________________
पैशांचा व्यवहार
असेल तेव्हा आपले स्वागत आहे आणि जेव्हा जायची इच्छा असेल तेव्हा जावे. आपलेच घर आहे. स्वागत आहे.' एवढे आम्ही सांगतो. आम्ही विनय चुकत नाही.
२२
दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीजींना कधीही झिडकारू नये. काही जण म्हणतात की 'हमको नहीं चाहिए, लक्ष्मीजी को तो हम टच भी नहीं करते.' ते लोक लक्ष्मीजींना शिवत नाहीत त्यास हरकत नाही, पण जे अशी वाणी बोलतात, अशी भावना करतात ही जोखीम आहे. पुढचे कितीतरी जन्म लक्ष्मीशिवाय भटकावे लागेल. लक्ष्मीजी तर 'वीतराग' आहेत, 'अचेतन वस्तू' आहेत. त्यास कधीही झिडकारू नये. कुणालाही झिडकारले मग ते चेतन असो किंवा अचेतन असो, त्याची प्राप्ती होणार नाही. आम्ही 'अपरिग्रही आहोत' असे बोलायला हरकत नाही. पण 'लक्ष्मीजीला कधीही शिवणार नाही' असे बोलू नये. लक्ष्मीजी तर साऱ्या जग व्यवहाराचे ‘नाक' म्हटले जाते. 'व्यवस्थित शक्तिच्या' नियमाच्या आधारावर सर्व देवी-देवता प्रस्थापित आहेत, म्हणून कधीही त्यांचा तिरस्कार करू नये.
लक्ष्मीचा त्याग करायचा नाही, पण अज्ञानाचा त्याग करायचा आहे. काही माणसे लक्ष्मीचा तिरस्कार करतात. जर कोणत्याही वस्तूचा तिरस्कार केला तर ती वस्तू पुन्हा कधी मिळतच नाही. केवळ निस्पृह होणे, हा तर मोठा वेडेपणाच आहे.
संसारी भाव करण्यात आम्ही निस्पृही आहोत आणि आत्म्यासंबंधी भाव करण्यात सस्पृही आहोत. सस्पृही - निस्पृही असेल तरच त्याला मोक्ष मिळेल. म्हणून प्रत्येक प्रसंगाचे स्वागत करा.
काळे नाणे कशास म्हणायचे, ते समजावतो. हे पूराचे पाणी घरात घुसले तर काय आपण खुष व्हायचे की घर बसल्या पाणी आले ? मग जेव्हा पूर ओसरला की पाणी तर वाहून जाईल पण नंतर जो चिखल उरेल तो धुवून काढता, काढता तर नाकी नऊ येतील. हे काळे नाणे पूराच्या पाण्यासारखे आहे. ते रोमारोमात डंख मारुन जाईल. म्हणून मला शेठजींना सांगावे लागले की सावध राहा.