायातली चप्पल काढून मारली तर काय अवस्था होईल तुमची? तुमच्याकडून कुणी पैसे घेतले, त्या गोष्टीला तीन-चार वर्षे होऊन गेली, तर एखाद्या वेळी ती रक्कम कोर्टाच्या कायद्याच्या बाहेर सुद्धा निघून जाईल, पण निसर्गाचा कायदा तर कोणी तोडू शकत नाही ना! निसर्गाच्या कायद्यानुसार रक्कम व्याजासकट परत मिळते. इथल्या कायद्यानुसार काही मिळणार नाही, हा तर सामाजिक कायदा म्हणायचा पण त्या निसर्गाच्या कायद्यात रक्कम व्याजासकट परत मिळते. म्हणून कधी कुणी आपले तीनशे रुपये परत करत नसेल, तर आपण त्याच्याकडे पैसे परत घ्यायला जावे. परत मागण्याचे कारण काय? की हा माणूस मुद्दलच परत देत नाही, तर निसर्गाचे व्याज तर किती मोठे असते, शे-दोनशे वर्षात तर रक्कम Page #72 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार किती जास्त होणार? म्हणून आपण त्याच्याकडे पैसे परत मागायला हवे. ज्यामुळे तो बिचारा इतक्या मोठ्या जोखीमेत तर अडकणार नाही! पण जर तो द्यायला तयारच नसेल आणि जोखीम पत्करत असेल तर त्याला जबाबदार आपण नाही. प्रश्नकर्ता : निसर्गाच्या व्याजाचा दर काय आहे ? दादाश्री : नॅचरल इन्टरेस्ट इज वन परसेन्ट एन्युअली. म्हणजे शंभर रुपयावर एक रुपया वार्षिक! जर तो तीनशे रुपये परत करू शकला नाही, तर हरकत नाही. आपण म्हणावे की मी आणि तू आपण दोघे मित्र. आपण एकत्र पत्ते खेळू. कारण आपली रक्कम काही जाणार तर नाही ना! हा निसर्ग इतका करेक्ट(अचूक) आहे की तुमचा एक केस जरी चोरला असेल, तरी तो कुठेही जाणार नाही. निसर्ग अगदी करेक्ट असतो. परमाणू परमाणूपर्यंतचा हिशोब करेक्टच असतो. म्हणून या जगात वकील करण्यासारखे नाही. मला चोर भेटतील, लुटारु भेटतील अशी भीती बाळगण्याचेही कारण नाही. हे तर वर्तमानपत्रात येते की आज अमक्याला गाडीतून खाली उतरवून त्याचे दागिने लुटले, अमक्याला मोटारीत डांबून मारले आणि पैसे हिसकावून घेतले. 'मग आता सोन्याचे दागिने अंगावर घालायचे की नाही घालायचे?' डोन्ट वरी! करोडो रुपयांची रत्ने धारण करून फिरलात तरीही तुम्हाला कुणी हात लावू शकणार नाही. असे हे जग आहे. आणि ते अगदी करेक्ट आहे. जर तुमची जोखीमदारी असेल तरच तुम्हाला हात लावेल. म्हणूनच आम्ही सांगतो की तुमचा वरिष्ठ कोणीही नाही. तेव्हा, 'डोन्ट वरी!' (चिंता करू नका) निर्भय व्हा! धंद्यामध्ये बिनहक्काचे अजिबात नसावे. आणि ज्या दिवशी बिनबहक्काचे घेतले जाईल, त्या दिवसापासून धंद्यात बरकत होणार नाही. देव यात हस्तक्षेप करीतच नाही. धंद्यात तर तुझी हुशारी आणि नीतिमत्ता हे दोनच कामास येतात. अनैतिक धंद्यात वर्ष-दोन वर्ष चांगली कमाई होईल परंतु नंतर मात्र नुकसान होईल. खोटे कार्य घडले तर शेवटी त्याचा पश्चाताप केला तरी सुटाल. व्यवहाराचे सार काही असेल, तर ते नीतिमत्ताच आहे. पैसे थोडे कमी असतील पण नीतिमत्ता असेल तरीही तुम्हाला शांती वाटेल. आणि जर नीति नसेल तर भरपूर पैसे असूनही Page #73 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार शांती वाटणार नाही, अशांतीच वाटेल. नैतिकतेशिवाय धर्मच नाही. धर्माचा पायाच नैतिकता आहे! __ आता यात असे म्हणतात, की संपूर्ण नीतिचे पालन होऊ शकेल तर पाळ आणि जर पालन होऊ शकत नसेल, तर नक्की कर की दिवसातून मला तीन वेळा तरी नीतिचे पालन करायचे आहे. आणि नाहीतर नियमात राहून अनीति केली तरी पण ती नीतिच आहे. जो मनुष्य नियमात राहून अनीति करतो, त्यास मी नीतिच म्हणतो. भगवंतांचा प्रतिनिधि म्हणून, वीतरागींचा प्रतिनिधि म्हणून मी सांगत आहे की अनीति सुद्धा नियमात राहून कर, तो नियमच तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. अनीति करत आहे की नीति हे महत्त्वाचे नाही, पण नियमात राहून कर. संपूर्ण जगाने जिथे सक्तीने मनाई केली, तिथे आम्ही सांगत आहोत की यास हरकत नाही. तू नियमात राहून कर. आम्ही तर असे म्हणतो की अनीति कर पण नियमात राहून कर. एक नियम ठेव की, मला इतकीच अनीति करायची आहे, याहून जास्त नाही. दुकानातून रोज दहा रुपयेच जास्त घ्यायचे आहेत, त्याहून जास्त पाचशे रुपये आले, तरीही मी घेणार नाही. हे आमचे गूढ वाक्य आहे. याचा गुढार्थ लक्षात आला तर काम होऊन जाईल ना! देव पण खुष होतील की परक्या चाऱ्यात तोंड खुपसत आहे तरी पण कसा प्रमाण सांभाळून खात आहे ! नाहीतर परक्या चाऱ्यात तोंड खुपसल्यावर तिथे मग प्रमाणशीरपणा येतोच कुठे? आपल्या लक्षात येतेय ना? की अनीति करण्यात पण नियम राखा. मी काय म्हणतो, की 'तुला लाच घ्यायची नाही पण तुला पाचशे कमी पडतात, तर तू कुठपर्यंत क्लेश करत राहशील? लोकांकडून, मित्रांकडून उसने पैसे घेतो, त्यामुळे तर तू जास्त जोखीम ओढवून घेत आहेस. म्हणून मी त्याला समजावून सांगतो, की 'बाबा, तू अनीति कर, पण नियमपूर्वक कर.' आता नियमाने अनीति करणारा नीतिवानापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण नीतिवानाच्या मनात एक रोग घुसतो की, 'मी काहीतरी आहे,' तिथे नियमाने अनीति करणाऱ्याच्या मनात असा रोग घुसणारच नाही. Page #74 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार असे कुणी शिकवणारच नाही ना? नियमात राहून अनीति करायची, हे तर फार मोठे कार्य आहे. जो अनीति सुद्धा नियमात राहून करतो त्याचा मोक्ष होईल, पण जो अनीति करीत नाही, जो लाच घेत नाही त्याचा मोक्ष कसा होणार? कारण जो लाच घेत नाही, त्याला 'मी लाच घेत नाही' याची नशा चढलेली असते. देव सुद्धा त्याला हाकलून देतो की, 'जा, तुझे तोंड वाईट दिसत आहे.' पण याचा अर्थ असा नाही की आम्ही लाच घ्या असे म्हणतो, पण जर तुला अनीतिच करणे भाग असेल, तर तू पद्धतशीरपणे (नियमाने) कर. नियम कर की मी लाच म्हणून पाचशे रुपयेच घेईन. पाचशेच्यावर पाच हजार जरी दिले, तरी ते सर्व परत करीन. घरखर्चामध्ये कमी पडत असतील तेवढीच, पाचशेचीच लाच घ्यायची. बाकी, असली जोखीम तर आम्हीच घेतो. कारण अशा काळात लोक लाच घेणार नाही तर काय करणार बिचारे? तेलातूपाचे भाव किती वाढले आहेत? साखरेचा दर किती वाढला आहे ? आता मुलांची फी दिल्याशिवाय चालेल का? बघा ना! तेलाचे भाव तर काही सतरा रुपये म्हणतात ना? प्रश्नकर्ता : होय. दादाश्री : आता जे व्यापारी काळाबाजार करतात त्यांचा निर्वाह तर होतो पण नोकरी करणाऱ्यांची बाजू घेणारा कुणी राहिलाच नाही ना? म्हणून आम्ही सांगतो की लाच घ्यावी लागली तर ती सुद्धा नियम सांभाळून घे. तर तो नियम तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. लाच नडत नाही, अनियम नडतो. प्रश्नकर्ता : अनीति करणे हे तर चुकीचेच म्हटले जाईल ना? दादाश्री : तसे पाहिले तर चुकीचेच म्हटले जाते! परंतु देवाच्या घरी तर वेगळ्याच प्रकारची व्याख्या आहे. देवाकडे तर नीति किंवा अनीति याचे भांडणच नाही. तिथे तर अहंकाराची अडचण आहे. नीतिपालन करणाऱ्यांचा अहंकार फार मोठा असतो. त्यांना तर दारु न पिता नशा चढलेली असते. Page #75 -------------------------------------------------------------------------- ________________ ६४ पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : आता लाच म्हणून पाचशे रुपये घेण्याची सूट दिली, तर मग जसजशी आवश्यकता वाढत जाईल तसतसे पैसे पण जास्त घेतले तर? दादाश्री : नाही. तिथे तर एकच नियम, पाचशे म्हणजे पाचशेच. नंतर त्या नियमातच राहायला पाहिजे. आता माणूस या काळात ह्या अडचणीतून कसे दिवस निभावणार? आणि त्यात जर त्याला कमी पडत असलेल्या पैशांची काही व्यवस्था होऊ शकली नाही, तर काय होईल? काळजीत सापडेल की हे जे पैसे कमी पडतात ते कुठून आणू? ही तर त्याची गरजही भागली, कमी पडलेले पैसे मिळाले. त्याचेही पझल सॉल्व्ह झाले ना? नाहीतर अशा परिस्थित तो चुकीच्या मार्गाने चालू लागेल, आणि मग संपूर्ण लाच घेण्याच्या आहारी जाईल. त्यापेक्षा हा मधला रस्ता काढला. म्हणजे त्याने अनीति केली, तरी पण ती नीतिच म्हटली जाईल, आणि त्याच्यासाठीही हे सोयीस्कर झाले की ही नीतिच म्हणायची. अन त्याचे घर-संसार पण चालेल. __ वस्तुतः मी काय सांगू इच्छितो, हे जर समजले तर त्याचे कल्याण होऊन जाईल. प्रत्येक वाक्यात मी काय सांगू इच्छितो हे जर नीट लक्षात आले तर त्याचे कल्याण होईल. पण जर तो ही गोष्ट स्वतःच्या भाषेत घेऊन गेला तर काय होईल? प्रत्येकाची स्वत:ची स्वतंत्र भाषा असते. तो स्वत:च्या भाषेत आपल्या परीने फीट करतो, पण त्याच्या लक्षात हे येणार नाही की 'नियमाने अनीति कर!' मी सुद्धा व्यापार-धंदा करणारा माणूस आहे. आमच्या वाट्याला सुद्धा धंदा-रोजगार-इन्कमटॅक्स हे सर्वकाही येते. आम्ही कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करतो, तरी पण त्यात आम्ही संपूर्णपणे 'वीतराग' राहतो. 'वीतराग' कसे राहू शकतो? 'ज्ञाना'मुळे. अज्ञानामुळे तर लोक दुःखी होत आहेत. प्रश्नकर्ता : 'खोटे' करण्याची इच्छा नसतानाही खोटे करावे लागते. दादाश्री : जे नाईलाजाने करावे लागते, त्याचा पश्चाताप करायला हवा. अर्धा तास बसून पश्चाताप केला पाहिजे की, 'असे करायची इच्छा Page #76 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार नाही, पण तरीही मला करावे लागत आहे.' तुम्ही पश्चाताप जाहीर केला म्हणजे तुम्ही गुन्ह्यातून सुटलात. आणि हे तर आपली इच्छा नसूनही अनिवार्यपणे करावे लागते. तेव्हा त्याचे प्रतिक्रमण करावे लागणार. 'असेच करायला पाहिजे' असे जर म्हणाले, तर त्याचा उलटा परिणाम होईल. असे करून खुष होणारी माणसे सुद्धा असतातच ना! हे तर तुम्ही हळुकर्मी (मंदकर्मी) आहात म्हणून तुम्हाला पश्चाताप होतो. नाहीतर माणसांना पश्चाताप सुद्धा होत नाही. जास्त पैसे असले तर देवाच्या किंवा सीमंधर स्वामींच्या मंदिरात देणे योग्य आहे. दुसरे एकही स्थान नाही आणि कमी पैसे असतील तर महात्म्यांना जेवू घातल्यासारखे दुसरे काहीच नाही! आणि त्याहीपेक्षा कमी पैसे असतील तर कुणी दुःखी माणसाला द्यावे आणि ते सुद्धा नकद पैसे नव्हे, तर खाण्या-पिण्याचे सामान पोहोचते करून! तर आता कमी ऐपतीत सुद्धा दान करायचे असेल तर झेपेल की नाही? (४) ममता रहीतता आपल्या पापात कुणीही भागीदारी करीत नाही. आपण जर मुलाला विचारले की, 'बाबा, मी चोरी करून हे पैसे कमावतो.' तर तो काय म्हणतो, तुम्हाला कमावायचे असतील तर कमवा, आम्हाला तसले पैसे नको.' तर बायको देखील म्हणते, 'जन्मभर उलट-सुलट केले, आता तरी सोडून द्या तो नाद! पण तरी हा मूर्ख सोडायला तयार होत नाही. जेव्हापासून द्यायला शिकला तेव्हापासून सद्बुद्धी उत्पन्न झाली, अनंत जन्मापासून द्यायचे शिकलाच नाही. खरकटे द्यायचे सुद्धा आवडत नाही, असा हा मनुष्य स्वभाव! ग्रहण करण्याचीच सवय आहे ना त्याला! जेव्हा जनावर होता तेव्हा सुद्धा ग्रहण करण्याचीच सवय, द्यायची सवयच नाही! तो जेव्हा द्यायचे शिकतो तेव्हा मोक्षाच्या वाटेवर वळतो. चेक मिळाला की समजतो की याला कॅश केला (वटवला) म्हणजे Page #77 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार पैसे येतील! तर हे (पुण्याचा) चेक घेऊन आले होते, तो तुम्ही आज वटवला! त्यात तुम्ही काय श्रम केले? पण तरीही लोक म्हणतात, 'मी इतके मिळवले, मी मेहनत केली!' अरे, एक चेक वटवला त्यास काय मेहनत केली म्हणायचे? आणि ते सुद्धा, जेवढ्याचा चेक असेल, तेवढेच मिळतील, त्याहून जास्त मिळणार नाही ना? आले का लक्षात? माझे म्हणणे असे की गंभीर व्हा, शांत व्हा, कारण ज्या पुरणगलनसाठी लोक धावपळ करीत असतात, गुणाकार-भागाकार करीत राहतात, ते सर्व स्वतःचे जन्म बिघडवतात आणि बँकबॅलेन्स मध्ये तर काही बदल होऊ शकेल असे नाही, कारण ते नैसर्गिक आहे. जे निसर्गाच्या हातात आहे त्यात तुम्ही काय फरक करू शकणार? म्हणून आम्ही तुमची भीती काढून टाकतो. आम्ही 'जसे आहे तसे' उघड करीत आहोत, की बेरीज-वजाबाकी (कमावणे किंवा गमावणे) ही कुणाच्या हातची गोष्ट नाही, ती निसर्गाच्या हातात आहे. आणि बँकेत (खात्यात) किती जमा होणे हेही निसर्गाच्या हातात आहे. आणि बँकेत कमी होणे हे सुद्धा निर्सगाच्याच हातात आहे. नाहीतर बँकेवाल्याने एकच खाते ठेवले असते. फक्त क्रेडिट खाते, डेबिट खाते ठेवलेच नसते. कोणाशीही कटकट करू नका. आणि अशी माणसे तर केव्हातरीच भेटतात ना? आता असल्या माणसांबरोबर भांडण पत्करून काय उपयोग? एकदा सांगून बघावे की, 'बाबा, देवाचे स्मरण तर ठेव' तेव्हा जर तो म्हणाला, 'देव-बीव मी काही जाणत नाही. असे शब्द निघाले की आपण समजून जायचे की हा भांडखोर आहे! लाचारीसारखे दुसरे पाप नाही. लाचारी करू नये. नोकरी मिळत नसेल तर लाचारी, धंद्यात तोटा आला तरी लाचारी, इन्कमटॅक्स ऑफिसरने धमकावले तरी पण लाचारी. अरे! लाचारी का म्हणून करायची? जास्तीत जास्त पैसे घेऊन जाईल, घर घेऊन जाईल, आणखी काय घेऊन जाणार? मग लाचारी कशासाठी? लाचारी म्हणजे तर भगवंताचा भयंकर अपमान आहे. आपण लाचार झालो की आतल्या भगवंताचा भयंकर अपमान होतो. पण भगवंत तरी काय करणार? Page #78 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ___६७ व्यावहारिक कायदा कसा आहे ! शेयर बाजारात झालेले नुकसान शेयर बाजारानेच परत फेडायचे. किराणा मालाचे दुकान उघडून नव्हे! खूप सारे डास असले तरी रात्रभर झोपू देत नाहीत आणि दोन असले तरी रात्रभर झोपू देणार नाहीत. तर आपण असे म्हणायचे की 'हे! डासमय दुनिया! दोघे झोपू देत नाहीत तर सगळेच या की!' हे नफानुकसान म्हणजे डासच म्हणायचे. डास तर येत राहतील. आपण त्यांना उडवत रहायचे आणि झोपायचे. आतमध्ये अनंत शक्ति आहे. ते शक्तिवाले काय म्हणतात, की 'हे चंदुभाऊ! तुमचा काय विचार आहे ?' तेव्हा आतून बुद्धी म्हणते की, 'या धंद्यात इतका तोटा झाला आहे. आता काय करणार? आता नोकरी करून नुकसान भरपाई करा.' तेव्हा आतून अनंत शक्तिवाले काय म्हणतात, 'आम्हाला विचारा ना, बुद्धीचा सल्ला का घेता? आम्हाला विचारा, आमच्याजवळ अनंत शक्ति आहे. जी शक्ति नुकसान घडवून आणते त्याच शक्तिजवळ फायदा शोधा! तोटा घडून येतो तो एका शक्तिमुळे आणि फायदा शोधत आहात दुसरीकडे! तेव्हा ताळमेळ कसा बसेल? आत तर अनंत शक्ति आहे. तुमचा 'भाव' जर बदलला नाही, तर या जगात अशी कोणतीही शक्ति नाही की जी तुमच्या इच्छेनुसार करणार नाही. अशी अनंत शक्ति आपल्या सर्वात आहे. पण कुणाला दुःख होणार नाही, कुणाची हिंसा होणार नाही, असे आपले लॉ (कायदे) असले पाहिजेत. आपल्या भावनांचा कायदा इतका कडक असला पाहिजे की, देह संपला तरी, आपली 'भावना' तुटणार नाही. देह पडला तर, एक वेळ पडू दे. त्यात घाबरायचे कारण नाही. असे घाबरल्याने तर या लोकांचे हाल होतील. मग कुणी सौदा करणारच नाही ना! आम्ही तर असे मोठे दलाल पाहिले आहेत की जे चाळीस लाख रुपयांची वसुलीची गोष्ट करतात आणि परत असेही म्हणतात की दादाजी, बरीच माणसं उलटे बोलू लागली आहेत, (घाबरवत आहेत) तर आता कसे होईल? तेव्हा मी म्हटले, जरा धीर धरावा लागेल. पाया मजबूत असला पाहिजे. रस्त्यावर या गाड्या इतक्या वेगाने धावत असतात, तरीही सर्व सलामत राहतात, तर काय धंद्यातून सेफ (सलामत) नाही निघू शकणार? रस्तावर Page #79 -------------------------------------------------------------------------- ________________ ६८ पैशांचा व्यवहार थोड्या-थोड्या वेळाने टक्कर होईल की काय, असे वाटते, पण टक्कर होत नाही. सगळ्यांचीच काय टक्कर होते? म्हणजे ज्या जागी घाव होतो त्या जागीच तो घाव भरतो सुद्धा. म्हणून जागा बदलू नका. शिवाय नियम सुद्धा हाच आहे. आपल्यात ज्या ज्या प्रकारच्या शक्ति असतील त्या वापरुन आपण लोकांना ऑब्लाइज(परोपकार) करावे, कोणत्याही प्रकारे समोरच्या माणसांना, सर्वांना, सुखी करावे. आपण सकाळी ठरवायचे की मला जो कुणी भेटेल, त्याला काही ना काही सुख द्यायचे आहे. पैसे देऊ शकत नाही तर इतर अनेक मार्ग आहेत. त्यांना योग्य समज देऊ शकतो, अडचणीत सापडलेल्या व्यक्तिला धीर देऊ शकतो आणि पैसे सुद्धा, पाच-पन्नास रुपये तरी देऊ शकतो ना! जो जितक्या जबाबदारीने परक्याचे करतो, तो स्वत:चेच करतो. प्रश्नकर्ता : परक्याचे करतो, तो स्वत:चचे करतो. ते कसे ? दादाश्री : सर्व आत्मा एकसारख्या स्वभावाचेच आहेत. त्यामुळे जो परक्याच्या आत्म्यासाठी करतो, ते स्वत:च्या आत्म्यालाच पोहोचते. आणि दुसऱ्याच्या देहाची सेवा करतो, ती पण पोहोचते. हे खरे, की जो केवळ आत्म्यासाठी करतो, ते दुसऱ्या प्रकारे फळाला येते, मोक्षाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो, आणि निव्वळ देहासाठी करतो तो इथे सुख भोगत राहतो. म्हणजे हा एवढाच फरक आहे. प्रश्नकर्ता : माझ्या मामांनी मला ज्या धंद्यात अडकविला आहे, हे जेव्हा-जेव्हा आठवते तेव्हा मामांसाठी मनात खूप उद्वेग होतो की असे का केले त्यांनी? मी काय करावे? काही समाधान सापडत नाही. दादाश्री : असे आहे की, चूक तुझी आहे म्हणून तुझ्या मामाने तुझी फसवणूक केली. जेव्हा तुझी चूक संपेल तेव्हा तुला फसवणारा कुणीही भेटणार नाही. जोपर्यंत तुम्हाला फसविणारे भेटतात तोपर्यंत तुमच्याच चुका आहेत. मला (दादाजींना) का कुणी फसवणारा भेटत नाही? मला तर फसवणूक करून घ्यायची आहे, तरी मला कुणी फसवित नाही. आणि Page #80 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ६९ तुला कुणी फसविणारा भेटला तर तू निसटून जाण्याचा प्रयत्न करतोस ? पण मला तर निसटता सुद्धा येत नाही. तात्पर्य असे की तुमची फसवणूक कोण, कुठपर्यंत करेल ? तर जोपर्यंत तुमच्या खात्यात त्याचा हिशोब बाकी आहे, देण्या-घेण्याचा हिशोब बाकी आहे, तोपर्यंतच तुम्हाला फसवू शकेल. माझ्या खात्याचे सगळे हिशोब पूर्ण झाले आहेत. मध्यंतरी तर मी लोकांना इथपर्यंत सांगत होतो की बाबा, ज्यांनाही पैशाची अडचण असेल, त्याने मला एक थप्पड मारायची आणि पाचशे रुपये घेऊन जायचे. तेव्हा ते लोक म्हणायचे, 'नको रे बाबा, या अडचणीत तर मी कसेही दिवस काढीन, पण तुम्हाला थप्पड मारली तर माझी काय अवस्था होईल ? आता ही गोष्ट सर्वांना सांगता येणार नाही, काही डेव्हलप माणसांनाच ही गोष्ट सांगू शकतो. म्हणजे काय, की जगात कुणीही तुला फसविणारा नाही. जगाचा तू मालकच आहेस. तुझ्यापेक्षा वरिष्ठ ( वरचढ ) कुणी नाही. खुदा एकटाच तुझा वरिष्ठ आहे. पण तू जर खुदला (स्वतःला ) ओळखले ना, तर मग तुझा वरिष्ठ कुणीच राहिला नाही. मग कोण फसविणार आहे वर्ल्डमध्ये ! कुणी आपल्याला किंचितही त्रास देऊ शकत नाही. पण पाहा ना, किती मोठी फसवणूक झाली आहे ती ! म्हणून 'मामाने माझी फसवणूक केली, ' हे डोक्यातून काढून टाक. आणि व्यवहारात कुणी विचारले तर असे नाही म्हणायचे की पूर्वी मी त्यांना फसविले होते म्हणून त्यांनी मला फसविले! कारण हे विज्ञान लोकांना माहित नाही, त्यामुळे लोकांना त्यांच्या भाषेतच सांगायला हवे की ‘मामांनी असे केले.' पण आपल्या मनात समजून असावे की ‘यात माझीच चूक होती.' दादा सांगत होते तेच राईट आहे. आणि गोष्ट पण खरीच आहे ना, कारण मामा सद्या तरी भोगत नाही, ते तर मोटार आणून मजेत फिरतात. निसर्ग जेव्हा त्यांना पकडेल तेव्हा त्यांचा गुन्हा सिद्ध होईल. आज तर निसर्गाने तुला पकडले आहे ना ! दुकानात गेलो नाही तर दुकान नाराज होते. दुकान खुष असेल तर चांगली कमाई होते, तसेच इथे सत्संगासाठी पाच मिनिटे, जास्त वेळे Page #81 -------------------------------------------------------------------------- ________________ ७० पैशांचा व्यवहार नसेल तर पाच-दहा मिनिटांसाठी येऊन दर्शन घेऊन जा, जोपर्यंत आम्ही इथे आहोत, तोपर्यंत! हजेरी तर द्यायलाच हवी ना! । म्हणजे हा दादांचा तर ब्लॅन्क चेक, कोरा चेक म्हणायचा. हा काही पुन्हा-पुन्हा वटवण्यासारखा नाही. खास अडचण आली तरच साखळी ओढायची. सिगरेटचे पाकीट पडले आणि आपण जर गाडीची साखळी ओढली, तर दंड झाल्याशिवाय राहील काय? म्हणजे असा दुरुपयोग करू नये. प्रश्नकर्ता : अलीकडे टॅक्स इतके वाढले आहेत की चोरी केल्याशिवाय मोठ्या धंद्यात संतुलन राहत नाही. सगळ्यांनाच लाच हवी, तर त्यासाठी चोरी तर करावीच लागते ना? दादाश्री : चोरी ठीक आहे पण नंतर तुम्हाला पश्चाताप होतो की नाही? पश्चाताप झाला तरीही ते (कर्म) हलके होऊन जाईल. प्रश्नकर्ता : तर मग अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? दादाश्री : जिथे आपल्याला असे वाटते की हे चुकीचे (काम) होत आहे, तिथे आपण हार्टिली पश्चाताप करायला पाहिजे. दु:ख वाटायला हवे, तरच सुटका होईल. आता काळ्या बाजारातून माल खरेदी करून आणला तर तो काळ्या बाजार भावानेच विकावा लागणार. तेव्हा मग चंदुलालला सांगायचे की तुम्ही 'प्रतिक्रमण करा.' होय, पूर्वी प्रतिक्रमण करीत नव्हतो म्हणून तर कर्माचे तळे साठले. आता प्रतिक्रमण केले, म्हणजे (हिशोब) चोख होऊन जाईल. जर लोखंड काळ्याबाजारात विकले, तर आपण चंदुलालला सांगायचे, "चंदुलाल, विकले त्यास हरकत नाही, ते 'व्यवस्थित'च्या आधीन आहे. पण त्याचे आता प्रतिक्रमण करा. आणि म्हणा, की परत असे घडता कामा नये." जर एखाद्या माणसाने मला सांगितले की, 'मला धर्म नको आहे. मला भौतिक सुख पाहिजे.' त्याला मी सांगेन, 'प्रामाणिक रहा, नीतिचे पालन कर.' त्याला मी देवळात जा असे नाही सांगणार. तू जे काही दुसऱ्यांना देतोस तो देवधर्म आहे. पण दुसऱ्याचे बिनहक्काचे घेत नाहीस, Page #82 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ७१ तो मानवधर्म आहे. अर्थात प्रामाणिकपणा हा सर्वात मोठा धर्म आहे. 'डिसऑनेस्टी इज द बेस्ट फूलिशनेस!' (अप्रामाणिकता हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे) पण जर ऑनेस्ट राहता येत नाही, तर काय मी समुद्रात उडी घेऊ? माझे दादाजी शिकवतात की डिसऑनेस्ट झालास तर, त्याचे प्रतिक्रमण कर. तुझा पुढील जन्म उजळेल. डिसऑनेस्टीला डिसऑनेस्टी समज आणि त्याचा पश्चाताप कर. पश्चाताप करणारा माणूस ऑनेस्ट आहे, हे निश्चित आहे. अनीतिची कमाई करतो, हे सर्व आहे, तर त्यावर उपाय कोणते ते मी सांगितले आहेत, की अनीतिने जर पैसे मिळविले असतील तर रात्री 'चंदुलाल'ला काय सांगावे की सतत प्रतिक्रमण करीत राहा. अनीतिची कमाई का केली? म्हणून आता प्रतिक्रमण कर. रोज चारशे-पाचशे प्रतिक्रमण करायला लावा. स्वतः शुद्धात्म्याने करायचे नाही. 'चंदुलाल'ला करायला लावायचे. ज्याने अतिक्रमण केले त्याच्याकडून प्रतिक्रमण करवून घ्यायचे. आता भागीदाराबरोबर मतभेद झाला, तर ते लगेच तुमच्या लक्षात येते की जरा जास्तच बोलून गेलो. मग लगेचच त्याच्या नावाचे प्रतिक्रमण करायचे. आपले प्रतिक्रमण कॅश पेमेन्ट सारखे(नकद) असले पाहिजे. ही बँक सुद्धा कॅश म्हणायची आणि पेमेन्ट सुद्धा कॅश म्हणायचे. या संसारात अंतराय कसे पडतात, ते तुम्हाला समजावून सांगतो. आपण ज्या ऑफिसमध्ये नोकरी करता, तिथे आपल्या आसिस्टन्टला (सहाय्यकाला) बेअक्कल म्हणालात, तर त्यामुळे तुमच्या अकलेवर अंतराय पडला! समजले! सारे जग अंतरायात अडकून मनुष्य जन्म वाया घालवत आहे. तुम्हाला अधिकारच नाही, समोरच्याला बेअक्कल म्हणायचा. तुम्ही असे बोलता म्हणून समोरचा सुद्धा उलट बोलतो, त्यामुळे त्यालाही अंतराय पडतो! बोला, आता या जगात अंतरायाची परंपरा कशी थांबेल? तुम्ही कुणाला नालायक म्हटले, तर तुमच्या लायकीवर पडला अंतराय! तुम्ही जर त्याचे लगेचच प्रतिक्रमण केले तर तो अंतराय पडण्यापूर्वीच धुतला जातो. Page #83 -------------------------------------------------------------------------- ________________ ७२ पैशांचा व्यवहार प्रश्नकर्ता : नोकरीचे कर्तव्य निभावताना मी फार कडकपणे लोकांना अपमानित केले होते, लोकांना झिडकारले होते. दादाश्री : त्या सर्वांचे प्रतिक्रमण करायचे. त्यात तुमचा हेतू वाईट नव्हता, तुम्ही स्वत:साठी नव्हे, तर सरकारसाठी ते सर्व केले. म्हणून ती सिनसियारीटी म्हणायची. (५) लोभामुळे थाटला संसार जी वस्तू प्रिय वाटत असेल त्यात मूर्छित राहणे, याचे नाव लोभ. ती वस्तू मिळाली तरी संतोष वाटत नाही. लोभी माणूस तर, सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत लोभातच अडकलेला असतो. सकाळी उठल्यापासून लोभाची गाठ जसे दाखविल तसे तो करत राहतो. लोभी हसण्यात सुद्धा वेळ घालवित नाही. दिवसभर लोभाच्याच नादात असतो. मार्केटमध्ये पाय ठेवला, तेव्हापासून लोभ. नुसता लोभ, लोभ, लोभ, लोभ ! कारणाशिवाय दिवसभर हिंडत राहतो. लोभी माणूस भाजीमार्केटमध्ये गेला की त्याला माहितच असते या बाजूला महाग भाजीपाला मिळतो आणि त्या बाजूला स्वस्तात ढीग विकले जातात. तर मग स्वस्तातले ढीग शोधून काढतो आणि मग रोज त्याच बाजूला भाजी घ्यायला जातो. लोभी माणूस भविष्यासाठी सर्वकाही गोळा करतो. मग जेव्हा फार गोळा झाले, की दोन भले मोठे उंदिर घुसतात आणि सर्वकाही साफ करून टाकतात. लक्ष्मी गोळा करण्याची इच्छा न बाळगात जमा करावी. लक्ष्मी येत असेल तर तिला रोखू नये, आणि येत नसेल तर चुकीच्या मार्गाने ओढू नये. लक्ष्मी तर स्वतः येण्यासाठी तयारच असते. ती काही आपण संग्रह केल्याने संग्रहित होत नाही! असे नाही, की आज लक्ष्मीचा संग्रह करून ठेवला, आणि पंचवीस वर्षानंतर, मुलीच्या लग्नासाठी वापरण्यापर्यंत ती Page #84 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार टिकून राहील. त्या गोष्टीत काही तथ्य नाही. जर कुणी असे मानत असेल, तर ती अगदी चुकीची समज ठरेल. हे तर त्यादिवशी जे पदरी पडेल ते खरे. फ्रेश असायला हवे. ७३ म्हणून ज्या वस्तू मिळतील त्याचा उपयोग करा, फेकू नका. सन्मार्गी वापरा. फार साठवून ठेवायचा मनसुबा ठेवू नका. साठवून ठेवायचे असेल तर त्याचा काही नियम असावा की बाबा, आपल्याजवळ, इतकी पुंजी असायला हवी. मग तितकी पुंजी जमा ठेवून, उरलेले योग्य जागी वापरावे. लक्ष्मी फेकून देण्यासाठी नसते. लोभाचा प्रतिपक्ष शब्द आहे संतोष. पूर्वजन्मी थोडेफार ज्ञान समजले असेल, आत्मज्ञान नाही, पण संसारी ज्ञान समजले असेल, त्याला संतोष उत्पन्न होतो. आणि जोपर्यंत हे समजले नसेल तोपर्यंत लोभातच जगत असतो. अनंत जन्मांपर्यंत स्वतःने बराच उपभोग घेतलेला असतो त्यामुळे त्याला त्याचा संतोष वाटतो की मला आता काहीच नको. आणि ज्याने उपभोग घेतला नसेल त्याला कितीतरी प्रकारचे लोभ चिकटतात. त्याला मग सारखे वाटत राहते की 'याचा उपभोग करू, त्याचा उपभोग करू' असे वाटत राहते. प्रश्नकर्ता : लोभी मनुष्य थोडा कंजूष पण असतो, नाही का ? दादाश्री : नव्हे. कंजूष पुन्हा वेगळे, कंजूष तर, स्वतः जवळ पैसा नाही म्हणून कंजूषपणा करतो. पण लोभी कसा असतो, तर घरात पंचवीस हजार असले तरी, कुठून गहू, तांदूळ स्वस्तात मिळू शकतील, कुठून तूप स्वस्त मिळेल, हेच शोधत राहतो सगळीकडे. त्याचे चित्त लोभातच गुंतलेले असते. मार्केटमध्ये गेला तर तिथे सुद्धा स्वस्तात भाजीपाल्याचे छोटे वाटे कुठे मिळतील तेच शोधत असतो. लोभी कुणाला म्हणायचे, तर प्रत्येक बाबतीत तो जागृतच असतो ! प्रश्नकर्ता : लोभी आणि कंजूष यांच्यात नेमका फरक काय ? दादाश्री : कंजूष फक्त लक्ष्मीच्या बाबतीच असतो. लोभी तर सर्व Page #85 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार बाबतीत लोभातच गुंतलेला असतो. मानासाठी पण लोभ करतो, आणि लक्ष्मीसाठी पण लोभ करतो. या लोभी माणसाला तर सर्व दिशांनी लोभ घेरुन असतो. सगळीकडून ओढून नेतो. प्रश्नकर्ता : लोभी बनणे की काटकसरी ? दादाश्री : लोभी असणे हा गुन्हा आहे, काटकसर करणे हा गुन्हा ७४ नाही. 'इकोनोमी' म्हणजे काय ? टाईट असेल तेव्हा टाईट आणि थंड असेल तेव्हा थंड. कधीही कर्ज काढून कार्य करू नये. कर्ज काढून व्यापार करू शकतो. परंतु ऐशोआरामासाठी कर्ज काढू नये. कर्ज काढून केव्हा खायचे? ज्यावेळी माणूस मरणाला टेकलेला असतो तेव्हा, नाहीतर कर्ज काढून तूप खाऊ नये. प्रश्नकर्ता: दादा कंजूषी आणि काटकसरमध्ये काय फरक आहे ? दादाश्री : फार मोठा फरक ! हजार रुपये महिना कमावत असाल तर आठशेचा खर्च करायचा, आणि पाचशे मिळत असतील तर चारशेचा खर्च करायचा, त्याला म्हणतात काटकसर. जेव्हा की कंजूष तर चारशे म्हणजे चारशेच वापरणार, मग जरी हजार मिळवत असेल किंवा दोन हजार. तो टॅक्सीने जाणार नाही. काटकसर हे तर इकॉनोमिक्स - अर्थशास्त्र आहे. काटकसरी तर भविष्यात येणाऱ्या अडचणींचा विचार करतो. कंजूष माणसाला बघितल्यावर समोरच्याला राग येतो की कंजूष आहे. पण काटकसर करणाऱ्याला बघून राग येत नाही. घरात काटकसर कशी असावी? तर आपले बाहेर वाईट दिसू नये अशी असावी. काटकसर स्वयंपाकघरात शिरता कामा नये. तिथे उदार काटकसर करावी. स्वयंपाकघरात काटकसर घुसली तर मन बिघडते. कुणी पाहुणा आला तरी मन बिघडते की इतके तांदूळ संपतील! कुणी पैसे उधळत असेल तर आम्ही त्याला सांगतो की 'नोबल' काटकसर करा. पैसे कमविण्याची भावना करायची गरज नाही. प्रयत्न सुरु असेल त्यास हरकत नाही. पण भावना बाळगल्याने काय होते ? 'मी पैसे खेचून Page #86 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ७५ घेऊ' तर समोरच्याच्या वाट्याला काही येणार नाही मग! म्हणून निसर्गाने जो क्वोटा निर्माण केला आहे तो तसाच राहू द्या ना! लोभ म्हणजे काय? तर दुसऱ्याचे हिसकावून घेणे. मग कमाईची भावना करण्याची गरजच काय? मरणार आहे त्याला मारण्याची भावना करण्याची काय गरज? हे मी सांगू इच्छितो. लोक कितीतरी पापकर्मातून वाचतील या एका वाक्याने ! असे माझे म्हणणे आहे. लोभवृत्तिमुळे जे आचरण घडते ते आचरणच त्याला पशूयोनीत घेऊन जाते. तुम्ही सज्जन माणूस आहात आणि तुमची फसवणूक नाही झाली तर दुसऱ्या कुणाची होईल? नालायकाची तर फसवणूक होणार नाही. त्याच्या बाबतीत तर 'सापाच्या घरी साप गेला, आणि जीभ चाटून परत आला' असा थाट होणार! फसवणूक झाली तरच आम्ही खानदानी म्हटले जाऊ ना. आपल्याला जो ‘यावे, बसावे' म्हणून आदर सत्कार मिळतो ना, हे तर त्याचे प्रिपेमेन्ट असते. म्हणून 'लोभ्याकडून फसविले जावे' असे लिहीले आहे. कारण फसविले जाऊन मला मोक्ष गाठायचा आहे. मी येथे पैसे जमा करण्यासाठी जन्माला आलो नाही. आणि मला हेही माहित आहे की तो नियमाच्या आधीन मला लुबाडत आहे की अनियमाने? मी हे सर्वकाही जाणून आहे, त्यामुळे मला काही हरकत नाही. माझी फसवणूक भोळेपणामुळे झाली नव्हती. मला माहित होते की हे सर्व माझी फसवणूक करीत आहेत. मी जाणून-बुझून स्वत:ला फसवून घेतो. भोळेपणामुळे जो फसविला जातो, तो तर वेडा ठरतो. आम्ही काही भोळे असू शकतो? जो जाणूनबुझून स्वत:ची फसवणूक करवून घेतो, तो कधी भोळा असू शकेल काय? आमचे भागीदार एकदा मला म्हणाले, 'तुमच्या भोळेपणाचा लोक फायदा घेतात.' तेव्हा मी त्यांना उत्तर दिले, 'तुम्ही मला भोळा समजता, म्हणजे तुम्हीच भोळे आहात. मी तर जाणून-बुझून फसवणूक होऊ देतो.' तेव्हा ते म्हणाले की 'या पुढे मी तुम्हाला असे बोलणार नाही.' Page #87 -------------------------------------------------------------------------- ________________ ७द पैशांचा व्यवहार मी समजून आहे की या बिचाऱ्याची मती अशी आहे. त्याची दानत अशी बनली आहे. त्यामुळे त्याला जाऊ द्या. 'लेट गो करा' आम्ही कषायांपासून (क्रोध-मान-माया-लोभापासून) मुक्त होण्यासाठी आलो आहोत. म्हणून स्वतःची फसवणूक होऊ देतो, दुसऱ्यांदा सुद्धा फसविले जातो. समजून-उमजून फसवणूक पत्करणारे लोक फार कमी असतात ना? लहानपणापासून माझे प्रिन्सिपल (सिद्धांत) होते की समजून फसवणूक होऊ द्यायची. बाकी, मला कुणी मूर्ख बनवू शकेल आणि फसवू शकेल, या गोष्टीत काही तथ्य नाही. अशाप्रकारे समजून फसण्याचा परिणाम काय झाला, की ब्रेन टॉप वर पोहोचले. मोठमोठ्या जजीसचे ब्रेन जिथे चालणार नाही, तिथेही आमचे ब्रेन काम करू लागले. श्रीमद राजचंद्र यांनी लिहीले आहे की, ज्ञानी पुरुषाची तन, मन, आणि धनाने सेवा करा. तेव्हा कुणी विचारले की 'ज्ञानी पुरुषाला धनाचे काय काम? त्यांना तर कोणत्याही वस्तूची इच्छा नसते. तर ते म्हणाले,' नाही. तुम्ही तन-मनपूर्वक सेवा करत आहात पण तुम्हाला असे सांगितले की या सुयोग्य जागी धन देऊन टाका, तेव्हा तसे केल्याने तुमची लोभाची ग्रंथि तुटून जाईल. नाहीतर आपले चित्त लक्ष्मीच्याच ध्यानात राहील. एक माणूस मला भेटला. तो म्हणाला 'माझा लोभ काढून द्या. माझी लोभाची गाठ फार मोठी आहे! ती काढून टाका.' मी म्हटले, 'ती काढल्याने जाणार नाही. ती तर नशीबाने पन्नास लाखाचा तोटा आला की आपोआपच निघून जाईल.' म्हणेल, 'नको रे बाबा, आता पैसेच नकोत!' ___म्हणजे ही लोभाची गाठ तर नुकसान झाल्यावर निघून जाईल. मोठे नुकसान झाले की लोभाची गाठ पटकन तुटून जाते. नाहीतर एक ही लोभाची गाठ मात्र तुटत नाही. दुसऱ्या सर्व गाठी वितळतात. लोभी माणसाचे दोन गुरु, एक धूर्त माणूस आणि दूसरा तोटा. मोठा तोटा झाला की लोभाची गाठ पटकन वितळते आणि दुसरे, म्हणजे लोभ्याला त्याचा गुरु भेटतो, धूर्त ! हातात चंद्र दाखवून लुबाडणारे असे धूर्त असतात तेव्हा Page #88 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ७७ लोभी हरखून जातो! आणि नंतर तो गुरु त्याची सर्व पुंजीच हडप करून टाकतो! मला लोक विचारतात की 'समाधि सुखाचा अनुभव केव्हा होईल?' मी म्हटले, 'ज्याला काहीच नको असते, लोभाच्या सर्व ग्रंथी पूर्णपणे सुटतील तेव्हा होईल. लोभाची ग्रंथी एकदा सुटली की मग सुख सहजपणे अनुभवास येते. बाकी आत ग्रंथी बाळगून आहे त्याला सुख मिळतच नाही ना! म्हणून दुसऱ्यांसाठी पैसे खर्च करा. जितके दुसऱ्यांसाठी खर्च कराल, तितके तुमच्या पदरी जमा झाले. जेवढे पैसे मिळतील तेवढे चांगल्या मार्गाने वापरतो, तो सुखी. तेवढे धन तुमच्या खात्यात जमा होते. नाहीतर गटारीत तर जाणारच आहेत. कुठे जातील? गटारीत जात असतील? या मुंबईचे सारे पैसे कुठे जात असतील? तिथे दांडगा प्रवाह गटारीतच वाहत राहतो! जेवढे चांगल्या मार्गाने वापरले तेवढे पैसे आपल्यासोबत येतील. दुसरे काहीही सोबत येणार नाही. जिथे तिरस्कार आणि निंदा आहे, तिथे लक्ष्मी राहत नाही. लक्ष्मी केव्हा तोंड फिरवते? तर लोकांची निंदा-नालस्ती करणे चालू असते तेव्हा. हा आपला देश केव्हा धनवान होणार? केव्हा लक्ष्मीवान आणि सुखी होईल? जेव्हा निंदा आणि तिरस्कार बंद होतील तेव्हा! हे दोन्ही बंद झाले की देशात पैसे आणि लक्ष्मी यांची रेलचेल होईल. (६) लोभाची समज, सूक्ष्मतेने प्रश्नकर्ता : कोणत्या प्रकारचे दोष भारी असतात की जे कित्येक जन्मापर्यंत चालू राहतात? ज्यायोगे कित्येक जन्म काढावे लागतात असे दोष कोणते? Page #89 -------------------------------------------------------------------------- ________________ ७८ पैशांचा व्यवहार दादाश्री : लोभ! लोभ कितीतरी जन्मापर्यंतसोबत राहतो. लोभी मनुष्य प्रत्येक जन्मात लोभीच राहतो, म्हणजे त्याला तसे पसंतच असते! प्रश्नकर्ता : करोडो रुपये गाठीशी असताना सुद्धा धर्मात पैसा देऊ शकत नाही, याचे काय कारण? दादाश्री : बांधलेले बंध सुटणार तरी कसे? त्यामुळेच त्याची सुटका होत नाही आणि बांधलेलाच राहतो. स्वतः खात पण नाही. अरे, पण कुणासाठी साठवून ठेवतो?! पूर्वी तर साप होऊन फिरत होते. जे धन जमिनीत गाढून ठेवत असत ना, त्या धनाच्या रक्षणासाठी तिथे साप होऊन फिरत राहायचे. 'माझे धन! माझे धन' करत! जीवन जगता आले, असे कुणाच्या बाबतीत म्हणता येईल? तर जवळ असलेला पैसा दुसऱ्यांसाठी लुटवून टाकतो. त्याला खरे जीवन जगता आले असे म्हणता येईल. वेडेपणाने उधळणे नव्हे, तर समजपूर्वक जो दुसऱ्यांच्यासाठी ओवाळून टाकतो. वेड्यासारखे दारु वगैरे पित असतात, त्यात काही भलं होत नाही. कोणतेही व्यसन नसेल आणि परक्यांसाठी स्वत:चे लुटवून टाकतो. यांना पाहा, हे लुटवत आहेत ना. यास पुण्यानुबंधी पुण्य म्हणतात. पुण्यानुबंधी पुण्य कशास म्हणतात? कोणत्याही क्रियेत ज्याला काही मोबदल्याची, इच्छा नाही ते पुण्यानुबंधी पुण्य. दुसऱ्यांना सुख देत असताना मोबदल्याची अपेक्षा ठेवत नसेल, त्याला म्हणतात पुण्यानुबंधी पुण्य ! प्रश्नकर्ता : पैसे सोबत घेऊन जायचे असेल तर कसे घेऊन जाता येतील? दादाश्री : त्यासाठी तर एकच मार्ग आहे की, जे आपले नातेवाईक नाहीत, अशा परक्यांच्या जीवनात शांती, संतोष दिला असेल, तर सोबत येईल. नातेवाईकांना सुख-शांती दिली तर ते सोबत येत नाही, पण आपला हिशोब चुकता होतो. किंवा आमच्यासारख्यांना विचारले तर लोकांना हितकारी होईल असे ज्ञानदान आम्ही सूचवू शकतो. चांगली पुस्तके छापून लोकांना दिली तर त्यांच्या वाचनाने कितीतरी माणसं सन्मार्गी लागतील. आम्हाला विचारले तर आम्ही सांगतो. आम्हाला देणे-घेणे नसते. Page #90 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार माणसाची अशी समजूत असते की पैसे संग्रह करून ठेवले तर मला सुख मिळेल. आणि मग दुःखी होण्याची वेळ कधीही येणार नाही. पण पैसे साठवत साठवत नकळत तो स्वतःच लोभाचा शिकार बनून लोभी बनतो. काटकसर करायची, इकॉनोमी करायची, पण लोभ करायचा नाही. लोभ कुठून शिरतो? लोभीपणाची सुरवात कुठून होते? पैसे जवळ नसतात तेव्हा लोभ नसतो पण जेव्हा नव्याण्णव होतात तेव्हा मनात येते की आज घरात खर्च करण्याऐवजी एक रुपया वाचवून शंभर पूर्ण करून टाकूया! याला म्हणतात नव्याण्णवाचा धक्का! एकदा का माणसाला हा धक्का लागला, तर मग पाच करोड झाले तरी तो लोभ सुटणार नाही. ज्ञानी पुरुषांनी धक्का मारला तरच ती लोभवृत्ती सुटू शकेल. लोभी माणूस सकाळी उठल्यापासून लोभाच्या आहारी जातो. सबंध दिवस त्याचा लोभाच्या हिशोबात जातो. म्हणेल भेंडी फार महाग आहेत. केस कापून घेण्यात सुद्धा लोभ! म्हणेल, अजून काय बावीस दिवसच झालेत, महिना पूर्ण होऊ दे की, काही बिघडत नाही. आले का लक्षात? हा स्वभाव आहे त्याचा. म्हणून ही गाठ त्याला सतत असे दाखवित असते. आणि कषाय होत राहतात. कपट आणि लोभ दोन्हीही दुःखदायक आहेत. पाच-पन्नास रुपये हाताशी असले तरीही खर्च करणार नाही, रिक्षा करणार नाही. पायाची तक्रार असेल, तरी सुद्धा! तेव्हा मी त्यांना म्हटले, 'असे करू नका. थोडे पैसे, दहा-दहा रुपये, रिक्षासाठी खर्च करायला सुरवात करा.' त्यावर ते म्हणाले, ते तर माझ्याने होऊ शकत नाही. द्यायचे झाले की अन्नाचा घास सुद्धा घश्याखाली उतरत नाही. 'आता हिशोबाने पाहिले तर मला सुद्धा कळते, की हे चुकीचे आहे. पण काय करणार? प्रकृती नकार देते.' तेव्हा एकदा मी त्यांना सांगितले, थोडे सुट्टे पैसे (चिल्लर) सोबत घ्या आणि ते रस्त्यात टाकत टाकत या! तर त्यांनी एक दिवस थोडे पैसे टाकले, नंतर बंद केले. ___ आता अशाप्रकारे दोन-चारदा टाकत आलो तर आपले मन काय म्हणेल की 'हा (चंदुभाऊ) तर आपल्या ताब्यात राहिला नाही. आमचे ऐकत नाही.' तर असे केल्याने आपले मन-बिन सगळे बदलते. आपल्याला Page #91 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार त्याच्या विरुद्ध जावे लागते. कारण त्याशिवाय ते वठणीवर येत नाही. जसे घरची मंडळी बेकाबू होत असेल तर त्यांच्या विरुद्ध जावे लागते, तसेच मनाला काबूत आणण्यासाठी त्याच्या विरुद्ध वागावे लागते. लोभ ग्रंथी म्हणजे काय? कुठे किती पैसे आहेत? तिथे किती आहेत? हेच डोक्यात फिरत राहते. बँकेत इतके आहेत, त्याज्याजवळ इतके आहेत, या जागी इतके आहेत, हेच सारखे ध्यानात असते. 'मी आत्मा आहे, हे त्याच्या लक्षात राहत नाही. लोभात जे लक्ष्य गुंतले आहे ते तुटले पाहिजे. 'मी आत्मा आहे' हेच लक्ष्य असायला पाहिजे. लोभी माणसाचा तर स्वभावच असा असतो की तो कोणत्याही रंगात रंगतच नाही. त्याच्यावर कोणताही रंग चढू शकत नाही! जर कोणी लोभी असेल तर तुम्ही हे समजूनच घ्या की त्याच्यावर कोणताही रंग चढणार नाही! लाल रंगात भिजवला तरी पिवळ्याचा पिवळाच राहणार! आणि हिरव्यात भिजवला तरी तो पिवळ्याचा पिवळाच! लोभ वृत्ती नसलेली सर्व माणसे रंगतात. परत तो लोभी हसत राहतो त्यामुळे आपल्याला वाटते की हा रंगून गेला. मी जे काही बोलतो ते सर्वच ऐकत असतो. फार उत्तम गोष्ट, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, इत्यादि शेरे मारतो, पण आतून तन्मयाकार होत नाही. अर्थात दुसरी माणसे तन्मयपणे आपले घरदार विसरुन जातात पण हा काही विसरत नाही. आपला लोभी स्वभाव विसरत नाही. आत्ता यांच्यासोबत यांच्या गाडीतून गेलो की पाच रुपये वाचतील, हे गणित त्याच्या लक्षातच असते. दुसरी माणसे पाच रुपये वाचवायचे विसरुनच जातील, 'नंतर जाऊ,' असे म्हणतील. पण लोभी मात्र विसरणार नाही. तो रंगात रंगला असे म्हणता येणार नाही. रंगला असे केव्हा म्हणता येईल की जेव्हा तन्मयाकार होऊन जाईल. घरदार सर्व विस्मृत होईल तेव्हा. आले का तुमच्या लक्षात? ही माणसे म्हणतात ना, की दादाजींचा रंग लागला? त्याला (लोभ्याला) दादाजींचा रंग लागत नाही. कितीदा तरी रंगात बुडवत राहिलो तरी रंग लागत नाही! ___ मनात पैसे देण्याचा भाव जागृत होतो की आपण देऊया, तरी पण देऊ शकत नाही, त्यास म्हणतात लोभ ग्रंथी. Page #92 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ८१ प्रश्नकर्ता : काही वेळेस संयोगच असे जुळून येतात की देण्याचा मनात भाव असून सुद्धा दिले जात नाहीत. दादाश्री : ती गोष्ट वेगळी. ते तर आपल्याला असे वाटते की संयोग असे आहेत, पण तसे नसते. देण्याचा निश्चय पक्का असेल तर देऊ शकू. असे आहे. प्रश्नकर्ता : होय. पण असूनसुद्धा देत नाही. दादाश्री : असून सुद्धा दिले जात नाही, दिलेच जात नाही ना, तो बांध तुटतच नाही. तो बांध जर तुटला तर मोक्षच होईल ना! ही काही सोपी गोष्ट नाही. प्रश्नकर्ता : तसे पाहिले तर प्रत्येकाची आपल्या लिमीटमध्ये थोडे फार देण्याची शक्ति तर असतेच ना? दादाश्री : नाही, लोभामुळे तसे घडत नाही. लोभीजवळ लाख रुपये असले तरी चार आणे सुटणे अवघड! थंडीताप येईल. अरे, इतकेच नव्हे तर, कुठे पुस्तकात वाचले की ज्ञानी पुरुषाची तन, मन, धनाने सेवा करावी. तर ते वाचताना त्याला ताप भरतो की असे का लिहितात ! लोभ तुटण्याचे दोन रस्ते आहेत. एक तर ज्ञानीपुरुष तोडू शकतात आपल्या वचनबळाने आणि दुसरे म्हणजे फार मोठे, जबरदस्त नुकसान झाले की ताळ्यावर येतो आणि लोभ तुटतो की मला आता काहीच करायचे नाही, आता जे थोडेफार उरले आहेत त्यातच निभावून घ्यायचे. कितीतरी लोकांना मला हे सत्य सांगावे लागते की तोटा येईल तेव्हा लोभ सुटेल. त्याखेरीज लोभ सुटणार नाही. आमच्या सांगण्याने सुद्धा सुटणार नाही. अशी खच्चून गाठ पडलेली असते. ___लोभी माणसाची गाठ मोठा तोटा झाल्यावर तुटते. किंवा जर ज्ञानीपुरुषाची आज्ञा मिळाली तर उत्तम. पण मग आज्ञा पालन करण्याची ज्याची तयारी नाही, त्याला कोण सुधारु शकेल? नियमित सत्संगात राहिल्याने गाठी वितळतात. जोपर्यंत सत्संगाचा Page #93 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार परिचय नसेल तोपर्यंत गाठी आहेत याची जाणीव सुद्धा नसते. सत्संगात राहिल्याने (गाठी) निर्मळ होऊ लागल्या आहेत असे जाणवते. कारण 'आपण' दूर राहिलो ना! दूर राहून सर्व सावकाश पाहायचे. त्यामुळे आपल्याला आपले सर्व दोष दिसू लागतात. नाहीतर गाठीत राहून दोष बघतो, त्यामुळे दोष दिसत नाहीत. म्हणूनच कृपाळुदेवांनी सांगितले आहे कि 'दीठा नहीं निज दोष तो तरीए कोण उपाय !' (जर स्वत:चे दोष दिसले नाहीत, तर कोणत्या उपायाने तरशील ?) ८२ आपले जीवन कुणाच्या लाभासाठी व्यतीत व्हावे, जशी ही मेणबत्ती जळत असते ना ? ती स्वतःला प्रकाश मिळावा म्हणून जळेत का? दुसऱ्यांसाठी, परार्थ जळत असते ना ? इतरांच्या फायद्यासाठी जळत असते ना? त्याच प्रमाणे ही माणसे दुसऱ्यांच्या हितासाठी जगू लागली, तर त्यांचे हितही त्यातच सामावलेलेच असते. नाहीतरी एक दिवस मरण तर येणारच ना ? तेव्हा जर इतरांचा फायद्या (कल्याण) साठी जगलास तर तुझा फायदा (कल्याण) हा त्यात असरणारच, आणि जर इतरांना त्रास देण्याच्या नादात राहिलास तर तू स्वतःसाठी पण त्रासच ओढवून घेशील. मग आता तुला जे करायचे असेल ते कर. आत्मा प्राप्त करण्यासाठी जे काही केले जाते, ते मेन प्रोडक्शन आहे, आणि त्यामुळे बायप्रोडक्शनही प्राप्त होते, ज्यामुळे संसाराची सर्व आवश्यकताही पूर्ण होते, मी माझे एकाच प्रकारचे प्रोडक्शन ठेवतो, संपूर्ण जगात सर्वांना परम शांती होवो आणि कित्येकांना मोक्ष मिळो. हे माझे प्रोडक्शन आणि त्याचे बायप्रोडक्शन मला मिळतच राहते ! आम्हाला चहानाष्टा तुमच्यापेक्षा काही वेगळ्या प्रकारचा मिळतो, त्याचे काय कारण ? तर माझे प्रोडक्शन तुमच्यापेक्षा उच्च कोटीचे आहे. तसे तुमचे प्रोडक्शनही जर उच्च कोटीचे झाले तर त्याचे बायप्रोडक्शनही उच्च कोटीचे होईल. आपल्याला फक्त आपला हेतूच बदलायचा आहे. दुसरे काही करायचे नाही. पंपाच्या इंजिनाचा एक पट्टा या बाजूला लावला की पाणी शेतात येते आणि त्या बाजूला लावला की शालीमधून तांदूळ निघतात. म्हणजे नुसता पट्टा बदलाण्यानेच एवढा फरक पडतो. आधी हेतू निश्चित Page #94 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ८३ करायचा आहे आणि नंतर तो हेतू पूर्णपणे आपल्या लक्षात राहायला हवा. बस, दुसरे काहीच नाही. लक्ष्मीत लक्ष गुंतलेले नसावे. प्रश्नकर्ता : लक्ष्मीचा सदुपयोग केला असे केव्हा म्हणता येईल? दादाश्री : लोकांच्या उपयोगासाठी (जनहितार्थ) किंवा देवासाठी वापरली तर तो लक्ष्मीचा सदुपयोग केला म्हणता येईल. प्रश्नकर्ता : लक्ष्मी टिकत नाही, तर काय करावे? दादाश्री : लक्ष्मी टिकेल अशी नाहीच. पण तिचा रस्ता बदलून टाकायचा. दुसऱ्या गैरमार्गाने जात आहे तर तिची दिशा बदलून टाकायची आणि धर्माच्या मार्गाकडे तिचा प्रवाह वळवायचा. जितकी सन्मार्गाकडे वळली तेवढी वाचली. देव आले की मग लक्ष्मीजी टिकणार, त्या खेरीज लक्ष्मी कशी टिकणार? पैसा चुकीच्या मार्गाने जाऊ लागला तर कंट्रोल करायचा आणि जर सन्मार्गाने खर्च झाला तर डीकंट्रोल करायचा. हा भाऊ कोणाला तरी दान देत असेल, तिथे कुणी बुद्धीवंत म्हणाला की 'अरे, याला का देतोय? तेव्हा हा म्हणेल, अहो देऊ द्या ना! हा गरीब आहे.' असे म्हणून तो दान देतो आणि तो गरीब दान घेतो. पण तो बुद्धीवंत मघेच बोलला त्याचा त्याला अंतराय पडला. त्यायोगे मग त्याला दु:खाच्या काळात कुणी दाता मिळणार नाही. (७) दानाचा प्रवाह आता तर आपण पश्चाताप करून सर्वकाही पुसून टाकू शकतो. आणि मनात निश्चय केला की परत असे बोलू नये आणि हे जे बोललो, 'त्याची क्षमा मागत आहे.' तर ते पुसले जाईल. कारण अजून ते पत्र पोस्टात पडले नाही, त्यापूर्वीच आपण मजकूर बदलून टाकला की पूर्वी Page #95 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार आम्ही मनात असा विचार केला होता की 'दान देऊ नये' पण ते चुकीचे आहे. तेव्हा आता आम्ही विचार करीत आहोत की 'दान देणे हे चांगले आहे.' म्हणजे पूर्वीचे सर्व पुसले जाईल. संकटाच्या वेळी फक्त धर्मच मदतीसाठी तुमच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून धर्माच्या प्रवाहात लक्ष्मीजींना जाऊ द्या. __ पैशाचा स्वभाव कसा असतो? चंचल असतो, त्यामुळे येतो आणि एक दिवस परत निघून जातो. म्हणून पैशाचा उपयोग लोकांच्या हितासाठी करावा. जेव्हा तुमच्या वाईट कर्मांचा उदय आला असेल तेव्हा लोकांना जे दिले असेल तेच तुम्हाला मदत करेल. म्हणून आधीच समजून जावे. पैशांचा सद्व्यय (सदुपयोग) तर करायलाच पाहिजे ना? चार प्रकारचे दान आहेत, एक आहार दान, दुसरे औषधदान, तिसरे ज्ञानदान आणि चौथे अभयदान. ज्ञानदानात पुस्तके छापून घ्यावीत, जी लोकांना सन्मार्गी वळवतील आणि लोकांचे कल्याण करतील अशी पुस्तके छापून घ्यावीत, ते झाले ज्ञानदान. ज्ञानदान करणारा चांगल्या गतीत, वरच्या गतीत जातो किंवा मोक्ष सुद्धा मिळवतो. म्हणून ज्ञानदान ही मुख्य गोष्ट आहे असे भगवंतांनी सांगितले. आणि जिथे पैशांची गरज नाही तिथे अभयदान सांगितले आहे. जिथे पैशांची देवाण-घेवाण असते तिथे ज्ञानदान सांगितले आहे आणि साधारण स्थिती, नरम स्थितीच्या माणसांसाठी औषधदान आणि आहारदान, हे दोन सांगितले आहेत. आणि चौथे अभयदान. अभयदान म्हणजे काय? तर कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही असे वर्तन ठेवायचे, ते अभयदान. __ प्रश्नकर्ता : हल्लीच्या काळात दोन नंबरचा पैसा धर्मात वापरला जातो तर त्यामुळे लोकांना पुण्योपार्जन होते काय? Page #96 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार दादाश्री : निश्चितच होते! त्याने तितका त्याग तर केला ना! स्वतः जवळ आलेल्याचा त्याग केला ना! पण हेतूनुसार ते पुण्य तशा प्रकारचे बनते, हेतू जसा असेल तसे! हे पैसे दिले एवढेच मात्र पाहिले जात नाही. पैशांचा त्याग केला हे निर्विवाद. परंतु ते कुठून आले, हेतू काय, हे सर्व प्लस-माईनस होऊन जे शिल्लक राहील, ते मग त्याचे. त्याचा हेतू काय आहे ? तर सरकार घेऊन जाईल त्यापेक्षा दान करून टाका! प्रश्नकर्ता : लोक लक्ष्मीचा संग्रह करून ठेवतात. ती हिंसा म्हणायची की नाही? दादाश्री : हिंसाच म्हणायची. संग्रह करणे ही हिंसाच आहे. दुसऱ्या लोकांना त्याचा उपयोग घेता येत नाही ना! प्रश्नकर्ता : काही मिळवण्याचा अपेक्षेने जे दान दिले जाते, त्याची पण शास्त्रात मनाई नाही. त्याची निंदा केलेली नाही. दादाश्री : त्याने अपेक्षा ठेवली नाही तर उत्तम आहे. अपेक्षा ठेवली जाते ते दान तर निर्मूळ झाले, सत्वहीन म्हटले जाईल. मी तर म्हणतो पाचच रुपये द्या, पण अपेक्षा न ठेवता द्या. कुणी लाख रुपये धर्मासाठी दिले. आणि स्वतःच्या नावाची पाटी लावून घेतली, आणि कोणी एकच रुपया धर्मासाठी दिला, पण गुप्तपणे दिला, तर या गुप्तदानाची किंमत जास्त आहे. मग जरी तो एक रुपया असला तरीही. आणि ज्याने स्वत:च्या नावाची पाटी लावून घेतली त्याची तर 'बॅलेन्स शीट' संपली, कारण त्याने जे धर्मासाठी दिले होते त्याचा मोबदला त्याने पाटी लावून (इथेच) मिळवून घेतला. आणि ज्याने एकच रुपया खाजगीत दिला, पण त्याने त्याचा मोबदला घेतला नाही, म्हणून त्याचे बॅलन्स शिल्लक राहिले. प्रश्नकर्ता : पुण्याच्या उदयामुळे गरजेपेक्षा जास्त लक्ष्मीची प्राप्ती झाली तर? दादाश्री : तर वापरुन टाकायची, मुलांसाठी फार जपून ठेवू नये. Page #97 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार मुलांना चांगले शिक्षण वगैरे सर्व द्यावे, ते सर्व चांगल्या प्रकारे पूर्ण करून त्यांना कामाला लावले की ते मार्गी लागले. म्हणून त्यांच्यासाठी फार ठेऊ नये. थोडे बँकेत किंवा कुठेतरी ठेवायचे. दहा-वीस हजार, म्हणजे केव्हा तरी तो अडचणीत आला तर त्याला द्यायचे. पण त्याला सांगायचे नाही की मी तुझ्यासाठी ठेवले आहेत. होय, नाहीतर अडचण नसली तरी अडचण उभी करतील. एक माणसाने मला प्रश्न केला की, 'मुलांना काही द्यायचेच नाही? मी उत्तर दिले, 'मुलांना द्यायचे. आपल्या वडिलांनी आपल्याला जितके दिले असेल ते सर्व द्यायचे. मधली जी मिळकत आहे ती आपली. ती आपल्या मर्जीनुसार धर्मासाठी दानात खर्च करावी. प्रश्नकर्ता : आमच्या वकिलीच्या कायद्यात सुद्धा असे आहे की जी वडिलोपार्जित प्रोपर्टी(मिळकत) असेल ती मुलांना द्यावीच लागते. आणि स्वोपार्जित आहे, त्याचा वापर वडील स्वतःच्या इच्छेनुसार करू शकतात. दादाश्री : हो, जे काही करायचे असेल ते आपल्या हातानेच करून घ्यावे! आपला मार्ग काय म्हणतो, की तुझा स्वतःचा जो माल आहे तो माल वेगळा करून तू वापर, तर ते तुझ्यासोबत येईल. कारण हे ज्ञान घेतल्यानंतर अजून एक दोन जन्म बाकी राहतील, म्हणून जवळ काहीतरी असावे ना! परगावी जातो तेव्हा सोबत थोडी शिदोरी घेऊन जातो, तर हे सर्व बरोबर नको का? प्रश्नकर्ता : पुढच्या जन्मासाठी पुण्य उपार्जन करण्यासाठी या जन्मी काय करायला पाहिजे? दादाश्री : या जन्मी जो पैसा मिळेल त्याचा पाचवा हिस्सा देव मंदिरात दान करावा किंवा मग लोकांच्या सुखासाठी वापरावा. म्हणजे तेवढा तरी ओव्हरड्राफ्ट तिथे पोहोचेल. हे गेल्या जन्मीचे ओव्हरड्राफ्ट तर आज उपभोगत आहात. या जन्मी पुण्य कराल, ते पुढच्या जन्मी उपयोगात येईल. आजची कमाई पुढे कामास येईल. Page #98 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ८७ (८) लक्ष्मी आणि धर्म मोक्षमार्गात दोन वस्तू नसाव्यात. ते म्हणजे स्त्रीसंबंधी विचार आणि लक्ष्मीसंबंधी विचार. जिथे स्त्रीचा विचार सुद्धा आहे, तिथे धर्म तर नाहीच आणि लक्ष्मीचा विचार सुद्धा आहे, तिथेही धर्म नाही. या दोन मायांच्या आधारावर तर हे जग टिकून आहे. हो, म्हणून तिथे धर्म शोधणे हे चुकीचे आहे. तर सद्या लक्ष्मीशिवाय किती केंद्र चालत आहेत? आणि तिसरे काय? तर सम्यक् दृष्टी असली पाहिजे. तात्पर्य, लक्ष्मी आणि स्त्रीसंबंध असेल, तिथे थांबू नये. गुरु करायचे तर नीट तपासून करा. लीकेज असेल अशा व्यक्तिला गुरु पद देऊ नये. ज्याची भीक सर्व प्रकारे नष्ट झाली असेल, त्याला ज्ञानीचे पद मिळते. ज्ञानीपद केव्हा मिळते? तर सर्व प्रकारची भीक संपते तेव्हाच! किती प्रकारची भीक, लक्ष्मीची भीक, कीर्तिची भीक, विषयभोगाची भीक, शिष्यांची भीक, मंदिर बांधण्याची भीक, सर्व भीक, भीक आणि भीकच आहे. एक माणूस मला विचारतो, 'यात दुकानदाराचा दोष की ग्राहकचा दोष? मी म्हटले, 'ग्राहकांचा दोष!' दुकानदार तर कोणतेही दुकान उघडून बसेल, पण आपण समजायला नको का? संत पुरुष, तर कधी पैसे घेतच नाहीत. समोरचा दु:खी आहे म्हणून तर तो तुमच्याजवळ आला, आणि उलट तुम्ही त्याच्याकडून शंभर रुपये हिसकावून घेतले. या हिंदुस्तानला खलास केले असेल तर या अशा संतांनी! संत तर कुणाला म्हणायचे की जे आपले सुख दुसऱ्यांना देतात. सुख घेण्यासाठी आलेले नसतात. आपला हा संघ इतका चोख आहे की मी (दादाजी) तर माझ्या घरचे धोतर आणि कपडे वापरतो. संघाचे वापरले असते तर चारशेचारशेही मिळतात ना? अरे, मी घेत नाही इतकेच नव्हे, तर या (नीरू) Page #99 -------------------------------------------------------------------------- ________________ पैशांचा व्यवहार ताई सुद्धा घेत नाहीत! ह्या ताई पण माझ्याबरोबर राहतात आणि कपडेही स्वत:च्या घरचेच वापरतात. ___या दुनियेत जितके तुम्ही स्वच्छ असाल तितकी दुनिया तुमची! तुम्ही मालक आहात या जगाचे! सव्वीस वर्षांपासून मी या देहाचा मालक झालो नाही. त्यामुळे आमची संपूर्ण स्वच्छता असते! म्हणून पूर्णपणे स्वच्छ व्हा, स्वच्छ! स्वच्छता म्हणजे या जगातल्या कोणत्याही वस्तूची ज्याला गरजच नसते, भीकारीपणाच नसतो!! अजून सुद्धा पश्चाताप केला, तर याच देहात राहून पापं भस्मीभूत करू शकाल. पश्चातापाचेच सामायिक करा. कसले सामायिक ? पश्चातापाचे सामायिक, कशाचा पश्चाताप? तर म्हणे, मी लोकांकडून चुकीचे पैसे घेतले. तर ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले त्यांचे नाव घेऊन, त्यांचा चहेरा स्मरून, व्यभिचार इत्यादि केला असेल, नजर बिघडवली असेल वगैरे सर्व पापं धुवायची असली तर अजून सुद्धा धुवू शकता. लोकांचे कल्याण तर केव्हा होईल? आपण अगदी शुद्ध-स्वच्छ झालो तर! प्योरिटीच सर्वांना, सर्व जगाला आकर्षित करते! प्योरिटी !!! प्योर वस्तू जगाला आकर्षित करते. इम्प्योरिटी जगाला फंक्चर करते. म्हणून प्योरिटी आणा! जय सच्चिदानंद Page #100 -------------------------------------------------------------------------- ________________ प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ** दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्ति द्या ___ ** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे. सामायिक करण्यापूर्वीची विधि हे दादा भगवान ! हे श्री सीमंधर स्वामी प्रभू! मला शुद्ध उपयोगपूर्वक, संपूर्ण आयुष्यात झालेल्या ** दोषांचे, सामायिक, प्रतिक्रमण करण्याची शक्ति द्या. ____ मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्म, आपण प्रकट परमात्मा स्वरूप प्रभुंच्या श्रीचरणात समर्पित करीत आहे. मी मन-वचन-काया, माझ्या नावाची सर्व माया, भावकर्म-द्रव्यकर्मनोकर्मांपासून मुक्त असा शुद्धात्मा आहे. मी शुद्धात्मा आहे. (3) मी विशुद्धात्मा आहे. (3) मी परमज्योती स्वरूप सिध्द भगवंत आहे. (3) मी अनंत ज्ञानवाला आहे. (3) मी अनंत दर्शनवाला आहे. (3) मी अनंत शक्तिवाला आहे. (3) मी अनंत सुखाचा धाम आहे. (3) मी शुद्धात्मा आहे. (3) आता आपल्या आतमध्ये खोलवर उतरायचे. ** ज्या दोषांसंबंधी सामायिक करायची असेल, उदाहरणार्थ विषयविकार संबंधी दोष, क्रोध संबंधी दोष, लोभ संबंधी दोष इत्यादि.. -दादाश्री Page #101 -------------------------------------------------------------------------- ________________ संपर्क सूत्र दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद-कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9924343478 भुज : त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 अंजार : त्रिमंदिर, अंजार-मुंद्रा रोड, सिनोग्रा पाटीया जवळ, सिनोग्रा गाँव, ता-अंजार. फोन : 9924346622 मोरबी : त्रिमंदिर, पो-जेपुर (मोरबी), नवलखी रोड, ता-मोरबी, जि-राजकोट, फोन : (02822) 297097 सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर-राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9879232877 अमरेली : त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा, (जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : त्रिमंदिर, बाबरिया कोलेज जवळ, वडोदरा-सुरत हाई-वे NH-8, वरणामा गाँव. फोन : 9574001557 अहमदाबाद : दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, 17, मामानी पोळ-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली : 9810098564 कोलकता : 9830093230 चेन्नई : 9380159957 जयपुर : 9351408285 भोपाल : 9425024405 इन्दौर : 9039936173 जबलपुर : 9425160428 : 9329644433 भिलाई : 9827481336 पटना : 7352723132 अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 : 9422660497 जालंधर : 9814063043 U.S.A. : (D.B.V.I.) +1877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) UAE : +971557316937 Kenya : +254722 722 063 Singapore : +65 81129229 Australia : +61 421127947 New Zealand: +64210376434 Website : www.dadabhagwan.org रायपुर Page #102 -------------------------------------------------------------------------- ________________ दादांचे गणित हे पैसे आपण वाढवत वाढवत गेलो तर कठपर्यंत पोहोचतील? नंतर पैशांचा मी हिशोब काढला, की या जगात कुणाचाही पहिला नंबर लागलेला नाही. लोक म्हणतात की 'फोर्डचा पहिला नंबर आहे.' पण चार वर्षांनंतर कोणी दुसऱ्याचेच नाव ऐकायला मिळते. अर्थात् कुणाचाच नंबर टिकत नाही. मग विनाकारण इथे धावपळ करण्यात काय अर्थ आहे? रेसमध्ये पहिल्या नंबरच्या घोड्याला बक्षिस मिळते. दुसऱ्या-तिसऱ्याला थोडे कमी देतात. आणि मग चौथ्याने तर धाव धाव धावून, तोंडातून फेस काढत मरायचे? मी म्हटले, 'असल्या रेसकोर्समध्ये मी कशासाठी उतरु? ही माणसं तर मला चौथा, पाचवा, बारावा किंवा शंभरावा नंबर देतील! अरे, पण मग आपण कशाला धावून फेस काढायचा? फेसब काडायचा ना शेवटी? पहिला नंबर मिळवण्यासाठी धावलो आणि नंबर मिळाला बारावा, मग तर कोणी आपली दखल सुद्धा घेणार नाही. -दादाश्री ISION 978-93-86121-763 9-789386321763 Printed in India dadabhagwan.org PriceRs25