________________
पैशांचा व्यवहार
सांगावे की, 'आपण यावे' कारण त्याची गरज आहे! सर्वांचीच गरज आहे ना? पण त्यामागेच तन्मायाकार राहिलो, तर मोजाणारे गेले आणि पैसे राहिले. तरीपण मोजावे तर लागतेच, मोजल्याशिवाय तर गत्यंतरच नाही ना? एखादाच असा शेठ असेल की जो त्याच्या मुनिमला सांगतो की 'बाबा, मला जेवताना अडचण करू नका, पैसे आले तर तुम्ही निवांतपणे मोजून तिजोरीत ठेवा आणि तिजोरीतून घ्या.' त्यात दखल करीत नाही, असा शेठ क्वचितच असेल ! हिंदुस्तानात असे दोन-चार शेठ असतील, जे निर्लेप राहू शकतात! ते माझ्यासारखे! मी कधीही पैसे मोजत नाही!! हा कसला नसता व्याप!! आज वीस-वीस वर्षे झाली, मी लक्ष्मी हातात घेतली नाही. त्यामुळेच तर इतका आनंदात असतो ना!
जोपर्यंत व्यवहार आहे, तोपर्यंत लक्ष्मीजींची आवश्यकता आहे, हे मान्य आहे परंतु त्यात तन्मयाकार होऊ नका. तन्मयाकार नारायणाशी व्हायचे, फक्त लक्ष्मीजींच्याच मागे लागलो तर नारायण चिडतील. लक्ष्मीनारायणाचे तर देऊळ आहे ना! लक्ष्मी काही सर्व सामान्य वस्तू आहे ?
पैसे कमावताना जसा आनंद होतो, तसाच आनंद खर्च करताना सुद्धा झालाच पाहिजे. पण तेव्हा तर म्हणतो की, 'इतके सारे पैसे खर्च झाले!'
____ पैसे खर्च होऊन जातील अशी जागृती ठेवायचीच नाही. म्हणून (चांगल्या कामासाठी) पैसे वापरा असे म्हटले आहे, की ज्याने लोभवृत्ती सूटेल, आणि पुन्हा पुन्हा दिले जातील.
भगवंतांनी सांगितले हिशोब करत बसू नका. भविष्यकाळाचे ज्ञान असेल तरच हिशोब करा. अरे, तुला हिशोबच करायचा असेल तर उद्या मेलो तर! असा हिशोब कर की?!
रुपयांचा नियम असा आहे की ते काही काळापर्यंत टिकणार आणि मग निघून जाणार. जाणार म्हणजे जाणारच. रुपया फिरतच राहतो, मग तो फायदा घेऊन येईल, नुकसान घेऊन येईल, किंवा व्याजही घेऊन येईल, पण फिरत तर राहणारच. तो बसून राहत नाही. तो स्वभावानच चंचल आहे. त्यामुळे जेव्हा हा वर चढतो(धनवान होतो) तेव्हा त्याला फसल्यासारखे वाटते. उतरताना मात्र कठीण होते. चढताना तर हौशीने,