________________
पैशांचा व्यवहार
जोपर्यंत आडधंदा सुरु होत नाही तोपर्यंत लक्ष्मीजी घर सोडून जात नाही. आडधंदा म्हणजे लक्ष्मी जाण्याचे निमित्त होय !
२३
हा काळ कसा आहे ? या काळाच्या लोकांना तर कुठून माल गोळा करायचा, कसे दुसऱ्यांचे हिसकावून घ्यायचे, भेसळ करून माल कसा विकायचा, बिनहक्काचा विषय भोग करायचा, यातून सवड मिळाली तर दुसरे काही शोधणार ना? या सर्वांमुळे सुख काही वाढले नाही. सुख तर केव्हा म्हणता येईल ? मेन प्रोडक्शन केले तर. हा संसार तर बायप्रोडक्ट आहे. पूर्वी काही पुण्य केले म्हणून देह मिळाला. भौतिक वस्तू मिळाल्या, बायको मिळाली, बंगला मिळाला. जर मेहनत केल्याने मिळत असते, तर मजूराला सुद्धा मिळाले असते, पण तसे नाही. आजच्या लोकांची चुकीची समजूत झाली आहे. म्हणून हे बायप्रोडक्शनचे कारखाने सुरु झाले आहेत. बायप्रोडक्शनचा कारखाना सुरु करायचा नसतो. मेन प्रोडक्शन, म्हणजेच 'ज्ञानीपुरुषां' कडून मोक्षाचे साधन प्राप्त करून घेतले की मग संसाराचे बायप्रोडक्शन तर आपसूकच फुकटात मिळेल. बायप्रोडक्शनसाठी तर अनंत अवतार वाया घालवले, दुर्ध्यान करून ! एकदा मोक्ष प्राप्त झाला की सगळा घुमाकूळ संपेल !
या भौतिक सुखापेक्षा अलौकिक सुख मिळवायला हवे की ज्या सुखाने आपल्याला तृप्ती मिळेल. या लौकिक सुखाने तर उलट मनस्ताप वाढतो. ज्या दिवशी पन्नास हजाराची विक्री होते ना, तेव्हा नोटा मोजूनमोजूनच माणूस थकून जातो. डोके असे फिरते की खाणे-पिणे सुद्धा नकोसे वाटते. कारण मला पण विक्रीचा पैसा मिळत होता, ते मी पाहिले होते, की तेव्हा डोक्याची काय स्थिती होत असते ! हे सर्वच मी अनुभवले आहे. मी तर हा समुद्र पोहून बाहेर निघालोय, त्यामुळे मला हे सर्व कळते की तुम्हाला काय होत असेल. जास्त रुपये आले की जास्त गुदमरायला होते, मेंदू डल (मंद) होऊन जातो आणि काहीच आठवत नाही, बैचेनी, बैचेनी होत राहते. हे तर नोटाच मोजत राहतात, पण त्या नोटा सर्व इथल्या इथेच पडून राहिल्या आणि मोजणारे मात्र निघून गेले ! नोटा तर सांगतातच, 'की तुला समजून घ्यायचे असेल तर समजून घे की, 'आम्ही (इथेच ) राहू आणि तू जाशील!' म्हणून आपण त्याच्याशी वैर बांधायचे नाही, पैशाला